Skip to main content

ताज्या घडामोडी - जून २०२२ (भाग २)

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी शनिवार, 18/06/2022 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात २५० प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. आधीच्या भागातील चर्चेसंदर्भात प्रतिसाद द्यायचा असल्यास त्या भागात आणि नवीन काही लिहायचे असल्यास या भागात लिहावे ही विनंती. लोकप्रिय व्यक्तीमत्व अभिजीत बिचुकले यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उडी घ्यायचे ठरविले आहे. विविध राज्यातील १०० आमदारांचा पाठिंबा मिळविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. आपल्याला राज्यघटना आणि कायदा याची चांगली जाण असून आपण राष्ट्रपती व्हायला योग्य आहोत असा त्यांचा दावा आहे. आपली राष्ट्रपती व्हायची इच्छा आहे हे त्यांनी मागच्या वेळेस मोदींना सांगितले होते पण आयत्या वेळेस मोदींनी रामनाथ कोविंदांचे नाव पुढे आणल्याने त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला असे दिसते. असो. अभिजीत बिचुकलेंना हार्दिक शुभेच्छा. २५ जुलै रोजी नवे राष्ट्रपती म्हणून ते शपथ घेताना दिसतील का? आणखी एक मराठी व्यक्ती राष्ट्रपती झाल्यास त्याचा आपल्या सगळ्यांनाच आनंद व्हायला हवा :) Bichukale

वाचने 46247
प्रतिक्रिया 216

प्रतिक्रिया

तो धरतीपकड नावाचा कोणीतरी एक इसम प्रत्येक वेळी राष्ट्रपती/उपराष्ट्रपती निवडणुकीला उभा रहायचा. प्रत्येक वेळी त्याच्या अर्जावर स्वाक्षरी करणारे समर्थक आमदार/खासदार त्याला कसे मिळत होते?

In reply to by श्रीगुरुजी

प्रत्येक वेळी त्याच्या अर्जावर स्वाक्षरी करणारे समर्थक आमदार/खासदार त्याला कसे मिळत होते?
तेच समजत नाही. काका जोगिंदरसिंग हे त्याचे मूळ नाव होते. त्याने नगरसेवकापासून राष्ट्रपतीपदापर्यंत जवळपास २०० वेळा निवडणुक लढवली होती. तो प्रत्येक वेळेस हरला नव्हे त्याची अनामत रक्कमही जप्त झाली हे वेगळे सांगायलाच नको. त्यामुळे त्याने 'धरतीपकड' हे टोपणनाव घेतले होते. त्याला अगदी राष्ट्रपती/उपराष्ट्रपतीपदाची निवडणुक लढवताना प्रस्तावर म्हणून आमदार/खासदारांच्या सह्या मिळायच्याच. पण थोडीफार मतेही मिळायची. १९९२ च्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत त्याने के.आर.नारायणनविरोधात निवडणुक लढवली होती आणि एका खासदाराचे मत त्याला मिळाले होते. १९९२ मध्येच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शंकरदयाळ शर्मा आणि जी.जी.स्वेल यांच्याबरोबरीने धरतीपकडनेही निवडणुक लढवली होती आणि त्याला हजारेक मूल्य असलेली मते मिळाली होती. याचा अर्थ त्याला पूर्ण देशातून २-३ मते मिळाली असली पाहिजेत.

In reply to by श्रीगुरुजी

प्रत्येक वेळी त्याच्या अर्जावर स्वाक्षरी करणारे समर्थक आमदार/खासदार त्याला कसे मिळत होते? श्रिगुरूजी, तेव्हा आमदार खसदार ह्यांची सही असण्याचे बंधन नव्हते. कुणीही ऊभा राहू शकत होतं.

त्या बिचुकले नामक इसमाला सातार्‍यात मी एकदा भेटलो आहे. प्रचंड उर्मट अणि स्वतःला सर्वज्ञ समजणारा इसम आहे. तो जर राष्ट्रपती झाला तर या देशाचे काय होईल कोण जाणे. त्याला समर्थन देणारे खासदार कसे मिळतात कोण जाणे.

In reply to by विजुभाऊ

प्रचंड उर्मट अणि स्वतःला सर्वज्ञ समजणारा इसम आहे.
म्हणजे आपला मराठी सुब्रमण्यम स्वामीच, म्हणा की !

In reply to by श्रीगुरुजी

सुब्रह्मण्यम स्वामी अत्यंत बुद्धिमान आहेत. ते बरोबर आहे हो. पण अध्येमध्ये ते भाजपला घरचा आहेर देत असतात. मग त्यांच्यावर टिका करायला नको?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

भगवान बुध्द ना पिपळाच्या झाडाखाली दिव्य ज्ञान प्राप्ती झाली होती.. आईनस्टाईन लं तर सफरचंद च्या झाडं खाली ज्ञान प्राप्ती झाली होती. तशा आपल्या तेजस्वी , दैदिप्मान ,विश्व गुरू ह्यांना अयोध्या मध्ये गेल्यावर दिव्यज्ञान मिळते असे तर नाही ना? मध्ये मध्ये ज्ञान रिफिल करण्यासाठी पण तिथे जावे लागते. तेजस्वी बुद्धी चे हेच गुपित असावे.

In reply to by प्रसाद_१९८२

तुम्ही पण बिचुकलेच!! :-) आमच्या खबरीं ने दिलेल्या पक्क्या टीप नुसार त्यांना "ताडा च्या ज्ञानप्राप्ती झाली आहे"

In reply to by सुक्या

"ताडा च्या ज्ञानप्राप्ती झाली आहे" ऐवजी . . "ताडा च्या झाडाखाली ज्ञानप्राप्ती झाली आहे" असे वाचावे ...

ट्रम्प ह्यांचे "सल्लागार" श्रीयुत पीटर नावारो ह्यांची आठवण आली. नावरो प्रत्येक निवडणूक लढले आणि हरले. बहुतेक इलेक्शन ते डेमोक्रॅट म्हणून लढले. एकदा तर हिलरी क्लिंटन ह्यांनी त्यांचा प्रचार केला होता आणि अगदी सेफ सीटवरून लढले तेंव्हा सुद्धा डेपोसिट जप्त. शेवटी अगदी आपल्या HOA चे इलेक्शन सुद्धा हरले. मग ते सोडून त्यांनी आपले नाव बदलले आणि "रॉन वीरा" नावानी पुस्तके वगैरे लिहायचे आणि मग नावरो नावाने दुसरी पुस्तके लिहून त्यांत रॉन वीरा ला "एक्स्पर्ट" म्हणून कोट करायचे. अभिजीत बिचुकले सारखे विद्वत्ताप्रचुर व्यक्तिमत्व राष्ट्रपती भवनात अत्यंत शोभून दिसले असते आणि त्यांच्या प्रभावी अस्तित्वाने त्या भवनाची गरिमा वाढली असती ह्यांत शंका नाही. बिचुकले म्हणजे उधोजींचे तडफदार व्यक्तिमत्व, गडकरी ह्यांची पिळदार शरीरयष्टी, पवार ह्यांची खणखणींत वाणी आणि साक्षात मोदी ह्यांचे कौटुंबिक व्यक्तिमत्व ह्यांचे सुयोग्य मिश्रण होय. पण बिचुकले ह्यांचा योग्य तो सन्मान करण्याची क्षमता भारतीय व्यवस्थेत नाही. वेलेन्टाइन डे दिवशी ज्यांना गर्लफ्रेंड आहे अश्या लोकांना धमकावत फिरणाऱ्या संस्कृतीरक्षण शिळ्या सैनिकाला त्याच बागेंत कुणा ललनेने अचानक गुलाबाचे फुल द्यावे आणि तो शिळा सैनिक गोंधळून जावा अशीच अवस्था आम्हा जनतेची बिचुकले ह्यांच्या अस्तित्वापुढे होईल.

सुमारे ६०-६५ वर्शापूर्वी मुम्बईच्या गिरगाव भागातले हे ग्रहस्थ नेहरून्च्या विरुद्ध निवडणुकीत उभे राहायचे व डिपॉझिट जप्त न होता हरायचे. नन्तर त्यानी आपले नाव आणि धर्म बदलून ग्यानी कर्तारसिन्ग असे नाव घेतले होते. ते पगडी घालून आणि तलवार घेऊन फिरत असत.

बिचुकले म्हणजे उधोजींचे तडफदार व्यक्तिमत्व, गडकरी ह्यांची पिळदार शरीरयष्टी, पवार ह्यांची खणखणींत वाणी आणि साक्षात मोदी ह्यांचे कौटुंबिक व्यक्तिमत्व ह्यांचे सुयोग्य मिश्रण होय.
आम्हाला दात ईचकायला लावायला हातभार लावला आहे आपण.

विरोधी पक्षांनी आता एकजूट दाखवणे खूप खूप गरजेचे आहे.५२,,% मत विरोधी पक्षांकडे आहेत. फक्त एकजूट असणे महत्वाचे आहे. हुशार,स्वाबुद्धी असणारा ,राजकीय व्यक्ती नसला तरी चालेल. पण सर्व विरोधी पक्षांनी एक होवून राष्ट्रपती विरोधी पक्षाने उभा केलेला उमेदवार च झाला पाहिजे. काळ नाजूक आहे.

एखाद्या योजने विषयी विरोध करून थेट अचानक जाळ्पोळ दंगल वगैरे निर्माण केली जाते. त्यावेळी संशय येतो नक्की कशावरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न आहे? अशी काय ताजी घडामोड आहे जी माध्यमातून नाहीशी करणे आवश्यक झाले?

भारतातील चीनचे राजदूत सन वेइडोंग यांनी भारतातील प्रमुख इंग्रजी वृत्तपत्र द हिंदूच्या मुख्यालयाला भेट दिली. चीनच्या राजदूतांना द हिंदू वृत्तपत्राबरोबर परस्पर समज आणि विश्वास निर्माण करायचा आहे! याच वृत्तपत्राने चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दी वर्षात भल्यामोठ्या चीनी जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या. चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दी वर्षात भारतातील सीताराम येचिरी, डी राजा, एस. सेंथिलकुमार आणि जी. देवराजनिन यांसारख्या अनेक कम्युनिस्ट नेत्यांनीही भाग घेतला होता. मुख्य माध्यमांत याची कुठेही बातमी आलेली नाही हे नोंद घेण्याजोगे आहे!

https://www.lokmat.com/national/agneepath-protest-agneepath-scheme-big-… दलालांना भडकवून आंदोलन करून शेतकऱ्यांचं वाटोळं केल्यानंतर हा आता तरूणांचं विटोळं करणार. जंग जंग पछाडून सुद्धा याला आणि याच्या समर्थकांना उत्तर प्रदेश व इतर तीन राज्यात भाजपला हरविता आलै नाही। मोदींनी कृषी कायदे मागे घेतल्यापासून हा अडगळीत पडला होता. आता परत हा फुरफुर करायला लागलाय. पुढील हिंसाचार टाळण्यासाठी व तरूणांना भडकवून भविष्यातील हिंसाचार टाळण्यासाठी याला तातडीने राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली दीर्घ मुदतीसाठी तुरूंगात टाकले पाहिजे.

In reply to by श्रीगुरुजी

केंद्र सरकार राकेश टिकैत, महम्मद झुबैर ( अल्ट न्युज) , द प्रिंट, सारख्या फेक न्युज पसरवणार्या विरुद्द ठोस कारवाई का करत नाहीय ? अग्निवीर योजने विरुद्ध बराच बवाल बिहार मधला काँ ग्रेसचा मुसलमान नेता बरळला आहे. अग्निवीर् योजना मागे घ्या अन्यथा पुर्ण देश जाळु अस तो म्हणाला

रिपब्लिक भारत,आज तक,आणि बाकी किंचाळून , आरडा ओरड करणारे गोदी मीडिया चॅनेल. ह्यांच्या विषयी तर रशिया पासून अनेक देशांनी आक्षेप नोंदवला आहे.

In reply to by sunil kachure

रशिया किस झाड की पत्ती है, एकदा तुम्ही आक्षेप नोंदवा. दुसर्‍याच क्षणी सर्व चॅनेल बद होतील.

विधानपरीषद निवडणुकीत भाजपचे सर्व ५ उमेदवार विजयी. कॉंग्रेसचे चंद्रकांत हंडोरे पराभूत. भाजपने मविआची किमान २० मते फोडली. राज्यसभेपाठोपाठ विधानपरीषदेत मविआला जोरदार दणका.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

माझ्या माहीतीनुसार महाराष्ट्रात "महा विकास आघाडी" चे सरकार आहे. त्यांनी जनतेचे प्रश्न सोडवणे अपेक्षित आहे. हे पण भाजपा ने करावे का? का करावे?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात आहे. त्याबद्दल बोलतोय. राज्यातले सरकार जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नसते का? की त्यासाठी पण विरोधी पक्षच जबाबदार आहेत. काही लोकांचे प्रश्न सोडवले हे मान्य. उदा: दारूवरचे कर कमी केले. हे एक उदाहरणादाखल. तेदेखील कोणीही मागणी केली नसताना

In reply to by निनाद

साडे तिन जिल्ह्याच्या नेत्याला बंगालच्या ननता नी दिल्लीचे केजरीवाल राष्ट्रपती बना म्हणून विनंती करतात. :) देशाचे पंतप्रधान त्यांना गुरू मानतात. :)

भाजपला २८३ पैकी पहिल्या पसंतीची १३४ मते मिळाली आहेत. कालच्या अनुभवावरून महा विनाश आघाडी विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक घ्यायचे धाडस करणार नाही कारण त्या निवडणुकीत सुद्धा गुप्त मतदान असते.

In reply to by श्रीगुरुजी

विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक घ्यायचे धाडस करणार नाही कारण त्या निवडणुकीत सुद्धा गुप्त मतदान असते. २०१९ ला पहाटे च्या शपथेनंतर कोर्चाने आदेश दिला की हात वर करून मतदान घ्या. नी लगेच दुसर्या दिवशी राजिनामा! खिक्क. :)

गाढवाच्या शेपटीला फटाक्यांचा सर लावून पेटविल्यानंतर ते गाढव जसे दुगाण्या झाडत सैरावैरा धावत सुटतं, तसं काल रात्रीपासून सेनेचं झालंय.

महाभकास आघाडीच्या सरकारने अगदी उबग आणला आहे- नव्हे कमालीची शिसारी आणि किळस वाटायला लागावी असला प्रकार सध्या महाराष्ट्रात चालू आहेत. एक तर या सरकारची स्थापनाच मुळात लोकांनी दिलेल्या जनादेशाला पायदळी तुडवून झाली आहे. सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळापैकी अर्ध्यापेक्षा जास्त काळ उलटला तरी '१०५ ना घरी बसवले, १०६ ना घरी बसवले' यापुढे त्यांची गाडी जात नाही. खरं सांगायचं तर या महाभकास आघाडी सरकारने १०५/१०६ ना घरी बसविण्याव्यतिरिक्त आणखी दोनच गोष्टी साध्य केल्या आहेत. पहिली म्हणजे सत्तेला घोरपडीसारखे चिकटून राहिले आणि दुसरी म्हणजे (माझ्यासाठी) सर्वात नावडत्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत केजरीवालांना दुसर्‍या नंबरला ढकलले. आपल्या मर्जीतल्या गुलाम आणि लाचार मिडियाला हाताशी धरून मधूनमधून हे आखिल ब्रह्मांडातील सर्वोत्तम मुख्यमंत्री असले कसलाही आधार आणि आगापिछा नसलेले सर्व्हे मधूनमधून प्रसिध्द करणे हा डोक्यात जाणारा आणखी एक प्रकार होता. तसेच 'उध्दव ठाकरे कित्ती कित्ती संयत भाषेत बोलतात' ची सगळ्या मोठ्यामोठ्या विचारवंतांनी केलेली हाकाटी हा डोक्यात जाणारा दुसरा प्रकार होता. अशा लोकांनी मागच्या वर्षी राज्यपालांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर मुख्यमंत्री म्हणून ठाकरेंनी केलेले भाषण ऐकले असले तरी त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करायचे ठरवले असते. राज्यपालांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर भाषण करताना मुख्यमंत्र्यांनी राज्याची परिस्थिती, सरकारची ध्येयधोरणे, यापुढे काय करायचा सरकारचा मानस आहे वगैरे गोष्टींवर बोलणे अपेक्षित असते. यापैकी एकाही गोष्टीचा लवलेश त्यात नव्हता. आणि 'शेतकर्‍यांना खिळे आणि चीनपुढे पळे' असले तद्दन गुडघ्यातले विधान ठाकरेंनी त्यावेळेस केले होते. ते कसले डोंबलाचे संयत भाषेतले बोलणे? सामनामधून दररोजची जी गटारगंगा व्हायची ते काय संयत भाषेत केलेली असायची का? दररोज सकाळी संजय राऊत विकाऊ मिडियासमोर जे कुंथत असतात ते अगदी संयत असते की नाही? एकवेळ ठाकरे परवडले पण हे सगळे विचारवंत अजून जास्त डोक्यात जातात. आदित्य ठाकरे पर्यावरणमंत्री म्हणून जी पोपटपंची करत असतो त्याला 'वा वा कित्ती कित्ती प्रगल्भ विचार' म्हणून माना डोलावणारी हीच ती घाणेरडी विचारवंतांची जात. त्याचे ते कौतुक बघून जणू काही आदित्य ठाकरे म्हणजे कोणी देवदूत म्हणूनच भूतलावर आला आहे असे वाटायचे कोणाला. एकीकडे हे सगळे विचारवंत मोठे फेमिनिस्ट असतात. पण संजय राठोड या शिवसेनेच्या मंत्र्यामुळे एका तरूणीने नक्की कोणत्या परिस्थितीत आत्महत्या केली असा आरोप होता त्यावर हे लोक कधी चकार शब्द बोलले आहेत? लाचार मिडिया आणि तितकेच गुलाम विचारवंत लोक हाताशी धरून महाभकास आघाडीने महाराष्ट्रात कसा स्वर्ग आणला आहे असे चित्र उभे करण्यात हे लोक यशस्वी झाले. दुसर्‍या महायुध्दात नॉर्वेमध्ये ब्रिटिश नौदलाचा पराभव झाल्यावर पंतप्रधान नेव्हिल चेंबरलेन यांना सत्ताधारी पक्षातील एक खासदार अ‍ॅमेरी यांनी ब्रिटिश इतिहासातील एक वाक्य सुनावले होते- "You have sat too long here for any good you have been doing. Depart, I say, and let us have done with you. In the name of God, go". सध्या महाराष्ट्रात घातलेल्या धुमाकुळाबद्दल ठाकरे सरकारला आणि त्याच सरकारची तळी उचलणार्‍या विचारवंतांनाही तेच म्हणावेसे वाटते-- In the name of God, go. असल्या घाणेरड्या सरकारमध्ये अजून राहिल्यास पुढच्या निवडणुकीत लोक जोड्याने बडवतील याची कुणकुण एकनाथ शिंदे आणि समर्थकांना लागली असेलच. काहीही झाले तरी एकनाथ शिंदे हे चारवेळा विधानसभेवर निवडून गेलेले जमिनीवरील कार्यकर्ते आहेत. विकाऊ मिडिया काहीही चित्र उभे करत असला तरी सामान्य जनतेत या सरकारविरोधात प्रचंड असंतोष आहे हे त्यांना समजले नसेल असे अजिबात नाही. त्यामुळे ते बंडाच्या पवित्र्यात उभे राहिले आहेत त्यामागचे कारण अगदी सहज समजू शकेल. अर्थातच डोळे उघडे ठेवणार्‍याला. इथे अगदी मिसळपाववर बघितले आहे की काही सदस्य अगदी थेट संजय राऊतांची भाषा बोलत आहेत. काही झाले तरी १०५/१०६ ना घरी बसविलेच्या पुढे त्यांचीही गाडी जात नाही. शिवसेनेच्या सत्तेमुळे संबंधित सदस्यांना चार आण्याचाही फायदा झाला असायची शक्यता शून्य. तरीही सततची संज्या राऊतची भाषा तोंडात. यांच्या सत्तेमुळे व्यक्तिशः काडीमात्र फायदा न झालेले समर्थकही असा 'अ‍ॅटिट्यूड' दाखवत असतील तर मग त्या सत्तेचा फायदा होत असलेले आणि त्याहूनही स्वतः सत्तेत बसलेले लोक कितीतरी जास्त माज करत असतील याची कल्पना येऊ शकते. सध्या जो प्रकार महाराष्ट्रात चालू आहे त्यामुळे लोकांमध्ये सरकारविरोधात मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे हे डोळे उघडे ठेवणार्‍या प्रत्येकाला समजू शकेल. पण या अ‍ॅटिट्यूडमुळे डोळ्यावर झापडे आली असतील तर मग जे काही चालू आहे ते दिसणे अशक्य आहे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

पूर्ण सहमत. इतके वाईट सरकार महाराष्ट्राला कधीही मिळाले नव्हते. अत्यंत उर्मटपुणे फुशारक्या मारणे आणि सर्व पोलिसयंत्रणा हाताशी धरून अत्यंत वाईट पद्धतीने दडपशाही करणे यापलिकडे या नालायकांनी अडीच वर्षात काहीही केलेले नाही. कुरमुसे, मदन शर्मा, केतकी चितळे, निखिल भामरे, राणा दांपत्य ही उदाहरणे समोर आहेतच. हे सरकार लवकरात लवकर जायलाच पाहिजे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

एक तर या सरकारची स्थापनाच मुळात लोकांनी दिलेल्या जनादेशाला पायदळी तुडवून झाली आहे. काहीही. ह्या सरकारची स्थापना लोकशाही मार्गाने झालीय म्हणून कोर्टात जाऊनही भाजपेयी तोंडावर पडले. जनादेश पायदळी तूडवून कर्नाटक ना मध्य प्रदेशातील भाजप सरकार स्थापन झालेय. सर्वात नावडत्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत केजरीवालांना दुसर्‍या नंबरला ढकलले. केजरीवाल हे अत्यंत स्वच्छ प्रतिमेचे तसेच विकासकामांमूळे दिल्लीतील अतिशय लोकप्रिय नेते आहेत. ह्याच लोकप्रियतेच्या बळावर त्यांनी पंजाब राज्यही जिंकले. महाभकास आघाडीने महाराष्ट्रात कसा स्वर्ग आणला आहे असे चित्र उभे करण्यात हे लोक यशस्वी झाले. महाराष्ट्रात ऊध्दव ठाकरेंची लोकप्रियता प्रामाणीकपणे सरकार चालवल्यामूळे वाढलीय. बाकी नेहमीचीच टिका आहें. कोरोना काळात ठाकरेंना ऊत्तम काम केलेय. मागच्या पर्वात तर सांगली कोल्हापूरातील पुरात लोकांना वेळीच मदत मिळाली नाही तेयामुळे तेथील भाजप नेत्याना कोथरूडात यावे लागले. ह्यावरून फडणवीस सरकार किती कार्यक्षम होते हे महाराष्ट्र जाणून आहे. आणी ठाकरेंचा महाराष्ट्र त्रृणी (किपॅड मूळे मूळ शब्द टाईपता येत नाहीये) राहील ज्यांनी हे मागील काळे पर्व संपवले.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

महाराष्ट्रात ऊध्दव ठाकरेंची लोकप्रियता प्रामाणीकपणे सरकार चालवल्यामूळे वाढलीय. खिक्क कोरोना काळात ठाकरेंना ऊत्तम काम केलेय. डबल खिक्क आणी ठाकरेंचा महाराष्ट्र त्रृणी (किपॅड मूळे मूळ शब्द टाईपता येत नाहीये) राहील ज्यांनी हे मागील काळे पर्व संपवले. ट्रिपल खिक्क

In reply to by श्रीगुरुजी

मागच्या पर्वात तर सांगली कोल्हापूरातील पुरात लोकांना वेळीच मदत मिळाली नाही तेयामुळे तेथील भाजप नेत्याना कोथरूडात यावे लागले. ह्यावर मात्र तूम्ही खिक्क, खुरक्क, खाक्क, फार्रर, फूर्र काहीही केलं नाही. :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

आधीच्या तुफान विनोदी दाव्यांवरचं खिक्क थांबलं की मग तुम्हाला जे हवं ते खिक्क, फार्रर, फुर्र वगैरे सगळं करीन. नाक फेंदारून तयार रहा.

महाराष्ट्रात खूप मोठ्या राजकीय घडामोडी होण्याची शक्यता आहे. काल संध्याकाळपासून सेनेचे एकनाथ शिंदे व इतर १२ आमदार बेपत्ता असून ते भाड्याच्या विमानातून सुरतला गेल्याच्या बातम्या आहेत. एकनाथ शिंदे सुरतेत २ वाजता पत्रकार परीषद घेणार असल्याच्या बातम्या आहेत. अजून एका बातमीनुसार एकनाथ शिंदेंबरोबर सेनेचे ३० आमदार आहेत. खासदार श्रीकांत शिंदे व राजन विचारे हे सुद्धा बेपत्ता आहेत. पक्षांतरबंदी कायद्यातून वाचण्यासाठी सेनेच्या ५५ पैकी किमान ३७ आमदारांनी एकत्र पक्ष सोडला पाहिजे. इतक्या मोठ्या संख्येने सेनेचे आमदार पक्ष सोडतील असे वाटत नाही. कदाचितकमळ मोहिमेंतर्गत भाजप सेनेच्या काही आमदारांना राजीनामा द्यायला लावून ठाकरे सरकार अल्पमतात आणून स्वत:चे सरकार स्थापन करून या आमदारांना कमळ चिन्हावर पुन्हा निवडून आणण्याची योजना बनवित असावा. मध्यप्रदेश व कर्नाटकात ही योजना यशस्वी झाली होती. परंतु तेथे भाजपची आवश्यकता १० आमदारांपेक्षा कमी असल्याने ती मोहीम यशस्वी झाली. महाराष्ट्रात भाजपला किमान २५ आमदारांची गरज आहे व इतक्या मोठ्या संख्येने सेना किंवा इतर पक्षांचे आमदार राजीनामा देऊन भाजपत सामील होणे अवघड वाटते. काहीही असले तरी काहीतरी खळबळजनक सुरू आहे किंवा होणार आहे, असे दिसत आहे.

(अ)धर्मवीर , मुक्काम पोस्ट सूरत .. अशा मथळ्याचा अग्रलेख संजय राउत्/गिरीश कुबेर टाकण्याची शक्यता दिसतेय. शिन्दे व ११ आमदार सूरतच्या मिरीडियन हॉटेलात मोबाईल फोन्स बंद करून बसले आहेत.

राज्यसभा व विधानपरिषद निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांनी, महाविनाश आघाडीतील पोपटपंची करणार्‍या नेत्यांना चांगलेच लोळविले आहे. एकनाथ शिंदे सध्या सुरत मधे ११ आमदारांसह एका हॉटेल मधे आहेत. व इथे साडेतीन जिल्हे ईलाईची सरकार वाचवण्याकरता कमालीची धडपड सुरु आहे.

उत्तर बहु बायकात बडबडला. आणि युद्धाची वेळ आली की गडबडला. विधान परिषद निवडणुकीत जे घडले त्या मुळे bjp समर्थक लोकांनी mipa चा मासळी बाजार करू नये. सरकार काही पडणार नाही. आणि निवडणूक झाली तरी bjp सरकार मध्ये महाराष्ट्रात येणार नाही.

In reply to by sunil kachure

विधान परिषद निवडणुकीत जे घडले त्या मुळे bjp समर्थक लोकांनी mipa चा मासळी बाजार करू नये. षटकार. एखादं राज्य जिकल्यासारखी बोंबाबोंब चाललीय. सरकार काही पडणार नाही. आणि निवडणूक झाली तरी bjp सरकार मध्ये महाराष्ट्रात येणार नाही. हे तर महाराष्ट्रातला बच्चाबच्चा जाणतो.

देवेंद्र फडणवीस ह्यांनी आज पासून रोज सकाळी ४ वाजता उठले पाहिजे.कधी ही चार तास मुख्यमंत्री होण्याची संधी येवू शकते. बाशिंग बांधून तयार राहावे फक्त नवरा कोण हे अजून आयटी सेल नी फिक्स केले नाही.

In reply to by sunil kachure

देवेंद्र फडणवीस ह्यांनी आज पासून रोज सकाळी ४ वाजता उठले पाहिजे.कधी ही चार तास मुख्यमंत्री होण्याची संधी येवू शकते. बाशिंग बांधून तयार राहावे फक्त नवरा कोण हे अजून आयटी सेल नी फिक्स केले नाही. सर ईतकाही घाण अपमान नका करत जाऊ. :)

धावपळ सुरू आहे. ------------ क्याम्रासाठी ट्राईपॉड घेताना दुकानात छान वाटतो तो बाहेर वाऱ्यात उभा राहील का हा विचार करावा लागतो.

महाराष्ट्रात निवडणुका झाल्या,त्या नंतर अनंत राजकीय घडामोडी झाल्या. चूक की बरोबर हा प्रश्न फक्त लोकांना पडला पाहिजे पण राजकीय पक्षांना पडला. तीन पक्षांचे सरकार स्थापन झाले..ते सरकार राज्यात योग्य काम करत आहे की चुकीचे ह्याचे मोजमाप झाले पाहिजे. विरोधी पक्षातील लोकांना तुरुंगात पाठवत आहे का? लोकांवर अत्याचार करत आहे का? राज्याचे हीत धोक्यात येईल असे काम करत आहे का? राज्य घटनेचा अनादर करत आहे का? हे प्रश्न महत्वचे आहेत. सरकार वरील सर्व काम करत असेल तर विरोधी पक्षाने विरोध करावा . लोक साथ देतील . केंद्र सरकार नी असे सरकार बरखास्त करावे लोक पाठिंबा देतील. पण फक्त आमदार ,खासदार ह्यांना सत्ता पद नाहीत. पक्ष सत्ते बाहेर आहे . अशा स्वार्थी वृती नी सरकार धोक्यात आणत असाल तर ..हा तुमचा स्वार्थी हेतू आहे.. राज्याच्या हिताच्या विरुद्ध केलेले कृत्य आहे. सत्ता च हवी असेल तर प्रामाणिक पण जनतेचे हित जपले पाहिजे आणि जनतेच्या विरुद्ध,राज्याच्या हिताच्या विरुद्ध सरकार काम करत असेल तर विरोध केला पाहिजे. पाच वर्ष झाली की लोक तुम्हाला पूर्ण बहुमत देवून निवडून देतील. फक्त राजकीय हेतू नी चिंधी पना करू नका.

महाराष्ट्रात निवडणुका झाल्या,त्या नंतर अनंत राजकीय घडामोडी झाल्या. चूक की बरोबर हा प्रश्न फक्त लोकांना पडला पाहिजे पण राजकीय पक्षांना पडला. तीन पक्षांचे सरकार स्थापन झाले..ते सरकार राज्यात योग्य काम करत आहे की चुकीचे ह्याचे मोजमाप झाले पाहिजे. विरोधी पक्षातील लोकांना तुरुंगात पाठवत आहे का? लोकांवर अत्याचार करत आहे का? राज्याचे हीत धोक्यात येईल असे काम करत आहे का? राज्य घटनेचा अनादर करत आहे का? हे प्रश्न महत्वचे आहेत. सरकार वरील सर्व काम करत असेल तर विरोधी पक्षाने विरोध करावा . लोक साथ देतील . केंद्र सरकार नी असे सरकार बरखास्त करावे लोक पाठिंबा देतील. पण फक्त आमदार ,खासदार ह्यांना सत्ता पद नाहीत. पक्ष सत्ते बाहेर आहे . अशा स्वार्थी वृती नी सरकार धोक्यात आणत असाल तर ..हा तुमचा स्वार्थी हेतू आहे.. राज्याच्या हिताच्या विरुद्ध केलेले कृत्य आहे. सत्ता च हवी असेल तर प्रामाणिक पण जनतेचे हित जपले पाहिजे आणि जनतेच्या विरुद्ध,राज्याच्या हिताच्या विरुद्ध सरकार काम करत असेल तर विरोध केला पाहिजे. पाच वर्ष झाली की लोक तुम्हाला पूर्ण बहुमत देवून निवडून देतील. फक्त राजकीय हेतू नी चिंधी पना करू नका.

समृद्धी महामार्ग योजना आणि त्याची कंत्राटे हे कोणीही ओळखेल. गोवा महामार्ग रुंदीकरण इतके वर्ष रेंगाळण्याचं कारण कंत्राटदार गट पावरफुल आहे.

असल्या बकवास खेळी मुळे लोक मतदान करणार च नाहीत. असे पण मतदान करायला लोकांना बिलकुल इंटरेस्ट नाही. टक्के वारी बघा १००% मतदान कुठेच होत नाही.

काका तिकडं बोंबलायल की भाजपाचे ५ जण गडबड करु जिकले.

In reply to by इरसाल

मला वाटतंय की काकांना मध्यावधी निवडणूक हवीये. त्यामुळे ते गुपचुप सरकार पाडण्याचा किंवा ठाकरेंना राजीनामा देऊन नवीन सरकार स्थापन होऊ न देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील. तसंही फडणवीसांना बहुमताची जुळवाजुळव करणे अवघड आहे. सेनेचे एकगठ्ठा ३८ आमदार फुटले तरच ते पक्षांतरबंदी कायद्यातून वाचतील. आज १०, उद्या ४, परवा २३ असे हप्त्याहप्त्यात आमदार फुटून उपयोग नाही. अर्थात पक्षांतरबंदी कायदा वापरण्याचा अधिकार विधानसभेच्या उपसभापतीला आहे का हे मला माहिती नाही. पुढील निवडणुकीत सेना व कॉंग्रेसची पूर्ण वाट लागणार आहे. सेना व भाजप वेगळे लढतील. परंतु आपल्या मदतीसाठी काका कॉंग्रेसबरोबर युती करून निवडणूक लढतील. सध्याची परिस्थिती काकांसाठी विन विन सिच्युएशन आहे.

ह्या राज्याचे हीत,मराठी लोकांचे हीत हे सर्वात वरती आहे.. सरकार राहो नाही तर जावो.. पण ह्या राज्याच्या मातीत ज्या लोकांनाच देह पोसला आहे ..त्यांनी मराठी माती शी आणि मराठी लोकांशी बेइमानी करू नये खास करून bjp walya लोकांसाठी. फालतू देश हीत राज्याच्या लोकांना भिकेला लावेल. ह्याचे भान ठेवा