Skip to main content

समाज

सहानुभूती आणि प्रत्यक्ष कृती

लेखक लिखाळ यांनी शुक्रवार, 12/12/2008 00:42 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, लहानपणापासूनच आपण परोपकाराय पुण्याय वगैरे ऐकत आलेलो असतो. अगदी पाठ्यपुस्तकांतसुद्धा दुसर्‍याला मदत करुन मोठ्यांच्या कौतुकास पात्र ठरलेल्या मुलांच्या कथा आपल्यावर संस्कार व्हावा म्हणून दिलेल्या असतात. त्यामुळे दुसर्‍याला मदत करायची असते हे कुणी मुद्दामहुन शिकवण्याची गरज असते असे मला तरी कधी वाटले नसते. पण एक प्रसंग अचानक घडला की ज्यामुळे मला शिकवण आणि प्रत्यक्ष कृती यात काय फरक असतो ते समजले. मी शाळकरी असतानाचा प्रसंग आहे. अगदी लहान नव्हतो. दहावीत वगैरे असेन. गणपती उत्सवाच्या वेळी आम्ही काही मित्र गणपतीचे देखावे पाहायला गेलो होतो.

दोष कोणा द्यावा ?

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 08/12/2008 12:12 या दिवशी प्रकाशित केले.
वार :- रविवार वेळ :- संध्याकाळचे ७.०० - ७.१५ वाजलेले ठिकाण :- सोसायटिचे पार्किंग पात्रे :- अ, ब , क , ड (ड च्या हातात एक बाहुली), इ (सर्व वय वर्षे ४ ते ६ १/२ ) आणी तो (दूरवरुन आपल्या दुकानात बसुन खेळाचा आनंद लुटणारा) वेळ संध्याकाळची आणी अगदिच आळस दाटलेला, सोसायटित सुद्धा अगदि शांत शांत .... अशा वेळिच ति ४/५ लहानगी वेगवेगळे खेळ खेळुन मन रमवत होती. आधी ते "आयडॉल आयडॉल" खेळले, २ जण "जज" झाले २ जण "स्पर्धक" आणी एकजण झाली "महागुरु" खेळ अगदी छान रंगला होता.

सुमारांच्या तावडीत...

लेखक श्रावण मोडक यांनी शुक्रवार, 05/12/2008 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
अखेर एकदाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री (तसे हे पद केवळ राजकीय सोयीचेच, आवश्यक तर नाहीच) ठरले. शत्रूंने चढवलेल्या एका भीषण हल्ल्यातून देशाच्या आर्थिक राजधानीला सावरण्याची वेळ जेव्हा होती तेव्हाच ही राजधानी असलेले राज्य नेतृत्त्वहीन ठेवण्याची किमयाही देशाच्या राजकारण्यांनी साधून घेतली. मुंबईवरील, देशावरील हल्ल्यानंतरचा गेला आठवडा उबग आणणारा ठरला तो राजकारण्यांच्या, आणि केवळ त्यांच्याच नव्हे तर प्रशासकांच्याही, सुमारपणानेच गाजला. राज्यकर्त्यांची कोंडी कशी झाली होती त्याचे हे काही दाखले - १. एखाद हादसा - माजी उपमुख्यमंत्री आर. आर.

२४ X ७ वाहिन्यांच्या विरुद्ध हायकोर्टात जनहित याचिका

लेखक मोहन यांनी शुक्रवार, 05/12/2008 15:13 या दिवशी प्रकाशित केले.
संगीतकार जोडी विशाल - शेखर मधल्या विशालने २४ X ७ वाहिन्यांच्या विरुद्ध मुंबई हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल कराचे ठरवले आहे. मिपावर काही मंडळींची या आधी काही दिवस अश्या अगोचर वाहिन्यांच्या विरुद्ध मते वाचली . ज्यांना या जनहित याचिकेत सहभागी व्हायचे असेल त्यांच्या करता हा दुवा देत आहे. http://smallchange.in/ आपला मोहन

अहिंसावाद प्रश्नोत्तरे आणि उहापोह

लेखक कोलबेर यांनी शुक्रवार, 05/12/2008 09:20 या दिवशी प्रकाशित केले.
अहिंसावाद हिंसावाद ह्यांचा नको तितका उहापोह सध्या मिपावर चाललेला दिसतो हे मान्य असुनही काही गोष्टींचा खुलास करणे आवश्यक वाटल्याने हा प्रपंच. हिंसा/अहिंसा ह्यापैकी कुठल्याही तत्त्वाचा मी अभ्यासक नाही. मला ह्या दोन्हीविषयी जे अर्थ अभिप्रेत आहेत त्यातुन इथे लिहित आहे. गालावार डास बसलेला जाणवत असताना तो एका फटक्यात मारुन न टाकता उडुन जायची वाट बघणे असा काहीसा अहिंसावादाचा जो नेभळट अर्थ लावला जातो आहे तो मलातरी हास्यास्पद वाटतो. हिंसावादी असो अहिंसावादी असो कुणीही पटकन तो डास मारुनच टाकणार. असल्या शुल्लक घटनांमधुन कसल्याही तत्त्वाचा/विचारसरणीचा शिक्का कुणावरही लावता येणे शक्य नाही.

गांधीवाद्याची थप्पड

लेखक भास्कर केन्डे यांनी शुक्रवार, 05/12/2008 01:00 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या महाविद्यालयात अभियांत्रिकीव्यतिरिक्त अनेक सामजिक कर्यावर सुद्धा उहापोह होत असे. वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे अशा उपक्रमांना सुद्धा खेळाच्या स्पर्धांप्रमाणेच भरगोस प्रतिसाद मिळे. शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, गांधीजी, डॉ सर्वपल्ली राधकृष्णन यांच्या जयंत्या आम्ही वादविवादासारख्या स्पर्धा भरवून साजर्‍या करत असू. या सगळ्या कार्यक्रमांमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण वल्ली होता जीवन जोशी, आमचा एक वर्गमित्र. गांधींविषयीची त्याची भक्ती सुपरिचित होती. कट्टयांवरच्या गप्पा असोत की चर्चासत्रे, तो मोठ्या चिकाटीने आणि विश्वासाने गांधीवादी विचारांचे मुद्दे मांडत असे.

नगरसेवक आमदार खासदारांना खुषखबर!

लेखक सुनील मोहन यांनी गुरुवार, 04/12/2008 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
निवडून आलेले अधिकारी, म्हणजेच नगरसेवक, आमदार, खासदार यांच्यावर भ्रष्टाचार रोधक कायदा १९८८ (prevention of corruption act 1988) याअन्वये खटला भरता येत नाही असे न्यायमूर्ती पी.एच.माळी यांनी निकालपत्रात म्हणत मुंबईतील महालक्ष्मी इथले नगरसेवक चंद्रकांत पुगावकर यांची मुक्तता केली.नगरसेवक पुगावकर यांच्यावर चार हजार रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली खटला सुरु होता. १९८८ च्या या कायद्याखाली खटला भरला जाणारी व्यक्ती ही नेमणूक केली गेलेली असली पाहिजे, निवडून आलेल्या व्यक्तीवर असा खटला भरता येत नाही.

अजुन मी...

लेखक राघव यांनी बुधवार, 03/12/2008 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईवर झालेल्या हल्ल्याच्या दिवसापासूनच खूप अस्वस्थ होतो. काहीतरी लिहावे असे सारखे मनात येई पण शब्दच सुचत नव्हते. शेवटी काल ते स्फुरले अन् खालील कविता झाली. पण वाचून झाल्यावर माझेच मला फार विषण्ण वाटले. श्रावणदांना विचारले कि काही बदल करू का म्हणून, पण त्यांनीही तशीच असू देत असे सांगीतले आणि काही मौलिक सुचनाही केल्या.

अनाम वीरा ...

लेखक मैत्र यांनी मंगळवार, 02/12/2008 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
काल झी वर लहान मुलं अतिशय शांत आणि गंभीर पणे देशभक्तीची गाणी सुरेख म्हणत होती... आणि त्यातच एक होतं - अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनांत तिथे चिरा ना कुणी बांधिला पेटली न वात... कुसुमाग्रजांचेच शब्द ते! साधे सुधे नव्हेत. पण अजूनही हेच घडतं आणि आजही घडते आहे. गेल्या काही दिवसातल्या प्रतिसादात सर्व शहीदांना अभिवादन करताना मला पुन्हा पुन्हा वाटत होतं की तीन मोठ्या अधिकार्‍यांचा जो राष्ट्रीय गौरव होतो आहे त्यात कदाचित बाकी लहान पदावरच्यांवर थोडा अन्याय तर होत नाही?

मुख्यमंत्र्यांचे संतापजनक वक्तव्य.

लेखक सुनील मोहन यांनी मंगळवार, 02/12/2008 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
शहीद मेजर संदीप उन्नीकॄष्णन यांचे घर नसते तर तिथे कुत्रेही फिरकले नसते. असे निर्बुद्ध आणि चीड आणणारे वक्तव्य केरळचे मुख्यमंत्री श्री. अच्युतानंद यांनी केले आहे. मूळचे केरळचे सुपुत्र असणारे मेजर उन्नीकॄष्णन यांच्या अंत्यसंस्काराला अच्युतानंद उपस्थित राहिले नव्हते. त्यानंतर दोन दिवसांनी ते उन्नीकॄष्णन यांच्या परिवाराला भेटण्यासाठी त्यांच्या बेंगलुरु स्थित निवासस्थानी पोहोचले. तत्पूर्वी उन्नीकॄष्णन यांच्या घराची सुरक्षारक्षक आणि श्वानपथकामार्फत तपासणी करण्यात आली होती.