एखाद्या पहाडावर, रणरणत्या उन्हात , पायी चालुन शरीर थकलेले असताना , त्याच पहाडावरच्या शिवालयात, नाजुक घंटानाद चालु असताना , फुलांचा सुंगध श्वासात शिरत असताना , पिंडीसमोरच्या , काळ्या कातळाचा पायाच्या तळव्यांना स्पर्श झालाय कधी ? कस वाटत त्यावेळी ? ती मनात येणारी भावना बोलुन लिहुन दाखवता येते ?? येईल ही कदाचित .......पण पुन्हा दुसर्या एखाद्या साध्याच मंदीरात गेल्यावर ती अनुभुती येते ? माझ उत्तर आहे ... नाही !! पण मन मात्र त्या अनुभुतीच्या अनुभुतीसाठी कासावीस होतो का ?