जुहू चौपाटी, सोबत मै शायर बदनाम चे स्वर आणि मी एकटाच..!
आज बर्याच दिवसांनी संध्याकाळची सवड भेटली..
पोटापाण्याच्या व्यवसायाचं एक महत्वाचं काम होतं अंधेरीला. ते थोडं लौकरच उरकलं. किती वाजले होते माहीत नाही, परंतु आठ वाजून गेले होते. थोडी सवड होती..
डोक्यात 'मै शयर बदनाम..'चे स्वर रुंजी घालू लागले..
तसाच तडक निघालो आणि जुहू चौपाटीवर पोहोचलो. त्या आधी त्याच्या बंगल्याभोवती खुळ्यासारखा थोडा वेळ घुटमळलो..
आणि समोरच असलेल्या चौपाटीच्या पुळणीवर जाऊन बसलो..चौपाटी नेहमीप्रमाणेच गजबजली होती.. पाणीपुरी, भेळपुरी, अन् काय काय! मी मात्र तिथे एकटाच बसलो होतो.
मिसळपाव