Skip to main content

संस्कृती

रहाट

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 03/07/2016 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
झुंजूमुंजू झालं कोंबडं आरवलं बामनाला जाग आली सडा सारवन पंचारती धडाडून चूल पेटली घुगऱ्या पुरण पोळी पहिला निवद अंबाबाईला मग येडाय रुकड्याय माळावरचा म्हसोबा शेवटून बाभळीखालचा वेताळ खांद्यावर जानवं हातात परात नैवैद्याची रिकामी, उदबत्तीचा धूर सुगंधी केवडा रामप्रहरी, रांगोळीतला मोर आणि हळदीकुंकू उंबरठ्याशी, शेणाचे गोळे ताटलीभर निवद वळचणीला, उनउन लाप्शी प्रसादाला बामन देवळात गेला घंटानाद अखंड दुग्धाभिषेक साडी चोळी खण ओवाळणी बाकी निर्माल्य, कपाळाला अष्टगंध पवित्र, याखेपेस गणपती वाटणीचा? नंदीबैलावर डोळा चिल्लर खुर्दा देवीचा 'वार' जणू दिवाळी दसरा फूलात फूल जास्वंदाचं मोगरा चमेली शोधून सापडेना सिता

सांस्कृतिक महाराष्ट्र

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शुक्रवार, 01/07/2016 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे महाराष्ट्रात इसवी सन पूर्व 230 ते इसवी सन 225 पर्यंत सातवाहनांचे राज्य होते. त्यांनीच महाराष्ट्राची स्थापना केल्याचे ऐतिहासिक दाखले मिळतात. याच काळात साक्षरता संस्कृती व कला या क्षेत्रात चांगली प्रगती केल्याचे पुरातत्व पुरावे मिळतात. शैक्षणिक, धार्मिक व कलेच्या क्षेत्रात महाराष्ट्राची प्रगती झाली. अजिंठा येथील लेणी प्रसिध्द आहेच. वाकाटक राजवटीनंतर काही काळ कलाचुरी घराण्याचे राज्य होते. नंतर चालुक्य, राष्ट्रकुट आणि यादव व शिलाहारांचे राज्य होते. काही काळ बहामणी साम्राज्य सुध्दा. छत्रपती शिवाजींकडून एकसंध महाराष्ट्राचा उदय झाला.

स्त्रीभृणहत्या - खरे जबाबदार कोण?

लेखक स्वीट टॉकरीणबाई यांनी शुक्रवार, 24/06/2016 09:56 या दिवशी प्रकाशित केले.
स्त्रीभृणहत्या - खरे जबाबदार कोण? अय्या, हा कसला बावळट प्रश्न? उत्तर सरळ आहे. पति, कधी कधी स्वतः पत्नी, त्यांच्यावर दबाव आणणारे सासू सासरे आणि याचा फायदा उठवणारे डॉक्टर ! पण इतकं सरळ नाही ते. कारण ‘उत्तर’ आणि ‘समाधान’ यात फरक असतो. राजकीय पुढार्‍यांकडे आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं. समाधान मात्र नसतं. कारण समाधान होण्यासाठी खोलात जावं लागतं. वरवरचा विचार पुरत नाही. प्रत्येक जणच म्हणतो की "या हत्येत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सामील होणार्‍यांवर घणाचे घाव घातले पाहिजेत. त्याचबरोबर अशी परिस्थिती येणारच नाही यासाठी पावलं उचलली पाहिजेत." वगैरे.

योग दिवस २०१६

लेखक लाल टोपी यांनी मंगळवार, 21/06/2016 01:06 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या योग दिवसाच्या सर्वांना हार्दीक शुभेछा!! आपल्यापैकी अनेक जण भारतात किंवा भारताबाहेर आपापल्या शहरात योग दिवसात सामिल होणार असेलच! या धाग्यावर त्यांचे फोटो अनुभव नोंदऊन योग दिव साजरा करावा असे वाटते. सुरुवात माझापासूनच करतो.. सध्या योग प्रशिक्षक म्हणून वास्तव्य बगोटा कोलंबिया येथे आहे.

पॅरिस भ्रमंती: वैभवशाली प्रासाद, संग्रहालये आणि कलाकृती (भाग १: फॉन्तेनब्लो)

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 20/06/2016 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
. वरील चित्रः फोंतेनब्लो प्रासाद आणि संग्रहलय. संग्रहालये बघण्याची माझी आवड फार जुनी. म्हणजे अगदी वयाच्या पाचव्या -सहाव्या वर्षी सालारजंग म्युझियम बघितले, त्याची मनावर अमिट छाप पडली. पुढे शाळकरी वयात इंदुरातल्या म्युझियममध्ये जवळ जवळ रोजच जाऊ लागलो. (त्या काळातील आठवणी इथे वाचा) शिवाय मुंबईचे प्रिन्स ऑफ वेल्स अधून मधून बघायला मिळायचे.

सत्यवान्/सावित्री

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 20/06/2016 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
माधव न्याशनलाईझ ब्यांकेत कामाला होता... वडलोपार्जित ब्लॉक..वडील देवाघरी गेलेले होते.. घरात फक्त आई अन तोच राहायचा.. माधव चे लग्नाचे वय झालेच होते..१-२ मुली पण पाहिल्या होत्या पण त्याला पसंत नाही पडल्या... * दुपारच्या वेळी शेजारच्या जोशी काकू गप्पा मारायला आलेल्या होत्या.. गप्पा गप्पात जोशी काकूने सुचवले..म्हणाल्या की.."माझी दूरची साठे नावाची आते बहीण आहे तिची माधवी नावाची मुलगी लग्नाची आहे...चांगले लोक आहेत...मुलगी बी कॉम झाली असून आता कॉम्प्युटरचा कोर्स करत आहे..नाकी डोळी नीटस आहे..

अवघे विश्वचि माझे घर... हे कितपत खरं?

लेखक वडापाव यांनी शुक्रवार, 17/06/2016 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
आपण जन्माला कोणामुळे आणि कोणाच्या पोटी येऊ, कुठल्या वातावरणातल्या घरात वाढू, कोणत्या समाजात राहून लहानाचे मोठे होऊ, कसे निपजू आणि किती जगू या सगळ्यातल्या काही गोष्टी तरी आपल्या हातात नसतात. आपल्या हातात असत्या तर? या कल्पनेला रंगवताना आपण आपल्या आयुष्याच्या कुठल्या अवस्थेत आहोत आणि आपली मनस्थिती कशी आहे यानुसार रंगसंगतीत कायम फेरफार होत राहतात.