उठल्यावर पहिला नमस्कार तुम्हाला
तो पोहोचला हे लगेच कळतं
त्याशिवाय का डोळ्यांत पाणी जमत
माझ्या वाचनाचं कौतुक
तुमच्या डोळ्यांत दिसायचं
आता अक्षरंच तरंगतात अश्रूंवर
आता कसं वाचायचं?
डोळयांसमोर झळाळतं
तुमचं राजस रूप
भेटत जा ना स्वप्नांत
बोलत जाऊ खूप
प्रत्यक्षाहूनही उत्कट
तुमचे सततचे भास
मन थकून जातं
पण संपत नाही आस...
आता कसली कोजागिरी
आणि कसलं काय
भरलेल्या डोळ्यांवर
आठवांची साय....
डोळे उघडे असोत वा मिटलेले
तुम्ही दिसता समोर थेट
जीव कोसळतो कणाकणानं
साहवत नाही हो अशी भेट
या असल्या शिक्षेपेक्षा
परवडला तुमचा राग
कशानेच शांत होत नाही हो
ही अंतरातली आग.....
फार सुरेख लिहिलंय.
In reply to फार सुरेख लिहिलंय. by पद्मावति
धन्यवाद पद्मावतिजी.
वडील
अप्रतिम लिहिता तुम्ही. एक
वडील