Skip to main content

संस्कृती

आपला जल्मोजल्मी ऋणी आहे

लेखक देशपांडे विनायक यांनी मंगळवार, 14/05/2013 09:50 या दिवशी प्रकाशित केले.
मोठ्या ,प्रसिद्ध ,VIP अशा लोकांचा परिचय वाचताना ते लोक किती DOWN TO EARTH आहेत याचा उल्लेख येतोच . ही व्यक्ती विशेष नसून त्यांच्या गुणांनी नम्र आहे हे दाखविण्याचा तो एक जाणीवपूर्वक प्रयत्न असतो . मध्यम वर्गातील माणूस विशेष कोणीतरी बनण्याचे गुण अंगी असूनही आहे तसाच राहिलेला दिसतो . मध्यम वर्गात जन्म घेतलेला ,मध्यम वर्गाचे संस्कार पाळणारा माणूस विशेष कसा बनणार ?तो तसाच राहणे हे खरे मध्यमवर्गीय संस्कार लक्षण .

मारा डंख मारा डंख मारा बिछुवा, मिपाप्रवेशाकांक्षिण्यांची गोची आणि आमची काशीयात्रा

लेखक चित्रगुप्त यांनी सोमवार, 13/05/2013 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
"ओ मारा डंख मारा डंख मारा बिछुवा… तोहरे प्यारके जहर चढे मितवा…" 'अपनीही मस्तीमे झूमते हुए' का काय म्हणतात तसा, आपल्याच धुंदीत, द्रुतगतीनं पायडिलं हाणत, गाणं म्हणत मी घराकडे सायकलत होतो.पोटात भूक खवळली होती आणि केंव्हा घरी पोचून वेगवेगळ्या मस्त रेसिप्या हाणतो, असं झालं होतं. आजची संध्याकाळ माझ्यासाठी 'ये शाम मस्तानी मदहोश किये जा… ' अशी ठरली होती.… दुपारी मला जेंव्हा बायकोनं सांगितलं की "अहो, आज संध्याकाळी पाच ते साडेआठ तुम्ही कुठेतरी एकटेच फिरायला जाउन या" तेंव्हा मी आश्चर्यानं विचारलं, "का गं, आज अचानक एवढी मेहेरबान कशी झालीस माझ्यावर?

पर्शियन, अरबी, फारसी इ भाषा आणि प्राचीन लिप्या

लेखक प्रचेतस यांनी गुरुवार, 09/05/2013 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
पारशांचा धर्मग्रंथ अवेस्तात असुरांना अहुर असे म्हणलेय. पर्शियन भाषेत 'स' नसल्याने त्याचा उच्चार 'ह' असा होतो उदा. सप्तसिंधू चा उल्लेख हप्तहिंदू वगैरे. आणि त्यात देवांना शत्रू म्हणून दाखवलेय असे कुठेतरी वाचले होते. असिरीया हा पर्शियन साम्राज्यातलाच प्रदेश. असुर कोण (१) या धाग्यावरील भाषा आणि लिपीच्या संदर्भातील प्रतिसाद या धाग्यात हलविले आहेत. - संपादक मंडळ

पंचम पुरीवाला.. एक श्रद्धास्थान..!

लेखक विसोबा खेचर यांनी शुक्रवार, 03/05/2013 15:10 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबैचा पंचम पुरीवाला. पंचम पुरीवाला हे एक हॉटेल आहे..परंतु खुद्द मालक मात्र त्याला पुरीचं दुकान असं म्हणतो.. बोरीबंदर स्थानकासमोरच बजारगेट स्ट्रीटच्या तोंडाशी हा पंचम पुरीवाला गेली दीडशेहून अधिक वर्ष उभा आहे.. अतिशय साध्या पद्धतीनं सजवलेलं साधंसुधं हॉटेल. लाकडी बाकं..अगदी प्रसन्न वातावरण. प्यायला थंडगार पाणी. प्रत्येक टेबलावर लिंबूमिरच्यांचा एक मोठा वाडगा ठेवलेला..! अतिशय सुरेख गरमगरम पुर्‍या. पानात पडलेली छान गरमगरम फुगलेली पुरी हळूच फोडावी अन् बोटाला वाफेचा चटका बसावा याहून अधिक सुंदर ते काय?! पुर्‍या तळण्याचा हा महायज्ञ दिवसभर सुरू असतो..

शिलाहारांचे कोप्पेश्वर मंदीर......भाग-२

लेखक जयंत कुलकर्णी यांनी रविवार, 21/04/2013 19:33 या दिवशी प्रकाशित केले.
शिलाहारांचे कोप्पेश्वर मंदीर......भाग-१ सिंघण यादवाने देवेगिरीला गेल्यावर शिलाहारांचे राज्य आपल्या राज्याला जोडले. सिंघण यादवांच्या काही शिलालेखात सर्परुपी भोजाला गरुडाने म्हणजे सिंघणाने पकडले असा उल्लेख आहे. त्याने कोपेश्वरच्या देवळाच्या चरितार्थाची सोय लावली मात्र ते पूर्ण करण्यास आर्थिक मदत केली नाही व ते बांधकाम अर्धवट पडले. नंतरच्या काळात केव्हातरी स्थानिक जनतेने देवळावर शिखर उभे केले पण ते मूळ देवळाशी अत्यंत विसंगत दिसते. पण एवढे काही वाईट नाही.

शिलाहारांचा कोप्पेश्वर.......भाग -१

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 19/04/2013 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
खिद्रापूरचा कोप्पेश्वर: Simple, Free Image and File Hosting at MediaFire या दरवाजातून आत पाऊल टाका आणि हे बघा..........कोप्पेश्वरचे मंदीर. Simple, Free Image and File Hosting at MediaFire शिलाहार राजे दोन गोष्टींसाठी बरेच प्रसिद्ध होते एक म्हणजे त्यांनी त्या काळात

बहु भुकेला झालो...

लेखक विसोबा खेचर यांनी शुक्रवार, 19/04/2013 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
१९३०-३२ चा सुमार असेल.. गदगच्या आपल्या राहत्या घरातून एक मुलगा अंगावरील वस्त्रानिशी घरातून पळाला.. संगीत देवतेला 'जोहार मायबाप जोहार.. ' असं म्हणत निघाला..! त्याच्या आईनं त्याला काही भजनं शिकवली होती. गावातल्या कुणा मास्तरांकडून त्याला काही सांगितिक भाकऱ्यांची शिदोरी मिळाली होती. पण तेवढ्यानं त्याचं पोट नव्हतं भरत.. त्यामुळे सोबत ती थोडीशी शिदोरी घेऊन तो महाराचा महार 'जोहार मायबाप जोहार..' असं म्हणत निघाला.. ग्वाल्हेर, रामपूर, बनारस, जालंदर... खूप खूप वणबण केली त्या बहू भुकेल्याने...

पुरुष विभाग - धागा क्र. १ - सेक्सी स्टबल आणि गर्लफ्रेंड/बायकोच्या तक्रारी

लेखक राजेश घासकडवी यांनी शनिवार, 13/04/2013 22:09 या दिवशी प्रकाशित केले.
पुरुषांचे काही खास प्रश्न असतात. त्यांच्या जिव्हाळ्याचे काही विषय असतात. बहुतकरून स्त्रियांना त्यांच्यात रस असतोच असं नाही. आणि काही विषय तर स्त्रियांना लागूच होत नाही. त्यामुळे अशा विषयांवर स्त्रियांचे प्रतिसाद कितपत ग्राह्य धरावे हा प्रश्नच पडतो. तरी पुरुष आयडींनी मनमोकळेपणाने प्रतिसाद द्यावेत ही विनंती. आता तुम्ही म्हणाल, की असं काय आहे जे पुरुषांना असतं आणि स्त्रियांना नसतं? उत्तर सोपं आहे - दाढी. किंबहुना एका प्रसिद्ध मनोवैज्ञानिक सिद्धांतानुसार अनेक तरुणींना बीअर्ड एन्व्ही निर्माण होते त्यामुळे ती कमतरता झाकण्यासाठी त्या पुरुषांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात.

तपश्चर्या आउटसोर्स – कथा सत्यव्रताची –निरुपण दासबोधाचे (नवी स्टाईल)-भाग -एक

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 08/04/2013 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
फार-फार पूर्वी अयोध्येत सत्यव्रत नावाचा राजा राज्य करीत असेल. त्याचा राज्यात सुख, समाधान आणि शांतता नांदत होती. त्याला काहीही कमी नव्हते. एकदा नारद मुनीं कडून स्वर्गाचे वर्णन ऐकले होते. त्या दिवसापासून एकदा तरी स्वर्गाची वारी केली पाहिजे, देवराज इंद्रासोबत सोम पान करावे, रंभा, उर्वशी यांचा नृत्याचा आनंद घ्यावा. वेळ मिळाला तर इतर देवतांसोबत आपल्या पुण्यवान पूर्वजांचे दर्शन घेऊन जीवन कृतार्थ करावे. ही इच्छा त्याचा मनात घर करू लागली. पण स्वर्गात जाणे सोपे नव्हते. एखादा पुण्यात्मा मृत्युनंतर स्वर्गात जातो. पण त्या वेळी ही आपल्या तपोबलाच्या शक्तीने काही ऋषि-मुनी सदेह स्वर्गात येत-जात असे.

निमित्त फक्त एका भेटीचे

लेखक सुज्ञ माणुस यांनी सोमवार, 08/04/2013 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
निमित्त फक्त एका भेटीचे परवाच आई च्या तोंडून तिच्या शाळेतल्या बाईंची भेट ऐकली. पहिल्या दोन वाक्यातच डोळ्यात पाणी उभे राहिले. खरेतर त्या काळाची ती गोष्ट, ऐकून सोडून देण्यापलीकडे काहीही हातात नव्हते. पण आमच्या मातोश्रींचे बोलणेच इतके अमोघ, की त्यातल्या भावनांची मनात गर्दी व्हायला काही क्षणांचा अवकाश. मन भूतकाळात केव्हाच वाहून जाते. आठवणी आणि भावनांचा कल्लोळ असा काही उठतो की अश्रूंचे हळुवार टीपके सैरावैरा धावू पाहतात इवल्याश्या डोळ्याच्या पटांगणावर. निमित्त फक्त एका भेटीचे. अशीच कोणतीशी वेळ, दोन लोक बस ची वाट बघत उभी आहेत.