बेडर!
मध्ये माझ्या बाबांचे, ते शाळेत असतानाचे मराठी पाठ्यक्रमिक पुस्तक मला सापडले. त्यांनी ते जपून ठेवले होते. त्या वेळेस मी बराच निराश मनस्थितीत होतो. शिक्षण पूर्ण झालेले होते, पण पुढे काय करावे ते समजत नव्हते. कुणी मार्गदर्शन करणारा भेटत नव्हता. त्यात लोकांचे टोमणे ऐकून जीव विटून जायचा. अशा मनस्थितीत ते पुस्तक हाती पडले. अन त्यातल्या बेडरच्या व्यक्तिचित्राने माझा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला असे म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही. त्याचीच ही संक्षिप्त ओळख..!
सुप्रसिद्ध ब्रिटिश वैमानिक, डग्लस बेडर चा जन्म १९१० सालाचा.
मिसळपाव