Skip to main content

संस्कृती

दुर्गे दुर्घट भारी... एक विचार.

लेखक प्यारे१ यांनी शुक्रवार, 11/10/2013 03:45 या दिवशी प्रकाशित केले.
गणेश विसर्जन झालं की पितृपक्ष येतो. तो संपला की लगेच प्रतिपदेला घटस्थापना होते नि आपण देवीची उपासना सुरु करतो. देवीच्या उपासनेची सुरुवात कधी झाली, का झाली, कशी झाली ह्याबाबत मला माहिती नाही. इतिहासकारांचा विषय आहे तो. असो. पुराणांमध्ये कुठंतरी सांगितल्याप्रमाणं महिषासुर नावाचा राक्षस प्रचंड मातला होता नि त्यानं सगळ्यांना त्रास द्यायला सुरुवात केली.

उद्या दि. ०९ ऑक्टोबर ला जागतिक टपाल दिवस आहे.

लेखक psajid यांनी मंगळवार, 08/10/2013 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
उद्या दि. ०९ ऑक्टोबर ला जागतिक टपाल दिवस आहे. त्यानिमित्त पूर्वी आपला समाज संदेश दळण- वळण कामी ज्याची मदत घ्यायचा त्या दूरसंचार अर्थात POST खात्याची आठवण आली. नुकतेच पोस्ट खात्यातून तार ही संदेशांची देवाण घेवाण करणारी १८३८ मध्ये सुरु झालेली सेवाही बंद झाली. त्यावेळी अतिशय वाईट वाटले.

'लोकायत' विचारचर्चा

लेखक प्रास यांनी गुरुवार, 19/09/2013 08:57 या दिवशी प्रकाशित केले.
माधव : असे आश्रय ज्ञानाचा। निःश्रेयसरूपी पुरूषार्थाचा । धनी माझ्या नमस्काराचा । शिव सृष्टीकर्ता।। १ पावले जे दर्शनसागरापार। करवली जनयोग्य ईप्सितार्थप्राप्ती अपार। असे सर्वज्ञ विष्णु गुरूवर । मम आश्रयदाता।। विचित्रपुष्पांसम शास्त्रांचा हा सर । गहन, दुस्तर तरी आनंद देई फार। अवलोकावा दूर ठेऊनि मत्सर । होई आल्हाददाता। पुरूष क्र. १ : नमस्कार माधवराव! माधव : नमस्कार बुवा! काय म्हणता? पुरूष क्र.

मखर, अर्थात मकरतोरण

लेखक प्रचेतस यांनी रविवार, 15/09/2013 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा गणेशोत्सव स्पर्धेतील मिपाकरांनी केलेल्या विविध सुंदर सजावटी, मखरे पाहून मलाही कैतरी फोटू द्यावेसे वाटू लागले. पण सजावट करायच्या कामात मी अगदीच ढ आणि त्यातून उत्साहाने असे काही करायचा प्रचंड कंटाळा. त्यामुळे स्वतः कै करायच्या ऐवजी मध्ययुगीन कालखंडात निर्मिती झालेल्या काही मंदिरांवर असलेल्या मखरांचे फोटू द्यायचा विचार केला. मखर, याचा उगम मकर अथवा मगरापासून होतो. मगरीच्या (मकराच्या) मुखातून निघालेले तोरण म्हणजे मकरतोरण. याचाच पुढे अपभ्रंश होत जाऊन आजचे मखर तयार झाले. काळानुरूप बदल होत जाऊन हल्ली तोरणाचा उगम मूळ मकरमुख जरी फारसे दिसत नसले तरी नक्षी मात्र अगदी तशीच आहे. १.

"बहर" डॉक्टर श्रीश क्षीरसागर

लेखक भ ट क्या खे ड वा ला यांनी गुरुवार, 12/09/2013 23:15 या दिवशी प्रकाशित केले.
१००/१२५ वृक्षांची ओघवत्या शैलीत, सचित्र ओळख करून देणारे एक बहारदार पुस्तक. श्री ज्ञानदेवांच्या समाधीवर सावली धरणाऱ्या "अजान" वृक्षा पासून संपूर्ण भारत भरातल्या गोड्या पाण्यावर तरंगणार्या "जलकुंभी" पर्यंत अनेक वृक्ष ,त्यांचे मूलस्थान, पर्यावर्णातील त्यांचे महत्व, महती आणि माहिती सांगणारे हे पुस्तक हातात घेतले कि ठेववत नाही. अत्यंत सुंदर अशी छायाचित्रे हे या पुस्तकाचे आणखी एक वैशिठ्य आहे. नाशिकच्या दैनिक "गावकरी" मध्ये "बहर' याच नावाने यातील काही लेख डॉक्टरांनी प्रकाशित केले होते. वाचकांचा प्रतिसाद पाहून हे सर्व लेख पुस्तक रुपात प्रसिद्ध झाले आहेत.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग-४

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 11/09/2013 18:47 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भागः- http://misalpav.com/node/25527 ...पुढे चालू आणखि एक गमतीदार, चवदार, व लज्जतदार विषय. संपूर्ण विषय ऐकल्यावर, यातल्या गमती कोणत्या? चव कोणती? लज्जत कोणती? आणी या गोष्टी चाखणार्‍यांची नक्की दारं कोणती? हे न कळल्यामुळे तुमचीही अवस्था विधानसभे सारखी त्रिशंकू होइल,यात शंका नाही............. =============================
जखमे सारखं
चिडचिडं करणारा सगळ्यात पहिला प्रकार म्हणजे, रस्त्यावरून येता-जाताना काहि कारणास्तव ब्रेक मारून थांबावं, तर काहि लोकं आंम्हाला नखं ते शिखेचा अंत होईपर्यंत न्याहाळतात.

गणराया

लेखक kalpana joshi यांनी मंगळवार, 10/09/2013 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
गणराया प्रथम नमन तुला गणराया, दाखवतो तू वाट भक्तांना आद्य पूजेचा मान तुझा आवडतो तू आम्हाला , संकट काळी धावून येशी, तुझ्या नामातच गोडवा किती ॐकाराचे स्वरूप तू, सर्व जगाचे रक्षण करशी तू चौशष्ट कलांचा,चौदा भाषांचा तूस्वामी दाता, बुद्धी ची देवता तू,सुबुद्धी दे आम्हांस, दुष्टांचा संहार कर,पापांचा नाश कर, तू सुखकर्ता,तू दु;ख हरता, विघ्नांचा तू विनाश करतो प्रसन्नतेचा तू एक आनंद उत्सव, सर्वाना तू आनंद देतो मंगलमय वातावरण निर्माण करतोस. तुझ गूण वर्णन कराया स्फूर्ती येते, सर्व संकटे घेऊन जाते तुझ्या दर्शनाने आम्ही पावन होतो.

मिपावर्धापनदिनाच्या शुभेच्छा...

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 09/09/2013 09:57 या दिवशी प्रकाशित केले.
समस्त मिपाकरांना गणेशोत्सवाच्या आणि मिपावर्धापनदिनाच्या अनेकानेक शुभेच्छा.. तसेच नीलकांत आणि मिपाचे सर्व संचालकमंडळ यांचे मनःपूर्वक आभार, अभिनंदन आणि शुभेच्छा..! आपला नम्र, (मिपा संस्थापक) तात्या. ---- कृपया आम्हाला येथे भेटा - शिळोप्याची ओसरी - https://www.facebook.com/groups/kbdbliberal/