मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वावर

सल्ला हवा

शरद ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रिय मित्रहो (आणि मुलींनो). नेहमी मी मित्रहो, यावर थांबतो पण आज मला सल्ला पाहिजे आहे व सर्व जगाला पुरातन काला॒पासून माहीत आहेच की सल्ला हा बायकांच देतात व बहुतेक वेळी तो योग्यच असतो ! तर काय सांगत होतो, मला आज एक सल्ला हवा आहे. मी येथे भरपूर लिहतो व ( पाककृती सोडून) वाचतोही. काही वेळेला वाटते की लेखकाने लिहलेले चुकीचे आहे. अनेकदा खात्री असते. कमी वेळी खात्री नसते.त्यावेळी मी गप्प बसतो व जाणत्यांनी लिहलेले शोधण्याचा प्रयत्न करतो. Quits. i पण ज्यावेळी माझी ठाम खात्री असते की लिहलेले चूक आहे त्यावेळी काय करावे हा प्रश्न निर्माण होतो. मला तीन मार्ग असतात. (1) विसरून जाणे.

प्रिय मायमराठी

शिव कन्या ·
प्रिय मायमराठी, तुझा प्रांत सोडून तब्बल एक तप उलटून गेले, म्हणूनच कदाचित् तुझी आठवण इतर कुणाहीपेक्षा माझ्या मेंदूत जास्त येरझाऱ्या घालत असावी. तुला न ऐकणे म्हणजे, कान असून श्रवण नसणे. तुला न वाचणे म्हणजे, डोळे असून आंधळे असणे. तुझे देवनागरी रूप महिनोंनमहिने नजरेस पडत नाही, तेव्हा डोळे दुखून येतात. लहानपणी, कुठल्याही परप्रांतातून घरी परतताना, तुझ्या साजिऱ्या रूपातला फलक वाचला कि डेरेदार सावलीत परतल्यासारखे वाटायचे. चित्रविचित्र लिपींचा न कळणारा प्रांत सोडून तुझ्या कळणाऱ्या रूपाशी आले, कि सुखरूप वाटायचे.

प्रवास

शिव कन्या ·
लेखनप्रकार
प्रवास तो म्हणाला, ‘मोना, प्लान चेंज! अब हम रेलसे नहीं, driving करके जायेंगे!’ त्याने गाडी बाहेर काढली, तेव्हा ती तिच्या कोषातून बाहेर पडली . गाडी शहरातील धूळधूर अंगावर घेत, गर्दीतून वाट काढू लागली. गाडी शहराबाहेर आली, त्याला तरतरीत वाटू लागले.....

कमलताल

शिव कन्या ·
(ताल = सरोवर) प्रिय कमलताल, मी आता फार फार दूर निघून आलेय. पण जेव्हा वारा स्तब्ध होतो, पानही हलत नाही तेव्हा, मन थेट तुझ्यापाशी जाऊन पोहचते. कितीही चाललो तरी पाय न दुखण्याचा एक काळ असतो. पहाटे उठावे. पाठीवर सॕक टाकावी. मिळेल ते वाहन घ्यावे. फारसे गुगल न करता, उंच उंच हिमालयात गुडूप व्हावे. तो पर्वतराज संपन्न. त्याची अगणित शिखरे. हे पार करेपर्यंत ते, ते पार करे पर्यंत ते, आणखी पुढची, आणखी पुढची शिखरे. प्रत्येक शिखर कोरीव. आकाशाला कातणारे. या शिखरांच्या पायथ्याशी कुठे कुठे माणसांची वस्ती. फार विरळ. अशीच चालून चालून दुपार उलटली. ते चालणे फार लयदार असे. उंच उंच झाडांतून जाणारी नागमोडी वाट.

मजूर

शिव कन्या ·
लेखनप्रकार
मजूर .... 'संध्याकाळ झाली कि बरं वाटतं. दिवसभरातली अंगावरची वाळू सिमेंट झटकली जाते. चहापाणी होऊन, अंगावर असे बरे कपडे येतात. हातात आपला खटक्यांवर चालणारा मोबाईल येतो. स्क्रीनवाला नवा घेईन ..... पण बघू. घरी पैसे पाठवायचेत. घरी पैसे पाठवण्यासाठी तर इतक्या दूर आलो. मागच्या वर्षी सुरु झालं होतं हे बांधकाम. बरोब्बर एका वर्षात ही उंचच उंच इमारत उभी राहिली. तसे मला इथे येऊन दोन वर्ष झाली ...... हं, वर्षदोनवर्षं होताच घरी जायला मी काय इंजिनीअर नाही. झालो असतो का इंजिनियर? १२ वी पर्यंत नेटाने शिकलोच. पण गरिबी, भूक........

लिहायचं वेगळच होतं पण...

शाली ·
लेखनविषय:
नातेवाईकांकडे लग्नकार्याला जायचा योग आला. नेहमीचेच वातावरण. बऱ्याच दिवसांनी भेटलेले नातेवाईक. सगळ्यांच्याच चेहऱ्यावर ऊत्साह. खळखळून हसनं. बरचसं खरं, थोडंफार खोटंही. एकमेकांच्या चौकशा, ख्याली खुशाली वगैरे. लहाण मुलांची धावाधाव, यजमानांची तारांबळ, पाहूण्यांच्या फर्माईशी, पंगतीतले आग्रह, या सगळ्यात अगदिच विसंगत वाटनारी केटरर्सची निर्विकार वाढपी मंडळी. एकूण वातावरणात छान ऊत्साह भरला होता. मी ही जरा बाजूला दोन खुर्च्या ओढून आत्याची मुलगी सुरभीबरोबर बोलत बसले होते. बोलत म्हणजे हातात सरबताचा ग्लास खेळवत श्रवण भक्ती करीत होते नेहमी प्रमाणे. मला हे अगदी ऊत्तम जमतं. आवडतही.

राजाची नियत

शिव कन्या ·
लेखनप्रकार
राजाची नियत आटपाट नगर होते. तिथे एक राजा होता. राजा फार दयाळू आणि प्रजेचे हित पाहणारा होता. वेश पालटून आपल्या राज्यात फिरे. लोकांची सुख दुखे समजून घेई. एकदा फिरता फिरता एका गावात पोहचला. तहान लागली होती. दूर एक लहानसे घर दिसले. घरा भोवती ऊसाचा मोठा मळा होता. तिथे गेला. एक म्हातारी सामोरी आली. त्याने प्यायला पाणी मागितले. ती शेतात गेली. एक उस तोडला. उभ्या कांडक्यावर आडवा कोयता मारला. एक मोठा ग्लास भर रस निघाला. राजा बघतच राहिला! उसावर कोयता मारायचा अवकाश कि लगेच एवढा रस! रस पिऊन राजा तृप्त झाला. त्याने विचारले, ‘माई, हा काय जादूचा ऊस आहे का? इतका रस?

राणी एलिझाबेथ, साधी एलिझाबेथ.

शिव कन्या ·
लेखनप्रकार
राणी एलिझाबेथ, साधी एलिझाबेथ. [ही एक रूपककथा. लावू तितके अर्थ. करू तसा विचार.] एक होती राणी एलिझाबेथ. दुसरी होती साधी एलिझाबेथ. दोघींचाही आपापल्या मामांवर भारी जीव होता. मामांचाही त्यांच्यावर. एके दिवशी घरात अचानक गर्दी दिसू लागली. गर्दीतच मामा झोपलेला दिसला. शेलाट्या अंग काठीचा मामा एकदम जाडसर दिसू लागला. त्याच्या अंगा खांद्यावर कसली कसली हारफुलं घातली जाऊ लागली. साधी एलिझाबेथ मामाजवळ जायचा हट्ट धरते. राणी एलिझाबेथ सगळे प्रोटोकॉल्स सांभाळत, मूक अश्रू गाळीत उभी राहते. जराशाने आपले कोणच ऐकत नाही म्हटल्यावर, साधी एलिझाबेथ रडून रडून हलकल्लोळ माजवते.

दवणीय अंडी - अंडे ४थे - सुविचारी सकाळ

आदिजोशी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आजचा सुविचारः न पिणार्‍याला जबरदस्तीने पाजता येईलही, पण त्याला बेवडा बनवता येणार नाही. दारूची ओढ रक्तातच असावी लागते. अंडी घालण्यासाठी सगळ्यात उत्तम वेळ म्हणजे सकाळ. सूर्य काही तासांपूर्वीच उगवलेला असतो, मेंदू मस्त रिकामा असतो, मन मात्र भावनांनी ओथंबलेले हवे. रात्री नंतर रोज येणारी सकाळ हँगओवर सोबत इतरही अनेक गोष्टी घेऊन येते. प्रत्येक सकाळ ही एका नव्या आयुष्याची सुरुवात होऊ शकते. रोज नवं आयुष्य. नवी बायको/नवरा, नवी नोकरी, नवे आई-बाप, नवे शेजारी, नवे मित्र, नवे कपडे... साबण मात्र जुनाच असावा. शरीरावर चढलेली पुटं घालवण्याचं पुण्यकर्म साबणच करतो.

ऐसपैस अंगण

जागु ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
अंगण म्हणजे घराचंच एक अंग जे घराबाहेर असूनही घराइतकंच जिव्हाळ्याचं असत. ऊन, पाऊस, दव झेलत आकाशाच्या प्रेमात पडलेलं असत. प्राजक्ताच्या सड्याच्या सुगंधी रांगोळीने ते बहरलेलं असत, रातराणीच्या सुगंधाने दरवळलेलं असत, गार गार वार्‍याच्या झुळूकेने शहारलेलं असत, कधी चंद्रदीपात तेवत असत तर कधी चांदण्यांचं शीतल पांघरूण घेऊन शांत पहुडलेलं असत. हल्ली वाढत चाललेल्या बिल्डिंगमुळे अंगणं लोप पावत चालली आहेत व आधुनिक घर/बंगल्यांच्या रचनेतील अंगणांचे स्वरूप बदलले आहे. आमच्या उरणमध्ये अजून काही पारंपरिक तर काही बदलत्या स्वरूपातली अंगण संस्कृती कुठे कुठे जपली आहे ह्याच समाधान वाटत.