Skip to main content

वाङ्मय

ब्रम्मा

लेखक पराग देशमुख यांनी शनिवार, 28/01/2017 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
निराकार, निर्विकार, अनासक्त आणि एकूणच सांगायचं झाल तर अनामिक असा मी एक नदीपात्रातील गोटा. तसा मुळात मी घाटी पण सह्याद्री, मंद्राद्री, निलगिरी नि सातपुडा वगैरे कौतुक आमच्या नशिबात अपवादानेच सापडतील. महाराष्ट्राच्या हृदयस्थानी असणाऱ्या मराठवाड्याच्या मध्यबिंदूशी माझी मुळ अजून घट्ट रुजलेली आहेत.

झेंगट कॉपीराईटचं, शैक्षणिक झेरॉक्सींगच !

लेखक माहितगार यांनी रविवार, 22/01/2017 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
नव्हेंबर डिसंबर २०१६ नोटबंदी निर्णयामुळे इतर छोट्या मोठ्या बातम्या पडद्या आड राहील्या त्यातील एक छोटी बातमी दिल्लीच्या रामेश्वरी फोटोकॉपी सर्वीसेसची. आजुबाजूच्या फोटोकॉपींग सेंटरवरच्या विद्यार्थ्यांकडून (आणि इतरांकडून) पुस्तकांच्या झेरॉक्सींगच्या वेळी लेखक-प्रकाशकांच्या कॉपिराईटचे काय खोबरे होते याची कुणि फारशी काळजी करत नाही. कारण सरसामान्यपणे सर्वसामान्य भारतीयांची वृत्ती कायद्यांकडे झेंगट म्हणून पहाण्याची झाली असावी.

दुसरे ट्विटर मराठी भाषा संमेलन २०१७ :: ३ ते ६ फेब्रूवारी २०१७ रोजी वापरा #ट्विटरसंमेलन

लेखक स्वप्निल_शिंगोटे यांनी गुरुवार, 05/01/2017 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
" प्रकट व्हा, अभिव्यक्त व्हा !! " ट्विटर हे एक जागतिक व्यासपीठ आहे.ह्या व्यासपीठावर रोज करोडो लोक आपले मत आपल्या भाषेत नोंदवत असतात.एकेकाळी फक्त इंग्रजी भाषेचा बोलबाला असणारे ट्विटर आज जगातील प्रत्येक लिपी असणारी भाषा सामावून घेत आहे.मग अशा ह्या ट्विटरवर मराठीचे अस्तित्व किती आहे ? असा तुम्हाला प्रश्न पडेल.सध्या मराठीचे ट्विटरविश्व जरी उगमावस्थेत असले तरी त्याचे भविष्य उज्जवल आहे.

गांझोल्यांचा पोळा

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी रविवार, 01/01/2017 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे मागच्या दारातून पुढच्या दारी येण्यासाठी एक बोळ होता. ओसरीत पाव्हणे रावळे असले तर मागच्या दाराने निघून पुढच्या दारी येता येत असे. ओसरीत आण्णा असले तर खेळायला जाण्यासाठी मागच्या दाराने मी हळूच निघून जात असे. ह्या बोळातून तसे खूप लोक वापरायचे. विशेषत: स्त्रिया. बोळाच्या दोन्ही बाजूच्या भिंती मातीच्या रद्दयाच्या म्हणून त्या भिंतीना मोठमोठे नळे आणि भगदाड पडलेले होते. अशाच एका नळ्यात गाझोंल्यांचा (गांधील माश्यांचा) पोळा तयार झाला होता. हा नळा मोठ्या माणसांच्या डोक्याइतक्या उंचीवर होता. होता होता या गांझोल्यांचा पोळा खूपच वाढला.

वडील

लेखक वृंदा१ यांनी मंगळवार, 27/12/2016 23:13 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या वाचनाचं कौतुक तुमच्या डोळ्यांत दिसायचं आता अक्षरंच तरंगतात अश्रूंवर आता कसं वाचायचं?

(कोरडी भाकर)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी रविवार, 11/12/2016 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या वेळी पेर्णा दिली नव्हती तर नाखुकाकांनी माझा कान धरला होता, त्यामुळे यावेळी न विसरता - ही पेर्णा फार धावाधाव झाली, सकाळी खरोखर जेवणा तरी सुधा, नाराज नसे मी तुझ्यावर मी किती दडवून ठेवले या ढेरीला कुत्सित नजरा घाव घालती.. या..!

कॅशलेस

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी सोमवार, 05/12/2016 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
‘देशभक्‍ताची व्याख्या’ या ब्लॉगचा ताजा कलम: - डॉ. सुधीर रा. देवरे 1975-77 च्या आसपासचा काळ. तेव्हाही माझ्या लहानपणी आमचं गाव बर्‍यापैकी कॅशलेस होतं. दुकानात कोणाला काही घ्यायला जायचं असलं की घरातलं धान्य- बाजरी, गहू, नागली, हरभरा, मका असं दुकानात घेऊन जायचं. दुकानदार तो त्याच्या मापाने मोजायचा. माप भरून भरपूर धान्य खाली पडू द्यायचा. आणि त्याच्या हिशोबाने सांगायचा, ‘इतके इतके पैसे झाले. काय देऊ?’ मग रोज लागणार्‍या जिनसा गुळ, दाळ, चहा, साखर, तेल असं थोडं थोडं खरेदी करायचं.

घर

लेखक नकुल पाठक यांनी रविवार, 04/12/2016 21:44 या दिवशी प्रकाशित केले.
एक घर असतं. अगदी नेहमीच्या घरांसारखं. खिडक्या, भिंती, कुंपण असणारं. बाहेरून जरी बाकीच्या घरांसारखं दिसत असलं तरी आतून मात्र अगदी वेगळं. कोणतीही वस्तु नाही किंवा सामान नाही. आणि घरात कोणी माणसंही नाहीत. फक्त खूप खोल्या. काहींमध्ये भीती निर्माण करणारा अंधार तर काहींमध्ये डोळे दिपवणारा उजेड आणि काहींमध्ये आल्हाददायक मिणमिणता प्रकाश. घराच्या खिडकीतून फुलांचे काटे दिसतात तर कधी घनदाट झाडांमध्ये अदृश्य होणारी वहिवाट. ह्याला समजुतीची बाजू घेणारा गार वारा आणि घणाघाती घाव घालणाऱ्या कटू विजांची साथ. घरातलं वातावरणही काहीसं तसंच. प्रत्येक खोली मधून एक विशिष्ठ सूर असलेलं.

कंट्रोल रूम - २

लेखक चांदणे संदीप यांनी मंगळवार, 29/11/2016 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
(जुनाच ढिस्क्लेमर: या लेखातील घटना जरी खरया असल्या तरी पात्रांची नावे बदलली आहेत आणि विनोदनिर्मितीसाठी काही प्रसंगांना तिखटमीठ लावण्यात आलेले आहे!) ०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-० कंट्रोल रूम ०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-० "नमस्कार, कंट्रोल रूम, काय मदत करू शकते आपली?" "हॅलो, म्याडम, ते याडं टाकीवं चलडय... उडी माराय." "पत्ता सांगा, कुठून बोलताय तुम्ही" "प...त्ता... हां लिहून घ्या ॲड्रेस...