मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वावर

सनई-चौघडे, शाम मनोहर आणि आपण

विनायक पाचलग ·
लेखनप्रकार
सनई-चौघडे, शाम मनोहर आणि आपण
दोन - चार दिवसांपुर्वीच 'सनई-चौघडे' हा चित्रपट पाहिला. खूप दिवसांनी एक चांगला चित्रपट पाहिल्याचे समाधान लाभले. 'कांदेपोहे' या नावाने मी हा चित्रपट पाहण्या अगोदर एक लेख येथे लिहिला होता. या चित्रपटाला इतके महत्व देणे अवास्तव नव्हते हे या चित्रपटाने सप्रमाण सिध्द केले. उत्कृष्ट संवाद, उत्तम अभिनय या सर्वांनी हा चित्रपट उत्तम झाला आहे. मराठी चित्रपटातील संवाद प्रभाव पाडत नाही हा समज ''सगळे पुरूष सारखे असतात, पण एकसारखे नसतात'' अशा संवादानीं खोटा ठरवलेला आहे.

मिपाकर भगिनींना नम्र विनंती..

विसोबा खेचर ·
प्राजू, चित्रा, शाल्मली, रेवती, भाग्यश्री, शितल, चकली, चित्रादेव, स्वाती दिनेश, इत्यादी मिपाकर भगिनींना एक नम्र विनंती.. आंब्याची डाळ, पन्हं, अजून एखादा खाद्यपदार्थ आणि जो आयटम लुटणार आहात/लुटू इच्छिता तो आयटम, अश्या गोष्टी असलेला एखादा छानसा फोटू लौकरात लौकर विसोबा खेचर या पत्त्यावर पाठवावा. त्या त्या भगिनीच्या नावाने (उदाहरणार्थ - आजचे हळदीकुंकू प्राजूकडून!) असे शीर्षक असलेला पाठवलेल्या पदार्थांचा फोटू त्या त्या सुवासिनीच्या नावासहीत मुखपृष्ठावर चढवला जाईल.

थोरांची ओळख ... महान साहित्यिक 'जालिंदर जलालाबादी'

भडकमकर मास्तर ·
थोरांची ओळख जालिंदर जलालाबादी : या सदरामधून आठवणीच्या पडद्याआड गेलेल्या काही महत्त्वाच्या साहित्यिकांच्या कामगिरीची ओळख करून देणे, हा उद्देश आहे. जालिंदर जलालाबादी हे साठच्या दशकात लिहायला सुरुवात केलेले महत्त्वाचे विद्रोही कवी आणि लेखक. पुढे त्यांनी जगभर विशेषत: अफ़्रिकेमध्ये मराठी विद्रोही लेखनाचा झेंडा फ़डकावत ठेवला. त्यांचे कुटुंब मूळचे अफ़गाणिस्तानचे... फ़ाळणीमध्ये त्यांचे कुटुंबीय पळून भारतात आले...त्यांची अफ़ूची शेती होती.जगभर पसरलेला व्यापार होता. पण पुढे कुटुंबीय महाराष्ट्रात स्थायिक झाल्यावर जालिंदरजींचा जन्म झाला.

वारा

विनायक पाचलग ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स............ हाय, मी वारा मला ओळखले नाही, हा कसे ओळखणार बरे! बरेच दिवस भेटच नाही आपली. अहो तुम्ही ५ वर्षाने आलेल्या राजकारण्याला ओळखू शकत नाही तसे मला तरी कसे ओळखणार... अगोदर मी अदृश्य त्यात मी काय कोणत्या पोस्टर वरून वगैरे पण दर्शन देत नाही त्यामुळे मला ओळखायचा प्रश्न येत नाही,....................... हा आता बघा आता ओळखलंत ना , हा एवढे बोचत आहे म्हटल्यावर ओळखणारच. हा तोच तो तुम्हाला बोचणारा मी वारा.. काय पण दिवस आलेत मला माझी ओळख सांगायला तुम्हाला त्रास द्यावा लागतोय..

माझे महान प्रयोग - २

दशानन ·
माझे महान प्रयोग - १ मागील भाग. सकाळ : ७.१५ मिनिटे नंतर टाईम आसपास ग्रहीत धरा. सतबीरला काल सुट्टी घे म्हणून सांगतले होतेच, त्यानुसार तो सकाळ पासूनच गायब होता + फ्रिज मधील बियर चे कॅन पण. चहाची तलफ होती, त्यामुळे उठल्या उठल्या सरळ किचन मध्ये प्रवेश केला, वरुन कोणीतरी फुले टाकत आहे.. दुरवर कुठे तरी जय हो जय हो चा घोष चालू आहे, कोणी तरी सुगंधी द्रव्य शिपंडत आहे असा काही तरी भास मला जेव्हा मी प्रथम काहीतरी निर्माण करण्यासाठी किचन मध्ये प्रवेश करताना झाला ! माझ्या मते चहा ही एक सोपी कृती आहे, चहा पावडर, साखर व दुध !

आणखी एक निवांत, मोकळा वीकांत

बेसनलाडू ·
सुनीलरावांचा एक निवांत, मोकळा वीकांत वाचून आम्हांला - म्हणजे नाटक्या, अस्मादिक आणि बबलु हे मिपाकर - आमचा गेला वीकांत आठवला - अशीच निवांत, मोकळी शनिवारची संध्याकाळ. "वीकेन्डला काय करतो आहेस?" आठवड्याच्या मध्यावर नाटक्याचा फोन आलेला. "हापिसात नसलो तर मोकळा असेन; पण शक्यता अंधुक आहे" मी. "बबलुच्या घरी कॉक् टेल् पार्टी करायचा बेत आहे. बरेच दिवसात आपली भेटही झालेली नाही. ब्याचलर् पार्टी करू ;)" नाटक्या (सौ.

एप्रील फळ (१०)

विजुभाऊ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
या पूर्वीचे दुवे http://misalpav.com/node/1398 = एप्रिल फळ ; http://misalpav.com/node/1403 एप्रिल फळ (२) ; http://misalpav.com/node/1416 = एप्रिल फळ (३) ; http://misalpav.com/node/1424 एप्रिल फळ (४) ; http://misalpav.com/node/1466 = एप्रिल फळ (५) ; http://misalpav.com/node/1480 एप्रिल फळ (६) http://misalpav.com/node/1492 = एप्रिल फळ (७) http://misalpav.com/node/2482 = एप्रिल फळ(८) एप्रिल फळ (९) http://misalpav.com/node/2538 फ़णासाचे गरे आयुर्वेदात रुचकर ; पौष्टीक असे काहीसे वर्णीले आहेत. पण खाणारा माणुस फ़णसाचे गरा तोंडात टाकतो तेंव्हा अजानतेपनी डोळे मिटतो.

आवडलेले पुस्तक...फॉर हिअर ऑर टु गो

भडकमकर मास्तर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
फ़ॊर हिअर ऒर टु गो लेखिका अपर्णा वेलणकर मेहता प्रकाशन पृष्ठ संख्या २८६ http://kharedi.maayboli.com/shop/product.php?printable=Y&productid=16335 या पुस्तकाला नुकताच एक पुरस्कार मिळाल्याची बातमी वाचली... अमेरिकेवरचे पुस्तक म्हणजे काही ठराविक कल्पना मनात घेऊन वाचायला सुरुवात केली होती. पण हे पुस्तक वेगळे आहे. हे एक टिपिकल ठराविक प्रवासवर्णन नाही.... ( अबब, केवढ्या त्या उंच इमारती अन केवढे ते गुळगुळीत रस्ते...

बरी नव्हे ही थट्टा!

प्रकाश घाटपांडे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
समर्थानी म्हटल आहे 'टवाळा आवडे विनोद' म्हणुन काही लगेच समर्थांना विनोदाचे वावडे होतं असे म्हणता येणार नाही. थट्टा मस्करी, टिंगल, विनोद विडंबन वात्रटिका प्रहसन, खिल्ली, चेष्टा गंम्मत नसती तर जगण्यातला (जीवन शब्द नको रे बाबा ) आनंद घेता आला नसता. विनोदाला असलेली कारुण्याची झालर, वेदनेला असलेले विनोदाचे कवच, विनोदाच्या अंतरंगात खदखदणारे अपमानाचे निखारे, सुडापोटी जन्मणारे विनोद, असहाय्ये पोटी जन्मणारे विनोद, कोल्ह्याला द्राक्षे आंबट या मानसिकतेतुन जन्मणार प्रहसन, आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी इतरांना कमी लेखण्याची केलेली चेष्टा, इतरांना भानावर आणण्यासाठी उडवलेली खिल्ली.