Skip to main content

संस्कृती

वारी हो वारी

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शुक्रवार, 23/06/2017 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
होता आषाढी कृष्णमेघांची दाटी मन केवळ विठूसाठी आक्रंदे । चालती पाऊले दिशा पंढरीची वारकरी आम्ही नाहू आनंदे । घोष एक गजर एक एक नाम जीव पिसावला या मधुर नादे । ना जुमानू आता ऊन पावसासी मार्ग क्रमु पांडुरंगाच्या आशिर्वादे । पडता दिठीस चरण ते सावळे जैसे भ्रमर प्राशी तो मकरंदे । वारीस न जाताही मनाने वारीमय हळवा अवघा महाराष्ट्र विठ्ठल छंदे ।

निंदा एक धंदा

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 19/06/2017 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षांपूर्वी एका दिवाळी अंकात भारतातील एका आघाडीच्या उद्योगपतींचा परिचय वाचण्यात आला. हे गृहस्थ त्या आधीच्या वर्षी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून जाहीर झाले होते. त्यांच्यावरील या लेखात त्यांच्या साध्या राहणीसंबंधीचे काही उल्लेख होते. ते एवढे धनाढ्य असूनही विमानप्रवास मात्र नेहेमी ‘इकॉनॉमी क्लास’ नेच करतात, त्यांच्या घरी आणि कंपनीत वीज व पाणी यांचा काटकसरीने वापर होण्याबाबत ते खूप काटेकोर असतात, इत्यादी. हे सर्व वाचून मी प्रभावित झालो आणि माझ्या एका परिचिताला हे सगळे कौतुकाने सांगितले. त्यावर त्याची प्रतिक्रिया मला काहीशी खचवणारी होती.

एक बाजू अशीही!

लेखक ज्योति अळवणी यांनी रविवार, 11/06/2017 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी मला whatsapp वर एक लिंक आली होती. विषय होता'A LEGAL RAPIST'. एका विवाहित स्त्रीच्या मनातले विचार मांडले आहेत या लिंकमध्ये.  नवरा कामावर असतो आणि ती घरी. तो घरासाठी कमावतो आहे आणि ती घर सांभाळते आहे. 'तो कमावतो आणि मी घराचे खर्च संभाळते', 'मी नोकरी करत नाही; पण आम्ही दोघेही कंपनीच चालवतो. तो बाहेर काम करून आणि मी घरी काम करून.' अशा काही वाक्यांमधून तिच्या मनात असलेल तिच स्वतंत्र आस्तित्व कुठेतरी जाणवत. याचा अर्थ ती एक सुशिक्षित स्त्री आहे. खोल कुठेतरी तिच्या मनात तिने जपलेल स्वत्रांत्य जाणवत. पण या विडीओ मध्ये पुढे तिनेच  एक घटना सांगितली आहे.

चिरंजीव रॉक्स

लेखक इनिगोय यांनी शनिवार, 10/06/2017 22:59 या दिवशी प्रकाशित केले.
संवाद (१) “If you wish to make an apple pie from scratch, you must first invent the universe.” - Carl Sagan ९ – ही मस्त कोट आहे, मला आवडली. ३७ – तुला कळली? ९ – हो. म्हणजे तुम्हाला जर अगदी पहिल्यापासून ऍपल पाय बनवायचा असेल, तर आधी झाड लावावं लागणार. त्याच्यासाठी पृथ्वी बनवावी लागणार. त्यासाठी बिग बँग झाला पाहिजे म्हणजे युनिव्हर्स तयार होईल. ३७ – (!!) कार्ल सगान?? संवाद (२) ९ – हे काय गं, देवाची पूजा नाही केलीस? ३७ – नाही रे बाबा, मला पूजा वगैरे नाही जमत. माझा त्यावर विश्वास नाहीये.

पैलवान-२

लेखक चांदणे संदीप यांनी शुक्रवार, 02/06/2017 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
पैलवान-१ "ह्ये बघा, आत्ता वाजलेत साडेआठ. दत्त्याच्या म्हाताऱ्याची शेतातन गाठ घेऊन दहा वाजेपर्यंत हालूया. दुपारची यस्टी गाटली की संध्याकाळच्याला सोमनाथाच्या वाडीत! रात्रभर खाऊ-पिऊ, उद्या त्यांच्या गावातबी कुस्त्या आसत्यात. त्या बघू, तिकडून दुपारच्याला बसू...

'संगीतज्ञानी इळैयाराजा'

लेखक उपयोजक यांनी शुक्रवार, 02/06/2017 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
ते ट्रिनीटी कॉलेज ऑफ म्युझिक, लंडन चे सुवर्ण पदक विजेते आहेत. BBC ने घेतलेल्या सर्वेक्षणात ते भारतातील सर्वोत्कृष्ट संगीतकार ठरले.त्यांच्या 'दलपति' या सिनेमातलं 'रक्कम्मा कय्य थट्टू' हे जगातलं ૪ थ्या क्रमांकाचं सार्वकालीन पसंती दिलेलं गीत! ६००० पेक्षा अधिक गाणी त्यांनी संगीतबध्द केली.१००० पेक्षा अधिक सिनेमांना त्यांनी संगीत दिलं.एस.जानकी,के.जे.येसुदास,चित्रा,एस पी बालसुब्रह्मण्यम् हे त्यांचे आवडते गायक.यांच्यासोबत सर्वाधिक गाणी त्यांनी संगीतबध्द केली.सर्वाधिक गाणी तमिळ भाषेत! तमिळ लोकसंगीत यांनी जागतिक पातळीवर नेलं.पारंपारीक तमिळ वाद्यांबरोबरच इलेक्ट्रॉनिक वाद्येही फार सुंदर पध्दती

ऊन

लेखक शिव कन्या यांनी गुरुवार, 01/06/2017 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
दिवसाचा ताप संपला कि ऊन उदास होऊन कोपऱ्यात एकटे बसते. आपण कुणासाठी सावली झालो नाही म्हणून हुरहुरते, हळहळते. अंधारात गडप होऊन पाण्यापलीकडचे मृगजळ शोधू लागते. -शिवकन्या
काव्यरस

आगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ७)

लेखक Anand More यांनी बुधवार, 31/05/2017 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
आगमन संकल्पना समजायला थोडी गुंतागुंतीची आणि कठीण आहे . कारण आगमनात येणारा विचार एक असतो तर त्याला आपापल्या मगदुराप्रमाणे आणि स्वार्थबुद्धीने प्रतिसाद देणारे प्रस्थापित विचार अनेक असतात. त्यामुळे समाजातील वेगवेगळ्या घटकांकडून एकाच वेळी आगमनाचे स्वागत आणि विरोध चालू असतो. आणि हे सर्व प्रकारचे प्रतिसाद, त्यांच्यामागील कार्यकारणभाव समजून घेणे एका व्यक्तीच्या प्रज्ञेला सहजशक्य नसते. त्यातुलनेत निर्गमन संकल्पना समजायला थोडी सोपी आहे. कारण निर्गमन विचारांचे होत नाही तर व्यक्तीचे होते. त्यामुळे निर्गमनातील अनुभव हे व्यक्तिगत स्वरूपाचे असतात.

माहेरचं 'माणूस'

लेखक भारी समर्थ यांनी रविवार, 28/05/2017 19:17 या दिवशी प्रकाशित केले.
"आगं आक्का, खूप कामं आहेत गं ऑफिसात. दोघंजण सुट्टीवर आहेत." जनक काकुळतीला येऊन आक्काची मनधरणी करत होता. "जनु, कुणी नको सोबत. पण तेवढं सुरमंडीच्या गाडीत बसवून दे बाबा." "तिकडं तुझं कोण करणारे का काही? तो शशी स्वतःच्या संसारात नरडीपर्यंत बुडालाय. कधी साधा फोन नाय का हालहवाल विचारायची सवड नाय." "हं" "काल त्याचा फोन काय आला अन् लगीच तुला घाई झाली त्याला भेटायची. मला तर कधी तोंडदेखलंबी बोलत नाय की गावाकडं ये म्हणून." "काय होतय मग. मी काय झाकपाक घिऊन निघाले काय माझा? म्हातारी राहील घराच्या सांदीत दोन दिवस. परत येईन माघारी माझी मीच. काय भार नाय व्हायचा शशीला माझा." "बर ठीकाय.

पैलवान-१

लेखक चांदणे संदीप यांनी शुक्रवार, 26/05/2017 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
"मोप.... मोप... मोप पटांगण व्हतं राव!" शंकऱ्या, विनोद आणि रामाचे ग्लास धरलेले हात तोंडाशी जाईना, पुढचं ऐकण्यासाठी चकणा चावायचा पण थांबवला त्या तिघांनी. "....तरीबी पब्लिक कुस्तीच्या रिंगणाजवळ एवढ दाटीवाटीनं बसल्यालं की एकाला ढकाल्ला असता तरी वळीन सगळी सांडली असती. कुस्तीच आशी आजाब लावल्याली! गावबी आजाबच म्हणायच! म्याबी लका पैलवान हाय, पण आपलीबी छाती झाली नस्ती त्या डोंगराच्या बगलत मान द्यायची. ह्ये मोठ्ठा तगडा राक्षिसावनी गडी आन दुसरं कोनतरी फाळकं होतं. पर अर्धा तास उलाटला तरी त्यो चिपाड काय पडना गड्या! त्या ढोल्यानं कुस्तीतले आसत्याल नसत्याल तेवढे डाव लावले पण ह्यो दुसरा काय दाद दिना!