Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by वामन देशमुख on Tue, 04/01/2025 - 10:46
सर्व मिपाखरांना नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! हे वर्ष सर्वांना सुख, समाधान, समृद्धीचे जावो ही श्रीचरणी प्रार्थना. भूकंपाने म्यानमारचे प्रचंड नुकसान झालेलं आहे. ऑपरेशन ब्रह्मा द्वारे भारत शक्य ती मदत करत आहे. महामार्गांवरील टोल हा वाहनचालकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. आजपासून टोल कुठे वाढलाय तर तुरळक कुठे कमी देखील झालाय!
  • समृद्धी महामार्गावर टोल वाढला.
  • महामार्ग ६५ वर हैदराबाद-विजयवाडा दरम्यान टोल कमी झाला!
ट्रम्प च्या टॅरिफ मुळे जगभरातील बाजार सध्या दोलायमान अवस्थेत आहेत. राजकीय आघाडीवर, या वर्षी बिहारात विधानसभा निवडणुका होत आहेत. दिल्ली जिंकल्यामुळे भाजप जोमात आहे आणि त्यांनी बिहार विधानसभा निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केले आहे. 'फिर से नितीश' हा एनडीए चा नारा आहे. तर आम्ही इंडीया ब्लॉक म्हणून लढू; मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याचा निर्णय हा "सामूहिक निर्णय" असेल.असे काँग्रेसने म्हटले आहे.
  • एनडीए
  • इंडिया
--- नवीन वर्षात व्यासंगी, विद्वान, अभ्यासू, प्रामाणिक मिपाखरांना लेखन-चर्चन करण्याचे पोषक वातावरण आणि म्हणून प्रेरणा मिळेल ही अपेक्षा. - द्येस्मुक् राव्
  • Log in or register to post comments
  • 37220 views

प्रतिक्रिया

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Mon, 04/07/2025 - 15:25

In reply to अबा - खुपच जातीयवादी होत आहात ..... by कोण

Permalink

माझे म्हणणे हेच आहे की काही

माझे म्हणणे हेच आहे की काही लोक गुन्हेगार कोण? हॉस्पिटल कोणते हे पाहून त्यांची बाजू घेतात असे ते का करतात? मीपावरही हाच अनुभव आलाय! त्यावर लिहिले तर जातीवादी होतय अस कस? वाईटाला वाईट म्हणायला काही लोकाना धाड का भरते?
  • Log in or register to post comments

Submitted by कोण on Mon, 04/07/2025 - 15:14

In reply to कुरुळकर असो की मंगेशकर by अमरेंद्र बाहुबली

Permalink

तुमच्याच प्रमाणानुसार "मनूवादी" होत आहात.

तुमच्याच प्रमाणानुसार "मनूवादी" होत आहात.
  • Log in or register to post comments

Submitted by आग्या१९९० on Mon, 04/07/2025 - 11:10

Permalink

बाईकवरून ऑनलाईन डिलिव्हरी

बाईकवरून ऑनलाईन डिलिव्हरी करणारे एक हातात मोबाईल घेऊन पत्ते शोधत वेळेत डिलिव्हरी करण्यासाठी, हायवे वरून सुसाट पळत असतात, कुठल्याही गल्लीतून उलट दिशेने अचानक येऊन धोकादायक पद्धतीने आपल्यासमोरून क्रॉस करतात. आपणच सावध रहावे. त्यांना स्वतःच्या किंवा दुसऱ्याच्या जीवाची पर्वा नसते. बेकारीची कमाल आहे ही.
  • Log in or register to post comments

Submitted by आग्या१९९० on Mon, 04/07/2025 - 11:12

Permalink

मंगेशकर रुग्णालय दोषी

मंगेशकर रुग्णालय दोषी ठरल्यापासून त्याची तळी उचलणारे असे गायबलेत जसे डेव्हिड धवनच्या सिनेमातून गोविंदा! हा हा हा.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Mon, 04/07/2025 - 11:17

Permalink

टाटा-बिर्लांंच्या जागी अदानी

टाटा-बिर्लांंच्या जागी अदानी-अंबानी टाकलेत. बाकी कार्यपद्धती तीच, आरोप तेच, आरोप करणारेही तेच. तेच ते आणि तेच ते. असो.
  • Log in or register to post comments

Submitted by युयुत्सु on Mon, 04/07/2025 - 11:38

Permalink

दिनानाथ समोर चाललेले आंदोलन

दिनानाथ समोर चाललेले आंदोलन बघता मी काही दिवसांपूर्वी मटा०मध्ये लिहीलेला लेख परत आठवला. अलिकडे घडलेली काही "अवमान" प्रकरणे आणि त्यावर समाजाने दिलेल्या प्रतिक्रिया बघता समाजातला विवेक संपला आहे हे निश्चित! त्याची पुनर्स्थापना पण मला अवघड वाटते. मग एकच काळजी भेडसावते - हा देश विनाशाकडे चालला आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by युयुत्सु on Mon, 04/07/2025 - 11:38

In reply to दिनानाथ समोर चाललेले आंदोलन by युयुत्सु

Permalink

(No subject)

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Mon, 04/07/2025 - 12:35

In reply to दिनानाथ समोर चाललेले आंदोलन by युयुत्सु

Permalink

सहमत आहे. दिवसेंदिवस आपण

सहमत आहे. दिवसेंदिवस आपण जास्त अप्रगल्भ होतोय.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Mon, 04/07/2025 - 13:04

In reply to दिनानाथ समोर चाललेले आंदोलन by युयुत्सु

Permalink

त्यावर समाजाने दिलेल्या

त्यावर समाजाने दिलेल्या प्रतिक्रिया बघता समाजातला विवेक संपला आहे हे निश्चित! गल्ली ते दिल्ली भाजपची सत्ता असल्याने विशिष्ट वळवळी लोक मग गिळून गप्प झालीत!
  • Log in or register to post comments

Submitted by स्वधर्म on Mon, 04/07/2025 - 17:23

In reply to दिनानाथ समोर चाललेले आंदोलन by युयुत्सु

Permalink

हेच म्हणावेसे वाटते

कुठलेही क्षेत्र घ्या, काहीतरी सकारात्मक वाचायला, पहायला मिळेल म्हणून पेपर, युट्यूब, इतर समाजमाध्यमे यावर जातो, तो अधिकच नकारात्मक गोष्टी समोर येऊ लागतात. सध्याच्या राज्य व केंद्र सरकारकडे पाहून आशा वाटेनाशी झालीय. आरोग्य विभागाची मागणी ११ हजार कोटींची होती म्हणे, त्यांना केवळ ३ हजार कोटी दिले या अर्थसंकल्पात. शिक्षणाचे तसेच, शेतकर्‍यांना पण कर्जमाफी नाकारली आहे. क्रुषी विभागातले घोटाळे दमानिया यांनी पुढे आणले, ते विसरवण्यासाठी हलाल - झटका, कबर इ. पुढे आणली. टेरिफवर बोलती बंद, वक्फ बील आणले. काही सकारात्मक दिसण्याची केवळ आशा...
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Mon, 04/07/2025 - 13:29

Permalink

मंगेशकर रुग्णालय प्रकरणात

मंगेशकर रुग्णालय प्रकरणात अनेक राजकारण्यांनी उडी मारल्याने यातून काहीही निष्पन्न होण्याची शक्यता पूर्णपणे संपली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Mon, 04/07/2025 - 13:32

In reply to मंगेशकर रुग्णालय प्रकरणात by श्रीगुरुजी

Permalink

त्यातल्या त्यात मेधा

त्यातल्या त्यात मेधा कुलकर्णींनीच एक भूमिका घेतली आहे. मतदारसंघाचा आमदार असूनही चंपा अज्ञातवासात आहे
  • Log in or register to post comments

Submitted by रामचंद्र on Mon, 04/07/2025 - 18:27

In reply to त्यातल्या त्यात मेधा by श्रीगुरुजी

Permalink

चांगलं निरीक्षण! याबद्दल

चांगलं निरीक्षण! याबद्दल कोणीच काही बोललं नव्हतं!
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Mon, 04/07/2025 - 18:53

In reply to चांगलं निरीक्षण! याबद्दल by रामचंद्र

Permalink

मुरलीधर मोहोळांनी किंवा

मुरलीधर मोहोळांनी किंवा पुण्यातील इतर आमदारांनी काही भूमिका घेतली आहे का याची कल्पना नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by आंद्रे वडापाव on Mon, 04/07/2025 - 16:29

Permalink

(No subject)

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by कानडाऊ योगेशु on Mon, 04/07/2025 - 19:43

Permalink

हॉस्पिटल ,सरकारी कार्यालये

हॉस्पिटल ,सरकारी कार्यालये,बॅ़का इथे जर आतली ओळख असेल तर सेवा चांगली मिळते हा अनुभव आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by रामचंद्र on Tue, 04/08/2025 - 00:53

In reply to हॉस्पिटल ,सरकारी कार्यालये by कानडाऊ योगेशु

Permalink

ससूनबद्दल हे पूर्वीपासून ऐकून

ससूनबद्दल हे पूर्वीपासून ऐकून आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Mon, 04/07/2025 - 23:30

Permalink

दीनानाथ रुग्णालयात तनिषा भिसे

दीनानाथ रुग्णालयात तनिषा भिसे यांना उपचाराविना साडेपाच तास बसवून ठेवलं, सीसीटीव्ही आलं समोर - https://www.saamana.com/tanisha-bhise-not-treated-first-five-hour-in-deenanath-mangeshkar-hospital-cctv/
  • Log in or register to post comments

Submitted by रात्रीचे चांदणे on Mon, 04/07/2025 - 23:38

In reply to दीनानाथ रुग्णालयात तनिषा भिसे by अमरेंद्र बाहुबली

Permalink

साडे पाच तास ते तरी का थांबले

साडे पाच तास ते तरी का थांबले? दुसरीकडे प्रयत्न करायला पाहिजे होते. रुग्णालयाविरोधात कारवाई होण्याची शक्यता कमी वाटतेय.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Mon, 04/07/2025 - 23:44

In reply to साडे पाच तास ते तरी का थांबले by रात्रीचे चांदणे

Permalink

रुग्णालयाविरोधात कारवाई

रुग्णालयाविरोधात कारवाई होण्याची शक्यता कमी वाटतेय. संघाची यंत्रणा नी भाजपची सत्ता म्हणून का? म्हणजे भाजपच्या राज्यात गुन्हेगारांना शिक्षा नाहीच!
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Tue, 04/08/2025 - 00:10

Permalink

सर्व ३६५ दिवस हाच निर्णय हवा.

Image removed. सर्व ३६५ दिवस हाच निर्णय हवा.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Tue, 04/08/2025 - 00:11

In reply to सर्व ३६५ दिवस हाच निर्णय हवा. by श्रीगुरुजी

Permalink

का? मांसाहारीनी काय खावे मग?

का? मांसाहारीनी काय खावे मग?
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Tue, 04/08/2025 - 00:14

In reply to का? मांसाहारीनी काय खावे मग? by अमरेंद्र बाहुबली

Permalink

खरं तर हे मी लिहिलेय पण

खरं तर हे मी लिहिलेय पण प्राण्यांची खाण्यासाठी होणारी कत्तल मलाच पाहवत नाही! लहानपणी एकदा बोकडाच पिलू मारताना पाहिले होते, त्यानंतर कित्येक वर्षे मी नॉनव्हेज खाल्ले नाही. नंतर कधीतरी मी भावनाशून्य झालो नी परत खा खा करू लागलो! :(
  • Log in or register to post comments

Submitted by रामचंद्र on Tue, 04/08/2025 - 00:59

In reply to खरं तर हे मी लिहिलेय पण by अमरेंद्र बाहुबली

Permalink

परिचयातील बहुतेक सर्वच

परिचयातील बहुतेक सर्वच (खासकरून ब्राह्मण) कट्टर हिंदुत्ववादी हे सात्त्विक सणासुदीलाही आवडीने मांसाहार करणारे आहेत! यानुसार तुम्हालाही कडवे हिंदुत्ववादी म्हटलं पाहिजे!
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Tue, 04/08/2025 - 01:04

In reply to परिचयातील बहुतेक सर्वच by रामचंद्र

Permalink

मी हिंदुत्ववादीच आहे, पण

मी हिंदुत्ववादीच आहे, पण मनुवादी नाही! काही मनुवादी स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेतात नी पवार ठाकरे वगैरेंचा द्वेष करत सुटतात!
  • Log in or register to post comments

Submitted by आंद्रे वडापाव on Tue, 04/08/2025 - 08:57

In reply to परिचयातील बहुतेक सर्वच by रामचंद्र

Permalink

साधारण आजपासून १२००० ते १५०००

साधारण आजपासून १२००० ते १५००० वर्ष्यापुर्वी शेतीचा शोध लागला आणि नियमितपणे मग ज्याला आपण शुद्ध शाकाहारी म्हणतो (खरं तर आजचा अतिकार्बोदके आहार) ते सुरु झालं... खरा शाकाहारी फक्त "ऋषी मुनी"/ जैन साधू वैगरे कि जे फक्त आणि फक्त कंदमुळं फळ खाऊन जगतात ... त्याला शाकाहार (शाक + आहार ) म्हणतात ... आजकाल शाकाहाराची नाटकं करणारी लोकच जास्ती झालीत ... Rigveda (10.87.4): "Māṃsaṃ bhakṣyāma / Yajñasya devatā yajñasya vai śreṣṭhaḥ" - "We shall eat flesh, for the deity of sacrifice is the best." Rigveda (1.162.18): "Gāvo 'dhyāyāt / Gāvo 'dhyāyāt" - "The cow is to be sacrificed, the cow is to be sacrificed." तर शेतीचा शोध लागण्यापूर्वी मानव जात निर्माण होई पर्यंत बहुतेक तो शिकार करूनच उदर निवार्ह करायचा ... मग यात आजच्या सर्वांचे पूर्वज आले ... "आज जरी ते नाक मुरडून "शुद्ध्ह शांकांहांरीं" म्हणून मिरवत असले तरीही ...
  • Log in or register to post comments

Submitted by आंद्रे वडापाव on Tue, 04/08/2025 - 08:56

In reply to का? मांसाहारीनी काय खावे मग? by अमरेंद्र बाहुबली

Permalink

साधारण आजपासून १२००० ते १५०००

साधारण आजपासून १२००० ते १५००० वर्ष्यापुर्वी शेतीचा शोध लागला आणि नियमितपणे मग ज्याला आपण शुद्ध शाकाहारी म्हणतो (खरं तर आजचा अतिकार्बोदके आहार) ते सुरु झालं... खरा शाकाहारी फक्त "ऋषी मुनी"/ जैन साधू वैगरे कि जे फक्त आणि फक्त कंदमुळं फळ खाऊन जगतात ... त्याला शाकाहार (शाक + आहार ) म्हणतात ... आजकाल शाकाहाराची नाटकं करणारी लोकच जास्ती झालीत ... Rigveda (10.87.4): "Māṃsaṃ bhakṣyāma / Yajñasya devatā yajñasya vai śreṣṭhaḥ" - "We shall eat flesh, for the deity of sacrifice is the best." Rigveda (1.162.18): "Gāvo 'dhyāyāt / Gāvo 'dhyāyāt" - "The cow is to be sacrificed, the cow is to be sacrificed."
  • Log in or register to post comments

Submitted by रामचंद्र on Tue, 04/08/2025 - 02:27

In reply to सर्व ३६५ दिवस हाच निर्णय हवा. by श्रीगुरुजी

Permalink

किमान योगीजींकडून याचं पालन

किमान योगीजींकडून याचं पालन होण्याची आशा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Tue, 04/08/2025 - 10:26

In reply to सर्व ३६५ दिवस हाच निर्णय हवा. by श्रीगुरुजी

Permalink

=))

सर्व ३६५ दिवस हाच निर्णय हवा.
=)) कहा कहा से आते है यार ये लोग. =)) -दिलीप बिरुटे ( फक्त गाजर ए कोबीचा फॅन )
  • Log in or register to post comments

Submitted by आग्या१९९० on Tue, 04/08/2025 - 10:29

In reply to =)) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

३६५ दिवस त्यांचे आणि ३६५

३६५ दिवस त्यांचे आणि ३६५ रात्र ह्यांची.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 04/09/2025 - 10:53

In reply to सर्व ३६५ दिवस हाच निर्णय हवा. by श्रीगुरुजी

Permalink

मुळात हे जाहीर आवाहन आहे.

मुळात हे जाहीर आवाहन आहे. शासकीय अध्यादेश नव्हे
  • Log in or register to post comments

Submitted by आग्या१९९० on Tue, 04/08/2025 - 00:39

Permalink

शाळेत असताना मृत्युंजय वाचले

शाळेत असताना मृत्युंजय वाचले होते. त्यात कवचकुंडले हिरावून घेतलेल्या कर्णाला युद्धात अर्जुन क्रूरपणे तीक्ष्ण बाण जिभाळी मारण्याचे वर्णन वाचून कसेसेच वाटले होते. मनुष्य मनुष्याला इतक्या क्रूरपणे मारत असेल तर इतर प्राणी कोणत्याही पद्धतीने मारताना बघताना मला कधीच त्रास झाला नाही, खाताना तर अजिबात होत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Tue, 04/08/2025 - 00:44

In reply to शाळेत असताना मृत्युंजय वाचले by आग्या१९९०

Permalink

माणूस माणसाला मारतो त्यामागे

माणूस माणसाला मारतो त्यामागे कारण असते, पण प्राणी बिचारा मुका! का मारावे त्याला? असो. प्रोटीनची गरज म्हणून मी भावना बाजूला ठेऊन चिकन खातो, व्हेज मध्ये पर्याय मर्यादित नी हाटेल वगैरे उपलब्ध नसलेले, पनीर तर सर्रास डुप्लिकेट!
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 04/09/2025 - 10:52

In reply to माणूस माणसाला मारतो त्यामागे by अमरेंद्र बाहुबली

Permalink

प्रोटीनची गरज म्हणून मी भावना

प्रोटीनची गरज म्हणून मी भावना बाजूला ठेऊन चिकन खातो भुजबळ बुवा यांच्या मूलभूत गैरसमजांपैकी हा अजून एक
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 04/11/2025 - 09:31

In reply to प्रोटीनची गरज म्हणून मी भावना by सुबोध खरे

Permalink

काय म्हणता ?

डॉक्टरसाहेब, आपण म्हणजे मिपावरील ज्ञानाचा सागर. फक्त इतके सांगा की चिकनमधे प्रोटीन असतात की नाही. चिकन आहारात असावे की नसावे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Fri, 04/11/2025 - 09:39

In reply to काय म्हणता ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

भावना बाजूला ठेवून चिकन अन्न

भावना बाजूला ठेवून चिकन अन्न म्हणून मुळीच खाऊ नये तर त्याच्या चवीसाठी आणि स्वादासाठी खावे. प्रोटीनसाठी खायचे असतील तर अनेक स्वस्त पर्याय उपलब्ध आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Sat, 04/12/2025 - 11:57

In reply to माणूस माणसाला मारतो त्यामागे by अमरेंद्र बाहुबली

Permalink

अबा, पनीर घरी अगदी सहज बनते

पनीर तर सर्रास डुप्लिकेट!
घरी अगदी सहज आणि कमी वेळात बनते पनीर. दीड लीटर दुधाचे अंदाजे दोनशे तीस ग्राम बनते. बाजारात तयार पनीर (इथे इंदुरात) ४०० रुपये किलो मिळते, म्हणजे किंमत तीच पडत असली तरी खात्रीशीर आणि ताजे.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Sat, 04/12/2025 - 12:20

In reply to अबा, पनीर घरी अगदी सहज बनते by चित्रगुप्त

Permalink

अरे वा! हाटलीतले नका खाऊ!

अरे वा! हाटलीतले नका खाऊ!
  • Log in or register to post comments

Submitted by आंद्रे वडापाव on Sat, 04/12/2025 - 13:19

In reply to अरे वा! हाटलीतले नका खाऊ! by अमरेंद्र बाहुबली

Permalink

पनीरात भेसळ होऊ शकते ...

पनीरात भेसळ होऊ शकते ... तशी दुधात पण भेसळ होऊ शकते ... (होऊ शकते काय ? होतेच अन काय ....! घाबरतोय कि काय कोण .. ) गाय म्हशीने जास्त दूध द्यावे म्हणून सर्रास त्यांना हार्मोन्स ची भरमसाठ इंजेक्शने टोचतात ... तसलं दुध पिऊन , या गेल्या काही वर्ष्यातील मुली (जेन झी), लवकर वयात येतात व त्यांना मासिक पाळी खूप लवकर सुरु होते ... असे एक ओळखीतले वैद्यराज म्हणत होते ब्वा ... डाळी आपण परदेशातून आयात करतो (म्हणजे भरपूर परकीय चलन खर्च करतो )... मोदीजी म्हणत होते ... कि लोकांनी आहारातून डाळ कमी केली पाहिजे ... (म्हणजे एक प्रकारे परकीय चलन वाचवून आपण देशसेवा करू ... )
  • Log in or register to post comments

Submitted by आंद्रे वडापाव on Sat, 04/12/2025 - 13:43

In reply to पनीरात भेसळ होऊ शकते ... by आंद्रे वडापाव

Permalink

हार्मोन्स ची भरमसाठ इंजेक्शने

हार्मोन्स ची भरमसाठ इंजेक्शने टोचतात ... तसलं दुध पिऊन , या गेल्या काही वर्ष्यातील मुली (जेन झी), लवकर वयात येतात व त्यांना मासिक पाळी खूप लवकर सुरु होते ... असे एक ओळखीतले वैद्यराज म्हणत होते ब्वा ...
शिवाय ते म्हणत होते... आधीच्या पिढीत मुलगी (समजा १७-१८ वर्षाची) तिचे जे फिजिकल फिचर डेव्हलपमेंट व्हायचे... तसे फिजिकल फिचर आताच्या मुलींना १२ , १३ वयातच होते....
  • Log in or register to post comments

Submitted by आग्या१९९० on Sat, 04/12/2025 - 13:47

In reply to पनीरात भेसळ होऊ शकते ... by आंद्रे वडापाव

Permalink

आपण तर बुवा सरकारचे डोके खातो

आपण तर बुवा सरकारचे डोके खातो आणि परकीय चलन वाचवतो. तरीसुद्धा भक्तांना आमचे कौतुक वाटत नाही. उलट अंगावर धावून येतात.
  • Log in or register to post comments

Submitted by आंद्रे वडापाव on Sat, 04/12/2025 - 15:41

In reply to आपण तर बुवा सरकारचे डोके खातो by आग्या१९९०

Permalink

मग काय करावं त्यांनी?? एकतर

मग काय करावं त्यांनी?? एकतर दुर्मिळ गोष्टींचे आपण भक्षण करता... चिडचिड तर होणार नं त्यांची....
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Sat, 04/12/2025 - 15:42

In reply to आपण तर बुवा सरकारचे डोके खातो by आग्या१९९०

Permalink

खिक्क! भक्तच ते! :)

खिक्क! भक्तच ते! :)
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Tue, 04/08/2025 - 05:57

Permalink

आमटी भाकरी खाऊन उन्हात

आमटी भाकरी खाऊन उन्हात फिरणारा गुराखी आणि व्हेज प्रोटिन खाऊन दांडगा झालेला मनुष्य यांच्यात कुस्ती झाली तर कोण भारी पडेल? मागे एकदा एका महाराजांचे चरित्र वाचले होते. लेले महाराज म्हणून त्यांना लोक पुढे ओळखू लागले. तरुण असतांना ते कुस्ती शिकवत असत. एकदा त्यांच्या आईने उसाचा रस आणून दे सांगितले तर ते उस घेऊन आले. आई म्हणाली "अरे मला आता दात आहेत का ऊस सोलून खायला?" तर हे म्हणाले तुला रस पाहिजे ना म्हणून ऊस आणलाय. मग त्यांनी हातांनीच ऊस पिळून लगेच ताजा रस काढून दिला.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Tue, 04/08/2025 - 07:54

In reply to आमटी भाकरी खाऊन उन्हात by कंजूस

Permalink

प्रथिने अनेक शाकाहारी

प्रथिने अनेक शाकाहारी पदार्थात मोठ्या प्रमाणात असतात.
  • Log in or register to post comments

Submitted by आग्या१९९० on Tue, 04/08/2025 - 08:51

In reply to प्रथिने अनेक शाकाहारी by श्रीगुरुजी

Permalink

ती सर्वांना परवडणाऱ्या दरात

ती सर्वांना परवडणाऱ्या दरात सहज उपलब्ध असतील असे नाही. त्यामुळे गैरशाकाहारातून ती भागवली जाते. डासाची मादी संधी मिळाल्यास रक्तातून प्रोटीनची गरज भागवते.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 04/09/2025 - 10:43

In reply to ती सर्वांना परवडणाऱ्या दरात by आग्या१९९०

Permalink

"ती सर्वांना परवडणाऱ्या दरात

"ती सर्वांना परवडणाऱ्या दरात सहज उपलब्ध असतील असे नाही. त्यामुळे गैरशाकाहारातून ती भागवली जाते. डासाची मादी संधी मिळाल्यास रक्तातून प्रोटीनची गरज भागवते." मूलभूत गैरसमज. चिकन मध्ये २७ ग्राम प्रथिनेअसतात आणि त्याची किंमत साधारण २०० रुपये किलो आहे. Pulses like lentils, chickpeas, black beans, and peas are excellent plant-based protein sources, typically containing 21-25% protein by dry weight, सोयाबीन मध्ये ३६% प्रथिने असतात. यांची किंमत साधारण ६० ते १०० रुपये किलो आहे. ७४ रुपये लिटर असेलल्या अमूल म्हशी च्या १ लिटर दुधात ५० ग्राम प्रथिने असतात. थोडा फार फेरफार केला तरी शाकाहारी आहारातील प्रथिने जास्त स्वस्त असतात. जगातील सर्वात बलाढ्य तीन प्राणी घेतले तर ते पूर्ण शाकाहारी आहेत. उदा हत्ती गेंडा आणि रानरेडा. मर्कट गटातील सर्वात शक्तीशाली असलेले गोरिला सुद्धा पूर्ण शाकाहारी आहेत. मांसाहार हा जास्त शक्तिदायक असतो हा गैरसमज मुघल आणि नंतर इंग्रज राज्यकर्त्यानी एतद्देशीय लोकांच्या मनात न्यूनगंड निर्माण करण्यासाठी मुद्दाम पसरवलेला आहे आणि त्यांची पिलावळ आजही हा गैरसमज पसरवताना आढळते. कोणी काय खावे हा माझ्या दृष्टीने गौण आणि वैयक्तिक मुद्द्दा आहे आणि गोमांस खाण्यावर बंदी आणावी असेही मला वाटत नाही. परंतु मांसाहार हा जास्त पौष्टिक आणि चांगला असतो हा मुद्दाम पस्रवलेला गैरसमज आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by आग्या१९९० on Wed, 04/09/2025 - 11:14

In reply to "ती सर्वांना परवडणाऱ्या दरात by सुबोध खरे

Permalink

ती सर्वांना परवडणाऱ्या दरात

ती सर्वांना परवडणाऱ्या दरात सहज उपलब्ध असतील असे नाही. दुर्गम भागात महागड्या डाळी आर्थिक परिस्थितीमुळे परवडत नाही, त्यामुळे गाई, शेळीपालन, परसातील कुक्कुटपालन, आणि वराहपालन केले जाते. ह्यात हे पाळीव पक्षीप्राणी आजुबाजूच्या जंगलातून, परिसरातून आपले खाद्य मिळवतात. त्यामुळे रोज मिळणारे दुध आणि अंडी ह्यातून प्रोटीनची गरज भागवली जाते. डुक्कर आणि कोंबड्याच्या मांसातूनही प्रोटीन उपलब्ध होते तेही डाळींच्या तुलनेत कमी खर्चात . बाकी कुठले प्रोटीन शरीराल योग्य हे शरीरच ठरवेल.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Wed, 04/09/2025 - 12:10

In reply to ती सर्वांना परवडणाऱ्या दरात by आग्या१९९०

Permalink

ती सर्वांना परवडणाऱ्या दरात

ती सर्वांना परवडणाऱ्या दरात सहज उपलब्ध असतील असे नाही. शाब्दिक कोलांट्या कितीही मारा दुर्गम भागात महागड्या डाळी आर्थिक परिस्थितीमुळे परवडत नाही. हे आपण कसं ठरवलं? आरामखुर्चीत बसून टंकलेखन केलं कि असा होतंय. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात लोक मोठ्या प्रमाणात शाकाहारी आहेत. आणि तेथे अत्यंत दुर्गम भागात सुद्धा भट (सोयाबीन) गेहट ( कुळीथ ) आणि अनेक तर्हेचे राजमा या डाळी मोठ्या प्रमाणात पिकवल्या आणि खाल्या जातात. ते दुसऱ्या महागड्या डाळी कशाला विकत घ्यायला जातील? तेथे ७५ % लोक मांसाहारी आहेत. परंतु रोजच्या भोजनात डाळींचाच मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. रागी किंवा नाचणी यात १३ टक्के प्रथिने असतात. ती आणि एखादे वरील कडधान्य हे रोजच्या जेवणात असतं आणि मांसाहार मधून मधून प्रसंगानुरूप केला जातो. बाकी कुठले प्रोटीन शरीराला योग्य हे शरीरच ठरवेल. शरीर कसं काय ठरवणार? प्रथिनांचा उत्तम स्रोत म्हणून कीटक सुद्धा खाता येतात. They’re Healthy. They’re Sustainable. So Why Don’t Humans Eat More Bugs? https://time.com/5942290/eat-insects-save-planet/ आपण खातो का? कारण आपल्याला हि कल्पनासुद्धा सहन होत नाही. थायलंड व्हिएतनाम इ आशियाई देशात भाजलेले उंदीर, टोळ नाकतोडे, बीटल्स सारखे कीटक आणि अळ्या , बेडूक सर्प सुद्धा रस्त्यावर विकायला ठेवलेले असतात. त्याच्या कडे पाहून आपल्याला किळस येते. कोण काय खातं हे ज्याच्या त्याच्या सामाजिकआणि वैचारिक स्थिती आणि समजुतीवर अवलंबून असतं.
  • Log in or register to post comments

Submitted by आग्या१९९० on Wed, 04/09/2025 - 14:06

In reply to ती सर्वांना परवडणाऱ्या दरात by सुबोध खरे

Permalink

शाब्दिक कोलांट्या कितीही मारा

शाब्दिक कोलांट्या कितीही मारा घाईघाईत प्रतिसाद देण्यापूर्वी समोरच्याने काय लिहिले हे नीट वाचत चला. चूक दाखवली की उसळता हे नेहमीचेच आहे. हे आपण कसं ठरवलं? मी आरामखुर्चीत बसून तुमच्यासारखे गुगल करून अर्धवट माहिती मिळवत नाही . माझा प्रत्यक्ष समाजवावराचा आवाका आणि अभ्यास तुमच्यापेक्षा अधिक आहे. त्यामुळे आर्थिक घटकाचा उल्लेख केला. तुम्हाला योग्य प्रतिवाद करता आला नाही म्हणून संतापला. प्रथिनांचा उत्तम स्रोत म्हणून कीटक सुद्धा खाता येतात. आजही ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागात आठवडे बाजारात मुंग्यांच्या ( मोठ्या लाल मुंग्या ) अंड्यांचे वाटे विकायला ठेवलेले असतात. पौष्टिक असतात ही अंडी. ह्याची चटणी मी खाल्ली आहे, खुप चवदार असते. अर्थात हे तुम्हाला माहित नसणारच.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • पान 6
  • पान 7
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com