Skip to main content

समाज

सरकारी इतमामात मरण.

लेखक रामदास यांनी मंगळवार, 02/12/2008 09:29 या दिवशी प्रकाशित केले.
त्या काळरात्रीची ही काही प्रकाश(?)चित्रे. आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांचे सकारी इतमामात दहन होणार नाही पण मरण मात्र सहज मिळेल सरकारी इतमामात. हे सर्व फोटो मिपा सदस्य आणि एक पत्रकार श्री उदय तानपाठक यांच्या मदतीने. (मा.

या १७ अनामिक बळींची माहिती त्यांच्या कुटुंबियांना कशी मिळेल?

लेखक बहुगुणी यांनी मंगळवार, 02/12/2008 07:58 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या अनामिक आणि बेवारस अवस्थेत मुंबईत शवागारात पडून असलेल्या या अतिरेक्यांच्या १७ बळींचे चेहेरे त्यांच्या नातेवाईकांपर्यंत कसे पोहोचू शकतील? आणि फक्त याविषयीची बातमी प्रसिद्ध करून मटा का थांबले आहे? त्या वृत्तपत्राला (किंवा नको तेंव्हा investigative journalisitc spirit दाखविणार्‍या वाहिन्यांना) ही छायाचित्रे घेण्यास व प्रसिद्ध करण्यास काही कायद्याच्या अडचणी आहेत काय? मुंबईतील कोणी मिपा कर त्या शवागारात जाऊन त्यांच्या चेहेर्‍यांची छायाचित्रे घेऊन प्रसिद्ध करू शकतील का?

थोडे डोके थंड ठेवून पाहिल्यानंतर... प्रतिसाद आणि माझे मत

लेखक श्रावण मोडक यांनी रविवार, 30/11/2008 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
दोन भागांतील या लेखावर आलेल्या प्रतिसादांनंतर तो धागा बराच खालवर लांबत गेल्याने हा स्वतंत्र धागा केला आहे. मूळ लेख आणि २ व चर्चा लेखावर प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचे आभार. प्रतिसादांचे स्वरूप साधारणपणे मुद्देसूद लेखन येथून सुरू होणारे आहे.

पाकिस्तानी सैन्य भारतीय सीमेवर.

लेखक बबलु यांनी रविवार, 30/11/2008 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच आलेली म.टा. च्या संस्थळावरील मुख्यपृष्ठावरील बातमी... अफगाणिस्तानच्या सीमेवर असलेले एक लाख सैन्य हलवून ते भारताच्या सीमाभागाजवळ तैनात करणे आवश्यक असल्याचे पाकिस्तानने नाटो आणि अमेरिकन लष्कराला कळवले आहे. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3775546.cms

सलाम!

लेखक आपला अभिजित यांनी रविवार, 30/11/2008 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
स्वर्गात अतिमहत्त्वाची सभा भरली होती. विषय होता, वाढती गुन्हेगारी आणि दहशतवाद. विष्णूचे दशावतार पूर्ण झाल्यानंतर राक्षसांचा दहशतवाद पुन्हा वाढला होता. अतिमहत्त्वाच्या ठिकाणांसाठी, सर्वसामान्य ठिकाणांसाठी, असे वेगवेगळे दहशतवादी गट राक्षसांनी स्थापन केले होते. त्यांनी सगळीकडे उच्छाद मांडला होता. स्वर्गातल्या कुणालाच पहिल्यासारखे सुरक्षित वातावरण जाणवत नव्हते. अप्सरांचे अपहरण, देव-देवतांचा छळ, शुभकार्यात बाधा, काय वाटेल तसा धुमाकूळ राक्षस घालत होते. राजाधिराज इंद्रानं आणीबाणीची स्थिती ओळखून सर्वांशी सल्लामसलत करण्यासाठी आजची बैठक बोलावली होती.

गोंधळ

लेखक ऋषिकेश यांनी शनिवार, 29/11/2008 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
होतोय गोंधळ.. नक्की होतोय गोंधळ! कुणाचा? कुणा कुणाचा? माझा! नक्कीच होतोय गोंधळ!! समोरून अनोळखी येताच मी आतून भेदरतो, तोंडदेखलं हसतो अंदाज घेतो लपवलेल्या बंदुकीने हा घालणार तर नाहि ना गोंधळ!! समोरून ओळखीचा येताच मी वरून सावरतो, आतून बावरतो अंदाज घेतो याच्याकडच्या एखाद्या बातमीने उडणार नाहि ना गोंधळ!! समोरच ते बाळ आतून बाहेरून कीती निश्चिंत आहे घरातून आक्रोश याच्या बालपणातच उडाला नसु दे रे देवा एक भयंकर गोंधळ!! कालच बघितलं होतं तिला झाडाच्या पाठी त्याच्याबरोबर त्याला डोळ्यांतून वेधणारी ती आज शोधतेय जमवतेय आपल्याच हृदयाचे तुकडे, ज्यात मावत नाहिये गोंधळ! तो बघा .... "तरी सांगत होते..

माझ्या मनातले!

लेखक अनामिका यांनी शुक्रवार, 28/11/2008 23:14 या दिवशी प्रकाशित केले.
४८ तास सुरु असलेले दुष्टचक्र शेवटि संपले म्हणायचे!!!!!!!!!! अजुन संपले नाही असे समजते आहे? ताज मधिल अतिरेक्याचा खात्मा करुन भारतिय सैन्याने ,एनएसजी कमांडोजनी मुंबईला वाचवले असेच म्हणायला हवे. काल शोभा डे पोटतिडकीने या निष्क्रिय सरकारला शिव्यांची लाखोली वहात होती तेंव्हा सहज मनात आल, आता या सगळ्याची आठवण झाली का?

डोके थंड ठेवून पाहिल्यानंतर...२

लेखक श्रावण मोडक यांनी शुक्रवार, 28/11/2008 17:42 या दिवशी प्रकाशित केले.
(आधीच्या भागात – मुंबईवरील हल्ल्याने पुढे येत असलेल्या नव्या परिस्थितीचे आजवरचे आकलन या वरवरच्या मुद्याला धरून तयार झाले आहे, त्याच्या खोलात जाण्याचा विचार याआधी झाला नाही, कारण या वरवरच्या आकलनापोटी हा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न मानून तो सोडवता येईल असा एक भ्रम तयार झाला होता...) हा युद्धाचा नवा प्रकार आहे. मुंबईच्या हल्ल्यातून या संघटनांच्या हाती एक जबरदस्त प्रभावी हत्यार आले आहे. कसे ते पाहू. १. याआधी होणाऱ्या "दहशतवादी" हल्ल्यांसाठी संबंधित संघटनांना काटेकोर आणि तपशीलवार नियोजन, साधनस्रोतांची उपलब्धता आणि त्यासाठी आवश्यक संघटन उभे करावे लागत असे.