Skip to main content

संस्कृती

बदलाच्या गतिचे नवे नियम मांडणारा: 'न्युटन'

लेखक पुंबा यांनी शनिवार, 23/09/2017 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
भारत बदलतो आहे, सत्तर वर्षांच्या प्रवासात असंख्य खाचखळग्यांतून, काट्याकुट्यातून वाट काढताना, जुन्या समस्यांवर विजय मिळवत नव्या समस्यांना तोंड देताना सतत कात टाकून नविन रुपडे घेतोय. काही बदल इतके क्रांतीकारी की त्यांच्याशी जुळवून घ्यायलाच शक्तिचा अफाट व्यय होतो अन काही इतके धीमे की 'काही होतंच नाही' अशी निराशा व्हावी. कित्येक प्रामाणिक लोक व्यवस्थेला आव्हान देता देता थकून जाऊन परत व्यवस्थेचाच भाग होऊन राहतात अश्या वेळेला धीमी पण आश्वासक पावले टाकत काही शिलेदार मात्र आपल्या परीने लढत राहतात. न्युटन ही अश्याच एका शिलेदाराची कथा आहे.

स्वयंपाकातील आयुधं

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 22/09/2017 21:54 या दिवशी प्रकाशित केले.
खल आणि बत्ता करतात ठणाणा आम्हाला काहीतरी काम सांगाना  स्टोव्ह शेगडीला लागली घरघर ग्यास सिलेंडर आला घरोघर काड्याची पेटी हिरमसून बसली लायटरने माझी जागा पटकावली यांत्रिक युगाला झाली सुरवात जुन्या बुढयाना करुया बाद वीज नी यंत्रे रुसतात जेव्हा जुने ते सोने म्हणतात तेव्हा लहानपणीच हे बडबड गीत म्हणताना मजा यायची. तरीही त्यावेळच्या त्या स्वयंपाक घरातल्या आयुधांचे अनन्यसाधारण महत्व मान्य होतेच. मला अजूनही आठवत खास पाहुणे आले की माझी आई खास कॉफी करायची. त्यासाठी खल-बत्यातून मस्त वेलची कुटायची आणि खिसणीवर जायफळ खिसून ते त्या कॉफीच्या पाण्यात टाकायची. आमच्या लहानपणी सर्रास चहा-कॉफी मिळत नसे.

माझी पहिली अहीराणी कविता

लेखक RDK यांनी गुरुवार, 21/09/2017 00:50 या दिवशी प्रकाशित केले.
बठा चालना गयात ज्या वट्टावर बठी बठी आमि भयाण गप्पा मारुतं ज्या लाइंग न खांब खाले एक दुसरांनी टेस्ट लेउत जो वट्टा झिजाई मन्या साऱ्या सुट्या खपी जाऐल शेतं पण तो वट्टा खाली दिखस आते कारण बठा चालना जाऐल शेतं फोनवर कितलक बोलुत आमि ?, बीजी राहतस आणी बिलं बी येस फेसबुक वर बी कितलक chat करुत , बोलणं कयस पण चेहरा याद येस ऑनलाईन राहतस चोवीस तास, पण गावमा ऑफलाईन दीखेल शेत पण तो वट्टा खाली दिखस आते कारण बठा चालना जाऐल शेतं सावन जाई बठेल शे दुसरा गावमा, तर मह्याना अभ्यास चालू शे ननूनी MPSC नि तयारी , ते कुलदीपले चांगला जॉब शे मी बी शे आपला काममा , पण डोया गाववर लागेल शेत पण तो वट्टा
काव्यरस

उपवासाचे ढोंग

लेखक हेमंतकुमार यांनी बुधवार, 20/09/2017 08:16 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व प्राणीमात्रांना जगण्यासाठी अन्न खावे तर लागतेच, पण खाण्यासाठीच जगणारा मात्र माणूस हाच एकमेव प्राणी असावा ! आपल्या उठसूठ ‘चरण्याच्या’ प्रवृत्तीला थोडा तरी आळा बसावा या उद्देशाने उपवासाची संकल्पना मांडली गेली असावी. आठवड्यातून निदान एक दिवस तरी एक वेळचे भोजन न घेणे आणि दुसऱ्या वेळेस पचायला अत्यंत हलका व मित आहार घेणे हा अर्थ उपवास करण्यामागे अभिप्रेत आहे. आपल्यासाठी सतत राबणाऱ्या आपल्या पचनसंस्थेला अधूनमधून विश्रांती देणे हा त्यामागचा खरा हेतू आहे. ( या मुद्द्याबाबत पारंपरिक आरोग्यशास्त्रे आणि आधुनिक वैद्यक यांच्यात मतभेद आहेत असेही दिसून येते). परंतु वास्तव काय दिसते?

लव यू ज़िन्दगी: अदूचा तिसरा वाढदिवस!!!!

लेखक मार्गी यांनी सोमवार, 18/09/2017 00:32 या दिवशी प्रकाशित केले.
आज तू चक्क तीन वर्षांची झालीस! वाढदिवशी तू घातलेल्या पंखाप्रमाणे तुला आता खरोखर पंख फुटले आहेत! तुझा वाढदिवस तू खूप खूप एंजॉय केलास! दिवसभर 'हॅपी बर्थडे टू यू' म्हणत होतीस! गेल्या एका वर्षामध्ये तुझी झेप थक्क करणारी आहे! अलीकडे तर तू मोठ्या माणसांप्रमाणे बोलतेस! जवळ जवळ ऐकलेला प्रत्येक शब्द तुला लक्षात राहतो आणि नंतर तू अचानक तो शब्द असलेलं वाक्य बोलतेस! तुला इतके बारीक सारीक संदर्भ लक्षात राहतात! माणसं चांगले लक्षात राहतात! गेल्या वर्षभरातल्या अनेक आठवणी आहेत! अजूनही तू आरशासारखी नितळ आहेस. अजूनही तू आमचे तसेच लाड करतेस! समोर येणा-या सर्व गोष्टी तू आनंदाने स्वीकारतेस.

आठवणीतला घरचा मेवा -१

लेखक जेडी यांनी शनिवार, 16/09/2017 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
एकाने ऑफीसमध्ये फुटाणे घेऊन आला होता, चार वाजता खायला. ते विकत आणलेले नव्हते हे स्पष्ट दिसत होते . कोठून भाजून आणले रे ? मी विचारले. सासुरवाडीकडून आलेत , तो म्हणाला . अर्थातच मला पूर्वी कधीतरी आईने केलेल्या अगदी तशाच फुटण्याची आठवण आली . हरभरे, हळद , मीठ घालून रात्री आई हरभरे भिजवायची . सकाळी त्यातले पाणी काढून दुरडीत नितळत ठेवायची . मग थोडे सुकवून चार वाजता पिशवीत बांधून ते भट्टीत भाजायला द्यायची , कोणीच भट्टीत घेऊन जायला मिळाले नाही तर सरळ तव्यावर भाजून घ्यायची . डबाभर फुटाणे तयार , फुटण्याच्या बरोबरीने शेंगदाणे पण खारवले जायचे . आठवडी बाजारातून चिरमुरे आणलेले असायचे .

सोने : चकाकती प्रतिष्ठा !

लेखक हेमंतकुमार यांनी बुधवार, 13/09/2017 16:23 या दिवशी प्रकाशित केले.
सराफांच्या दुकानांमध्ये सोनेखरेदीसाठी झालेली झुंबड जर आपण पाहिली, तर क्षणभर ‘भारत हा गरीब आणि विकसनशील देश आहे’ या विधानावर विश्वास ठेवणे कठीण जाते. सोन्याचे वेड हे प्राचीन असून समाजातील सर्व स्तरांमध्ये कमीअधिक प्रमाणात आढळतेच. अर्थातच हे वेड स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. अलंकार परिधान केल्याने स्त्री- सौंदर्याला उठाव येतो हे खरे; पण ते अलंकार महागड्या सोन्याचेच हवेत या अट्टाहासातून अखिल स्त्रीजातीची दोन वर्गांमध्ये सरळसरळ विभागणी झालेली दिसते.

अत्तर

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 12/09/2017 01:10 या दिवशी प्रकाशित केले.
कपडे कितीही मळले, जुने झाले, रंग उडून गेला वीण उसवून गेली घड्या विस्कटून गेल्या तरी कधीतरी लावलेले मायेचे भरजरी अत्तर मंदपणे दरवळत राहते! . . . माणसं अशी अत्तर असती तर..! शिवकन्या

१/१/२१०२, स.न.वि.वि.

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 11/09/2017 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
बापरे ! काय धूळ पडली आहे या पेटीवर. सुमारे एक चौरस फूट आकारमान असलेली ही लोखंडी पेटी मागच्या शतकात कधी तरी या भिंतीत ठोकून बसवली होती. आता ती प्रचंड गंजली आहे आणि तिला बरीच भोकेही पडली आहेत. ती कुलूपबंद आहे खरी पण तिच्या किल्लीने ती उघडेल की नाही याची शंका आहे. एके काळी तिच्यावर तिच्या घरमालकाचे नाव रंगवलेले होते. आता ते नाव वाचण्यालायक राहिलेले नाही. कित्येक महिने घरातले कोणी तिला उघडून बघायच्या फंदात सुद्धा पडत नाही. ही पेटी एखाद्या नव्वदी उलटलेल्या जराजर्जर म्हाताऱ्याप्रमाणे तिचे उरलेसुरले आयुष्य कंठीत आहे.

दिवाळी अंक २०१७ - दृकश्राव्य विभाग - आवाहन

लेखक गोष्ट तशी छोटी... यांनी सोमवार, 11/09/2017 06:30 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो! "गोष्ट तशी छोटी.." आणि मिपा दिवाळी अंकाचे काही तरी ऋणानुबंध असले पाहिजेत. मागच्या वर्षीच्या दिवाळी अंकात "गोष्ट.."ची घोषणा झाली होती. यंदा सुद्धा दिवाळी अंकासाठी सासं आणि "गोष्ट ..." टीम पुन्हा एकत्र आले आहेत. आजकालच्या डिजिटल युगात लेखनासोबतच व्हिडीओ ब्लॉगिंग आणि पॉडकास्ट सारखे उपक्रम अधिकाधिक लोकप्रिय होत चालले आहेत. मिपानेही मागच्या दिवाळीत आपले यू ट्युब चॅनल सुरू करून नव्या अभिव्यक्तीची दारे उघडली होती. यंदाच्या दिवाळी अंकात आपण एक संपूर्ण विभाग दृकश्राव्य माध्यमाकरिता राखून ठेवत आहोत.