Skip to main content

विज्ञान

असत्य तेही शास्त्रोक्त

लेखक रन्गराव यांनी शुक्रवार, 03/12/2010 20:14 या दिवशी प्रकाशित केले.
काही महिन्यांपूर्वी राजेश घासकडवी साहेबांनी एक कौल काढल होत- पूर्वजांविषयी पडणारी पितृपक्षातील पडणारी स्वप्न आणि योगायोग ह्या विषयी. नंतर त्यांनी आकडेमोड मांडून तो योगायोग कसा आहे हे दाखवणारा लेखही लिहिला होता. तो बर्याच अंशी पटणारा होता. आणि बर्याच लोकांना पटलाही. पण त्यातली आकडेमोड मला न रुचल्यामुळे मी वेगळी जास्ती शास्त्रोक्त पद्धत कशी वापरली पाहिजे ह्या विषयी एक लेख लिहिला होता. त्यात एक आगाऊ आणि आवांतर वक्तव्य होतं स्वप्नांच्या डिस्ट्रीब्युशन विषयी . राजेशनी ते पॉयसॉन आहे हे कौलाद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केला होता आणि मला अस वाटत होत कि ह्यात नवीन काहीच नाही.

चिरंजीव चिंटू

लेखक डावखुरा यांनी गुरुवार, 18/11/2010 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
आजचा "चिंटू" वाचला का !? ह्या प्रश्नाने आमची सकाळ होते... chintoo अहो येत्या रविवारी म्हण्जे २१ तारखेला आपल्या सगळ्यांचा लाडका "चिंटू" एकोणिस वर्षे पूर्ण करून विसाव्या वर्षात पदार्पण करतो आहे. प्रचंड लोकप्रियता लाभलेली ही चित्रमालिका तब्बल १९ वर्षापासुन सकाळच्या वृत्तपत्रम

दि. १७ नोव्हेंबर, सिंह राशीतला उल्कावर्षाव!

लेखक असुर यांनी मंगळवार, 16/11/2010 06:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, उल्कावर्षावावर लिहून बरेच दिवस झाले. अदितीतै, चतुरंगकाका आणि घासकडवी गुर्जींनी सुचवल्याप्रमाणे त्यात अजून थोडी भर घालायचा हा एक प्रयत्न! उल्कावर्षाव पहायचे अनेक मौके वर्षभर आपणास मिळतच राहतात. पण काही उल्कावर्षाव असे असतात की ते टाळून किंवा चुकवून चालतच नाही मुळी! अशाच प्रसिद्ध वर्षावांपैकी एक म्हणजे सिंह राशीतून होणारा उल्कावर्षाव! १७ नोव्हेंबर ही त्या उल्कावर्षावाची मुख्य तारीख मानली जाते.

त्रिमिती: चित्रपट ते भ्रमणध्वनी

लेखक देवदत्त यांनी शुक्रवार, 12/11/2010 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
त्रिमिती चित्रपटांशी माझी ओळख झाली १९८५ मध्ये, 'छोटा चेतन' द्वारे. आईस्क्रिम घेण्याकरीता हात पुढे करणे, इतर काही प्रसंगात दचकणे वगैरे अनुभव तेव्हाच मिळाले. त्यानंतर पाहिला 'शिवा का इन्साफ'. 'सामरी' सिनेमा भुताचा असल्याने बहुधा वडिलांनी आम्हाला तेव्हा दाखवला नाही. :) त्यानंतर नवीन चित्रपट आले नाहीत. पण काही वर्षांनी त्रिमिती चित्रांकित गोष्टीची पुस्तके (कॉमिक्स) आलेत. एका रद्दीच्या दुकानात आम्हाला ती पुस्तके दिसली. मग काय, जमतील तेवढी पुस्तके आणून वाचण्याचा कार्यक्रम झाला. नंतर आलेली 'छोटा चेतन'ची नवीन आवृत्ती हरीश आणि उर्मिला मातोंडकरला सोबत घेऊन.

क्ष-कीरणांचा शोध.

लेखक शानबा५१२ यांनी सोमवार, 08/11/2010 20:42 या दिवशी प्रकाशित केले.
श्री.अदीती ह्यांनी लिहलेला 'क्ष-किरणांच्या शोधाचा वाढदिवस' हा लेख वाचुन त्यात थोडी भर घालवशी वाटली.जेव्हा आपण क्ष-कीरणांच्या वाढदीवसाबद्दल बोलतो तेव्हा क्ष-कीरणांचा जन्म नक्की कसा झाला ही माहीती देण्याचा ईथे उद्देश आहे. माझ्याकडे 'Rays And Radiations' नावाचं पुस्तक आहे,लेखक आहेत Robert Scharff,पुस्तकाच्या प्रकाशनाची तारीख आहे, ५ एप्रील १९६०(ईथे ) .ह्या पुस्तकात काही मनो

क्ष-किरणांच्या शोधाचा वाढदिवस

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी सोमवार, 08/11/2010 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
रोजच्याप्रमाणे आजचा दिवसही गुगलशिवाय पुढे जाणं शक्य नव्हतं. इंटरनेट वापरायचं आहे, इंटरनेटवर काही कुठेतरी वाचायचं आहे आणि गुगल वापरलं नाही हे माझ्यासाठी जवळजवळ अशक्य असतं. तसंच आजही काहीतरी धुंडाळताना 'सर्च रिझल्ट्स'च्या डाव्या बाजूला वर गुगलचा चमत्कारिक लोगो दिसला. आज क्ष-किरणांच्या शोधाचा ११५वा वाढदिवस आहे हे गुगलबाबाकडून समजलं. क्ष-किरण सर्वप्रथम शोधले ते जर्मन शास्त्रज्ञ विल्हेम कॉनराद राँतजेन याने, आजचीच तारीख, साल १८९५. आणि या शोधासाठी त्याला नोबेल पुरस्काराची फार वर्ष वाट पहावी लागली नाही, १९०१ साली राँतजेनही नोबेल लॉरिएट झाला.

मानवनिर्मित वातावारणबदल (climate change)

लेखक निकित यांनी सोमवार, 01/11/2010 08:56 या दिवशी प्रकाशित केले.
सोयीस्कर असत्ये लोकसत्तेमध्ये काही महिन्यांपूर्वी मुग्धा कर्णिक यांचा “गैरसोयीची असत्ये” हा लेख प्रकाशित झाला. त्यामध्ये त्यांनी जागतिक तापमानवाढ आणि वातावरण बदल हे नैसर्गिकच असून त्याला कार्बन डाय ऑक्साईड व इतर हरितगृह वायू जबाबदार नाहीत अशा प्रकारचा दावा केला आहे. त्याकरिता त्यांनी काही शास्त्रज्ञांचे दाखलेसुद्धा दिले आहेत. तथापि, त्यांच्या लेखातील अनेक मुद्दे हे सोयीस्कररित्या अपुऱ्या व अवैज्ञानिक माहितीवर आधारित आणि हास्यास्पद आहेत.

I bet तुम्ही कधी हे पाहीले नसेल - भाग ४

लेखक शानबा५१२ यांनी गुरुवार, 21/10/2010 01:12 या दिवशी प्रकाशित केले.
फोटोत कैद झालेले भुत/आत्मा. विशेष नोंद : १) मुळ छायाचित्र प्राप्त झाले त्याच अवस्थेत ईथे प्रकाशित करण्यात आले आहे.त्यात तसुभरही बदल केला गेला नाही. २) हा लेख लिहण्या मागच्या उद्देशाबद्दल साशंक असलेल्या सदस्यांनी 'ते काय आहे?' ह्यावर भाष्य करावे. ३) हा काय प्रकार आहे हे कळण्यात आपली मदत अपेक्षित आहे,तेव्हा प्रतिसाद लेखासंबंधीतच असावेत. ४) आम्हाला कल्पना आहे की लेख थोडा करेशाटम आहे,पण आपण आपले मत सांगावे ही माफक अपेक्षा ठेवत आहे.

आमचे तंत्रज्ञान प्रेम - सॉफ्टवेअर विभाग

लेखक शानबा५१२ यांनी सोमवार, 18/10/2010 01:06 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार्,नमस्कार...... तंत्रज्ञान म्हणजे एक मित्र जो आपल्याकडुन कसलीच अपेक्षा न ठेवता आपल्याला आनंद देत राहतो.आपण दु:खी असु ,नाराज असु तरी तो स्वःता आपले कार्य अविरतपणे पार पाडतो,आपल्या निराश मनाला दीलासा देत,थंड फुंकर मारत.(बस,बस झाल!!) असो, तर आज आम्ही(?) आमचे तंत्रज्ञानावर असणारे प्रेम 'सॉफ्टवेअर' ह्या त्याच तंत्रज्ञानाचा भाग असणा-या संकल्पनेतुन दाखवु ईच्छीत आहोत.'सॉफ्टवेअर्स' जी आमच्या मनावर राज्य करतात्,त्यांची महीमा(?) गाणार आहोत. नोंद :१) आमचे संगणक्,हार्डवेअर व सॉफ्टवेअर ह्याबाबतचे ज्ञान म्हणजे बालवाडीतल्या पोराला जेवढे 'न्युटन्स थेअरी ऑफ रीलेटीव्हीटी' मधले समजते,तेवढेच असल्याने खाल