गजानन वाट्व्यांचे निधन

शुभान्कर जनातलं, मनातलं
थोडयावेळापूर्वी कळले की गजानन वाटवे गेले. मराठी भावगीताचा जनक हरवला त्यांना विनम्र श्रद्धांजली.
वर्गीकरण

11 टिप्पण्या 2,643 दृश्ये

Comments

प्रमोद देव नवीन

माझीही विनम्र आदरांजली. आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

सागर नवीन

मराठी संगीतविश्वाला झळाळी देणारा एक अनमोल तारा निखळला माझीही गजाननरावांना भावपूर्ण श्रद्धांजली.... - सागर

नाटक्या नवीन

भावगीतात स्वतःचे युग निर्माण करणारा, निगर्वी कलावंत हरपला. सोप्या चालीतून कवीतेतल्या शब्दांना रसिकांच्या मनावर वर्षानुवर्ष मोहीनी घालणार्‍या या महान गायक आणि संगीतकाराला विनम्र श्रध्दांजली... - नाटक्या

आनंद घारे नवीन

आद्य भावगीतगायक स्व.श्री.गजानन वाटवे यांना सादर आणि साश्रु श्रध्दांजली. यासंबंधी सविस्तर बातम्या इथे पहा. लोकसत्ता http://www.loksatta.com/daily/20090403/mp01.htm सकाळ http://beta.esakal.com/2009/04/02130412/home-gajananrao-watave-no-more.html लोकमत http://onlinenews.lokmat.com/staticpages/editions/pune-1.php महाराष्ट्र टाइम्स http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4352478.cms आनंद घारे मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात. http://360.yahoo.com/abghare http://anandghan.blogspot.com/

सुधीर कांदळकर नवीन

मैफिली अजून माझ्यां मनांत दरवळत आहेत. जशा मेहदी हसननें पाकिस्तानांत गझल सामान्य जनतेत लोकप्रिय केली तशीच आपल्याकडे वाटव्यांनीं मराठी कविता. खासकरून स्त्रीमनाचे विभ्रम दाखवणारी कविता. त्यामुळें अर्थातच तरुणींची गर्दी जास्त असे. बहुधा म्हणूनच असूयेनें तत्कालीन ढुढ्ढाचार्यांनी त्यांना सळो कीं पळॉ करून सोडलें आणि बहुधा त्यांनीं मंचनिवृत्ती स्वीकारली असावी. 'मोहुनिया तुजसंगे' तर एक अफलातून गीत. त्यांना माझे शत:श: प्रणाम. सुधीर कांदळकर.