नव्वदीच्या दशकात दूरदर्शनवर लागणारं हे गाणं माहित नसणारा माणूस विरळाच. अशोक पत्की आणि लुइस बँक्स यांनी संगीतबद्ध केलेलं आणि जाहिरात क्षेत्रातलं प्रसिद्ध नाव, पियुश पांडे यांनी लिहिलेलं हे गाणं आजही अनेकांच्या मनात घर करून आहे. हे गाणं 'मेरे देश की धरती' सारखं स्फुरण चढवणारं नाहिये. किंवा 'ए मेरे वतन के लोगों' सारख डोळ्यात पाणी आणणारं पण नाहिये. हे गाणं मनाला काहिशी हुरहुर लावणारं आहे.
भीमसेन जोशी यांच्यापासून सुरु होणारं हे गाणं आपल्याला ८-९ भाषा वापरून, अनेक अभिनेते, गायक-गायिका, खेळाडू, लेखक यांच्या मार्फत बहुतांश भारताची सफर घडवुन आणते. या गाण्यात भीमसेन जोशी, लता मंगेशकर, बालमुरलीकृष्णन हे गाय़क आहेत. मल्लिका साराभाईं सारख्या नर्तिका आहेत. कमल हसन, अमिताभ, जितेंद्र, ओम पूरी हे अभिनेते आहेत. शबाना आझमी, तनुजा, हेमा मालिनी, वहीदा रेहेमान या अभिनेत्री आहेत. क्रिकेटर किरमाणी आणि हिरवाणी आहेत. अगदी अरूण लाल पण आहे. सह्याद्री, हिमालय, समुद्र, हत्ती, ताज महाल सारं काही आहे. हे गाणं काहिसं आपल्या देशाचं प्रतिबिंब आहे. ज्या तीन गोष्टी या गाण्यात प्रामुख्याने दिसतात त्या म्हणजे संगीत, चित्रपट आणि खेळ. त्याच तीन गोष्टी आपल्या देशाला जोडण्यात महत्वाचा वाटा उचलतात असं मला वाटतं.
२-३ वर्षांपुरवी हेच गाणं नव्या अवतारात लोकांसमोर आलं होतं. काही लोकांना ते आवडलं तर काही लोकांना अजिबात नाही. गाण्याचं नवं रुपडं कसही असो, आत्मा तोच होता. तीच भैरवी सद्रुश्य चाल आणि चित्रपट, संगीत आणि खेळ ही त्रिमुर्ती. मुक्या मुलांनी 'गायलेलं' गाणं ही या नव्या अवतारातली उल्लेखनीय गोष्ट !
मराठी, कन्नड, तमिळ, बंगाली, पंजाबी यापुढे जाउन माझी अजुनही काही ओळख आहे हे वाटण्यालाच राष्ट्रीय भावना म्हणतात का हे मला माहीत नाही, पण हे गाणं आणि त्या भावनेचं काहितरी नातं नक्किच आहे. आता या गाण्यामुळे ही भावना निर्माण होते का ती भावना आपल्यात असते म्हणून हे गाणं आपल्याला आवडतं हे सांगणं कठीण आहे.
१९८८ साली स्वातंत्र्यदिनादिवशी पहिल्यांदा प्रसारित झालेल्या या गाण्याला आज २५ वर्ष पूर्ण झाली.
सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेछ्छा.
याद्या
4114
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा !
नविन गाणं पाहिलं नाहिये
धांव
शायनी अहुजाला धांवताना पहायला
In reply to धांव by तिमा
बरोबर
In reply to शायनी अहुजाला धांवताना पहायला by कानडाऊ योगेशु
माझी दोन आवडती गाणी मी भारतीय
मस्तं !
In reply to माझी दोन आवडती गाणी मी भारतीय by मदनबाण
+१०^९
In reply to माझी दोन आवडती गाणी मी भारतीय by मदनबाण
आवडले !
In reply to माझी दोन आवडती गाणी मी भारतीय by मदनबाण
समयोचित आठवण!!
धन्यवाद. जुन्या आठवणी ताज्या केल्यापद्दल.
मिले सुर मेरा तुम्हारा...
समयोचित !
जुनं मिले सूर मेरा तुम्हारा
जुनं मिले सुरच सर्वांत भारी