सध्याच्या हॉट टॉपिक "स्त्री वादा"वर एका चर्चेत तिकडे पलीकडे रामायणातील एका प्रसंगात सीता, बिचार्या लक्ष्मणाला काहीतरी वाईट बोलली ("लंपट माणसा! राम मेला तर मी तुला मिळेन अशी अभिलाषा बाळगतोस"?) असा उल्लेख आला आहे. आता नेमके आठवत नाही पण एका लेखात (बहुदा 'अंतू बर्वा' मध्ये असावे ) पु.लं नी पण प्रतिकूल परिस्थितीत विनोदाचे कवच वापरून तोंड कसे द्यायचे हे दाखवले आहे.. इतके अपमानास्पद बोलणे ऐकायला लागले तर आपण विनोदाने ते माईल्ड कसे करू शकू ?माझ्या डोक्यात उठलेले हे विचार आणि त्यावर सूचलेले हे स्फूट..जरा दोन घटका करमणूक. ह.घ्या.
हे सर्व काल्पनिक आहे, कशाशी साम्य असल्यास निव्वळ योगायोग समजावा.