समर्थानी म्हटल आहे 'टवाळा आवडे विनोद' म्हणुन काही लगेच समर्थांना विनोदाचे वावडे होतं असे म्हणता येणार नाही.
थट्टा मस्करी, टिंगल, विनोद विडंबन वात्रटिका प्रहसन, खिल्ली, चेष्टा गंम्मत नसती तर जगण्यातला (जीवन शब्द नको रे बाबा ) आनंद घेता आला नसता. विनोदाला असलेली कारुण्याची झालर, वेदनेला असलेले विनोदाचे कवच, विनोदाच्या अंतरंगात खदखदणारे अपमानाचे निखारे, सुडापोटी जन्मणारे विनोद, असहाय्ये पोटी जन्मणारे विनोद, कोल्ह्याला द्राक्षे आंबट या मानसिकतेतुन जन्मणार प्रहसन, आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी इतरांना कमी लेखण्याची केलेली चेष्टा, इतरांना भानावर आणण्यासाठी उडवलेली खिल्ली.