Skip to main content

विज्ञान

तारका-पुष्प

लेखक मराठे यांनी गुरुवार, 03/02/2011 या दिवशी प्रकाशित केले.
माझं नाव डॉ. सुधा देशपांडे. मी एक वनस्पती शास्त्रज्ञ आहे. मी आज इथे हे लिहून ठेवतेय.. कदाचित कोणालातरी आमची परिस्थिती कळेल.. कदाचित त्यांना आमची दया येईल आणि आमचं दुसर्‍या कुठल्यातरी ग्रहावर पुनर्वसन करतील... अर्थात याची शाश्वती नक्कीच नाही. सत्तावीस वर्ष झाली त्या गोष्टीला... आकाशातून पाउस पडावा तशी पुष्प-वृष्टी होउ लागली होती. सगळा फुलांचा पाउस त्यांनीच पाठवला होता. चिटुकली चंदेरी, सोनेरी रंगांची फुलं... सगळ्या जगभर त्यांची बरसात झाली होती. एकही देश एकही गाव सुटलं नव्हतं.

स्पेस शटल चॅलेंजर

लेखक विकास यांनी शनिवार, 29/01/2011 या दिवशी प्रकाशित केले.
स्फुटनिक पासून अमेरिका-रशिया यांच्या मधे चालू झालेल्या अंतराळ स्पर्धेत अमेरिकेने मजल मारली होती. स्पेस शटलचे तंत्रज्ञान विकसीत करून पुन्हा पुन्हा तेच वाहन आंतराळात उपग्रह सोडण्यासाठी तसेच मानवी वावरासाठी आणि त्यांना परत आणण्यासाठी वापरणे आता नवीन राहीलेले नव्हते.

विकिचा दहावा वाढदिवस

लेखक मस्त कलंदर यांनी रविवार, 16/01/2011 या दिवशी प्रकाशित केले.
काल विकिपिडियाचा दहावा वाढदिवस जगभरात साजरा करण्यात आला. भारतात खुद्द मुंबईत पाच वेगवेगळ्या ठिकाणी, पुणे, बंगळूरू, म्हैसूर, कोलकाता अशा नव्वदएक ठिकाणी हा सोहळा संपन्न झाला. त्यातल्या एका कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा योग मला लाभला.

व्याख्याच व्याख्या

लेखक स्पा यांनी मंगळवार, 11/01/2011 या दिवशी प्रकाशित केले.
काही मजेशीर व्याख्या,काही कधीतरी वाचलेल्या, तर काही रचलेल्या. बघा आवड्तायेत का? अनुभव - सभ्य शब्दात मांडलेल्या चुका मोह - जो आवरला असता माणूस सुखी राहतो पण आवरला नाही तर अजून सुखी होतो शेजारी - तुमच्या स्वतःपेक्षा ज्याला तुमच्या आयुष्याची खडानखडा माहिती असते तो सुखवस्तू - वस्तुस्थितीत सुख मानणारा वक्तृत्व - मिनिटा दोन मिनिटात सांगून संपणारी कल्पना दोन तास घोळवणे लेखक - चार पानात लिहून संपणाऱ्या गोष्टीसाठी ४०० पानं खर्ची घालणारा फ्याशन - शिंप्याच्या हातून झालेल्या चुका पासबुक/ब्यांक्बुक - जगातील सर्वोत्कृष्ठ पुस्तकाचे नाव (जर भरपूर

क्षारांमुळे नापीक झालेल्या जमीनी

लेखक चिंतामणी यांनी सोमवार, 03/01/2011 या दिवशी प्रकाशित केले.
कालच्या सकाळच्या Today पुरवणीत एक बातमी होती. क्षारांमुळे नापीक झालेल्या जमीनी बद्दल. त्यात म्हणले होते की "ह्या जमीनी ४० वर्षापासुन पडीक आहेत. हे संशोधकांसाठी आव्हान आहे." सविस्तर बातमी येथे वाचा. http://72.78.249.107/Sakal/2Jan2011/Enlarge/PuneCity/PuneToday/page2.htm काही दिवसांपुर्वी लोकप्रभामधे एक लेख आला होता.

कोअर (आणि त्यामुळे निघालेला पसारा)

लेखक यकु यांनी मंगळवार, 07/12/2010 या दिवशी प्रकाशित केले.
२००३ साली येऊन गेलेला हॉलीवूडचा दि कोअर हा सी-फि सिनेमा नुकताच नजरेवेगळा केला. या कोअरमधूनच बराच पसारा निघाला, तोच आता इथं मांडणार आहे. कोणताही सी-फि म्हटले की त्यात डायरेक्ट पृथ्वीचाच नाश होताना पाहाणे आणि मध्येच कुणीतरी (विशेषत: व्हाईट हाऊस किंवा पेंटागॉनच्या जाली सेटवर बसलेल्या लुंग्यासुंग्यांनी, किंवा कुठल्यातरी वाळवंटात, कबाडखान्यात किंवा जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात संशोधन करणार्‍या झक्की लोकांनी) तो थांबवणे अटळ असते. या सिनेमातही हेच होते; एकापेक्षा एक छप्परफाड (खरं म्हणजे पृथ्वीफाड, आकाशफाड किंवा ग्रहगोल-तारे-आकाशगंगा-विश्व-फाड असं म्हणायला हवं) कल्पना यात अगदी ठासून भरलेल्या आहेत.