Skip to main content

संस्कृती

स्त्री पुरूष मिश्र व्यवहार व पडदा पध्दतीचे परिणाम

लेखक माहितगार यांनी सोमवार, 14/08/2017 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे कर्ते, श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी जवळपास १०० वर्षापुर्वी An Essay on Indian Economics, and Hindu Law and the Methods and Principles of the Historical Study Thereof. या विषयांवर लेखन केले The History of Caste in India या विषयावर Phd केली. स्त्री सहभागाचा समाज व्यवहारात अभाव आणि जाती व्यवस्थेचा पगडा यांचा आर्थीक विकासावर होणार्‍या परिणामांकडे त्यांनी त्यांच्या ज्ञानकोशातील लेखातून दिशा निर्देश केलेला दिसून येतो.

माझ्या मनातला गणपती

लेखक भटकीभिंगरी यांनी रविवार, 13/08/2017 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मनातला गणपती मूर्ती असावी धातूची! विसर्जित नाही करायची!! विसर्जनाचे शास्त्र करून! ठेवून द्यावी तिला जपून!! दुर्वा फुले चार वाहून! हात जोडा मनापासून!! भारंभार फुलांनी झाकू नका! निर्माल्य कचरा करू नका!! थर्मॉकोलची नको आरास! पर्यावरणाचा होतो ह्रास!! घरच्या घेऊन वस्तू चार! मखर छानसे करा तयार!! नको विजेची प्रखर अती! रोषणाई ती झगमगती!! शोभा न्यारी ज्योतीची! निरांजनाची समईची!! गोड सुस्वर गा आरती! आरडा ओरडा नको अती!! स्पष्ट शब्द उच्चार करा! बाप्पावरती ध्यान धरा!! सण साजरा करूया! गणपती बाप्पा मोरया!! रचना ....

भेट हवी की भेटवस्तू ?

लेखक हेमंतकुमार यांनी मंगळवार, 01/08/2017 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
सुमारे ४० वर्षांपूर्वीचे लग्नसमारंभ आठवतात का पाहा. लग्न लागल्यानंतर वधूवर मंचावर बसत आणि मग लोक त्याना भेटायला येत. तेव्हा लग्नाला आलेला प्रत्येक पाहुणा हा त्यांच्यासाठी काहीतरी भेटवस्तू घेऊनच येई. वधू आणि वराच्या बाजूस प्रत्येकी एक जवळचा माणूस वही घेऊन बसलेला असे. पाहुण्याने वर किंवा वधूच्या हातात ती वस्तू दिल्यावर ते ती बाजूस बसलेल्या माणसाकडे देत. मग तो त्या वस्तूची व्यवस्थित नोंद (कुणी दिली यासह) त्याच्या वहीत करत असे. एक प्रकारे हा माणूस वधू अथवा वरपक्षाचा ‘ रोखापाल’ च असे ! कार्यक्रम संपेपर्यंत तो हे काम चोख बजावी आणि अखेरीस तो सर्व ‘हिशेब’ ज्या त्या यजमानाच्या स्वाधीन करे.

सह्याद्री आणि गोपाळांची संस्कृती

लेखक हेमंत ववले यांनी सोमवार, 31/07/2017 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या सह्याद्रीच्या भटकंतीमध्ये अनेकविध अनुभव घेता आले. सह्याद्रीची प्राचीनता आणि जैवविविधता सांप्रत अधिक चर्चिली जाते. सोबतच सह्याद्रीतील शिवाजी राजांचे अभेद्य किल्ले, द-या, डोंगर, विविध प्राचीन आणि आधुनिक घाट सर्वांनाच भुरळ पाडत असतात. सह्याद्रीने चालुक्य, यादव, माऊली, तुकाराम महाराज, शिवाजी महाराज, या सर्वांनाच मोहीत केलेले दिसते. सह्याद्रीचे शौर्य अभेद्य किल्ल्यांच्या रुपात आजही विद्यमान आहे. प्रत्येक किल्ला त्याच्या अवतीभवतीचे गावे, गावागावातील माणसे, लढवय्ये, मावळे, हवालदार, भालदार, धारकरी, हारकरी, किल्यावरच्या बाजारपेठा.

सह्याद्रीतल्या अपघातांची शेल्फी

लेखक विखि यांनी गुरुवार, 27/07/2017 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या जे आपल्या सह्याद्री मध्ये अपघातांच सत्र सुरू आहे, त्यावर काही तरी बोलावं आणि त्या संदर्भात काही चर्चा करावी या हेतूने हा लिहायचा एक प्रयत्न. लिखाण माझा पिंड पण नाही. पण सध्या जे काही विचित्र अपघात घडतायत त्या मध्ये विनाकारण माझ्या सह्याद्री बद्दल ज्या काही शंका,भीती पसरवली जात आहे तो दूर करण्याच्या साठी हा सगळा लेखनाचा प्रपंच. हो जाणीवपूर्वक मी 'माझा सह्याद्री' म्हणतोय कारण त्यानेच मला घडवलं आहे असा माझा ठाम विश्वास आहे. मला तो गुरुस्थानीच आहे. मी त्याला माझाच समजतो आणि त्याने देखील कधी मला परकं समजलेलं नाही.

श्रीगणेश लेखमाला २०१७!

लेखक साहित्य संपादक यांनी गुरुवार, 27/07/2017 00:20 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो, म्हणता म्हणता बाप्पांचे आगमन अवघ्या एका महिन्यावर येऊन धडकलंय. त्यांच्या स्वागतासाठी सजावटीचा थाटमाट, आरत्यांचा दणदणाट, मोदकांची रास याचबरोबर अजुन एक गोष्ट असतेच ती म्हणजे आपली श्रीगणेश लेखमाला!!! यावर्षी श्रीगणेश लेखमाला सुरू होतेय अर्थातच गणेश चतुर्थीच्या दिवशी २५ ऑगस्टला. या लेखमालेत नेहमीप्रमाणेच दर्जेदार लेखांची रेलचेल असणार आहे. तर मिपाकरहो बाप्पाचे नाव घ्या आणि येऊ द्या तुमच्याकडून एक से एक उत्तम लेख. आम्ही वाट पाहतोय या मेजवानीची. केवळ 'मी' ह्या विषयावर माजलेल्या तुंबळ रणाच्या पार्श्वभुमीला देऊ आता ऑफिशिअल स्वरुप.

आमचं पानीपत- द बिगीनिंग.

लेखक भीमराव यांनी शुक्रवार, 21/07/2017 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या गोष्टीची सुरुवात होते ती एका चकाचक मल्टीन्याशनल कंपनी पासुन, अँपरेंटीस अँक्ट च्या कृपेने आमचा येथे प्रवेश झाला हे सुरुवातीलाच सांगुन टाकलेलं बरं, आमचं आव्या मी अन तात्या या सर्वांच्या एका असामान्य संघर्षाची ही कथा, कंपनी मधेच आमची ओळख झालेली, तात्या व मी एकाच डिपार्टमेंट साठी सिलेक्ट झालो होतो, तर आव्याची तात्यासोबत कँटीन मधे ओळख झाली होती, आमचं आव्या सांगलीच्या कुठल्याशा कॉलेज मधुन यांत्रिक अभियंता झालेलं, मी सोलापुरातुन विद्युत अभियांत्रीकी शिकुन आलेलो, आणि आमच्यामधले सर्वात अँक्टीव, मोस्ट हँडसम असे तात्याबा पुण्यात शिकलेले होते, ग्रामीण भागतल्या कॉलेजात ईंजिनेरींग शिकणाऱ्या तमाम कार्

(why is there nothing rather than something ???????)

लेखक मुक्त विहारि यांनी शुक्रवार, 30/06/2017 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

आगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ८)

लेखक Anand More यांनी शुक्रवार, 23/06/2017 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
निर्गमन केल्यानंतर नव्या भूप्रदेशात जर व्यक्तीच्या इच्छा आकांक्षांना हवे तसे वातावरण मिळाले तर व्यक्ती तिथेच स्थायिक होणे स्वाभाविक असते. मातृभू / पितृभू यांची ओढ असली तरी बसलेले बस्तान मोडून अश्या व्यक्तींनी केवळ मातृभूमीप्रती प्रेमापोटी किंवा कर्तव्यापोटी परत यावे अशी अपेक्षा धरणे म्हणजे त्यांचे माणूसपण नाकारण्यासारखे आहे.