Skip to main content

संस्कृती

काल: क्रीडति (भाग १) - आठवड्याचे सात दिवस.

लेखक अरविंद कोल्हटकर यांनी गुरुवार, 02/11/2017 04:23 या दिवशी प्रकाशित केले.
काल: क्रीडति (भाग १) - आठवड्याचे सात दिवस. आठवड्याच्या सात दिवसांची व्यवस्था आहे तशी का आहे ह्याचा विचार करायला कोणी कधी थांबतो काय? रविवारनंतर सोमवार, त्यानंतर मंगळवार इत्यादि सात दिवसांच्या परंपरेचे रहाटगाडगे आपल्या विचारांचा इतका अविभाज्य भाग झाले आहे की आहे ते तसे का आहे हा विचारण्यायोग्य प्रश्न आहे हेहि आपणास सुचत नाही. आठवड्यात दिवस सात का, रविवारनंतर सोमवार यावा, सोमवारनंतर मंगळवार यावा ही व्यवस्था कोणी, कधी आणि कोठे निर्माण केली असे प्रश्न विचार केल्यास निर्माण होतात. ह्या प्रश्नांची उत्तरे, मला माहीत आहेत तशी, देण्याचा प्रयत्न ह्या लेखामध्ये केला आहे.

...मी दोन काटं खाल्ल्यात कळकीच

लेखक हेमंत ववले यांनी बुधवार, 01/11/2017 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
“काही तरीच बरका ! तुमच वय ९० वर्षे असणे शक्यच नाही”, रामा धनगराला मध्येच थांबवत मी जरा मिश्किलपणे म्हंटले. त्यावर रामा धनगर थोडा थबकला. आता त्याच्या पुढे प्रश्न होता की कस काय पटवुन द्यायचे की त्याचे वय ९० ची आसपासच आहे असे. पश्चिमघाटाच्या घाटमाथ्यावर भोर्डी गावात आम्ही दोन वर्षापुर्वी बांबु(मेस जातीचा) ची लागवड केली. रविवारी पर्यटकांची पुण्यात रवानगी केल्यावर मी आणि सुनिल सिंगापुर रोड कडे फेरफटका मारुन, बांबुंची वाढ कशी आहे ते पाहण्यासाठी आमच्या जागेत गेलो. सगळ्या शिवारात फेरफटका मारुन झाला. वाटेने पुन्हा चढ चढुन सिंगापुर रोड ला येण्यासाठी थोडी चढण होती. त्यामुळे आमचा वेग कमी थोडा मंदावला.

रुद्राध्याय एक मनन.

लेखक अरविंद कोल्हटकर यांनी मंगळवार, 24/10/2017 08:19 या दिवशी प्रकाशित केले.
रुद्राध्याय ह्या प्रसिद्ध सूक्ताचे नाव बहुतेकांनी ऐकलेले असते कारण शिवभक्तांचे ते एक नेहमी आवर्तन केले जाणारे सूक्त आहे. मी स्वत: जरी शिवभक्त - किंबहुना कोणत्याच देवाचा भक्त - नसलो तरी ह्या सूक्ताचे स्वच्छ उच्चारांमध्ये आणि आघातांसह केले जाणारे पठन मला ऐकायला फार आवडते. (जालावर अनेक ठिकाणी हे ऐकायला सापडते. त्यासाठी माझे आवडते संस्थळ हे आहे. हे पठन प्रामुख्याने ’नमक’ आणि ’चमक’ अशा दोन भागांमध्ये विभागले आहे. नमकामध्ये ’नम:’ ह्या शब्दाच्या आणि चमकामध्ये ’च मे’ ह्या शब्दांच्या वारंवार आणि लयबद्ध पुनरावृत्तीमुळे ही सुश्राव्यता निर्माण होते.

माणसातील तील निसर्ग जागा होईल का कधी?

लेखक हेमंत ववले यांनी सोमवार, 23/10/2017 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवार रविवार नेहमीप्रमाणे कॅम्पिंग ट्रिप च्या नियोजनासाठी वेल्ह्याला जाणे झाले. अगदी अचानक ठरल्यामुळे एकट्यावरच सगळी जबाबदारी आली. एकटाच असल्यामुळे दुचाकी वर जाणेच पसंत केले. पुणे बेंगलोर महामार्ग सोडुन वेल्ह्याकडे निघालो. तस पाहता चेलाडी-वेल्हे-केळद(-महाड) हा देखील राज्य महामार्गच आहे. रस्त्यावर गाड्यांची वर्दळ होतीच. दुचाकी असल्याने वेग मर्यादीत होता. त्यातच आपल्याकडे रात्रीच्या वेळी वाहने चालवताना समोरच्या गाडीच्या हेडलाईट चा झोत डोळ्यावर आल्याने डोळे दिपुन जात होते. त्यातच हेल्मेट घातले होते, त्यामुळे रस्त्यावर किंवा आजुबाजुला फारसे पाहता येत नव्हते किंवा दिसत ही नव्हते.

कागदाचे झाड

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 21/10/2017 08:59 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय जिब्रान खलील, माझ्या लाडक्या मुला, कसा आहेस? देवाने तुला आता भरपूर कागद दिले असतील. पण आता तुला लिहायची इच्छा नसेल, कि अजूनही आहे? माहित नाही. आज तुला पत्र लिहावेसे फार फार वाटत आहे. काल रात्रभर तुझी आठवण येत राहिली, येतच राहिली. तू छोटासा. अरेबिक शब्द, वाक्यं लिहायचा छंद तुला. आईला म्हणालास, ‘आई, मला कागद दे ना आणून! मला लिहायचेय!’ तिने आजूबाजूला पाहिले. घरावर जप्ती येऊन ते दुसऱ्याच्या ताब्यात गेलेले. नवरा तुरुंगात. पदरात छोटी मुले.धर्माची बंधने. बाहेर अंदाधुंदी. छोटीमोठी कामे करून कशीबशी हातातोंडाला गाठ घालीत असे. तिने एकवार तुझ्याकडे असे पाहिले....

मोरोपंतांची १०८ रामायणे

लेखक अरविंद कोल्हटकर यांनी सोमवार, 16/10/2017 20:32 या दिवशी प्रकाशित केले.
(माझा हा पुढील लेख ’ऐसीअक्षरे’मध्ये पूर्वी प्रकाशित झाला आहे.) पंडितकवि मोरोपंत हे व्यवसायाने पुराणिक. बारामतीतील प्रसिद्ध सावकार आणि पेशव्यांचे संबंधी बाबूजी नाईक ह्यांच्या आश्रयाने ते बारामतीला आले आणि तेथेच प्रवचने-कीर्तने करून त्यांची उपजीविका झाली. रामभक्त असलेल्या मोरोपंतांचे शब्दसंपदेवर कमालीचे प्रभुत्व होते. हत्तीने शुंडादंडावर पुष्पमाला खेळवावी तितक्या सहजतेने मोरोपंत भाषेशी खेळतात असे त्यांच्या बाबतीत म्हणले गेले आहे. त्याचप्रमाणे कविता रचण्याचेहि मोठे कसब त्यांच्यामध्ये होते.

फुलांची फुल स्टोरी...

लेखक हेमंत ववले यांनी शुक्रवार, 13/10/2017 18:29 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळी जवळ येत आहे. दिवाळीमध्ये धन्वंतरी पुजनामध्ये खाली मंत्र म्हंणण्याचा प्रघात आपल्याकडे आहे. श्रीमत भागवतामध्ये (३/१५/१९) मध्ये सदर श्लोक पहायवयास मिळतो. सेवंतिका बकुल चंपक पाटलाब्जै पुन्नाग जाती करवीर रसाल पुष्पै:| बिल्वप्रवाल तुलसी दल मालतीभिस्त्वां पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद यात अनेकविध फुले तसेच वनस्पती, वृक्षांचा उल्लेख येतो. व या व अशा प्रकारच्या फुलांच्या समर्पणाने जगदीश्वर प्रसन्न (प्रसन्न म्हणजे आनंदीत) होतो. अशा आशयाचा हा श्लोक आहे. याचा अर्थ फुले समर्पण भाव जागा करु शकतात असा होतो. लहान मुलांच्या निरागस, निर्लोभ स्वभावाला अनेकदा आपण फुलांची उपमा देतो.

ऑनलाईन मराठी क्रियापद रूपावली : मराठी भाषा शिकणाऱ्यांसाठी अजून एक सुविधा

लेखक कौशिक लेले यांनी शुक्रवार, 13/10/2017 01:33 या दिवशी प्रकाशित केले.
अमराठी लोकांना ऑनलाइन मराठी शिकवण्याच्या उपक्रमाबद्दल मी पूर्वी मिपावर सांगितले होते. मिपा लेख १ मिपा लेख २ त्याच अनुषंगाने माझ्या नवीन कामाची ओळख मिपाकरांना करून देण्याची माझी इच्छा आहे. २ ऑक्टोबर २०१७ रोजी मराठी भाषा शिकणाऱ्यांसाठी अजून एक सुविधा मी आजपासून सुरू केली आहे- "क्रियापद रूपावली". अर्थात एका क्रियापदाची वेगवेगळ्या काळातली, वेगवेगळ्या सर्वनामांसाठीची रूपे किंवा तसेच वेगवेगळ्या वाक्प्रचारांतली रूपे दाखवणारे संकेतस्थळ.

दिमाग का दही (शतशब्दकथा)

लेखक चांदणे संदीप यांनी गुरुवार, 28/09/2017 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
ऑफिसचा पहिला दिवस. मस्तपैकी लवकर उठलो...अंघोळ वगैरे आटपून कपड्यांना इस्त्री केली...मग घातले! फॉर्मल शर्ट... इन केला. नवा चेरीचा डबा फोडून बुटपॉलिश उरकलं. सकाळी ऑफिसात पायधूळ झटकणारा पहिलाच एम्प्लॉयी. कुठे बसायचं माहित नसल्याने रिसेप्शनला सोफ्यावर रेलून मॅगझीन चाळत बसलो. ऑफिसबॉयने इंटरव्हयूला पाहिलेलं मला.

प्रिय नर्मदेस

लेखक शिव कन्या यांनी रविवार, 24/09/2017 07:28 या दिवशी प्रकाशित केले.
( आज सरिता दिन. त्या निमित्त.....) प्रिय नर्मदेस, कारण काहीही असो, माणूस अनिकेत होतो तेव्हा पाण्यापाशी पोहचतो. मी तुझ्यापाशी पोहचले. अजून ती पहाट आठवते. मध्यरात्री कधीतरी मराठी मुलुख मागे पडला. दुसरा मुलुख लागला हे एसी गाडीतही कसं कळतं? पण कळतं. माणसं निराळी भासू लागली. हळूहळू अनोळखी भाषा कानावर पडू लागली. लक्ष देऊन ऐकलं कि कळतेय असं वाटायचं. पण थकून गेले. किती वेळ कान ताणणार? उन्हाळ्यातील पहाट म्हणजे तशी सकाळच. एकदम गाडीचा आवाज बदलला. कुणी म्हणालं, ‘नर्मदाजी’. मी फट्कन खिडकीवरचा जाड पडदा बाजूला सारला. बाहेर पाहिलं ....... गाडी तुझ्यावरच्या एका अजस्त्र पुलावर उभी होती. टोल भरायला.