Skip to main content

वाङ्मय

तळ्याकाठी

लेखक aanandinee यांनी सोमवार, 03/07/2017 16:03 या दिवशी प्रकाशित केले.
तळ्याकाठी “तू तर नेहेमी त्याचीच बाजू घेणार. तुला सांगण्याचाही काय उपयोग ! तरी तुला बजावतोय मी, माझ्या करीअरमधे तो ढवळाढवळ करतो तेवढी पुरे, पण आता माझ्या पर्सनल लाईफमध्ये जर त्याने नाक खुपसलं तर मोठा भाऊबिऊ सगळं मी विसरून जाईन.” त्याने आईला निक्षून सांगितलं. “अरे पण चिंटू,” आई समजावणीच्या स्वरात सांगू लागली. “चिंटू म्हणू नको मला, हजारदा सांगितलाय, राजस म्हण. ओजसला कसं बरोबर ओजस म्हणतेस. मी काय आयुष्यभर चिंटूच रहायचं का?” राजसने चवताळून विचारलं. “बरं, बरं, चुकलंच माझं! पण राजस, दादा नव्हता गेला त्यांच्याकडे. तुझ्या मैत्रिणीचे वडीलच येऊन बोलले त्याच्याशी, तुझ्याबद्दल.

(why is there nothing rather than something ???????)

लेखक मुक्त विहारि यांनी शुक्रवार, 30/06/2017 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

पारिजात

लेखक aanandinee यांनी मंगळवार, 13/06/2017 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
सुन्न मनाने तिने फोन ठेवला. समोरच्या टेबलवर ठेवलेला चहा केव्हाच थंड झाला होता, त्याखालचा सकाळचा पेपर फडफडत होता पण तिला काही सुचत नव्हतं. हुंदकाही येत नव्हता. आतून थिजल्या सारखी ती गोठून गेली होती. अण्णा जाणार हे निश्चितच होतं. त्यांचं वयही झालं होतं. होणार हे माहीत असलं तरी प्रत्यक्षात झाल्यावर गोष्ट मनाला चटका लावून जाते. गायत्रीचही तसंच झालं. अण्णांच्या मागोमाग तिच्या मनात विचार आला माईचा. माई कशी असेल? सावरली असेल का? तिने चटकन माईला फोन लावला. पण कोणी फोन उचललाच नाही.      माईशी बोलल्यालासुद्धा आता बरेच महिने होऊन गेले होते.

बदलतं मराठी बालसाहित्य - प्रश्नावली भरण्यासाठी मदत हवी आहे

लेखक आदूबाळ यांनी सोमवार, 12/06/2017 18:34 या दिवशी प्रकाशित केले.
'बदलतं मराठी बालसाहित्य' या विषयाला वाहिलेला एक विशेषांक घेऊन ‘रेषेवरची अक्षरे’ (http://www.reshakshare.com/) लवकरच येत आहे. या अंकात विविध मान्यवर नि जाणकार यांच्या मुलाखती, लेख यांतून गेल्या काही दशकांत बालसाहित्यात झालेल्या विविध बदलांचा मागोवा घेतला जाणार आहे. यासंदर्भात आजच्या मराठी बाल/कुमार पिढीच्या वाचनसवयी काय आहेत हे टिपण्याचाही आम्ही प्रयत्न करणार आहोत. ही पिढी काय वाचते, कसं वाचते, का वाचते, कोणत्या भाषेतलं साहित्य वाचते वगैरे.

पहिले प्रेम आणि पहिला पाऊस सारखाच!

लेखक bhavana kale यांनी सोमवार, 12/06/2017 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
आताच हिंजवडीत मस्त पाऊस पडला आणि मग हे सुचलं.... आभाळ आला कि मन हळवं होतं.... असंख्य आठवणी बरसू लागतात.. मग माझी मीच ह्या पावसासोबत वाहत जाते... सरींसारखे विचार मनात सरसर कोसळतात भूतकाळाच्या पानात मग मी रमत जाते.. पावसात भिजली नाही तरी मनात खूप पाऊस पडतो.. कितीही नाही म्हटलं तरी वेळेचा काटा पळत असतो.. पाऊस संपत संपत माझा आनंदही घेऊन जातो.. का हा पाऊस असा ह्रदयाला चिरून चेहऱ्यावर एक गोड हास्य देऊन जातो...
काव्यरस

नटनागर कृष्ण

लेखक शरद यांनी शनिवार, 03/06/2017 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
नटनागर कृष्ण भगवान कृष्ण ही एक महान विभुती असली पाहिजे. असं बघा, जन्मता जन्मता तुरुंगातून पळणे ते सोन्याची द्वारका समुद्रात बुडवून नंतर एका रानात शांतपणे मरणाची वाट पहाणे या दोन नाट्यमय क्षणांमधील आयुष्यात त्याने काय काय केले किंवा खरे म्हणजे काय काय केले नाही ? सर्व स्तरातील माणसांना मग ते स्त्री-पुरुष, आबालवृद्ध, गरीब-श्रीमंत, ज्ञानी-अज्ञानी कोणी असोत, आपल्याला भावेल, तेथे आपण पाहिजे होतो, असे वाटावे अशी एक तरी घटना कृष्णाच्या आयुष्यात घडलेली असते. तुमचा देवावर विश्वास नसेल तर विश्वदर्शन तुम्हाला भाकडकथा वाटेल व त्याला महान विभुती म्हणावयास तुम्ही तयार होणार नाही.

पैलवान-२

लेखक चांदणे संदीप यांनी शुक्रवार, 02/06/2017 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
पैलवान-१ "ह्ये बघा, आत्ता वाजलेत साडेआठ. दत्त्याच्या म्हाताऱ्याची शेतातन गाठ घेऊन दहा वाजेपर्यंत हालूया. दुपारची यस्टी गाटली की संध्याकाळच्याला सोमनाथाच्या वाडीत! रात्रभर खाऊ-पिऊ, उद्या त्यांच्या गावातबी कुस्त्या आसत्यात. त्या बघू, तिकडून दुपारच्याला बसू...

ऊन

लेखक शिव कन्या यांनी गुरुवार, 01/06/2017 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
दिवसाचा ताप संपला कि ऊन उदास होऊन कोपऱ्यात एकटे बसते. आपण कुणासाठी सावली झालो नाही म्हणून हुरहुरते, हळहळते. अंधारात गडप होऊन पाण्यापलीकडचे मृगजळ शोधू लागते. -शिवकन्या
काव्यरस

ऋग्वेदातील सुविचार

लेखक माहितगार यांनी सोमवार, 29/05/2017 09:38 या दिवशी प्रकाशित केले.
आमची हि प्रस्तावना वाचलीच पाहीजे असे नाही. मेघश्याम पुंडलिक रेगे ((मे.पुं. रेगे) हे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. त्यांचे एक वाक्य आहे. "..जे पुस्तक आपण वाचलेले नसेल तरी आपण ते वाचलेले असणार अशी ज्याच्याविषयी आपली समजूत असते त्या पुस्तकाला अभिजात पुस्तकाचा (classic) दर्जा प्राप्त झालेला असतो असे म्हटले गेले आहे..." अशीच काहीशी स्थिती वेदांबाबतही होते का ? नुसताच उदो उदो किंवा नुसतीच टिका पण त्यात प्रत्यक्षात काय लिहिले आहे हे उघडून पहाणारे कमी आणि त्यातलाच मीही एक.