Skip to main content

संस्कृती

विश्व स्वधर्मसूर्ये पाहो

लेखक नरेंद्र गोळे यांनी बुधवार, 21/08/2013 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
खूप खूप वर्षांपूर्वी मानवी जीवन हे पृथ्वीच्या सीमित भूभागावरच स्थिरावलेले होते. उपजीविकेच्या शोधात मानवाने मग नवनव्या भूप्रदेशांचा शोध घेतला. कालांतराने सबंध पृथ्वीचा शोध लागला. आज पृथ्वीवरचे बहुतेक सर्व भूभाग, त्यांवरील चराचरांसह ज्ञात झालेले आहेत. ज्याकाळी मानवी जीवन हे पृथ्वीच्या सीमित भूभागावरच स्थिरावलेले होते, तेव्हा आपले पूर्वज उत्तरेला असलेल्या हिमालय पर्वतापासून तर दक्षिणेला असलेल्या हिंदी महासागरापर्यंतच पृथ्वीचा सर्व विस्तार असल्याचे मानत असत.

यात्रा जत्रा काल आणि आज

लेखक भ ट क्या खे ड वा ला यांनी सोमवार, 19/08/2013 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
जम्मू मधील सैन्य छावणीत (Caluchak) एक रात्र राहण्याचा योग २००२ साली आला होता. तेथील सर्व धर्म पार्थना स्थळ विशेष लक्षात राहिले ते तेथे भेटलेल्या एका धर्मगुरू मुळे. आज उत्तराखंड मधील आपत्ती नंतर त्यांची पुन्हा आठवण झाली. आमच्या अमरनाथ यात्रेला शुभेच्या देताना त्यांनी जे प्रबोधन केले तसे प्रबोधन भारतातील कोणी धर्मगुरू करेल का? काय सांगितले होते त्या अवलियाने ? भारत हा यात्रेकरूंचा देश आहे , प्रसार माध्यमे जेव्हा उपलब्ध नव्हती तेव्हा या यात्रांना खूप महत्व होते. या यात्रा म्हणजे समाज जोडण्याचे एक महत्वाचे साधन होते. संत महंतांनी संपूर्ण देशाची परिक्रमा करून का देश जोडला होता.

गंधांच्या स्मृती स्मृतींचे गंध.

लेखक भ ट क्या खे ड वा ला यांनी सोमवार, 19/08/2013 01:05 या दिवशी प्रकाशित केले.
भाऊसाहेब पाटणकरांच्या शायरीचे व. पु. नी केलेले "जिंदादिल' रसग्रहण ऐकत पडलो होतो. "आहे स्मृतींचा गंध येथे....... असा शेर ऐकता ऐकता डोळा लागला. जाग आल्यावर स्मृतींचा गंध ,गंधांच्या स्मृती असे उलट सुलट काहीतरी आठवू लागले.आणि अचानक अनेक गंधांच्या आठवणी जाग्या झाल्या. अगदी पहिला स्मृती गंध आला तो मधुमालतीचा. अगदी लहानपणीच या फुलाशी परिचय झाला. खेडच्या लक्ष्मी नारायण मंदिरा भोवती बागडण्यात सारे लहानपण गेले. घराकडून देवळाकडे जाण्याच्या वाटेवर मार्च एप्रिल महिन्यात मधुमालती बहरलेली असायची. राम नवमीचे दिवस आले कि दिवस रात्र देवळातच असायचो. जाता येता मधुमालतीचा सुवास यायचा.

जोवरी हे जग, जोवरी भाषण - १

लेखक तिरकीट यांनी शनिवार, 17/08/2013 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार .. मिपावर माझे हे पहीलेच लिखाण आहे. कुठला विषय घ्यावा हा विचार करताना असं मनात होतं की मिपावर आत्तापर्यंत माझ्या वाचनात न आलेला विषय घ्यावा. आपल्याकडे अश्या अनेक गोष्टी वारसा असल्यासारख्या आल्या आहेत की ज्या नवीन पिढीला वेगळ्या शिकवाव्या लागत नाहीत, घरातील थोरा-मोठ्यांचे बघून, ऐकून त्या लहान मुलांपर्यंत पोहोचतात..मग त्यामध्ये रामरक्षा, अथर्वशीर्ष, भीमरूपी यांसारखी घरोघरी म्हटली जाणारी स्तोत्रं असोत किंवा क्रिकेट सारखे खेळ असोत. याचसारखी अजून १ गोष्ट बघायला मिळते ती म्हणजे 'गीतरामायण'...

मिले सुर मेरा तुम्हारा...

लेखक अनुप ढेरे यांनी गुरुवार, 15/08/2013 00:19 या दिवशी प्रकाशित केले.
नव्वदीच्या दशकात दूरदर्शनवर लागणारं हे गाणं माहित नसणारा माणूस विरळाच. अशोक पत्की आणि लुइस बँक्स यांनी संगीतबद्ध केलेलं आणि जाहिरात क्षेत्रातलं प्रसिद्ध नाव, पियुश पांडे यांनी लिहिलेलं हे गाणं आजही अनेकांच्या मनात घर करून आहे. हे गाणं 'मेरे देश की धरती' सारखं स्फुरण चढवणारं नाहिये. किंवा 'ए मेरे वतन के लोगों' सारख डोळ्यात पाणी आणणारं पण नाहिये. हे गाणं मनाला काहिशी हुरहुर लावणारं आहे. भीमसेन जोशी यांच्यापासून सुरु होणारं हे गाणं आपल्याला ८-९ भाषा वापरून, अनेक अभिनेते, गायक-गायिका, खेळाडू, लेखक यांच्या मार्फत बहुतांश भारताची सफर घडवुन आणते.

सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग ३: अंतिम)

लेखक चित्रगुप्त यांनी बुधवार, 07/08/2013 00:06 या दिवशी प्रकाशित केले.
सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग १) सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग २) ७. अर्जुन उवाच : कृष्णाला शोधायला मी रथ हाकारून नगराकडे निघालो. जिकडे तिकडे शोकमग्न स्त्रियांचे जथे हिंडत होते. त्या सर्व स्त्रियांना एकत्र व्हायला मी सांगत गेलो. एके ठिकाणी बर्‍याचश्या बैलगाड्या दिसल्या. माझा रथ तिथे पोचताच तिथून काही स्त्रियांनी पोबारा केला. "अभीर स्त्रिया आहेत त्या" कुणीतरी म्हणाले. जवळ जाऊन बघतो, तो गाड्यांमधे मूल्यवान वस्त्राभूषणे, सोन्या-चांदीची भांडी वगैरे भरलेले होते.

गुरुजींचे भावं विश्व! भाग-२

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 05/08/2013 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
भाग-१ http://misalpav.com/node/25298 >>> पुढे... त्या-मला ना...आमच्या मासिकासाठी तुमची मुलाखत हवी आहे? इथेच द्याल का? हा कर्यक्रम संपल्यावर... सुशी ओरडणार नै कै मला...(ही त्यांची- सुशी..म्हण्जे आमच्या यजमानांच्या सुविद्य पत्नी असतात..असं नंतरहून आंम्हाला..त्यांचा(ही) सह भाग मुलाखतीत झाल्यानंतर कळतं.. ================================= त्या-(मुलाखतकार मोड ऑन) नमस्कार...धर्मसमाज मासिकातर्फे तुमचं स्वागत! आंम्ही-(सर्व मोड ऑफ करून!!!) धन्यवाद त्या-तुमचं नाव काय? आंम्ही-आत्माराम सदाशिव बापट.

सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग २)

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 03/08/2013 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग १) http://www.misalpav.com/node/25292 ------------------------------------------------------------------------------- ४. अभीराणी उवाच : अभीरमन्युशी माझं लग्न झाल्यावर त्यानं माझं आधीचं 'शतगोणी' हे नाव बदलून 'अभीराणी ' ठेवलं.