सजणा...दूर व्हा ना....दूर व्हा ना.... जाऊ द्या... सोडा... जाऊ द्या
लेखनप्रकार
नुकताच झी मराठी चॅनलवरील "सारेगमप लिटिल चॅम्प्स" हा लहान शाळकरी मुलांच्या संगीत स्पर्घेचा कार्यक्रम पाहिला.
त्यात कुमारी आर्या आंबेकर या चिमुरड्या शाळकरी मुलीने ग. दि. माडगूळकरांची
सजणाऽऽऽऽ दूर व्हा नाऽऽऽऽ दूर व्हा नाऽऽऽ जाऊ द्याऽऽऽ सोडाऽऽऽ, जाऊ द्याऽऽऽऽऽ
ही लावणी सादर केली आणि तिच्या गाण्याने तमाम प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. प्रेक्षकच नव्हे तर परीक्षकसुद्धा तिचे गाणे ऐकून "हैराण" झाले. तिचा आवाज, नज़ाकत, सादरीकरण सारे काही केवळ अप्रतिम होते. तिने या लावणीने तमाम मराठी रसिकांच्या "कानाचे पारणे" फेडले. अर्थात तिला सर्वाधिक गुण या भागातील सादरीकरणाचे मिळाले, हे सांगणे न लगे.
तिचे गाणे संपल्यावर आम्ही इतके भारावलो होतो की आम्ही आमच्या गुगल निरोपकावरील स्टेटस मेसेजमध्ये ते गाणे लिहिले होते. आमचे स्नेही श्री. प्रकाश घाटपांडे तेव्हा ऑनलाईन होते. त्यांच्याशी तिच्या परफॉर्मन्सबद्दल चर्चा झाली. घाटपांडे हे देखिल गदिमांचे चाहते. ते देखिल तिचे गाणे ऐकून आमच्यासारखेच "वेडे" झाले होते.
कुमारी आर्या आंबेकर हिचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी तिला आमच्या लाख लाख शुभेच्छा.
तिच्या पत्रिकेतील पंचमस्थानाचा उपनक्षत्रस्वामी नवम, दशम आणि एकादश स्थानाचा बलवान कार्येश असो व तिला पुढील महादशा नवम, दशम व एकादश स्थानांशी संबंधीत येऊन तिची कीर्ति, नावलौकिक देशभर होवो अशा ज्योतिषशास्त्रीय शुभेच्छांसह.....
आपला,
(मंत्रमुग्ध) धोंडोपंत
वाचने
3997
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
मी पण
आर्याचं
In reply to आर्याचं by विसोबा खेचर
लाखमोलाचे
In reply to आर्याचं by विसोबा खेचर
असं कसं असं कसं ?
आर्याचं
In reply to आर्याचं by पक्या
आहे खरे तरी
काल पाहिला
पक्या,
अहो.... पंत....
आर्याचे कौतुक
In reply to आर्याचे कौतुक by अनामिका
धन्यवाद!