Skip to main content

संस्कृती

नवोदित कवींना आवाहन

लेखक कवितानागेश यांनी गुरुवार, 05/09/2013 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
माझी आजी- कै. सौ. प्रभावती केसकर यांच्या जन्मशताब्दीची या २५ ऑक्टोबर ला पूर्तता होत आहे. या जुन्या काळातल्या लेखिका-कवयित्री. त्यांनी आपल्या काव्यगायनाने अनेक समारंभ व कवीसंमेलानातून रसिकांची मने जिंकली. त्यांच्या कविता आशयपूर्ण तर होत्याच, शिवाय गेयही होत्या.

Spanish Cherry !! नाही गं, बकुळ.

लेखक भ ट क्या खे ड वा ला यांनी गुरुवार, 05/09/2013 00:47 या दिवशी प्रकाशित केले.
भाचीचा फोन ,मामा किती वेळ झाला तुझा फोनच लागत नाही. एवढे अर्जंट काम काय असावे हा तर्क करत असतानाच भाचीचे शब्द कानी पडले.मामा बकूळी ला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? आणि खारीक च्या झाडाला काय म्हणतात ? दोन्ही प्रश्न ऐकून मी थोडासा हडबडलो ? तुला आत्त्ताच कशाला हवी हि माहिती ,बघून सांगतो असे म्हणताच नाहीरे सई चा प्रोजेक्ट आहे त्यासाठी हवी आहे. आता मलाही राहवेना ५/६ वर्षाच्या मुलीचा प्रोजेक्ट तो काय असणार आणि त्यासाठी आईची धावाधाव. मला सुद्धा पटकन आठवेना.

आम्हां घरी धन.....(३)

लेखक मोदक यांनी बुधवार, 04/09/2013 16:02 या दिवशी प्रकाशित केले.
आम्हा घरी धन... आम्हां घरी धन ...(२) ---------------- धन्यवाद मंडळी! पहिल्या आणि दुसर्‍या धाग्याला उदंड प्रतिसाद मिळाला. अनेक उत्तमोत्तम उतारे, कविता सर्वांना वाचायला मिळाले. पण आता तिथे नव्या प्रतिक्रिया, नवे उतारे शोधणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे या धाग्याचा पुढचा भाग सुरू करत आहे. चला.. आपल्याला आवडलेल्या कविता, ओळी, छोटेखानी लेख, वन लाईनर्स, टॅन्जंट्स, सुभाषिते..

पुरुष विभाग धागा क्र.३---- संसार देवाची कहाणी-----

लेखक मुक्त विहारि यांनी शुक्रवार, 30/08/2013 17:44 या दिवशी प्रकाशित केले.
माझे मित्र म्हणतात की तुझा संसार सुखाचा आहे.असेल,कदाचित तसेही असेल.कारण मी "संसार देवाची" रोज पुजा करतो.माझे लग्न झाल्यावर, माझ्या वडीलांनीच मला हे व्रत करायला सांगीतले.मी तर सुखी झालो (मित्र खोटे बोलत नाहीत, हे मी आधीच पु.वि.धा.क्र.२ मध्ये स्पष्ट केले आहेच.... http://www.misalpav.com/node/24546 ) नमनाला इतके तेल खूप झाले.

गुरुंजींचे भावं विश्व! भाग-३

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 30/08/2013 00:24 या दिवशी प्रकाशित केले.
गुरुंजींचे भावविश्व! भाग २-http://www.misalpav.com/node/25318 ... पुढे ... हा सवाल-जबाब टाकलेला आमचा कोल्हापुरी मित्र वाणीनी तिखट असला,तरी मनानी अगदी लोण्यासारखा मऊ आहे.एकदा बाहेरगावी एका "अठवडी" कामाला गेलो असतांना,रात्रीचं जेवण झाल्यावर सोबतीनं तंबाखू मळता मळता मला एक मजेशीर प्रश्न विचारून गेला , "आत्म्या.. हा आपला धंदा आणी ह्यातली ही आपल्यासारखी मानसं..कोणच्या पन क्षेत्रात गेली,तरी अशीच हिट'ला जातील का रं !?

गोविंदा २०१३

लेखक मदनबाण यांनी गुरुवार, 29/08/2013 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
या वर्षी दहीहांडीचा उत्सव पाहता येईल की नाही अशी जरा शंका होती...पण तस काही झालं नाही.ऑफिसातुन घरी आल्यावर बॅग ठेवली आणि लगेच दहीहांडी पाहण्यासाठी आणि तीचे फोटो तुमच्यासाठी काढण्यासाठी खाली पळालो.

कृष्णलीला..

लेखक किसन शिंदे यांनी गुरुवार, 29/08/2013 13:38 या दिवशी प्रकाशित केले.
कुठे दोन-चार स्पीकर्स तर कुठे दहा फुटांच्या डॉल्बीच्या अजस्त्र भिंती.. कुठे पाच-दहा हजाराचं शुल्लक बक्षीस तर कुठे एक कोटीचं.. कुठे भगव्या टि-शर्टमधल्या कार्यकर्त्यांचा घोळका तर कुठे पांढर्‍या... कुठे गोविंदा रे गोपाळा तर कुठे मच गया शोर सारी नगरी रे.. कुठे चार-पाच थरांचा तर कुठे विश्वविक्रमाशी बरोबरी करणार्‍या नऊ-दहा थरांचा थरार.. कुठे हाता-पायावर निभावतं तर कुठे जिवाशी जातं.. कुठे मानाची तर कुठे जगातली सर्वात मोठी.. कुठे हिंदी तारे-तारका तर कुठे मराठी.. कुठे लावणीतलं या रावजी तर कुठे हिंदीतलं चिकनी चमेली.. उत्तराखंडमधली मोठ्ठी नैसर्गिक आपत्ती..पुरोगामी महाराष्ट्राला हादरवणारी दाभोळकर

सुदामा

लेखक सार्थबोध यांनी गुरुवार, 29/08/2013 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
काय वर्णन करू, त्या पामराचे सदनी दारिद्र्य, अठरा विश्वाचे जाहला गृहस्थ, पाश गरिबीचा स्मरे परंतु मेळा, गोकुळाचा ll १ ll दशा वाईट, भविष्य होय अंध उदर भरण्या, रोजचा आक्रंद स्मरणात तरी, होता गोपालवृंद इच्छा पाहण्या, पुन्हा तो मुकुंद ll २ ll करुनी विचार, निश्चय केलासे मनोमनी स्मरण, माधवाचे भेटस्वरूप काय, मित्रास न्यावे? कल्लोळ मनी, त्यास काय आवडावे ll ३ ll घरात नाही, एकही उपलब्ध दाणा कृष्णाचा मित्र, उगीच का रे म्हणा ! शिळे पोहे पुरचुंडी, घेतली शेवटी त्याच्या ठायी, तीच शक्य होती ll ४ ll आला द्वारकेस, उपाशी थकलेला काम टाकून, माधव भेटीस धावला धरिले पाय, हतबल सुदाम्याने तो सावळा मित्र, आलिंगन

एका गाजलेल्या पुस्तकाचे परिक्षण

लेखक दशानन यांनी बुधवार, 28/08/2013 21:50 या दिवशी प्रकाशित केले.
आज प्रदर्शनात दुपारी थोडावेळ मिळाला म्हणून एक पुस्तक वाचण्यासाठी हाती घेतले. प्रथमदर्शनी पुस्तकाचे निर्माण कसे करु नये? याचे उत्तम उदाहरण म्हणून हे पुस्तक नक्कीच खपून जाईल, त्यामुळेच तर याला उत्कृष्ट वाडमयीन त्यावर्षी मिळाला होता. कव्हर ३०० जीएसम च्या जागी ३०५ आणि आतील पाने ५८ जीएसम च्या जागी ६० वापरली असती तर अजून हे पुस्तक चांगले घडू शकले असते, मॅथलीतो च्या जागी नॅचरल असता तर जगात भारी पुस्तक निर्माण झाले असते. पुस्तकाचे वजन अंमळ जास्त आहे, थोडी काही शे पाने कमी केली असती तर वजन नक्कीच कमी झाले असते.

बादशाही...!

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 22/08/2013 01:44 या दिवशी प्रकाशित केले.
आज सांजच्याला अड्ड्यावरनं घरला निघालो,आणी गाडी सवईनी पानाच्या आमच्या आवाडत्या ठेल्यावर गेली. "बोलो साब...कितना...?" मी-"तीन बनाओ,तीनो पार्सल करो. असं म्हणालो आणी जरा कानावरचा हेडफोन दूर करुन आजूबाजुला न्याहाळायला लागलो. आमच्या सदाशिवपेठेतली ही गल्ली पूर्वी सदाशिवपेठेचा केवळ एक भाग होती आणी भरत नाट्य मंदिराचा चौक ते टिळक स्मारक मंदिराचा चौक यांना जोडणारी गल्ली.."इतकिच" नाट्यमय तिची ओळख होती.पण गेल्या १५ वर्षात या गल्लीला एक नविन ओळख मिळाली... मटण-गल्ली! हो....!