Skip to main content

समाज

डायरेक्ट ढगात जातील . . .

लेखक काहीतरीच यांनी मंगळवार, 23/12/2008 या दिवशी प्रकाशित केले.
अरे मुर्खान्नो,अरे लुच्चान्नो, बस करा तुमचे राजकारण, तुमच्या या हलगर्जी पनामुले, सामन्यांचे होत आहे मरण . . . खुर्चीच्या मागे लागुन-लागुन भ्रष्टाचाराचा केला कलस, अरे आतातरी सुधरा अन झटकून टाका आलस . . . आरोप-प्रत्यारोप करता-करता तुमचा वेळ जातो, कोणी जमीन, कोणी पैसे, तर कोणी चारा खातो . . . फार झाला गांडूपणा, फार झाला अत्याचार, पाकिस्तान समोर वाकू नका, करा थोडा विचार . . . तुम्ही वोटांच्या मागे असताना, भाडखाऊ बोट करुन आले, आमच्या या मुम्बापुरिला, त्यांनी गालबोट लावले . . . लाखो संकटे आलीत, तरी भारतवासी समर्थ राहतील, पण, यापुढे भ्रष्टाचारी आणि आंतकवादी मात्र डायरेक्ट ढगात जातील . .
Taxonomy upgrade extras

!! चांडाळ चौकडी !!

लेखक अनिल हटेला यांनी मंगळवार, 23/12/2008 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी !! मिपा म्हणजे आमचा पडीक अड्डा झालाये...बॉस किवा कलीग असोत,सारखे विचारत असतात की काय करत असतोस दिवसभर ह्या साइटवर....(हे लोक अमराठी असण्याचा फायदा की मी नेमका काय करतोये ते कुणालाच कळत नाय ..शिवाय सगळ देवनागरी ह्या लोकाना वाचता येतं पण समजत काहीच नाय....) तर मंडळी प्रत्येकाच्या आयुष्यात काही खास मित्र असतात..तसे आम्हाला ही ४ चांगले मित्र लाभले.सारे आमच्या ग्रुपला आवर्जुन चांडाळ चौकडी म्हणत...आणी नावाप्रमाणेच आम्ही होतोही (आहे म्हणनं जास्त सयुक्तीक ठरेन) तर ह्या मित्राशी आज तुमची ओळख करून द्यावी म्हटलं.. १)राजेश पाटीलः हे माननीय महोदय ९वी फेल..पण शिक्षका

घरटे -१ : सत्यकथेवर आधारित!

लेखक चेतन१२३प यांनी सोमवार, 22/12/2008 या दिवशी प्रकाशित केले.
डिसेंबरच्या गुलाबी थंडीमध्ये सकाळचे कोवळे ऊन या जठर शरीराने खाण्यात काही औरच मजा! त्यातही लाडक्या सुनेच्या हातचा कडक, तजेलदार चहा आणि वर्तमानपत्र गॅलरीमध्ये अगदी हातामध्ये आणून मिळावे, म्हणजे माझ्यासारख्या भाद्रपदी विचार करणाऱ्या रिटायर्ड माणसाला स्वर्गसुखच म्हणा. किंबहुना त्याहूनही अधिक! तसा माझ्या सौच्या हातचा चहादेखील अगदी कडक असतो बरका! पण, सुनेच्या हातच्या चहाच्या कडकपणामध्ये "आदरणीयं श्वशुरम ।" ही भावना जाणवते तर आमच्या हिच्या हातच्या चहाच्या कडकपणामध्ये "हाताचा" कडकपणाच अधिक वाटतो.

मदत हवी आहे.

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 19/12/2008 या दिवशी प्रकाशित केले.
माझा एक लंगोटीयार सध्या पुण्यातून मनीला (फिलीपाईन्स) इथे स्थलांतरित झालाय. सध्या तो एकटाच तिकडे गेलाय. थोड्याच दिवसात घर शोधून कुटूंब स्थलांतरित करेल. मिसळपावकरांपैकी कोणी मनीला इथे आहेत का? माझ्या मित्राला घर शोधायला मदत करु शकेल अशी माहीती कोणाला असल्यास कृपया व्य. नि. तून संपर्क साधावा. धन्यवाद! चतुरंग

हारापरी हौतात्म्य हे ज्यांच्या गळा साजे

लेखक सर्वसाक्षी यांनी शुक्रवार, 19/12/2008 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक ९ ऑगस्ट १९२५ रोजी ’८ डाऊन’ गाडीवर लखनौ पासोन सुमारे चौदा मैल अंतरावर काकोरी ते आलमनगर दरम्यान सायंकाळी साडेसातच्या सुमारास हिंदुस्थान प्रजासत्ताक संघटनेच्या १० धाडसी शिलेदारांनी दरोडा घालुन सरकारी तिजोरी लुटली आणि साम्राज्य हादरले. हा घाला गाडीतुन वाहुन नेल्या जाणाऱ्या तिजोरीवर नव्हता तर ब्रिटीश साम्राज्यावर होता. या धाडसी क्रांतीकारकांनी जणु सरकारी खजिना लुटुन सरकारला आव्हान दिले होते. हा दरोडा अत्यंत विचार्पूर्वक ठरविलेला व सुनियोजित होता. एकदा हुतात्मा पंडीत रामप्रसाद बिस्मिल शाहजहानपूरहुन लखनौला जात असताना वाटेत त्यांनी या गाडीत सरकारी खजीना चढवताना पाहिला.

गांधीवाद आणि मराठी साहित्य !

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी गुरुवार, 18/12/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाववर सध्या वेगवेगळे 'वाद' गाजत आहेत. दहशतवाद, गांधीवाद, अवांतरवाद इत्यादी इत्यादी. सध्या या विचारांनी मिसळपाववरील जनजीवन ढवळून निघाले आहे आणि त्याचा परिणाम मिपावर वावरणार्‍या मंडळींवर होतो, या सर्व विचारांचा परिणाम येथे वावरणार्‍यावर झाला नाही तर नवल वाटावे. आम्हालाही साहित्यातील गांधीविचारांनी शीळ घातली. गांधीविचारांच्या चर्चेवरुन असे दिसते की भारतीय समाजमनावर म. गांधीच्या विचारांचा परिणाम झालेला आहे आणि ती एक मोठी घटना मानलीच पाहिजे. भारतीय स्वातंत्र्याला नवचैतन्य देण्याचे श्रेय म. गांधीजींनीचा द्यावे लागेल. म. गांधींनी आपली नीतिमुल्य निश्चित केली होती.

गांधी.

लेखक कलंत्री यांनी रविवार, 14/12/2008 या दिवशी प्रकाशित केले.
वाघ म्हटला तरी खातो वाघाबो म्ह्टला तरी खातो तर वाघ्याच का न म्हणावं? एक वाक्प्रचार. सध्या बंगालच्या वाघीणी या लेखाद्वारे आम्हाला गांधीवर इतरत्र चर्चा करा असे सांगितल्यामुळे हा वेगळा पंक्तिप्रपंच. आता मुळ विषयाकडे. गांधीबद्दल सरळसरळ चर्चा करण्यासाठी हा लेख सुरु करत आहे. काही मुद्दे मांडत आहे.

बंगालच्या वाघिणी

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 14/12/2008 या दिवशी प्रकाशित केले.
स्त्री शक्तिचे प्रतिक असलेल्या देवीची अनेक रुपे आहेत, अनेक अवतार आहेत. मात्र बंगालच्या मुला मुलींना भावलेले देवीचे रुप म्हणजे कालिमाता किंवा दुर्गामाता - हातात शस्त्र घेऊन दैत्याचा वध करणारे हाती शस्त्र धारण केलेले रौद्र रुप. मात्र क्रांतिपर्वात याच देवींचे बालिकारुप पाहायला मिळाले. सरकारी अधिकाऱ्यांनी वा मानकऱ्यांनी उन्मत्त होऊन जनतेवर अत्याचार करायचे हा जणु इंग्रजांचा शिरस्ताच होता. हिंदुस्थानात यायचे ते सत्ता आणि वैभव उपभोगायलाच, जणु आपल्या आजवरच्या कर्तबगारीचा राणीने केलेला सन्मान! मात्र विसाव्या शतकात क्रांतिपर्व उजाडले आणि चित्र पालटले.

-सकाळवरील "गुगलच्या' जाहिरातींबद्दल निवेदन

लेखक ईसकाळ यांनी शनिवार, 13/12/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मागील एक दोन दिवसांत "ई-सकाळ' वाचत असताना जगातील काही भागातील काही वाचकांच्या पाहण्यात आक्षेपार्ह जाहिराती आल्या. मूळच्या "गुगल ऍडसेन्स'मार्फत प्रसिद्‌ध करण्यात येणाऱ्या या जाहिराती आमच्या वाचकांच्या सूचनेनंतर काढून टाकण्याचा निर्णय "ई सकाळ' व्यवस्थापनाने घेतला असून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात आली आहे. मुळात आक्षेपार्ह जाहिराती प्रसिद्ध करणे ही गोष्ट सकाळ किंवा "ई-सकाळ'च्या जाहितरातविषयक धोरणात नाही असे आम्ही नम्रपणे सांगू इच्छितो. म्हणूनच या सारख्या जाहिराती भविष्यात "ई-सकाळ'वर झळकणार नाहीत या बाबत अधिक काळजी घेण्याचा ई-सकाळचा प्रयत्न राहिल.

सहानुभूती आणि प्रत्यक्ष कृती

लेखक लिखाळ यांनी शुक्रवार, 12/12/2008 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, लहानपणापासूनच आपण परोपकाराय पुण्याय वगैरे ऐकत आलेलो असतो. अगदी पाठ्यपुस्तकांतसुद्धा दुसर्‍याला मदत करुन मोठ्यांच्या कौतुकास पात्र ठरलेल्या मुलांच्या कथा आपल्यावर संस्कार व्हावा म्हणून दिलेल्या असतात. त्यामुळे दुसर्‍याला मदत करायची असते हे कुणी मुद्दामहुन शिकवण्याची गरज असते असे मला तरी कधी वाटले नसते. पण एक प्रसंग अचानक घडला की ज्यामुळे मला शिकवण आणि प्रत्यक्ष कृती यात काय फरक असतो ते समजले. मी शाळकरी असतानाचा प्रसंग आहे. अगदी लहान नव्हतो. दहावीत वगैरे असेन. गणपती उत्सवाच्या वेळी आम्ही काही मित्र गणपतीचे देखावे पाहायला गेलो होतो.