Skip to main content

ताज्या घडामोडी - जून २०२२ (भाग २)

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी शनिवार, 18/06/2022 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात २५० प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. आधीच्या भागातील चर्चेसंदर्भात प्रतिसाद द्यायचा असल्यास त्या भागात आणि नवीन काही लिहायचे असल्यास या भागात लिहावे ही विनंती. लोकप्रिय व्यक्तीमत्व अभिजीत बिचुकले यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उडी घ्यायचे ठरविले आहे. विविध राज्यातील १०० आमदारांचा पाठिंबा मिळविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. आपल्याला राज्यघटना आणि कायदा याची चांगली जाण असून आपण राष्ट्रपती व्हायला योग्य आहोत असा त्यांचा दावा आहे. आपली राष्ट्रपती व्हायची इच्छा आहे हे त्यांनी मागच्या वेळेस मोदींना सांगितले होते पण आयत्या वेळेस मोदींनी रामनाथ कोविंदांचे नाव पुढे आणल्याने त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला असे दिसते. असो. अभिजीत बिचुकलेंना हार्दिक शुभेच्छा. २५ जुलै रोजी नवे राष्ट्रपती म्हणून ते शपथ घेताना दिसतील का? आणखी एक मराठी व्यक्ती राष्ट्रपती झाल्यास त्याचा आपल्या सगळ्यांनाच आनंद व्हायला हवा :) Bichukale

वाचने 46247
प्रतिक्रिया 216

प्रतिक्रिया

एकच पक्ष येणे कठीण आणि स्थानिक पक्षांची मदत घेऊन युती करावी लागणार. मग मध्यावधीमध्ये खर्च करूनही पुन्हा काय वेगळे चित्र येणार?

In reply to by प्रसाद_१९८२

सध्याच्या घडामोडी पाहाता, भाजपा पुन्हा एकदा तोंडावर आपटणार असेच दिसते. जर ह्या "कांडा" च्या मागे भाजपा असेल तर नक्कीच तोंडावर आपटणार. पण भाजपा असा हरणारा खेळ का खेळेल ?

In reply to by डँबिस००७

सेना व कॉंग्रेस या दोन पक्षात दोन गट, मतभेद, एकमेकांविषयी संशय निर्माण करणे, हे दोन्ही पक्ष आतून पोखरून दुर्बल करणे हे उद्दिष्ट असावे. राज्यात अस्थिरता निर्माण झाली आहे असा अहवाल राज्यपाल केंद्रीय गृहखात्याला पाठवून राज्यात राष्ट्रपती राजवट आणून काही काळाने नवीन सरकारची जुळवाजुळव करणे किंवा सेना, कॉंग्रेस या पक्षातील फुटीचा फायदा घेण्यासाठी मध्यावधी निवडणूक घेणे हे उद्दिष्ट सुद्धा असू शकते.

२०१९ मधे भाजपा असाच उतावळा खेळ खेळली होती व त्याचे परिणाम आपण पाहिलेच होते. एकनाथ शिंदेचे माहित नाही, मात्र त्यांच्यासोबत गेलेले आमदार त्यांच्या बरोबर कितीकाळ राहातात हा प्रश्न आहे. अजित पवारांबरोबर फुटलेले आमदार एक दिवस ही टिकले नव्हते.

In reply to by प्रसाद_१९८२

राष्ट्रपती राजवट उठविण्यासाठी अजित पवारांना काकांनीच पाठवून फडणवीसांना लालूच दाखविली होती. शपथविधी झाल्यानंतर अजित पवार मंत्रालयाकडे फिरकलेच नव्हते. ते घरी जाऊन पुढील सूचनांची वाट पहात ३ दिवस स्वस्थ बसून होते. पुढील ३ दिवसात काकांनी सोनिया गांधींचे मन वळवून सेना-राष्ट्रवादी सरकारला कॉंग्रेसचा पाठिंबा मिळवून आपले उद्दिष्ट साध्य केले. बिच्चाऱ्या फडणवीसांना धूर्त काकांचे डावपेच समजलेच नाहीत.

In reply to by कंजूस

सेना भूतकाळात अनेकदा फुटली आहे. पूर्वी बंडू शिंगरे व माधवराव देशपांडे फुटले, नंतर भुजबळांसहीत १८ आमदार फुटले, नंतर राणे, नंतर राज ठाकरे, दरम्यानच्या काळात गणेश नाईक, भास्कर जाधव, विनायक निम्हण, प्रकाश परांजपे, संजय निरूपम वगैरे फुटले होते.

"भाजपात जाण्याऐवजी किंव्हा फडणवीस मुख्यमंत्री होण्याऐवजी तूच मुख्यमंत्री हो, मी राजीनामा देतो" अशी ऑफर एकनाथ शिंदेना देऊन जनतेच्या नजरेत सहानभुती मिळवायची एक चांगली संधी, उद्धव ठाकरेंकडे चालून आली आहे, अर्थात ते या संधीचा फायदा घेतात की उर्मटपणे शिंदेवर कारवाई करतात ते आता पाहायचे.

In reply to by प्रसाद_१९८२

मुख्यमंत्री होता येत नाही म्हणून पक्ष सोडला हे संभवत नाही. शिवसेना ही काँग्रेस्/भाजपा नाही तर घराणेशाहीवर चालणारा पक्ष आहे. त्यामुळे उद्धव ह्यांना उघडपणेआव्हान कोणी देणार नाही. जे काही वाचायला मिळतेय त्यावरुन असे दिसतेय की उद्धव आमदारांना भेटण्यास्/त्यांनी मांडलेले प्रश्न ऐकुन घेण्यास फार वेळ देत नसत. मंत्र्यानादेखील भेटण्यास उद्धव जात वेळ देत नाहीत अशी तक्रार आहे. एकनाथ शिंदे ह्यांचा पुत्र श्रीकांत खासदार आहे. तो ठाणे/कल्याण मतदारसंघात खूप लोकप्रिय आहे. त्याला वेसण घालण्यासाठी उद्धव/ईतर सेना नेत्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची मदत घेतली असाही आरोप आहे.

एकनाथ शिंदेनी बंड केल्यानंतर सर्वात जास्त अडचण मविआच्या पाळीव पत्रकार व विचारवंताची झाली आहे. मविआ सरकार पडल्यास दररोज मिळणारे 'पाकिट' बंद होईल या भितीने एकनाथ शिंदेना शिवसनेने कसे भरभरुन दिले, उद्धव ठाकरेंचे नेतृत्व कसे प्रभावी आहे, शिंदेच्या कोणत्याही प्रस्तावाला ठाकरे अजिबात भिक घालणार नाहीत वगैरे वगैरे सांगण्याची पाळीव पत्रकार व विचारवंतात सध्या चढाओढ लागली आहे.

In reply to by प्रसाद_१९८२

पाकिटापेक्षाही अग्रलेखातून जगाला/मोदी/शहाना उपदेश कसे करायचे ह्याचीही चिंता असणार. शिंदे ह्यांनी माघार घेतली तर बुद्धीजीवी संपादक आनंदाने बेहोश होतील, उद्धव्/राउत ह्यांचे महिनाभर कौतुक होईल.

एवढा विरोध करायची ताकद आली कुठून? कॉन्ग्रेसही बाहेर पडणार मविआतून असं दिसतंय.

In reply to by कंजूस

बहुदा राष्ट्र्वादी बाहेर पडेल. गुजराती चॅनेल्सवर "सूरतमधील हॉटेलात आहे शिंदे ह्यांच्यासोबत राष्ट्रवादीचा एक मोठा नेता आहे" अशी बातमी होती. संध्याकाळी हा नेता शिंदे ह्यांची गाठ अमित शहा/नड्डा ह्यांच्याशी घालून देणार आहे अशी बातमी होती.

In reply to by कंजूस

तो पंजाबी चंदू हलवाई कराचीवालाही एकेकाळी प्रसिद्ध होता. खोदादाद सर्कलला.असो. शिंदे ह्यांच्यासोबत ३० हुन अधिक आमदार आहेत. शिवसेनेने भाजपाशी युती करावी अशी त्यांची मागणी आहे. ही अर्थात अमान्य होईल. मग काय? शिंदे वेगळा पक्ष काढणार? की भाजपात सामील होणार?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

शिवसेनेने भाजपाशी युती करावी अशी त्यांची मागणी आहे अशी काहीबाही मागणी त्यांनी केलेली नाही. तुम्हाला कुठून कळलं माई?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

https://www.youtube.com/watch?v=sH103_0kK7Y https://www.youtube.com/watch?v=p1zMu32HBM0 https://www.news18.com/news/politics/im-with-hindutva-will-not-return-t… "मी हिंदुत्वाबरोबर आहे. मी शिवसेनेत जाणार नाही". हिंदुत्व वगैरेच्या गप्पा मीडियात ठीक. पण सेना सोडण्याची कारणे जी काही माहित झाली- १)राष्ट्रवादीच्या नेत्यांतर्फे शिंदे व त्यांच्या खासदार पुत्राचे ठाण्यात पंख कापण्याचे उद्योग उद्धव व सेनेचे काही नेते करत होते. २)गेल्या वर्षभराहुन अधिक काळ उद्धव व शिंदे ह्यांत धूसपुस चालू होती(https://www.lokmattimes.com/maharashtra/thackeray-memorial-how-come-mmr…)

अजित पवारांना पुढे करुन पहाटेचा शपथविधीसारखा करण्यासारखा प्रकार वाटतोय. होणार काही नाही पण देवेंद्र फडणवीस व पर्यायाने भाजपाच्या बोकांडी अजुन एक फजिती/मूर्खपणा बसेल. पहाटेचा शपथविधीचा आततायी पणा करुन फडणवीस अगोदरच अनेकांच्या मनातुन उतरले आहेत.

In reply to by कानडाऊ योगेशु

भाजपाच्या बोकांडी अजुन एक फजिती/मूर्खपणा बसेल. पहाटेचा शपथविधीचा आततायी पणा करुन फडणवीस अगोदरच अनेकांच्या मनातुन उतरले आहेत. १००%

मला वाटतं की सरकार पडायची ही संधी उठांनी आजीबात सोडू नये. खुशाल विरोधात बसावं आणि २०२४ ला दणकून मैदान मारावं. मध्ये एकनाथ शिंदेसारखा मोहरा बळी पडला याचं दु:ख आहे. -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मैदान विसरा आता. घरात बसून मैदान मारता येत नाही. पूर्वी भुजबळ ५२ पैकी १८ आमदार घेऊन बाहेर पढले होते. आता ५५ पैकी जवळपास ३५ आमदार फुटलेले दिसतात. कदाचित जास्तच असतील. किमान ३७ आमदार असतील तर शिंदे गटालाच शिवसेना अशी मान्यता मिळून धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मिळेल किंवा हे पक्षचिन्ह गोठवले जाईल. खरं तर २०१९ च्या निवडणुकीतच सेना संपलेली दिसली असती. परंतु फडणवीसांनी पुन्हा एकदा सेनेशी युती करण्याची गंभीर घोडचूक करून सेनेचे आमदार निवडून आणून सेनेला प्राणवायू पुरविला. पुढील निवडणुकीत एकट्याने लढून सेना संपली यावर मोहोर लागली असती. पण ती वेळ अडीच वर्षे अलिकडेच आली असे निदान आजतरी चित्र दिसत आहे. महाराष्ट्रासंबंधित सर्व निर्णय यापुढे मोदी-शहांनी एकट्याने घ्यावे. निर्णयप्रक्रियेत फडणवीस/चंपा यांना सहभागी केले महाराष्ट्रात भाजप पुन्हा एकदा तोंडावर आपटेल हे नक्की.

In reply to by श्रीगुरुजी

१९९५ मध्ये चंद्रबाबू नायडूंनी आपले सासरे एन.टी.रामारावांविरोधात बंड केले. त्यावेळी तेलुगू देसम पक्षाचे बरेचसे आमदार चंद्रबाबूंबरोबर आले आणि रामाराव राजकारणातून बाहेर फेकले गेले. सध्या एकनाथ शिंदेंबरोबर ३५-४० आमदार आहेत असे दिसते. जर त्यांचे पारडे जड आहे असे चित्र उभे राहिले तर इतर काही आमदारही त्यांच्याबरोबर जाऊन उधोजींना हद्दपार करू शकतील आणि १९९५ मध्ये आंध्रमध्ये झाले ते २०२२ मध्ये महाराष्ट्रात होऊ शकेल. एकनाथ शिंदे चारवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. ठाकरे सरकारने घातलेल्या सावळ्यागोंधळाविरोधात जनतेत मोठा संताप आहे हे त्यांच्यासारख्या जमिनीवरील कार्यकर्त्याला अधिक चांगल्या पध्दतीला समजू शकेल. स्वतः ठाकरे आणि ते ज्या संजय राऊतांच्या पूर्ण कह्यात गेले आहेत त्यांनीही एकदाही कधी निवडणुक लढवलेली नाही. त्यांच्या सगळ्या फुशारक्या चालू आहेत या निवडून गेलेल्या आमदारांच्या जीवावर. शिवसेनेतील जमिनीवरील कार्यकर्त्यांना ठाकरेंच्या मनमानीविरोधात असंतोष वाढला तर त्यात अजिबात आश्चर्य वाटण्यासारखे नाही. एकंदरीत या सगळ्या नाट्याचे पुढे काय होईल हे सांगता येत नसले तरी ठाकरे जर राजकारणातून हद्दपार झाले तर ती एक खूप चांगली घटना असेल. फक्त फडणवीस, गडकरी आणि चंद्रकांत पाटील यांना शिवसेनेचे प्रेमाचे भरते येऊन परत एकदा शिवसेनेपुढे शेपूट हलवत जायची अवदसा त्यांना आठवू नये हे नक्कीच.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

ठाकरे जर राजकारणातून हद्दपार झाले तर ती एक खूप चांगली घटना असेल. फक्त फडणवीस, गडकरी आणि चंद्रकांत पाटील यांना शिवसेनेचे प्रेमाचे भरते येऊन परत एकदा शिवसेनेपुढे शेपूट हलवत जायची अवदसा त्यांना आठवू नये हे नक्कीच. अगदी हेच म्हणतो. थोडीशी भर टाकून सांगतो की भाजपने सेनेप्रमाणे राष्ट्रवादीबरोबर सुद्धा जाऊ नये.

In reply to by श्रीगुरुजी

भाजपने सेनेप्रमाणे राष्ट्रवादीबरोबर सुद्धा जाऊ नये. सत्तेसाठी मेहबूबा बरोबर जानारे राष्ट्रवादी सोबत गेल्यावर प्राॅब्लेम काय?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कोणताही राजकीय पक्ष असू ध्या ..त्या मध्ये bjp pan आहे. Bjp काही मोठ्या नीतिमान पक्ष नाही.. मेहबूबा पण मेहबूब वाटली होती bjp ल. BJP एकटी लढली आणि हवे तेवढे आमदार निवडून आले नाहीत तर bjp नी काँग्रेस शी युती केली तर आश्चर्य वाटायचे कारण नाही...सेने बरोबर तर आता पण bjp युती करेल.. राष्ट्रवादी बरोबर चार तासाचे सरकार bjp नी बनवले होते ना.

In reply to by श्रीगुरुजी

महाराष्ट्रांतील भाजप ज्या तर्‍हेने हे सर्व प्रकरण हाताळते आहे, त्यांतून त्यांची येनकेन प्रकारे सत्ता मिळवण्याची हतबलता दिसून येत आहे. गेल्या निवडणूकांपासूनच त्यांनी राश्ट्रवादी इत्यादी पक्षांतून बाजारबुणग्यांची भरती स्वपक्षांत केली, त्यांतून काय निष्पन्न झाले? ह्या पक्षाचे बळ त्यांच्या पक्षाची जी काही विचारसरणी आहे, त्याच्याशी अंतर्बाह्य एकरूप होऊन कार्य करणारे कार्यकर्ते होते. ह्या नव्या खोगीरभरतीमुळे त्याचे कार्य व प्रतिमा अतिशय डागाळलेली झाली आहे, व होत रहाणार आहे. आता हे जे काही तथाकथित फुटीर सेना आमदार- खासदार आहेत, ते भाजपांत दाखल होवोत अथवा स्वत:च सेनेचा झेंडा हाती घेवोत. त्यांच्याशी मिळवून घेणे ह्यापुढे भाजपाला भाग आहे. ह्यांपैकी किमान एका तरी आमदारावर ई.डी. ची केस सुरू आहे. ती आता गुलद्स्त्यांत ठेवावी लागेल. श्रीगुरुजी येथे अनेकदा, ह्या सर्वासाठी फडणवीसांना(च) दोषी ठरवतात. फडणवीस हे सगळे पुढे राहून, प्रत्यक्ष धोरणे आखून वगैरे घडवून आणत असले, तरी भाजपच्या शीर्षनेत्यांचे, प्रत्येक पाऊलावर, शिक्कामोर्तब असणारच, ह्याबद्दल शंका बाळगण्याचे कारण नाही. ह्यावरून भाऊ तोरसेकर काही वर्षांपूर्वी म्हणाले होते ते आठवले. 'सुमारे तीस- चाळीस वर्षे सत्तेत राहिल्यानंतर भाजप, आताच्या कॉंग्रेससारखाच भ्रष्ट व कसलाही विधीविशेष नसलेला पक्ष होईल, असे त्यांचे अनुमान होते. मला हे पटते आहे-- पण एका फरकाने. कॉंग्रेसने सध्या ते जे काही आहेत तिथवर येण्यास ६०+ वर्षे घेतली. कारण सुरूवातीच्या तीसेक वर्षांत देशांत आयुष्य सुस्त होते, मीडिया संपूर्णपणे मूठभर संस्था व व्यक्तिंच्या ताब्यांत होती. माहितीचे प्रसारण बर्‍याच धीम्या गतीने होत होते, किंवा तेही होत नव्हतेच. आता सोशल मीडिया व वेब बेस्ड मीदिया पोर्टल्समुळे माहिती प्रसारण, वितरण इत्यादी आमूर्लाग्र बदलले आहे. तेव्हा भाजपचा र्‍हास झपाट्याने होईल. सुमारे २०३५- ४० च्या दरम्यान ती सत्तेबाहेर फेकली जाईल. म्हणजे सत्तेत आल्यानंतर जेमतेम ३० वर्षांनी.

In reply to by प्रदीप

हो पण सेना आमदार स्वतःहुन फुटत असतील तर भाजपाने फायदा का नको करून घायला? शेवटी सत्ता पण महत्वाची आहेच की. काल पर्यंत तरी भाजप नेत्यांनी सावध भूमिका घेतलेली दिसते.

In reply to by प्रदीप

भाजपाने राजकारणासाठी इतर पक्षातून काही अयोग्य माणसे घेतली तरी त्या माणसांनी भाजपात येऊन नव्याने खाबूगिरी केली का हेही पहावे लागते. नंबरांचे गणित जुळवण्यासाठी "खाने नही दूंगा" या अटीवर अयोग्य माणसांना पक्षात घ्यायला काय हरकत आहे? अशा प्रकारची ती विचारसरणी वाटते. त्यांची टक्केवारी एकूणात २-४ टक्के असल्याने बिघडत नसावे. २०१४ साली भाजपाने अशी काही माणसे घेतली तरी त्यांनी नव्याने भ्रष्टाचार केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे याअगोदर जे केले ते माफ करतो पण यापुढे नव्याने काही केले तर क्षमा नाही, हा व्यवहारी दृष्टिकोन ठेऊन राजकारण करणे सध्याच्या काळात आवश्यक झाले असावे. खरेतर मला हा विचार पसंत नसला तरी सध्याच्या काळात ह्या विचारावर राजकारणे करणे ही स्वच्छ माणसांची अगतिकता असावी. याच विचारावर आधारित चंद्रकांत दादा काल म्हणाले असावे की, "भाजप म्हणजे भजनी मंडळ नाही." :)

In reply to by शाम भागवत

रात्रीचे चांदणे व शाम भगवत, भाजपची आपण दोघांनी सांगितलेली अगतिकता समजण्यासारखी आहे. ह्या व तत्सम सिच्युएशन्सचे मूळ आपल्या लोकशाहीमधे आहे. वास्तविक, लोकशाही राबवण्यास जी परिपक्वता लागते, ती आपल्याकडे तसेच, खरे तर आशियातील कुठल्याही देशांत नाही. त्यामुळे एकतर राजकीय पक्षांना कोलांट्याउड्या माराव्या लागतात, अथवा जातीपातीचे राजकारण करावे लागते-- किवा इतर काही आशियाई देशांत झाल्याप्रमाणे सैन्याने देशाच्या राज्यशकठहाठीचा ताबा घेणे व गव्हर्नन्स सुरळीत ठेवणे, हे करावे लागते (ही माझी गेल्या काही वर्षांपूर्वी, माझ्या निरीक्षणावरून, व माझ्या कुवतीनुसार केलेली थेयरी आहे). ह्याबद्दल येथे काही लिहीत नाही, कारण ते अवांतर होईल.

In reply to by प्रदीप

तुमचे म्हणणे बरोबर आहे. युरोप अमेरिकेशी तुलना करता भारतातील लोकशाही नविन आहे. अविकसीतपणा, निरक्षरता हे जास्तीचे मुद्दे आहेतच. त्यामुळे जो पक्ष देशाचे जास्तीत जास्त भले करू शकेल किंवा कमीत कमी नुकसान करू शकेल, कमीत कमी भ्रष्टाचार करेल अशा पक्षाला निवडून देणे एवढेच विचारी व सुसंकृत माणसाला सध्याच्या स्थितीत शक्य आहे. आपल्याला चांगला पक्ष निवडायचा नाही आहे तर कमीत कमी वाईट पक्ष निवडायचा आहे. ;)

एकंदरीत एकनाथ शिंदेंच्या बंडातून फारसे काही साध्य झाल्याचे अजूनतरी दिसत नाही. विक्रांत जोशी नावाच्या पत्रकाराचे भाकित आहे की आज रात्री अनिल परबांना अटक होईल व उद्या मंत्रीमंडळ बैठकीनंतर उद्धव ठाकरे राजीनामा देतील.

In reply to by श्रीगुरुजी

त्या विक्रांतचे अनेक अंदाज चुकले आहेत. ई.डी./सी बी आय्/आय बी/कॅबिनेट सचिव रोज ह्याला अपडेट देत असावेत असे त्याच्या बोलण्यावरुन अनेकदा जाणवते.

एकनाथ शिंदे नी बंड केले असेल तर सत्य स्वीकारा .. ठाकरे नी स्वतः राजीनामा द्यावा..आणि आपल्या पक्षातील सर्व आमदार cha राजीनामा घ्याबा. काँग्रेस आणि राष्ट्रवादी ल आव्हान करावे त्यांनी पण सर्व आमदार cha राजीनामा घ्यावा.. विरोधी पक्ष च नसलेले भारताच्या इतिहासात कधीच जे घडले नाही ते घडू ध्या. महाराष्ट्रात फक्त सरकार पण विरोधी पक्ष नाही. जो काही गोंधळ घालायचा आहे तो त्यांना घालू ध्या. सत्य स्वीकारणे हेच शहाणपण.

आला आहे. हातातल्या फायलीऐवजी डिजिटल डायरी खिशात ठेवणे बरे नाही का? एडिटिंग सोपे पडेल. गजराचे घड्याळही हातावर मनगटावर बांधता येत नाही. 'मी' बँड? नोटिफिकेशनस पाहायला सोपे.

शिंदे आणी कंपनी आता सूरतहून गुवाहाटीला पोचली आहे. शिंदे ह्यांच्याबरोबर ४० आमदार असल्याचा दावा केला जात आहे. हे खरे असेल तर उद्धव पक्ष सांभाळण्यात सपशेल अपयशी ठरले असे म्हणावे लागेल. हे सगळे आमदार काही सत्ता हवी/पैसा हवा म्हणून बंड करत आहेत असे कोणाला वाटत असेल तर तो मूर्खांच्या नंदनवनात वावरत आहे असे म्हणावे लागेल. नऊ वाजुन गेले आहेत अजूनही शेरो शायरी करणार्या संजय राउत ह्यांचा पत्ता नाही.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

त्यांना दिलेली भूमिका त्यांनी उत्तम वठवली आहे. ते काम आता झालंय. आता दिग्दर्शक आणि निर्माते नवी पात्रे आणतील. ( बाकी हल्ली मराठी मालिका पहात नाही का तुम्ही? :))

In reply to by खेडूत

+१ शिंदेंबरोबर १० ते १५ आमदार असते तर हे बंडं म्हटले गेले असते. मध्यावधी लावायची असेल तर अशी काहीतरी खेळी खेळणे भाग असते.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

शिवसेना + राष्ट्रवादी + काँग्रेस अशा युतीत राहून परत निवडून येणे अवघड आहे व आपल्याला राजकारणाचे दुकान कायमचे बंद व्हायची शक्यता आहे हे जाणवल्यामुळे शिंदेसाहेबांनी बाहेर पडायचे ठरवले असावे. नगरसेवकांकडून ही भिती आमदारांकडे व्यक्त केली गेली असावी व त्यातून नाईलाजाने ही खेळी खेळली गेली असावी.

मिसळपाव समूहाचा whtsapp Group आहे का?

In reply to by अमोल निकस

पण गुप्तपणे असेल.

In reply to by अमोल निकस

मिसळपाव समूहाचा कोणताही अधिकृत गुप नाही. पण, मिपाचे लोक असलेले अनेक समुह आहेत. -दिलीप बिरुटे

काल सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष या दोन्ही बाजूंनी आपल्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांची घोषणा केली. सत्ताधारी पक्षाकडून झारखंडच्या राज्यपाल द्रौपदी मुर्मू तर विरोधी पक्षांकडून माजी अर्थमंत्री/परराष्ट्रमंत्री यशवंत सिन्हा हे उमेदवार असतील. द्रौपदी मुर्मूंचे नाव मागच्या वेळेसही चर्चेत होते. पण त्यांना मागच्या वेळेस उमेदवारी न देता मोदींनी रामनाथ कोविंद यांचे नाव पुढे आणले होते. तसेच मागच्या वेळेस सत्ताधारी पक्षाने कोविंद यांचे नाव पुढे आणल्यावर विरोधी बाजूकडून आधी चर्चेत असलेली गोपाळकृष्ण गांधी वगैरे नावे मागे पडून मीरा कुमार हे नाव पुढे आणले गेले. यावेळेस मात्र सत्ताधारी गोटातून उमेदवाराच्या नावाची घोषणा आधी केली गेली नाही. विरोधी पक्षांकडून दुपारी यशवंत सिन्हांचे नाव आले तर रात्री ८ च्या सुमारास सत्ताधारी पक्षाकडून द्रौपदी मुर्मूंच्या नावाची घोषणा झाली. मुळच्या ओरिसाच्या असलेल्या द्रौपदी मुर्मू वनवासी समाजातील (tribal) आहेत. आपल्याच राज्यातील स्त्री उमेदवाराला विरोध करणे नवीन पटनायक यांना शक्य होईल असे वाटत नाही. त्याप्रमाणेच झारखंडमधूनही त्यांच्या नावाला समर्थन मिळू शकेल. झारखंड मुक्ती मोर्चाला त्याच tribal समाजातून मोठे समर्थन असल्याने त्या समाजातील उमेदवाराला विरोध कदाचित त्यांच्याकडूनही व्हायचा नाही. त्यामुळे द्रौपदी मुर्मूंची वाट सोपी दिसते. या सगळ्या घडामोडींमध्ये अभिजीत बिचुकलेंचा पत्ता परत एकदा कापला गेला याचे वाईट वाटते :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

या सगळ्या घडामोडींमध्ये अभिजीत बिचुकलेंचा पत्ता परत एकदा कापला गेला याचे वाईट वाटते :)
याबद्दल बिचुकलेला सुद्धा वाईट वाटले नसेल

उधोजी ह्यांचा शिळ्यासेनेवर ताबा नाही आणि निव्वळ फोटोला थोबाड आणि हाराला गळा म्हणून हे नेते होते. त्यांत बाजूला चमचे मंडळींचा घोळका आणि राऊत सारखे वाचाब्रहस्पती. शिवसेनेचे ४० आमदार महाराष्ट्र सोडून गुजरात मध्ये क्या पोचतात आणि उधोजींना साधी बातमी सुद्धा लागत नाही ? ह्या संत्र्याना पोलीस संरक्षण नव्हते ? महाराष्ट्र पोलिसांची गुप्तचर यंत्रणा जी ह्याच्या साठी वसुलीचे काम करते त्यांना सुद्धा वित्तमंबातमी लागली नाही ? पुढे काय होईल ठाऊक नाही पण उधोजीने शिंदे ह्यांच्या पुढे नाक घासले तर शिवसेनेवरची त्यांची पकड कायमची निघून जाईल. शिवसेनेचे खरे नेते शिंदे असून उधोजी फक्त उत्सवमूर्ती आहेत असे जनतेला सुद्धा कळून चुकेल. मग पैश्यांच्या बॅगा मातोश्रीवर पोचणार नाहीत तर शिंदे ह्यांच्या घरी जातील. पुत्रमोह आणि सत्ता मोह कसा लोकांना खाली खेचतो ह्याचे उत्तम उदाहरण ठाकरे परिवार आणि शिळीसेना आहे.

In reply to by साहना

शिळीसेना, पैशांच्या बॅगा मातोश्रीवर. संपादर मंडळ हे वाचतंय की नाही?? भाजप विरोधी आयडींवर त्वरीत कारवाई होते.

या सगळ्यात भाजप परत तोंडावर पडणार अशी मला दाट शंका आहे .. आणि परत राष्ट्रवादी मृतदेहाचं टाळू वरचे लोणी खाणारं भाजप काही शिकली असले तर नवीन निडवणुकांची मागणी करेल तर इज्जत राहील भाजपचं समर्थांकी खुश जरूर व्हावे पण सबुरीने ... सेने बद्दल बोलायचे तर जसे काँग्रेस मध्ये काँग्रेस चाय कार्यकर्त्यांना नेहरू कुटुंबाशिवाय कोणी दुसरे केहाळत नाही तसेच सेनचं "कट्टर" कार्यकर्त्यांना ठाकरेंचं ठारच लागतात सेनेत मुळातच अंतर्गत लोकशाही नसल्यमुळे हे होणारच जसे पुतण्यांचे पहाटेचं बंडाळी नंतर सुद्धा परत राष्ट्रवादी मध्ये स्वागत केले गेले तसे एकनाथशिंदेंचं परत स्वागत होणार सेनेत असे वाटते पण दुसरे मन म्हणते कि त्यांचा भुजबळ / राणे हे जसे गद्दार ठरेल तसे शिंदे गद्दार होणार असो एकूण " परिपकव लोकशाहीत सर्वच पक्ष असे शेण खातात.. लाज वाटली पाहिजे आमदारांना हॉटेलात काय / नेले जाते / चार्टर विमान काय ! असा ऐकलंय कि ५ तारांकित हॉटेल नवे पॅकेजेस काढतात -- गटबाधान प्याकेज .... मज्जा आहे

शिवसेनेला खिंडार पडण्याची ही काही पहिली वेळ नाही. छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक, राज ठाकरे अशा थोरा-मोठ्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि आज एकनाथ शिंदे. आज जरी एकनाथ शिंदे आणि त्यांचे शिलेदार आम्ही बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी सैनिक आहोत असे म्हणत असले तरी खिंडार पडले ते पड्लेच आहे. शिंदेसमर्थक आमदार भाजपाला पाठींबा देऊन भाजपाचे सरकार आणत असतील तर त्यांचे सरकार आघाडी येऊ देतील असे वाटते. अडीच वर्षानंतर आघाडीलाच त्याचा फायदा होईल, अर्थात ही शक्यता. आघाडीचं सरकार बनले त्या प्रत्येक दिवसापासून भाजपा महाआघाडीत फूट होईल याची वाट पाहात होते. दोन प्रयत्नानंतर शिंदे गटाच्या निमित्ताने भाजपाने उद्धव ठाकरे यांची खुर्ची अस्थिर केली आहे. भाजपा सत्ता स्थापन करेल असा दावा अजून तरी कोणी केला नाही. आणि करीत असेल तर महाविकास आघाडी ते करु देईल कारण आघाडीला याचा फायदा होईल असे वाटते. अर्थात राजकारणात निश्चित काहीच सांगता येत नाही. सत्ता टीकविण्याची महाआघाडी प्रयत्न करतील. हा खेळ आकड्याचा. शिंदे गटाने आमचीच मूळ सेना आहे, असे म्हणून कोणालाही पाठींबा न देता तटस्थपणे राहतील असे काही वाटत नाही. भाजपा-सेनेचा संसार असतांना भाजपाने शिवसेनेचा कायम अपमान केला. त्या शिवसेनेतील निष्ठावंतांनी भाजपाचा हिशेब चुकता करायचा असा विडा उचलला आणि शिवसेनेने त्यांचा बदला घेतला. कायम भाजपा युतीत शिवसेनेचा जो अपमान भाजपा करीत होती. त्याचा बदला शिवसेनेने महाविकास आघाडीबरोबर संसार सुरु करुन घेतला, ते योग्य होते नव्हते. तो वेगळा विषय पण भाजपाला धडा दिला. कधीना कधी हा महाविकास आघाडीचा संसार मोडेल याची दरदिवशी भाजपा वाट पाहातच होती. मला वाटतं तो दिवस जवळ आला आहे. अध्यक्ष महोदय, हे योग्य नाही. अध्यक्ष महोदय हे बरोबर नाही. आता थेट संधी मिळत आहे. बाकी, इतिहासाची पुनरावृत्ती होते असे म्हणतात. महाराष्ट्रात इतिहासाच्या राजकारणात १९७७ मधे महाराष्ट्रात जनता पक्षाला 99 जागा मिळाल्या, पण त्या काही सत्ता स्थापनेसाठी पुरेशा नव्हत्या. कारण चव्हाण-रेड्डी काँग्रेसला ६९ आणि इंदिरा काँग्रेसला ६२ जागा मिळाल्या होत्या. महाराष्ट्रात पहिल्यांदाच त्रिशंकू स्थिती निर्माण झाली होती. महाराष्ट्रात दोन्ही काँग्रेसनं एकत्र येत सरकार स्थापनेसाठी प्रयत्न केले. या सरकारमध्ये रेड्डी-चव्हाण काँग्रेसचे मुख्यमंत्री (वसंतदादा पाटील) आणि इंदिरा काँग्रेसचे उपमुख्यमंत्री (नासिकराव तिरपुडे) बनले. महाराष्ट्रात दोन पक्ष एकत्र येत आघाडी करून सरकार स्थापन करणं आणि महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री बनवणं, या दोन्ही गोष्टी पहिल्यांदाच यावेळी घडल्या. वसंतदादांच्या सरकारमध्ये उद्योगमंत्री असलेल्या शरद पवार यांनी सुशीलकुमार शिंदे, दत्ता मेघे आणि सुंदरराव सोळंके या मंत्र्यांसह एकूण 38 आमदारांना घेऊन भर अधिवेशनात बंडखोरी केली आणि दादासाहेब रुपवते यांच्या नेतृत्वात 'समांतर काँग्रेस' असा नवा गट स्थापन केला. या बंडखोरीने वसंतदादांचं सरकारच अल्पमतात आलं आणि ते पडलं. जनता पक्षाच्या पाठींब्यावर शरद पवार मुख्यमंत्री बनले. पुढे पुन्हा इंदिरा गांधी सत्तेवर आल्या आणि पुढे राष्ट्रपतीच्या शिफ़ारशीनंतर सरकार बरखास्त केलं आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली. मला वाटतं, महाराष्ट्रात पुन्हा एकदा तसेच चित्र निर्माण झाले आहे. महाविकास आघाडीतला गोंधळ संपला नाही. भाजपाला सरकार स्थापन करता आले नाही तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होईल. अर्थात ही सगळी मतं-मतांतरे, राजकारणात आणि क्रिकेटखेळामधे निश्चित काहीच सांगता येत नाही. काय घडते ते पाहात राहु या. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

या बंडखोरीने वसंतदादांचं सरकारच अल्पमतात आलं आणि ते पडलं. जनता पक्षाच्या पाठींब्यावर शरद पवार मुख्यमंत्री बनले. हाच तो प्रसंग का ज्यामुळे काका बदनाम झाले?

In reply to by कानडाऊ योगेशु

हा पहिलाच प्रसंग. नंतर अनेक वेळा खंजीर खुपसण्याचे प्रसंग घडले. आता तर पवार म्हणजेच विश्वासघात असं नातं तयार झालंय.

In reply to by प्रसाद_१९८२

दोन वेगवेगळ्या फौजदारी खटल्यात तुरूंगवासाची शिक्षा मिळालेला बच्चू कडू, प्रताप सरनाईक अशांचा पाठिंबा भाजपने घेऊ नये.

In reply to by श्रीगुरुजी

बच्चू कडू, प्रताप सरनाईक अशांचा पाठिंबा भाजपने घेऊ नये. -- सहमत ! मात्र सत्तेसाठी भाजपा काहीही करु शकतो.

आता सरकार पडेल . बंड केलेले त्या मध्ये यशस्वी होतील. पण पुढे काय?स्वतः निवडून येण्याची ताकत ह्या बंडखोर पैकी किती लोकात आहे. Bjp काही ह्यांना गरज संपल्यावर जास्त किँमत देणार नाही. खरे तर राज ठाकरे नी बाळा साहेब ची जागा चालवायला हवी होती.. उद्धव ठाकरे मवाळ स्वभावाचे आहेत आणि शिवसेनेची ती ओळख नाही .

In reply to by sunil kachure

राज ठाकरे नी बाळा साहेब ची जागा चालवायला हवी होती.. उद्धव ठाकरे मवाळ स्वभावाचे आहेत आणि शिवसेनेची ती ओळख नाही .
१००० ट्क्के सहमत. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बाळासाहेबांची शिवसेना आहे ती. उद्धव आणि आदित्य त्यांच्या स्वबळावर पुढे येतात , घराणेशाहीवर नाही ते सर्वांना माहिती आहे.

राज्यपाल कोश्यारींना करोना झालाय अशी एक बातमी आहे. गोव्याचे राज्यपाल प्रभारी राज्यपाल म्हणून काम करतील अशी शक्यता बोलली जातेय

एकनाथ शिंदे यांच्या गटाला मुख्यमंत्रीपद देउन भाजपा त्यांना बाहेरुन पाठींबा देईल, आणि अडिच वर्षे सत्ता चालवेल, अशी शक्यता नाही का? तसेही विधानपरिषदेचे निकाल आल्या नंतर फडणविस म्हणाले होते "आमचा लढा जनतेसाठी आहे सत्तेसाठी नाही" पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

एकनाथ शिंदे यांच्या गटाला मुख्यमंत्रीपद देउन भाजपा त्यांना बाहेरुन पाठींबा देईल, आणि अडिच वर्षे सत्ता चालवेल, अशी शक्यता नाही का?
अगदी. आता तसेही दोघांचेही ब्लडगृप एकच निघाले आहे, त्यामुळे हा एक उत्तम पर्याय आहे. पण भाजपा केंद्रीय नेतृत्वास मान्य होणारा पर्याय नाही. आपण एवढी मरमर केली आणि आपला मुख्यमंत्री होणार नसेल तर त्यास केंद्रीय नेतृत्व मान्यता देणार नाही. पण मुख्यमंत्री शिंदे झाले तर, काठावर असलेले शिवसेनेचे आमदार शिंदे गटाला मिळतील. अवांतर : बाकी. ४ कि.मी अंतर पावसात शिंदेंच्या तावडीतून निसटलेल्या आमदाराने सांगितली आपबिती. अजून सुरस चमत्कारिक गोष्टींसाठी वाचत राहा. सबसे आगे, सबसे तेज. मिपा. ;) -दिलीप बिरुटे