किशोरी...
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about किशोरी...
- 23 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
जवळपास २४ तास झालेत पण अजून त्याचा विसर पडत नाही...
कित्येक वर्षांनी झालेली भेट...पुन्हा कधी होईल माहित नही...८२ वर्षांचे वय पण नं स्वरात नं वावरण्यात त्याचा मागमूस...
गेटवे ऑफ इंडियाचा परिसर ... आधीचा जमलेला भैरव आणि नंतर सुरु झालेला ललत....पाठीमागे २ तानपुरे आणि त्याच्याही पाठीमागून येणारी मंद सागराची गाज...
इतक्या वर्षांची तपश्चर्या प्रत्येक स्वरातून झिरपणारी...त्यातील श्रुतींचे वापर आम्हा पामरांच्या पार डोक्यावरून जाणारे...आपण हे सगळे ऐकतो आहोत अनुभवतो आहोत हि जाणीव लोपलेली ...
काहींच्या आयुष्यात परीघावरच राहण्याचा योग असतो. केंद्राकडे त्यांना गुणवत्ता असुनही जाता येत नाही. हिन्दी चित्रपट सृष्टीत महेंद्र कपूरच्या बाबतीत असंच घडलं असं मला वाटतं. एक नम्र स्वभावाचा अतिशय सभ्य माणुस यापलिकडे मी त्याच्या बद्द्ल काही वाचलेलं नाही. स्वतः महेंद्र कपूरला त्याची उपेक्षा झाली असं कधी वाटलं का याचा देखिल मला अंदाज नाही. पण माझं स्वतःचं मत या अतिशय गुणी गायकाबद्द्ल हेच आहे की गुणवत्ता झाकली गेली. कलेचं चीज पुरेसं झालं नाही.