Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by चंद्रसूर्यकुमार on Sat, 06/18/2022 - 17:26
आधीच्या भागात २५० प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. आधीच्या भागातील चर्चेसंदर्भात प्रतिसाद द्यायचा असल्यास त्या भागात आणि नवीन काही लिहायचे असल्यास या भागात लिहावे ही विनंती. लोकप्रिय व्यक्तीमत्व अभिजीत बिचुकले यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उडी घ्यायचे ठरविले आहे. विविध राज्यातील १०० आमदारांचा पाठिंबा मिळविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. आपल्याला राज्यघटना आणि कायदा याची चांगली जाण असून आपण राष्ट्रपती व्हायला योग्य आहोत असा त्यांचा दावा आहे. आपली राष्ट्रपती व्हायची इच्छा आहे हे त्यांनी मागच्या वेळेस मोदींना सांगितले होते पण आयत्या वेळेस मोदींनी रामनाथ कोविंदांचे नाव पुढे आणल्याने त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला असे दिसते. असो. अभिजीत बिचुकलेंना हार्दिक शुभेच्छा. २५ जुलै रोजी नवे राष्ट्रपती म्हणून ते शपथ घेताना दिसतील का? आणखी एक मराठी व्यक्ती राष्ट्रपती झाल्यास त्याचा आपल्या सगळ्यांनाच आनंद व्हायला हवा :) Bichukale
  • Log in or register to post comments
  • 45475 views

प्रतिक्रिया

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Tue, 06/21/2022 - 12:28

In reply to महाभकास आघाडी by चंद्रसूर्यकुमार

Permalink

एक तर या सरकारची स्थापनाच

एक तर या सरकारची स्थापनाच मुळात लोकांनी दिलेल्या जनादेशाला पायदळी तुडवून झाली आहे. काहीही. ह्या सरकारची स्थापना लोकशाही मार्गाने झालीय म्हणून कोर्टात जाऊनही भाजपेयी तोंडावर पडले. जनादेश पायदळी तूडवून कर्नाटक ना मध्य प्रदेशातील भाजप सरकार स्थापन झालेय. सर्वात नावडत्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत केजरीवालांना दुसर्‍या नंबरला ढकलले. केजरीवाल हे अत्यंत स्वच्छ प्रतिमेचे तसेच विकासकामांमूळे दिल्लीतील अतिशय लोकप्रिय नेते आहेत. ह्याच लोकप्रियतेच्या बळावर त्यांनी पंजाब राज्यही जिंकले. महाभकास आघाडीने महाराष्ट्रात कसा स्वर्ग आणला आहे असे चित्र उभे करण्यात हे लोक यशस्वी झाले. महाराष्ट्रात ऊध्दव ठाकरेंची लोकप्रियता प्रामाणीकपणे सरकार चालवल्यामूळे वाढलीय. बाकी नेहमीचीच टिका आहें. कोरोना काळात ठाकरेंना ऊत्तम काम केलेय. मागच्या पर्वात तर सांगली कोल्हापूरातील पुरात लोकांना वेळीच मदत मिळाली नाही तेयामुळे तेथील भाजप नेत्याना कोथरूडात यावे लागले. ह्यावरून फडणवीस सरकार किती कार्यक्षम होते हे महाराष्ट्र जाणून आहे. आणी ठाकरेंचा महाराष्ट्र त्रृणी (किपॅड मूळे मूळ शब्द टाईपता येत नाहीये) राहील ज्यांनी हे मागील काळे पर्व संपवले.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Tue, 06/21/2022 - 14:14

In reply to एक तर या सरकारची स्थापनाच by अमरेंद्र बाहुबली

Permalink

महाराष्ट्रात ऊध्दव ठाकरेंची

महाराष्ट्रात ऊध्दव ठाकरेंची लोकप्रियता प्रामाणीकपणे सरकार चालवल्यामूळे वाढलीय. खिक्क कोरोना काळात ठाकरेंना ऊत्तम काम केलेय. डबल खिक्क आणी ठाकरेंचा महाराष्ट्र त्रृणी (किपॅड मूळे मूळ शब्द टाईपता येत नाहीये) राहील ज्यांनी हे मागील काळे पर्व संपवले. ट्रिपल खिक्क
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Tue, 06/21/2022 - 14:25

In reply to महाराष्ट्रात ऊध्दव ठाकरेंची by श्रीगुरुजी

Permalink

मागच्या पर्वात तर सांगली

मागच्या पर्वात तर सांगली कोल्हापूरातील पुरात लोकांना वेळीच मदत मिळाली नाही तेयामुळे तेथील भाजप नेत्याना कोथरूडात यावे लागले. ह्यावर मात्र तूम्ही खिक्क, खुरक्क, खाक्क, फार्रर, फूर्र काहीही केलं नाही. :)
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Tue, 06/21/2022 - 14:36

In reply to मागच्या पर्वात तर सांगली by अमरेंद्र बाहुबली

Permalink

आधीच्या तुफान विनोदी

आधीच्या तुफान विनोदी दाव्यांवरचं खिक्क थांबलं की मग तुम्हाला जे हवं ते खिक्क, फार्रर, फुर्र वगैरे सगळं करीन. नाक फेंदारून तयार रहा.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Tue, 06/21/2022 - 14:52

In reply to महाभकास आघाडी by चंद्रसूर्यकुमार

Permalink

पूर्ण सहमत

पूर्ण सहमत
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Tue, 06/21/2022 - 10:23

Permalink

महाराष्ट्रात खूप मोठ्या

महाराष्ट्रात खूप मोठ्या राजकीय घडामोडी होण्याची शक्यता आहे. काल संध्याकाळपासून सेनेचे एकनाथ शिंदे व इतर १२ आमदार बेपत्ता असून ते भाड्याच्या विमानातून सुरतला गेल्याच्या बातम्या आहेत. एकनाथ शिंदे सुरतेत २ वाजता पत्रकार परीषद घेणार असल्याच्या बातम्या आहेत. अजून एका बातमीनुसार एकनाथ शिंदेंबरोबर सेनेचे ३० आमदार आहेत. खासदार श्रीकांत शिंदे व राजन विचारे हे सुद्धा बेपत्ता आहेत. पक्षांतरबंदी कायद्यातून वाचण्यासाठी सेनेच्या ५५ पैकी किमान ३७ आमदारांनी एकत्र पक्ष सोडला पाहिजे. इतक्या मोठ्या संख्येने सेनेचे आमदार पक्ष सोडतील असे वाटत नाही. कदाचितकमळ मोहिमेंतर्गत भाजप सेनेच्या काही आमदारांना राजीनामा द्यायला लावून ठाकरे सरकार अल्पमतात आणून स्वत:चे सरकार स्थापन करून या आमदारांना कमळ चिन्हावर पुन्हा निवडून आणण्याची योजना बनवित असावा. मध्यप्रदेश व कर्नाटकात ही योजना यशस्वी झाली होती. परंतु तेथे भाजपची आवश्यकता १० आमदारांपेक्षा कमी असल्याने ती मोहीम यशस्वी झाली. महाराष्ट्रात भाजपला किमान २५ आमदारांची गरज आहे व इतक्या मोठ्या संख्येने सेना किंवा इतर पक्षांचे आमदार राजीनामा देऊन भाजपत सामील होणे अवघड वाटते. काहीही असले तरी काहीतरी खळबळजनक सुरू आहे किंवा होणार आहे, असे दिसत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on Tue, 06/21/2022 - 10:28

Permalink

मुक्काम

(अ)धर्मवीर , मुक्काम पोस्ट सूरत .. अशा मथळ्याचा अग्रलेख संजय राउत्/गिरीश कुबेर टाकण्याची शक्यता दिसतेय. शिन्दे व ११ आमदार सूरतच्या मिरीडियन हॉटेलात मोबाईल फोन्स बंद करून बसले आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद_१९८२ on Tue, 06/21/2022 - 10:50

Permalink

राज्यसभा व विधानपरिषद

राज्यसभा व विधानपरिषद निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांनी, महाविनाश आघाडीतील पोपटपंची करणार्‍या नेत्यांना चांगलेच लोळविले आहे. एकनाथ शिंदे सध्या सुरत मधे ११ आमदारांसह एका हॉटेल मधे आहेत. व इथे साडेतीन जिल्हे ईलाईची सरकार वाचवण्याकरता कमालीची धडपड सुरु आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by sunil kachure on Tue, 06/21/2022 - 12:30

Permalink

ठिक आहे

उत्तर बहु बायकात बडबडला. आणि युद्धाची वेळ आली की गडबडला. विधान परिषद निवडणुकीत जे घडले त्या मुळे bjp समर्थक लोकांनी mipa चा मासळी बाजार करू नये. सरकार काही पडणार नाही. आणि निवडणूक झाली तरी bjp सरकार मध्ये महाराष्ट्रात येणार नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Tue, 06/21/2022 - 12:43

In reply to ठिक आहे by sunil kachure

Permalink

विधान परिषद निवडणुकीत जे घडले

विधान परिषद निवडणुकीत जे घडले त्या मुळे bjp समर्थक लोकांनी mipa चा मासळी बाजार करू नये. षटकार. एखादं राज्य जिकल्यासारखी बोंबाबोंब चाललीय. सरकार काही पडणार नाही. आणि निवडणूक झाली तरी bjp सरकार मध्ये महाराष्ट्रात येणार नाही. हे तर महाराष्ट्रातला बच्चाबच्चा जाणतो.
  • Log in or register to post comments

Submitted by sunil kachure on Tue, 06/21/2022 - 12:41

Permalink

सकाळी पाच वाजता

देवेंद्र फडणवीस ह्यांनी आज पासून रोज सकाळी ४ वाजता उठले पाहिजे.कधी ही चार तास मुख्यमंत्री होण्याची संधी येवू शकते. बाशिंग बांधून तयार राहावे फक्त नवरा कोण हे अजून आयटी सेल नी फिक्स केले नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Tue, 06/21/2022 - 12:44

In reply to सकाळी पाच वाजता by sunil kachure

Permalink

देवेंद्र फडणवीस ह्यांनी आज

देवेंद्र फडणवीस ह्यांनी आज पासून रोज सकाळी ४ वाजता उठले पाहिजे.कधी ही चार तास मुख्यमंत्री होण्याची संधी येवू शकते. बाशिंग बांधून तयार राहावे फक्त नवरा कोण हे अजून आयटी सेल नी फिक्स केले नाही. सर ईतकाही घाण अपमान नका करत जाऊ. :)
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Tue, 06/21/2022 - 12:42

Permalink

आता दुपारच्या बातम्या 'राजकीय भूकंप'

धावपळ सुरू आहे. ------------ क्याम्रासाठी ट्राईपॉड घेताना दुकानात छान वाटतो तो बाहेर वाऱ्यात उभा राहील का हा विचार करावा लागतो.
  • Log in or register to post comments

Submitted by sunil kachure on Tue, 06/21/2022 - 13:48

Permalink

विचाराने परिपक्व भारतीय कधी होणार

महाराष्ट्रात निवडणुका झाल्या,त्या नंतर अनंत राजकीय घडामोडी झाल्या. चूक की बरोबर हा प्रश्न फक्त लोकांना पडला पाहिजे पण राजकीय पक्षांना पडला. तीन पक्षांचे सरकार स्थापन झाले..ते सरकार राज्यात योग्य काम करत आहे की चुकीचे ह्याचे मोजमाप झाले पाहिजे. विरोधी पक्षातील लोकांना तुरुंगात पाठवत आहे का? लोकांवर अत्याचार करत आहे का? राज्याचे हीत धोक्यात येईल असे काम करत आहे का? राज्य घटनेचा अनादर करत आहे का? हे प्रश्न महत्वचे आहेत. सरकार वरील सर्व काम करत असेल तर विरोधी पक्षाने विरोध करावा . लोक साथ देतील . केंद्र सरकार नी असे सरकार बरखास्त करावे लोक पाठिंबा देतील. पण फक्त आमदार ,खासदार ह्यांना सत्ता पद नाहीत. पक्ष सत्ते बाहेर आहे . अशा स्वार्थी वृती नी सरकार धोक्यात आणत असाल तर ..हा तुमचा स्वार्थी हेतू आहे.. राज्याच्या हिताच्या विरुद्ध केलेले कृत्य आहे. सत्ता च हवी असेल तर प्रामाणिक पण जनतेचे हित जपले पाहिजे आणि जनतेच्या विरुद्ध,राज्याच्या हिताच्या विरुद्ध सरकार काम करत असेल तर विरोध केला पाहिजे. पाच वर्ष झाली की लोक तुम्हाला पूर्ण बहुमत देवून निवडून देतील. फक्त राजकीय हेतू नी चिंधी पना करू नका.
  • Log in or register to post comments

Submitted by sunil kachure on Tue, 06/21/2022 - 13:48

Permalink

विचाराने परिपक्व भारतीय कधी होणार

महाराष्ट्रात निवडणुका झाल्या,त्या नंतर अनंत राजकीय घडामोडी झाल्या. चूक की बरोबर हा प्रश्न फक्त लोकांना पडला पाहिजे पण राजकीय पक्षांना पडला. तीन पक्षांचे सरकार स्थापन झाले..ते सरकार राज्यात योग्य काम करत आहे की चुकीचे ह्याचे मोजमाप झाले पाहिजे. विरोधी पक्षातील लोकांना तुरुंगात पाठवत आहे का? लोकांवर अत्याचार करत आहे का? राज्याचे हीत धोक्यात येईल असे काम करत आहे का? राज्य घटनेचा अनादर करत आहे का? हे प्रश्न महत्वचे आहेत. सरकार वरील सर्व काम करत असेल तर विरोधी पक्षाने विरोध करावा . लोक साथ देतील . केंद्र सरकार नी असे सरकार बरखास्त करावे लोक पाठिंबा देतील. पण फक्त आमदार ,खासदार ह्यांना सत्ता पद नाहीत. पक्ष सत्ते बाहेर आहे . अशा स्वार्थी वृती नी सरकार धोक्यात आणत असाल तर ..हा तुमचा स्वार्थी हेतू आहे.. राज्याच्या हिताच्या विरुद्ध केलेले कृत्य आहे. सत्ता च हवी असेल तर प्रामाणिक पण जनतेचे हित जपले पाहिजे आणि जनतेच्या विरुद्ध,राज्याच्या हिताच्या विरुद्ध सरकार काम करत असेल तर विरोध केला पाहिजे. पाच वर्ष झाली की लोक तुम्हाला पूर्ण बहुमत देवून निवडून देतील. फक्त राजकीय हेतू नी चिंधी पना करू नका.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Tue, 06/21/2022 - 14:14

Permalink

सरकार डळमळीत होण्यामागे कारण

समृद्धी महामार्ग योजना आणि त्याची कंत्राटे हे कोणीही ओळखेल. गोवा महामार्ग रुंदीकरण इतके वर्ष रेंगाळण्याचं कारण कंत्राटदार गट पावरफुल आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by sunil kachure on Tue, 06/21/2022 - 14:29

Permalink

लोक असे पण मतदान करत नाहीत

असल्या बकवास खेळी मुळे लोक मतदान करणार च नाहीत. असे पण मतदान करायला लोकांना बिलकुल इंटरेस्ट नाही. टक्के वारी बघा १००% मतदान कुठेच होत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on Tue, 06/21/2022 - 14:34

Permalink

ते

काका तिकडं बोंबलायल की भाजपाचे ५ जण गडबड करु जिकले.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Tue, 06/21/2022 - 14:45

In reply to ते by इरसाल

Permalink

मला वाटतंय की काकांना

मला वाटतंय की काकांना मध्यावधी निवडणूक हवीये. त्यामुळे ते गुपचुप सरकार पाडण्याचा किंवा ठाकरेंना राजीनामा देऊन नवीन सरकार स्थापन होऊ न देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील. तसंही फडणवीसांना बहुमताची जुळवाजुळव करणे अवघड आहे. सेनेचे एकगठ्ठा ३८ आमदार फुटले तरच ते पक्षांतरबंदी कायद्यातून वाचतील. आज १०, उद्या ४, परवा २३ असे हप्त्याहप्त्यात आमदार फुटून उपयोग नाही. अर्थात पक्षांतरबंदी कायदा वापरण्याचा अधिकार विधानसभेच्या उपसभापतीला आहे का हे मला माहिती नाही. पुढील निवडणुकीत सेना व कॉंग्रेसची पूर्ण वाट लागणार आहे. सेना व भाजप वेगळे लढतील. परंतु आपल्या मदतीसाठी काका कॉंग्रेसबरोबर युती करून निवडणूक लढतील. सध्याची परिस्थिती काकांसाठी विन विन सिच्युएशन आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by sunil kachure on Tue, 06/21/2022 - 14:55

Permalink

राजकारण गेले चुलीत

ह्या राज्याचे हीत,मराठी लोकांचे हीत हे सर्वात वरती आहे.. सरकार राहो नाही तर जावो.. पण ह्या राज्याच्या मातीत ज्या लोकांनाच देह पोसला आहे ..त्यांनी मराठी माती शी आणि मराठी लोकांशी बेइमानी करू नये खास करून bjp walya लोकांसाठी. फालतू देश हीत राज्याच्या लोकांना भिकेला लावेल. ह्याचे भान ठेवा
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Tue, 06/21/2022 - 16:59

Permalink

हेच काका पूर्वी सांगायचे की

एकच पक्ष येणे कठीण आणि स्थानिक पक्षांची मदत घेऊन युती करावी लागणार. मग मध्यावधीमध्ये खर्च करूनही पुन्हा काय वेगळे चित्र येणार?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद_१९८२ on Tue, 06/21/2022 - 17:18

Permalink

सध्याच्या घडामोडी पाहाता,

सध्याच्या घडामोडी पाहाता, भाजपा पुन्हा एकदा तोंडावर आपटणार असेच दिसते.
  • Log in or register to post comments

Submitted by डँबिस००७ on Tue, 06/21/2022 - 17:23

In reply to सध्याच्या घडामोडी पाहाता, by प्रसाद_१९८२

Permalink

सध्याच्या घडामोडी पाहाता,

सध्याच्या घडामोडी पाहाता, भाजपा पुन्हा एकदा तोंडावर आपटणार असेच दिसते. जर ह्या "कांडा" च्या मागे भाजपा असेल तर नक्कीच तोंडावर आपटणार. पण भाजपा असा हरणारा खेळ का खेळेल ?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Tue, 06/21/2022 - 17:30

In reply to सध्याच्या घडामोडी पाहाता, by डँबिस००७

Permalink

सेना व कॉंग्रेस या दोन पक्षात

सेना व कॉंग्रेस या दोन पक्षात दोन गट, मतभेद, एकमेकांविषयी संशय निर्माण करणे, हे दोन्ही पक्ष आतून पोखरून दुर्बल करणे हे उद्दिष्ट असावे. राज्यात अस्थिरता निर्माण झाली आहे असा अहवाल राज्यपाल केंद्रीय गृहखात्याला पाठवून राज्यात राष्ट्रपती राजवट आणून काही काळाने नवीन सरकारची जुळवाजुळव करणे किंवा सेना, कॉंग्रेस या पक्षातील फुटीचा फायदा घेण्यासाठी मध्यावधी निवडणूक घेणे हे उद्दिष्ट सुद्धा असू शकते.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद_१९८२ on Tue, 06/21/2022 - 17:35

Permalink

२०१९ मधे भाजपा असाच उतावळा

२०१९ मधे भाजपा असाच उतावळा खेळ खेळली होती व त्याचे परिणाम आपण पाहिलेच होते. एकनाथ शिंदेचे माहित नाही, मात्र त्यांच्यासोबत गेलेले आमदार त्यांच्या बरोबर कितीकाळ राहातात हा प्रश्न आहे. अजित पवारांबरोबर फुटलेले आमदार एक दिवस ही टिकले नव्हते.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Tue, 06/21/2022 - 17:41

In reply to २०१९ मधे भाजपा असाच उतावळा by प्रसाद_१९८२

Permalink

राष्ट्रपती राजवट उठविण्यासाठी

राष्ट्रपती राजवट उठविण्यासाठी अजित पवारांना काकांनीच पाठवून फडणवीसांना लालूच दाखविली होती. शपथविधी झाल्यानंतर अजित पवार मंत्रालयाकडे फिरकलेच नव्हते. ते घरी जाऊन पुढील सूचनांची वाट पहात ३ दिवस स्वस्थ बसून होते. पुढील ३ दिवसात काकांनी सोनिया गांधींचे मन वळवून सेना-राष्ट्रवादी सरकारला कॉंग्रेसचा पाठिंबा मिळवून आपले उद्दिष्ट साध्य केले. बिच्चाऱ्या फडणवीसांना धूर्त काकांचे डावपेच समजलेच नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Tue, 06/21/2022 - 17:37

Permalink

शिवसेना फुटू शकते

एवढेच आत अधोरेखित झाले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Tue, 06/21/2022 - 17:44

In reply to शिवसेना फुटू शकते by कंजूस

Permalink

सेना भूतकाळात अनेकदा फुटली

सेना भूतकाळात अनेकदा फुटली आहे. पूर्वी बंडू शिंगरे व माधवराव देशपांडे फुटले, नंतर भुजबळांसहीत १८ आमदार फुटले, नंतर राणे, नंतर राज ठाकरे, दरम्यानच्या काळात गणेश नाईक, भास्कर जाधव, विनायक निम्हण, प्रकाश परांजपे, संजय निरूपम वगैरे फुटले होते.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद_१९८२ on Tue, 06/21/2022 - 17:46

Permalink

"भाजपात जाण्याऐवजी किंव्हा

"भाजपात जाण्याऐवजी किंव्हा फडणवीस मुख्यमंत्री होण्याऐवजी तूच मुख्यमंत्री हो, मी राजीनामा देतो" अशी ऑफर एकनाथ शिंदेना देऊन जनतेच्या नजरेत सहानभुती मिळवायची एक चांगली संधी, उद्धव ठाकरेंकडे चालून आली आहे, अर्थात ते या संधीचा फायदा घेतात की उर्मटपणे शिंदेवर कारवाई करतात ते आता पाहायचे.
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on Tue, 06/21/2022 - 18:24

In reply to "भाजपात जाण्याऐवजी किंव्हा by प्रसाद_१९८२

Permalink

हम्म

मुख्यमंत्री होता येत नाही म्हणून पक्ष सोडला हे संभवत नाही. शिवसेना ही काँग्रेस्/भाजपा नाही तर घराणेशाहीवर चालणारा पक्ष आहे. त्यामुळे उद्धव ह्यांना उघडपणेआव्हान कोणी देणार नाही. जे काही वाचायला मिळतेय त्यावरुन असे दिसतेय की उद्धव आमदारांना भेटण्यास्/त्यांनी मांडलेले प्रश्न ऐकुन घेण्यास फार वेळ देत नसत. मंत्र्यानादेखील भेटण्यास उद्धव जात वेळ देत नाहीत अशी तक्रार आहे. एकनाथ शिंदे ह्यांचा पुत्र श्रीकांत खासदार आहे. तो ठाणे/कल्याण मतदारसंघात खूप लोकप्रिय आहे. त्याला वेसण घालण्यासाठी उद्धव/ईतर सेना नेत्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची मदत घेतली असाही आरोप आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद_१९८२ on Tue, 06/21/2022 - 18:37

Permalink

एकनाथ शिंदेनी बंड केल्यानंतर

एकनाथ शिंदेनी बंड केल्यानंतर सर्वात जास्त अडचण मविआच्या पाळीव पत्रकार व विचारवंताची झाली आहे. मविआ सरकार पडल्यास दररोज मिळणारे 'पाकिट' बंद होईल या भितीने एकनाथ शिंदेना शिवसनेने कसे भरभरुन दिले, उद्धव ठाकरेंचे नेतृत्व कसे प्रभावी आहे, शिंदेच्या कोणत्याही प्रस्तावाला ठाकरे अजिबात भिक घालणार नाहीत वगैरे वगैरे सांगण्याची पाळीव पत्रकार व विचारवंतात सध्या चढाओढ लागली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on Tue, 06/21/2022 - 18:50

In reply to एकनाथ शिंदेनी बंड केल्यानंतर by प्रसाद_१९८२

Permalink

पाकिटा

पाकिटापेक्षाही अग्रलेखातून जगाला/मोदी/शहाना उपदेश कसे करायचे ह्याचीही चिंता असणार. शिंदे ह्यांनी माघार घेतली तर बुद्धीजीवी संपादक आनंदाने बेहोश होतील, उद्धव्/राउत ह्यांचे महिनाभर कौतुक होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Tue, 06/21/2022 - 19:35

Permalink

घेताहेत माघार!!

एवढा विरोध करायची ताकद आली कुठून? कॉन्ग्रेसही बाहेर पडणार मविआतून असं दिसतंय.
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on Tue, 06/21/2022 - 19:55

In reply to घेताहेत माघार!! by कंजूस

Permalink

बहुदा

बहुदा राष्ट्र्वादी बाहेर पडेल. गुजराती चॅनेल्सवर "सूरतमधील हॉटेलात आहे शिंदे ह्यांच्यासोबत राष्ट्रवादीचा एक मोठा नेता आहे" अशी बातमी होती. संध्याकाळी हा नेता शिंदे ह्यांची गाठ अमित शहा/नड्डा ह्यांच्याशी घालून देणार आहे अशी बातमी होती.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Tue, 06/21/2022 - 21:15

Permalink

ठाण्याचं कल्याण होणे आता दूर नाही.

बाकी सूरतचे चांगले पदार्थ - सुतरफेणी आणि घारी. दादरलाही मिळते. मधुर स्वीट्स जुन्या अगरवाल क्लासच्या इमारतीजवळ.
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on Tue, 06/21/2022 - 23:00

In reply to ठाण्याचं कल्याण होणे आता दूर नाही. by कंजूस

Permalink

हा हा हा

तो पंजाबी चंदू हलवाई कराचीवालाही एकेकाळी प्रसिद्ध होता. खोदादाद सर्कलला.असो. शिंदे ह्यांच्यासोबत ३० हुन अधिक आमदार आहेत. शिवसेनेने भाजपाशी युती करावी अशी त्यांची मागणी आहे. ही अर्थात अमान्य होईल. मग काय? शिंदे वेगळा पक्ष काढणार? की भाजपात सामील होणार?
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Tue, 06/21/2022 - 23:10

In reply to हा हा हा by माईसाहेब कुरसूंदीकर

Permalink

शिवसेनेने भाजपाशी युती करावी

शिवसेनेने भाजपाशी युती करावी अशी त्यांची मागणी आहे अशी काहीबाही मागणी त्यांनी केलेली नाही. तुम्हाला कुठून कळलं माई?
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on Wed, 06/22/2022 - 00:09

In reply to शिवसेनेने भाजपाशी युती करावी by अमरेंद्र बाहुबली

Permalink

हम्म

https://www.youtube.com/watch?v=sH103_0kK7Y https://www.youtube.com/watch?v=p1zMu32HBM0 https://www.news18.com/news/politics/im-with-hindutva-will-not-return-to-shiv-sena-eknath-shinde-5416321.html "मी हिंदुत्वाबरोबर आहे. मी शिवसेनेत जाणार नाही". हिंदुत्व वगैरेच्या गप्पा मीडियात ठीक. पण सेना सोडण्याची कारणे जी काही माहित झाली- १)राष्ट्रवादीच्या नेत्यांतर्फे शिंदे व त्यांच्या खासदार पुत्राचे ठाण्यात पंख कापण्याचे उद्योग उद्धव व सेनेचे काही नेते करत होते. २)गेल्या वर्षभराहुन अधिक काळ उद्धव व शिंदे ह्यांत धूसपुस चालू होती(https://www.lokmattimes.com/maharashtra/thackeray-memorial-how-come-mmrda-minister-eknath-shindeji-not-invited-asks-nitesh-rane/)
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Wed, 06/22/2022 - 03:40

In reply to शिवसेनेने भाजपाशी युती करावी by अमरेंद्र बाहुबली

Permalink

ही नवीन बातमी पाहा

नार्वेकर वकील आणी शिंदे भेट सूरतेत
  • Log in or register to post comments

Submitted by कानडाऊ योगेशु on Tue, 06/21/2022 - 23:38

Permalink

अजित पवारांना पुढे करुन

अजित पवारांना पुढे करुन पहाटेचा शपथविधीसारखा करण्यासारखा प्रकार वाटतोय. होणार काही नाही पण देवेंद्र फडणवीस व पर्यायाने भाजपाच्या बोकांडी अजुन एक फजिती/मूर्खपणा बसेल. पहाटेचा शपथविधीचा आततायी पणा करुन फडणवीस अगोदरच अनेकांच्या मनातुन उतरले आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by चौकस२१२ on Wed, 06/22/2022 - 10:31

In reply to अजित पवारांना पुढे करुन by कानडाऊ योगेशु

Permalink

भाजपाच्या बोकांडी अजुन एक

भाजपाच्या बोकांडी अजुन एक फजिती/मूर्खपणा बसेल. पहाटेचा शपथविधीचा आततायी पणा करुन फडणवीस अगोदरच अनेकांच्या मनातुन उतरले आहेत. १००%
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Tue, 06/21/2022 - 23:39

Permalink

उठांनी ही संधी सोडू नये ...

मला वाटतं की सरकार पडायची ही संधी उठांनी आजीबात सोडू नये. खुशाल विरोधात बसावं आणि २०२४ ला दणकून मैदान मारावं. मध्ये एकनाथ शिंदेसारखा मोहरा बळी पडला याचं दु:ख आहे. -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 06/22/2022 - 10:43

In reply to उठांनी ही संधी सोडू नये ... by गामा पैलवान

Permalink

मैदान विसरा आता. घरात बसून

मैदान विसरा आता. घरात बसून मैदान मारता येत नाही. पूर्वी भुजबळ ५२ पैकी १८ आमदार घेऊन बाहेर पढले होते. आता ५५ पैकी जवळपास ३५ आमदार फुटलेले दिसतात. कदाचित जास्तच असतील. किमान ३७ आमदार असतील तर शिंदे गटालाच शिवसेना अशी मान्यता मिळून धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मिळेल किंवा हे पक्षचिन्ह गोठवले जाईल. खरं तर २०१९ च्या निवडणुकीतच सेना संपलेली दिसली असती. परंतु फडणवीसांनी पुन्हा एकदा सेनेशी युती करण्याची गंभीर घोडचूक करून सेनेचे आमदार निवडून आणून सेनेला प्राणवायू पुरविला. पुढील निवडणुकीत एकट्याने लढून सेना संपली यावर मोहोर लागली असती. पण ती वेळ अडीच वर्षे अलिकडेच आली असे निदान आजतरी चित्र दिसत आहे. महाराष्ट्रासंबंधित सर्व निर्णय यापुढे मोदी-शहांनी एकट्याने घ्यावे. निर्णयप्रक्रियेत फडणवीस/चंपा यांना सहभागी केले महाराष्ट्रात भाजप पुन्हा एकदा तोंडावर आपटेल हे नक्की.
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Wed, 06/22/2022 - 11:18

In reply to मैदान विसरा आता. घरात बसून by श्रीगुरुजी

Permalink

आंध्र

१९९५ मध्ये चंद्रबाबू नायडूंनी आपले सासरे एन.टी.रामारावांविरोधात बंड केले. त्यावेळी तेलुगू देसम पक्षाचे बरेचसे आमदार चंद्रबाबूंबरोबर आले आणि रामाराव राजकारणातून बाहेर फेकले गेले. सध्या एकनाथ शिंदेंबरोबर ३५-४० आमदार आहेत असे दिसते. जर त्यांचे पारडे जड आहे असे चित्र उभे राहिले तर इतर काही आमदारही त्यांच्याबरोबर जाऊन उधोजींना हद्दपार करू शकतील आणि १९९५ मध्ये आंध्रमध्ये झाले ते २०२२ मध्ये महाराष्ट्रात होऊ शकेल. एकनाथ शिंदे चारवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. ठाकरे सरकारने घातलेल्या सावळ्यागोंधळाविरोधात जनतेत मोठा संताप आहे हे त्यांच्यासारख्या जमिनीवरील कार्यकर्त्याला अधिक चांगल्या पध्दतीला समजू शकेल. स्वतः ठाकरे आणि ते ज्या संजय राऊतांच्या पूर्ण कह्यात गेले आहेत त्यांनीही एकदाही कधी निवडणुक लढवलेली नाही. त्यांच्या सगळ्या फुशारक्या चालू आहेत या निवडून गेलेल्या आमदारांच्या जीवावर. शिवसेनेतील जमिनीवरील कार्यकर्त्यांना ठाकरेंच्या मनमानीविरोधात असंतोष वाढला तर त्यात अजिबात आश्चर्य वाटण्यासारखे नाही. एकंदरीत या सगळ्या नाट्याचे पुढे काय होईल हे सांगता येत नसले तरी ठाकरे जर राजकारणातून हद्दपार झाले तर ती एक खूप चांगली घटना असेल. फक्त फडणवीस, गडकरी आणि चंद्रकांत पाटील यांना शिवसेनेचे प्रेमाचे भरते येऊन परत एकदा शिवसेनेपुढे शेपूट हलवत जायची अवदसा त्यांना आठवू नये हे नक्कीच.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 06/22/2022 - 14:32

In reply to आंध्र by चंद्रसूर्यकुमार

Permalink

ठाकरे जर राजकारणातून हद्दपार

ठाकरे जर राजकारणातून हद्दपार झाले तर ती एक खूप चांगली घटना असेल. फक्त फडणवीस, गडकरी आणि चंद्रकांत पाटील यांना शिवसेनेचे प्रेमाचे भरते येऊन परत एकदा शिवसेनेपुढे शेपूट हलवत जायची अवदसा त्यांना आठवू नये हे नक्कीच. अगदी हेच म्हणतो. थोडीशी भर टाकून सांगतो की भाजपने सेनेप्रमाणे राष्ट्रवादीबरोबर सुद्धा जाऊ नये.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Wed, 06/22/2022 - 14:52

In reply to ठाकरे जर राजकारणातून हद्दपार by श्रीगुरुजी

Permalink

भाजपने सेनेप्रमाणे

भाजपने सेनेप्रमाणे राष्ट्रवादीबरोबर सुद्धा जाऊ नये. सत्तेसाठी मेहबूबा बरोबर जानारे राष्ट्रवादी सोबत गेल्यावर प्राॅब्लेम काय?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 06/22/2022 - 14:58

In reply to भाजपने सेनेप्रमाणे by अमरेंद्र बाहुबली

Permalink

अज्ञानी प्रतिसादामुळे खिक्क

अज्ञानी प्रतिसादामुळे खिक्क खिक्क खिक्क . . .
  • Log in or register to post comments

Submitted by sunil kachure on Wed, 06/22/2022 - 15:09

In reply to भाजपने सेनेप्रमाणे by अमरेंद्र बाहुबली

Permalink

निवडणुकी अगोदर आणि नंतर

कोणताही राजकीय पक्ष असू ध्या ..त्या मध्ये bjp pan आहे. Bjp काही मोठ्या नीतिमान पक्ष नाही.. मेहबूबा पण मेहबूब वाटली होती bjp ल. BJP एकटी लढली आणि हवे तेवढे आमदार निवडून आले नाहीत तर bjp नी काँग्रेस शी युती केली तर आश्चर्य वाटायचे कारण नाही...सेने बरोबर तर आता पण bjp युती करेल.. राष्ट्रवादी बरोबर चार तासाचे सरकार bjp नी बनवले होते ना.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रदीप on Wed, 06/22/2022 - 11:26

In reply to मैदान विसरा आता. घरात बसून by श्रीगुरुजी

Permalink

भाजपाची अधोगती

महाराष्ट्रांतील भाजप ज्या तर्‍हेने हे सर्व प्रकरण हाताळते आहे, त्यांतून त्यांची येनकेन प्रकारे सत्ता मिळवण्याची हतबलता दिसून येत आहे. गेल्या निवडणूकांपासूनच त्यांनी राश्ट्रवादी इत्यादी पक्षांतून बाजारबुणग्यांची भरती स्वपक्षांत केली, त्यांतून काय निष्पन्न झाले? ह्या पक्षाचे बळ त्यांच्या पक्षाची जी काही विचारसरणी आहे, त्याच्याशी अंतर्बाह्य एकरूप होऊन कार्य करणारे कार्यकर्ते होते. ह्या नव्या खोगीरभरतीमुळे त्याचे कार्य व प्रतिमा अतिशय डागाळलेली झाली आहे, व होत रहाणार आहे. आता हे जे काही तथाकथित फुटीर सेना आमदार- खासदार आहेत, ते भाजपांत दाखल होवोत अथवा स्वत:च सेनेचा झेंडा हाती घेवोत. त्यांच्याशी मिळवून घेणे ह्यापुढे भाजपाला भाग आहे. ह्यांपैकी किमान एका तरी आमदारावर ई.डी. ची केस सुरू आहे. ती आता गुलद्स्त्यांत ठेवावी लागेल. श्रीगुरुजी येथे अनेकदा, ह्या सर्वासाठी फडणवीसांना(च) दोषी ठरवतात. फडणवीस हे सगळे पुढे राहून, प्रत्यक्ष धोरणे आखून वगैरे घडवून आणत असले, तरी भाजपच्या शीर्षनेत्यांचे, प्रत्येक पाऊलावर, शिक्कामोर्तब असणारच, ह्याबद्दल शंका बाळगण्याचे कारण नाही. ह्यावरून भाऊ तोरसेकर काही वर्षांपूर्वी म्हणाले होते ते आठवले. 'सुमारे तीस- चाळीस वर्षे सत्तेत राहिल्यानंतर भाजप, आताच्या कॉंग्रेससारखाच भ्रष्ट व कसलाही विधीविशेष नसलेला पक्ष होईल, असे त्यांचे अनुमान होते. मला हे पटते आहे-- पण एका फरकाने. कॉंग्रेसने सध्या ते जे काही आहेत तिथवर येण्यास ६०+ वर्षे घेतली. कारण सुरूवातीच्या तीसेक वर्षांत देशांत आयुष्य सुस्त होते, मीडिया संपूर्णपणे मूठभर संस्था व व्यक्तिंच्या ताब्यांत होती. माहितीचे प्रसारण बर्‍याच धीम्या गतीने होत होते, किंवा तेही होत नव्हतेच. आता सोशल मीडिया व वेब बेस्ड मीदिया पोर्टल्समुळे माहिती प्रसारण, वितरण इत्यादी आमूर्लाग्र बदलले आहे. तेव्हा भाजपचा र्‍हास झपाट्याने होईल. सुमारे २०३५- ४० च्या दरम्यान ती सत्तेबाहेर फेकली जाईल. म्हणजे सत्तेत आल्यानंतर जेमतेम ३० वर्षांनी.
  • Log in or register to post comments

Submitted by रात्रीचे चांदणे on Wed, 06/22/2022 - 12:02

In reply to भाजपाची अधोगती by प्रदीप

Permalink

हो पण सेना आमदार स्वतःहुन

हो पण सेना आमदार स्वतःहुन फुटत असतील तर भाजपाने फायदा का नको करून घायला? शेवटी सत्ता पण महत्वाची आहेच की. काल पर्यंत तरी भाजप नेत्यांनी सावध भूमिका घेतलेली दिसते.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com