Skip to main content

समाज

प्रतिमा जपायची आहे

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी रविवार, 01/11/2020 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे साहित्यिक, कलावंत वा संवेदनाशील व्यक्‍तींना ‍जीवनात हटके अनुभव घ्यायला आवडतात. पण असे अनुभव घेतांना काही चटके बसणंही अपरिहार्य असतं. हे चटके सोसण्याची ताकद प्रत्येकात असतेच असं नाही. उलट परिणाम उद्‍भवले की व्यक्‍ती गांगरून भीतीने थरथरते. आपण ज्या सामाजिक चौकटीत वावरतो त्या जनमानसात आपल्या प्रतिमेला तडा जाऊ नये असं वाटणं स्वाभाविक आहे. आपल्या मूळ स्वरूपाहून केवळ आपली प्रतिमा उत्कट करण्याच्या अट्टहासामुळे, माणूस हटके अनुभव घेण्यासाठी आपणहून साहस करत नाही. पचेल, परवडेल, समाजात चुकीचा संदेश जाणार नाही असा मोजून मापून आपण अनुभव घेतो. परिणाम उलटा होताच हादरून जातो.

अरविंद बाळ यांची अंनिसवरील अप्रकाशित प्रतिक्रिया

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी बुधवार, 28/10/2020 या दिवशी प्रकाशित केले.
प्रास्ताविक - आमचे ज्येष्ठ मित्र श्री अरविंद बाळ यांचे दि.27 ऑक्टोबर 2020 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.आंतरजालावरील उपक्रम या संकेतस्थळाविषयी मी जेव्हा जालाबाहेरील लोकांशी चर्चा करत असतो त्यावेळी त्यांना मराठी संकेतस्थळाविषयी उत्सुकता तर असतेच पण येथील चर्चांविषयी एक आकर्षणही असत. श्री अरविंद बाळ यांचे लेखन हे जालाबाहेरील वर्तुळात असते. गप्पांमधुन ते भरभरुन बोलतात पण लिखाणाबाबत जरा उदासीनच. अरविंद बाळ हे B.E. (Civil) व्यवसायाने सिव्हिल इंजीनिअर . या क्षेत्रातील कंपन्यातून नोकरी व नोकरीनिमित्त भारतभर प्रवास. तीन वर्षे इराकमधे वास्तव्य. निवृत्ती सन 2000 घेतल्यावर पुण्यात कर्वेनगरला स्थायिक.

प्रार्थनास्थळे बंद असण्याबाबत साहित्यीकांची अन मान्यवरांची दुटप्पी भुमिका

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 24/10/2020 या दिवशी प्रकाशित केले.
प्रार्थनास्थळे बंद असण्याबाबत साहित्यीकांची अन मान्यवरांची दुटप्पी भुमिका आजच्या ऑनलाईन वर्तमानपत्रांत "नेमाडे-पठारेंसह 2 हजार मान्यवरांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले समर्थनाचे पत्र, (मंदीरे उघडण्याबाबतीत) श्रद्धांशी खेळणाऱ्या राजकारणावर घेतला आक्षेप" अशा अर्थाच्या बातम्या आलेल्या आहेत.

प्रकाश बाबुराव सरवदे..... तळेगावचे अथांग तळे

लेखक सतीश विष्णू जाधव यांनी बुधवार, 21/10/2020 या दिवशी प्रकाशित केले.
प्रकाश बाबुराव सरवदे..... तळेगावचे अथांग तळे २२.०६.२०१९ . काही व्यक्तिमत्व खूपच प्रभावी असतात, प्रथम भेटीतच भारावून टाकतात. मुंबई ते पंढरपूर सायकल सफरीत अशाच एका व्यक्तिमत्वाची भेट झाली.

OTT वरील पाहण्याजोग्या सिरीज /चित्रपट

लेखक महासंग्राम यांनी सोमवार, 19/10/2020 या दिवशी प्रकाशित केले.
लॉकडाऊनच्या काळात OTT वर बऱ्याच सिरीज/चित्रपटांनी धुमाकूळ घातला आहे, यातला काही कन्टेन्ट दर्जेदार होता तर काही अगदीच टाकाऊ. मला भावलेल्या काही सिरीज आणि चित्रपटांची यादी आणि माहिती थोडक्यात देतोय. तुम्हांला आवडल्या तर नक्की पहा. तुमच्याकडेही अजून काही पाहण्याजोग्या सिरीज आणि चित्रपटांची माहिती असल्यास खाली प्रतिसादामध्ये डकवा म्हणजे एक चांगली यादी होईल. SCAM 1992: The Harshad Mehta Story - SONY LIV : हर्षद मेहता हे नाव माहिती नाही असं होवूच शकत नाही. भारतात उदारीकरण सुरु होण्याच्या काळात झालेल्या त्याकाळातल्या सर्वात मोठ्या आर्थिक घोटाळ्याविषयीची हि सिरीज.

(आणखी काय हवं?) - अच्रत बव्लत

लेखक टवाळ कार्टा यांनी गुरुवार, 15/10/2020 या दिवशी प्रकाशित केले.
ढिश्क्लेमर - पोगो बघणार्यांसाठी नाही....नंतर बोंब मारु नये :D . . . . . . . . . . . . . . नशिल्या दिवसाची संध्याकाळची वेळ शुभ्र वाळूसोबत गुंजणार्या लाटा खिदळणारे ओठ आणि सूचक नजरा सोनेरी पाणी व शनेलचा सुगंध धुंद संगीताचा मंद आवाज "गरम सोबती" बरोबर आवडती "श्टेपनी" बोला आणखी काय हवं?

स्टँनली मिलग्राम ,आज्ञाधारकता आणि मानसशास्त्र

लेखक आदित्य कनोजे यांनी गुरुवार, 08/10/2020 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसिद्ध सामाजिक मानसशास्त्रज्ञ स्टँनली मिलग्राम यांनी १९६२ साली एक प्रयोग पूर्णत्वास नेला..जो समाजातील माणुसकीच्या वावराच्या वागणुकीचा एक्स-रे काढणार होता..ह्या प्रयोगाने नुसतं स्टँनली मिलग्रामचच आयुष्य बदललं नाही तर समूह मानसिकतेच्या संशोधनाच्या वाढीस चालना दिली..इतिहासाच्या घटनांना आणि त्यातील पात्रांना समजून घेण्यासाठी ह्या प्रयोगाने राजमार्ग दाखवून दिला. आता जरा प्रयोगाकडे येऊयात म्हणजे एकूण पाश्वभूमी समजून घेता येईल.प्रयोगात दोन व्यक्तींना निवडलं गेल.

एका नातवाची आजी....

लेखक Vivekraje यांनी शुक्रवार, 02/10/2020 या दिवशी प्रकाशित केले.
रोजची रात्री साडेआठची बस. या बसला शक्यतो रोज अप डाऊन करणारे, काही कॉलेजची मुलं अशी नेहमीची गर्दी. मुंबईत नसलो तरी आम्ही बस ने अप डाऊन करताना तसाच लोकलचा फील यायचा आम्हाला. कारण प्रत्येक बस ला वेगळा ग्रुप, वेगळी माणसं त्यामुळे आपली रेग्युलर बस चुकली की एकदम अनोळखी प्रदेशात आल्यासारखं वाटायचं. असंच त्या दिवशी माझी रोजची साडेसातची बस चुकली अन मी साडेआठच्या बस मध्ये बसलो. बस गच्च भरलेली घामाचा कोंदट वास , उन्हाळ्याचे दिवस त्यामुळे हवेतही उष्णता जाणवत होती. बस सुटायला थोडावेळ बाकी असताना एक आजी बसमध्ये शिरली, हातात छोटंसं गाठोडं , एक नायलॉनची पिशवी.

बळी तो कान पिळी

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी गुरुवार, 01/10/2020 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे एवढ्यात तीन बातम्या ऐकण्यात आल्या. दर्जेदार वृत्तपत्र आणि राष्ट्रीय चॅनलवरुन या बातम्या ऐकल्या असल्याने या अफवा नसाव्यात, त्यांत तथ्य जरुर असावं : बातमी क्रमांक एक : ‘तयार होऊ घातलेली करोनाची लस (अनेक असल्या तरी) जगातल्या काही श्रीमंत देशांनी आधीच बुक करुन ठेवल्या. म्हणून अशा काही लसींना अधिकृत मान्यता मिळताच त्या श्रीमंत देशांना आधी पुरवल्या जातील.’ विसनशील आणि गरीब देशांपर्यंत ही लस पोचायला म्हणून खूप उशीर होणार आहे. तोपर्यंत अनेक लोक आपला प्राण गमावू शकतात.

स्थलांतर..

लेखक Vivekraje यांनी गुरुवार, 01/10/2020 या दिवशी प्रकाशित केले.
भाकरी साठी शोधली चाकरी, चाकरीसाठी सोडलं गांव.. शहरात कुणी ओळखेना तरी , गावात राहायचं नाही राव.. रोजच्या साठी रोज कमवायचं, मिळेल खायला ते गोड मानायचं.. मजूर म्हणून असंच जगायचं, अन श्रीमंतीचं स्वप्न बघायचं.. थकलेलं मन रोज सांगायचं, एक दिवस मी मालक होईल.. माझ्या मालकीच्या गाडीतून माझ्या गावी परत जाईल.. तेव्हढ्यात कुठला आजार आला, धावणारा माणूस घरात कोंडला.. उद्योगधंदे बाजार बंद, अन वाहणारा रस्ता ओस पडला.. घरात खायला पुरणार किती, दुसरीकडं मागायचं किती.. आठवणीने परत गावच्या, मंद झाली होती मती.. जायला रस्ते भरपूर होते, पण साधन काही मिळणार नव्हते.. स्थलांतरित मजुरांचे हे दुःख कधी कुणा कळणार नव्हत