मी रात्री अमुक करत होतो.टी.व्ही.वर अमकं-ढमकं लागलं होतं. अमकं -ढमकं ऐन रंगात आलं होतं...
आणि अचानक लाईट गेले .
असं काही वाचलं की माझं डोकंच सणकतं.
अचानक लाईट गेली म्हणजे काय्?लाईट काय पूर्वकल्पना देवून जाते?की शनवारी मी ८.३२ ला जाणार आहे.मग लिहीणारा ''अचानक'' शब्द वगळून लिहेल की रात्री ८.३२ ला टाटा म्हणून लाईट गेली.
आपल्या भाषेच्या अशा काही गमती जमती मजेशीर वाटतात...मात्र काही वेळा काही प्रकार वाचून डोकं ठणकायला लागतं .( मघाशी सणकलं होतं....आता ठणकलं )
उदा...--- घरी आल्या आल्या मी अंगातला शर्ट काढून हँगरला लावला. ( शर्ट अंगात असतो की अंग शर्टात ? )
--- पायात चप्पल घातली .
---डोक्यात टोपी घातली .
---हे आलं आपलं गाव. ( आपण गावात नाही आलो??? )
किंवा काही शब्दांना विशेषणे अगदी गळूसारखी ( हे आणखी एक विशेषण ) चिकटलेली असतात.
उदा. नियम म्हटला म्हणजे तो ''अलिखित''च असतो.
वर्णनातील आकाश ''निरभ्र''च असतं.
कादंबरीतील तरुणी ''टंच'' च असते.
सासू खाष्ट असते...... यार हा लंगोटीच असतो वगैरे वगैरे...
हम्म्म्म
विचार करकरुन डोकं उठलं ( सणकलं,ठणकलं.....आता उठलं ( ? ) )
म्हटलं आता एक मोट्ठा लेखच लिहीतो यावर...
पीसी ऑन केला.
कीबोर्ड बडवायला सुरुवात केली.
.
.
.
.
.
.
'' आणि अचानक लाईट गेले''.
--डॉ.कैलास गायकवाड
वाचने
2408
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
:)
कांदबर्या
गाव
In reply to कांदबर्या by कपिलमुनी
+ १००००००
In reply to कांदबर्या by कपिलमुनी
कांदब -या
:)
असेच म्हणतो ! पुलेशु!
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गळूसारखी नाही हो, जळूसारखी.
पुलेशु