मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विज्ञान

गाय आणि विदाकेंद्रे (अर्थात डेटा सेंटर्स)

विकास ·
लेखनप्रकार
Source: lbl.gov
left
आपण जे काही इंटरनेट वापरत असतो, ऑफिसातील कामात विदाचे आदानप्रदान करत असतो, साठवत असतो, त्या सर्वाला विदाकेंद्रे अर्थात डेटासेंटर्स लागतात. अनेक सर्वर्स जोडलेली ही क्रेंद्रे अथक आणि अहोरात्र कार्यरत असतात. प्रचंड उर्जा खर्च होत असते.

बोल्ट्झमन - एक शापित विद्वान!

शानबा५१२ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
कोणा व्यक्तीच्या विचाराने भारावून जायला ती व्यक्ती हयात असावी लागते का?........ नाही असं माझं उत्तर! तसंच भारावून टाकणारं जीवन जगला बोल्त्झमान!!! हा माणुस फिजिसिस्ट व गाजलेला तत्वज्ञ. त्याचे रसायनशास्त्रातले काम भौतिकशास्त्रामधल्या संकल्पनांवर आधारलेलं होत. पण आम्ही त्याला एक रसायनशास्त्रज्ञ म्हणूनच ओळखत आलो, अर्थात पुस्तकात. पण ह्या माणसाकडे खिळुन ठेवेल अस खुप ही आहे सांगायला! आज त्याची केमीस्ट्रीमधली गाजलेली संकल्पना 'एंट्रॉपी' व त्याचे 'शापित' आयुष्य ह्याबद्दल वाचू व समजू. (एंट्रॉपी ही संकल्पना मांडणारा बोल्त्झमान हा काही पहिलाच संशोधक नाही.

केक्युलेचे स्वप्न

शानबा५१२ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
'ह्या' विषयातला पहीलाच लेख असल्याने,मला ही कल्पना सुचवणा-या बि.का ह्यांना समर्पित......आणि हो अर्थातच केक्युलेला. "सफरचंद खालीच का पडल?" हा प्रश्न कोणात्या संशोधकाला पडला होता?ह्य प्रश्नाच उत्तर सर्वांनाच माहीती असेल........हो,isaac newton.मग त्याने 'गुरुत्वाकर्षण' ही कल्पना पुढे आणली व त्यावरुन कीतीतरी शोध लागले,ब-याचश्या प्रश्नांना उत्तर भेटली.'न्युटन' व 'सफरचंद' हे शब्द डोळ्यासमोर आले की हे सर्व लक्षात येत. 'केक्युलेचे स्वप्न' हे असच काहीतरी आहे.ऑरगॅनीक केमीस्ट्रीमधे ह्याच कुतुहल वर्षांनुवर्षांपासुन आहे.'केक्यलेचे स्वप्न' हे दोन शब्द लिहले की दोन चित्र डोळ्यास

पुस्तक परिचय : "आत्मा ते जनुक"

मुक्तसुनीत ·
लेखनप्रकार
मराठी भाषेच्या एकंदर स्थितीचा विचार करताना ज्ञानाच्या निरनिराळ्या शाखांमधला गहन आशय सोप्या भाषेत परंतु विषयाची यथायोग्य ओळख करून देणार्‍या पुस्तकांच्या अभावाचा उल्लेख येतो. इंग्रजीच्या तुलनेमधे या गोष्टीमधे नक्की तथ्य आहे; परंतु त्याचवेळी जे काम चालले आहे त्याचा वेधसुद्धा घेणे महत्त्वाचेच. मराठीमधे अर्थातच अशा प्रकारचे लिखाण होत असते. थोडा शोध घेतला तर आपल्याला जाणवते की अशा प्रकारच्या लिखाणाला आता मराठीमधे बाजारपेठही चांगली आहे. विविध प्रदर्शनांमधे, पुस्तकांच्या दुकानांमधे अशा पुस्तकांना ग्राहकवर्ग मिळताना दिसतो. आज या प्रकारच्याच एका पुस्तकाची ओळख करून द्यावी म्हणतो.

परमेश्वराचे..... मेंदू? ---- क्षमस्व !

जयंत कुलकर्णी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
या विषयावरचे लेखन मला उडवावे लागणार आहे कारण - Copyright .(परंतू ज्याला हा लेख मराठीत वाचायचा आहे त्यांनी मला व्यनि करावा मी तो त्यांना ई-मेल ने पाठ्वीन. मी त्यांना लिहीले आहे. जर नवीन परवानगी मिळाली तर हा लेख आख्खा टाकेन. नशीब ! जयंत कुलकर्णी.

कृत्रिम जिवाणू

मराठे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आजच्या मुख्य बातम्यांमधे ह्या बातमीनं माझं लक्ष वेधून घेतलं... थोडं आणखी वाचल्यावर ह्या शोधाने बरीच खळबळ माजवली असल्याचं जाणवलं. डॉ. क्रेग वेन्टर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली जवळ जवळ १५ वर्ष हा प्रयोग चालू होता. ह्याविषयावर शास्त्रीय आणी अशास्त्रीय वर्तुळात बरीच चर्चा चालू आहे. ह्या प्रयोगाच्या जनकांच्या मते ह्या प्रयोगाची तुलना औद्योगीक क्रांतीशी करता येइल.अशा कृत्रिम जिवाणूंचा उपयोग कितितरी वेगवेगळ्या क्षेत्रात होउ शकतो. इंधना पासून ते वातावरणातील कार्बन-डायऑक्साईड शोषून घेण्यापर्यंत... डॉ.

स्त्रीची आजची प्रतिमा - ४: लिझ माईट्नर

३_१४ विक्षिप्त अदिती ·
वीणा गवाणकरांमुळे जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर या शेतकरी-संशोधकाची ओळख खूपच लहानपणी झाली. पुस्तकांच्या दुकानात वीणा गवाणकरांचं नाव पाहून एक पुस्तक उचललं आणि भौतिकशास्त्र शिकूनही या महान स्त्रीचं साधं नावही आधी माहित नव्हतं याबद्दल सखेद आश्चर्य वाटलं.