मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रेकी करताना आलेले अदभुत्,अविश्वसनीय्,अनाकलनीय अनुभव.

शानबा५१२ · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
मी रेकीची 'लेवल १' ही दीक्षा घेतली आहे.रेकी हे एक विज्ञान आहे असे मी मानतो,रेकीला मी कुठल्याच देवाशी कींवा धर्माशी जुळत/जोडत नाही.आता सरळ अनुभव लिहतो.ईथे मी फक्त प्राण्यांसंबधीत आलेले अनुभव लिहत आहे. १) सोनु व ढींगण्या : माझ्या पाळलेल्या पोपटांपैकी नर म्हणजे सोनु.त्याच्याकडे माझे दुर्लक्ष होतेय असे वाटले म्हणुन खुप दीवसांनी पिंज-याजवळ जाउन पिंज-यात हात टाकुन त्याच्यापाठीवर रेकी देउ लागलो.रेकी माझ्या ह्रदयातुन हातात व हातातुन त्याच्यापाठीवर जात आहे असे जाणवत होते.सोनु खुप दीवसाने मी हात फीरवत आहे म्हणुन मला ओळखीचे असे प्रेमळ आवाज काढत होता.अचानक मी पाहीले की त्याने मान पुर्ण खाली घातली व मध्येच जोरात वर केली,तेव्हा त्याच्या पोटाच्या भागातुन मला एक आगेची ढींगणी बाहेर पडताना दीसली.मी ती ढींगणी पाहुन "व्हॉट?" असे जणु काय ओरडलो. आजही मला ती ढींगणी काय होती ते नाही कळाले,पण 'ती खरच ढींगणी होती का?' असा प्रश्न कींवा शंका माझ्या मनात कधीच आली नाही,कारण मला पुर्ण खात्री होती मी काय पाहीले आहे. २) डोंगरावरच्या मंदीरातुन येताना भुंकणारा कुत्रा : मी सुट्टीचा दीवस म्हणून सकाळी वसईच्या एका डोंगरावर चालायला गेलो व तिथल्या मंदीरात जाउन परत होतो.डोंगर उतरुन खाली आलो,तेव्हा माझा ऑरा खुप वाढला आहे असे मला जाणवले,बघण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझे शरीर पुर्ण त्या ऑरामधे होते,त्या ऑराने वेढले गेले होते.थोडे पुढे आल्यावर, एक खुप रागीट कुत्रा दोन चार मुलांवर भुकंत होता.ती मुले खेळुन थकली असतनाही घाबरुन जीव हातात घेउन एकडे तिकडे पळत होती.तो कुत्रा रस्त्याच्या एका बाजुला व मुले दुस-या बाजुने पळत होती.कुत्रा बांधलेला असुनही मुलांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न करत होता,त्याचा मालक त्यावर ओरडत होता,पण कुत्रा भुंकायचे थांबत नव्हता. मी कुत्रा ज्या बाजुला होता त्याच बाजुने चालत होतो.जेव्हा मी त्या भुंकणा-या कुत्र्यापासुन ७ ते ८ फुटाच्या अंतरावर आलो,तेव्हा तो कुत्रा भुंकणे बंद करावा,म्हणुन कदाचित नकळत मी माझ्या उजव्या हाताचा तळवा त्या कुत्राकडे केला व मनात 'शांत हो' 'कुल डाsssन' असे म्हणालो.व काय आश्चर्य!! मला माझ्या हातातुन माझा ऑरा एकत्र होउन त्या कुत्राच्या शरीरकडे जातोय असे 'दीसले' (ऑराचा वलय रंगहीन वायुसारखा दीसतो)....आणि जेव्हा तो ऑराचा प्रवाह माझ्या हातातुन त्या कुत्र्याच्या पुर्ण शरीरावर आदळला,तेव्हा तो कुत्रा अंगावर कोणी पाणी फेकावे असा दचकला व एका चुटकीशरशी शांत होउन मान खाली घालुन व जीभ बाहेर काढुन (कदाचित खुप भुंकल्यामुळे) तसाच उभा राहीला.त्याची एंकदर काया एकदम एक शिस्त असलेल्या कुत्र्याप्रमाणे दीसु लागली.मी त्याच्यापासुन ७-८ फुट पुढे गेल्यावर मला पुन्हा तोच कुत्रा भुंकण्याचा आवाज आला.पण ह्यावेळी थोडा हळु भुंकत होता. मी जेव्हा घरी पोहचलो व मला हा प्रसंग आठवला तेव्हा 'अ‍ॅ?' ते काय होते एवढेच मनात आले.व माझा ऑरा खुप कमी झालेला जाणवला. मला ४-५ कुत्र्यांनी घेरले आहे,माझ्यावर एक चावर कुत्रा भुंकत आहे असेही झाले आहे तेव्हाही रेकी देल्यावर तेच कुत्रे शॉक लागल्याप्रमाणे माझ्यापासुन लांब होतात. ३) भुतदया : एक कुत्री व तिचे पिल्लु ह्यांना एका बाईकने नाजुक धडक मारली,कुत्रीला थोडेच लागले पण पिल्लाच्या पायाला थोडे लागले व ते एका दगडावर आदळले.ते पाहील्यावर 'रक्त आले नसेल तर मुका मार वाढत्या शरीरबरोबर ठीक होईल' असे माझ्या मनात आले,म्हणुन जास्त घाई न करता आरामशीर त्या पिल्लाकडे गेलो.मी लगेच जाउन त्या पिल्लाने मला हात लाउ दीला नसता.पण ते पिल्लु वेदनेने जे केकाटत होते,ते ऐकुन मनात दया कमी व त्या बाईकवाल्याचा राग जास्त येत होता.रागाने रेकी कमी होते असे मी मानतो म्हणुन पिल्लावर लक्ष केंद्रीत केले.पिल्लाजवळ जाउन मी पिल्लाच्या दुखणा-या पायला स्पर्श केला,तेव्हा ते पिल्लु अजुन जोरात विव्हळु लागले.कुत्री गोंधळामध्ये फक्त त्या पिल्लाकडे पाहत होती व मध्ये मध्ये त्याचे शरीर चाटत होती.मी त्या कुत्रीला 'पारले जी' बिस्कीट दीले व त्या पिल्लाला पायवर रेकी दीली.पिल्लु विव्हळण्याचे कमी कमी होउन पुर्ण शांत झाले तेव्हा त्याचा पाय आतल्या आत फीरल्याचे जाणवले.व ते पिल्लु पुर्ण शांत होउन कुत्रीजवळ जाउन दुध पिण्याचा प्रयत्न करु लागले.खुप लहान असल्याने बिस्कीट खात नव्हते.मग कुत्रीने दुध पाजण्यास नकार दील्यावर माझ्याजवळ आले,मी खाली एका पायावर जोर देउन बसलो होतो.मी त्याला परत रेकी दीली तेव्हा ते पिल्लु लाडात जमीनीवर झोपुन माझ्याकडे बघत होते.फक्त पाच मिनीटापुर्वी वेदनेने विव्हळणारे पिल्लु हेच होते ह्या भावनेने मला हसायला आले.मी निघु लागल्यावर माझ्या मागे धावु लागले,मी दुर्लक्ष करुन पुढे जाउ लागलो व मध्येच मागे वळुन त्याच्या डोळ्यात पाहीले,तेव्हा ते पिल्लु अक्षरक्षा रडु लागले,तो रडण्याचा आवाज व ते गोंढस डोळे बघुन मला रडु येईल असे वाटले म्हणुन मी जोरात चालु लागलो,तर त्या पिल्लाचा रडण्याचा आवाज तसाच येत राहीला.राहवले नाही म्हणून मी त्याला पुन्हा रेकी दीली,पुन्हा जमीनीवर लोळणे व मी गेल्यावर परत रडणे सुरु! 'मी तुला सोडुन जातोय्,पण तुझी आठवण ठेउन मी कधीच कुत्रा पाळणार नाही' असे मी त्याला डोळ्यात बघुन बोललो. रेकीने मला असे प्रेम देणे शिकवले आहे,त्या रेकी आईला 'माझ्यावर असेच प्रेम आयुष्यभर करत रहा' ही विनंती.मला माझ्या कल्पनेत दीसणारे रेकी आईचे रुप काहीसे असे आहे : Reiki Mother

वाचन 43030 प्रतिक्रिया 0