Skip to main content

वाङ्मय

रिकामा देव्हारा

लेखक शरद यांनी शनिवार, 09/04/2011 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
याच देव्हार्‍यात होता .... याच देव्हार्‍यात होता देव आमुचा आधार आता रिकामा देव्हारा तरी माझा नमस्कार. नमस्कारास वाकता क्षणी घडे चमत्कार वीणा लागली वाजाया झाला टाळांचा गजर. समईत जळू लागे प्राण होऊनिया ज्योत आणि उजळले विश्व काळ राहिला तेवत. कसे मला आता दिसे माझे वेगळे शरीर रिकाम्या देव्हार्‍याला पुन्हा माझा नमस्कार. शंकर वैद्य श्री. वैद्यांचा चमत्कार काय तो पाहण्याआधी थोडी अवांतर माहिती देतो. शंकराचार्य आणि ज्ञानेश्वर माऊली दोघेही अद्वैती. दोघांनी गीतेवर टीका लिहल्या. दोघांच्या मतात साम्य दिसल्याने डॉ.

थोडेसे 'रंग'वणे

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 05/04/2011 01:14 या दिवशी प्रकाशित केले.
वडापाव मिळणार असे समजून जावे आणि अचानक पुरणपोळी समोर यावी तसा मिसळपावावर 'थोडेसे शब्दवणे' हा लेख सामोरा आला. अलवार पुरणपोळीवर पातळ तुपाची धार पडून डाराडूर वामकुक्षीची दवंडी पिटणारा. शब्दनशब्द दवणीय रसाने ओथंबलेला. 'लिखाळ' हे दवण्यांचे टोपण नाव तर नव्हे असे वाटून मी नखे कुरतडतो! पुलाखालच्या कविता करण्यासाठीच खरेतर लिखाळाने कलम हाती घ्यावे. त्याच्या भेसूर कवितेचे जसे शब्द, तसे हे उंबराला आलेले फूल. लिखाळाच्या अनिर्बंध काळ गायब होण्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यासाठी प्रतिसाद कर्त्यांचे सर्व प्रयत्न. पण तो या सर्वांहून फार हुशार.

थोडेसे शब्दवणे

लेखक लिखाळ यांनी सोमवार, 04/04/2011 19:50 या दिवशी प्रकाशित केले.
तंद्रीमधून अचानक भान यावे तसे आमच्या दारातल्या झाडाला पालवी फुटली. नाजूकश्या पानाने फांदीच्या सालीला फाडून बाहेर येणे हे आश्चर्य. पातळ नाजूक पाने ! वार्यावर डुलून नवजीवनाची द्वाही देणारी. रंग तरी कसा तर शब्द बापुडे. निसर्गाशी असलेली आपली नाळ तुटली असे वाटून आत पोटात कुरतडते. अभिव्यक्तीची मर्यादा अधोरेखित करण्यासाठीच शब्दाने जन्म घ्यावा. आपले शब्द जसे तसेच झाडाला आलेली नवी पालवी. जीवन सातत्या बद्दल आश्चर्य व्यक्त करण्यासाठीचे सर्व प्रयत्न. पण जीवन या सर्वांहून फार मोठे व्यापक.

बर्मा फ्रंटवरून........

लेखक जयंत कुलकर्णी यांनी रविवार, 27/03/2011 20:37 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, माझ्या मराठालाईट इन्फंट्रीच्या आभ्यासादरम्यान हे एका सैनिकाने त्याच्या प्रेयसीला लिहीलेले पत्र सापडले. त्याचे भाषांतर केले आहे. सैनिकांची मनस्थिती यात बरीच समजून येते. हे पत्र बर्माहून लिहीले आहे. प्रियतमे, पंख असते तर तू उडत येथे आली असतीस असे सारखे म्हणतेस, पण खरंच तुला येथे यायला आवडेल का ? तुला आवडेल की नाही हे मला माहीत नाही पण तू येथे आलेले मला आवडणार नाही हे निश्चित. येथे येण्यात धोके आहेत, नाही असे नाही, पण याही पलीकडे काही कारणे आहेत. धोके तर आमच्या आयुष्याचे अविभाज्य घटक आहेत.

अंताजीची बखर - ऐतिहासिक महत्त्वाची ऐतिहासिक कादंबरी

लेखक चिंतातुर जंतू यांनी गुरुवार, 24/03/2011 13:47 या दिवशी प्रकाशित केले.
‘मराठी ऐतिहासिक कादंबरी’ असं म्हटलं की काही ठराविक नावं समोर येतात. त्यांचा एक साचादेखील जवळपास ठरलेला असतो. एखादी ऐतिहासिक महत्त्वाची व्यक्ती किंवा घटना घ्यायची आणि अलंकृत (किंवा अगदी शब्दबंबाळ!) भाषेची खैरात करून त्या व्यक्ती/घटनेभोवती एक महिरप तयार करायची. मराठी मनाला पूज्य आणि अभिमानास्पद वाटतील अशा, म्हणजे मराठ्यांचं शौर्य वगैरे उदात्त गोष्टींची त्या कादंबरीत भलामण करायची. असं केलं म्हणजे मराठी लोक तिच्याविषयी भरभरून बोलतात.

परिश्रमांती रसग्रहण

लेखक लंबूटांग यांनी मंगळवार, 22/03/2011 23:57 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या ठिकाणी टारझनने एका प्रतिसादाचे रसग्रहण करण्याचे आव्हान केल्याने मी माझा कधी नव्हे ते मिळालेला रिकामा वेळ सत्कारणी लावण्याचे ठरवले. सर्वप्रथम अन्वर चित्रपटावरून लेखकाला लंडनची आठवण येते म्हणून त्या चित्रपटाच्या निर्मात्याला धन्यवाद.

भोग

लेखक मृत्युन्जय यांनी शनिवार, 19/03/2011 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
या जन्माची पापं या जन्मातच फेडायला लागतात म्हणे. आयुष्याचे भोग प्रत्येकाने भोगायलाच पाहिजेत असाही एक प्रवाद आहे. पण मी आयुष्यात अशी कुठली पापं केली आहेत की माझे भोग संपता संपत नाहीत हे कळेना झालय. नाही मी काही 'तसला' विचार मांडत नाही आहे किंवा माझी गार्‍हाणी गाण्याचा पण माझा विचार नाही. पण माझी दु:खभरी दास्तां ऐकुन तुमच्या डोळ्यात पण पाणी येइल. अजुन काही नाही तुमच्या कडुन फक्त थोड्या सहानुभुतीची अपेक्षा आहे. मी सुरुवातीलाच मोकळेपणाने कबूल करु इच्छितो की माझ्या आयुष्यात हे जे काय घडले आहे न पेक्षा जे काही नेहेमीच घडते त्यात अंशतः चुक माझीच आहे. पण पुर्णपणे मी स्वत:ला दोष देउ इच्छित नाही.

निसर्गवेड्यांसाठी नवी भेट - पुण्याचे पक्षीवैभव

लेखक प्रसन्न केसकर यांनी बुधवार, 16/03/2011 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
एनआरसीओतर्फे `पुण्याचे पक्षीवैभव’ फील्ड गाईडचे प्रकाशन २० मार्च रोजी नॅचरल रिसोर्सेस कॉन्झर्वेटर्स ऑर्गनायझेशन (एनआरसीओ) या पुण्यातील संस्थेच्या वतीने जागतिक वनदिनाचे औचित्य साधून दिनांक २० मार्च रोजी वनाधिकारी व वन्यजीव तज्ञ श्री. प्रभाकर कुकडोलकर यांनी लिहिलेल्या `पुण्याचे पक्षीवैभव’ या पक्षीनिरीक्षकांसाठीच्या फील्ड गाईडचे प्रकाशन करण्यात येणार आहे.