Skip to main content

पहिला अनुयायी (बाबागिरीच्या साबणाचा गिऱ्हाइक) असा मिळवावा

लेखक राजेश घासकडवी यांनी रविवार, 22/08/2010 01:26 या दिवशी प्रकाशित केले.

श्री. श्री. अदितीअम्मा देवी यांनी 'पहिला अनुयायी कसा मिळवावा' यावर काथ्याकूट टाकला, त्यावर खूप मोठी चर्चा झाली, श्रद्धा, अंधश्रद्धा, नास्तिकपणा वगैरे विषय चघळले गेले. 'कुंभार थोडे गाढवं फार, त्यामुळे हे सोपं असतं' किंवा 'अमुक बाबाला नशीबाने असे अनुयायी मिळाले' वगैरे आख्यायिका झाल्या. तरी अदितीच्या 'पहिला अऩुयायी कसा मिळवावा?' मूळ प्रश्नाला उत्तरं मिळालीच नाहीत. ती देण्याचा हा प्रयत्न. तो धागा जवळपास 200 पर्यंत गेल्याने इथे त्याची नवीन सुरूवात करतो आहे. पामरावर श्री. श्री.

शुभकार्य..

लेखक वारा यांनी शनिवार, 21/08/2010 13:47 या दिवशी प्रकाशित केले.

एक शुभकार्य थोड्याच दिवसात येउ घातलेल आहे. यानिमीत्ताने काहीतरी दान धर्म करावा अशी इच्छा मनात घर करु लागली आहे. त्याचबरोबर हे दान धर्म सर्वसमावेशक असाव, व कुठल्या स्पेसिफीक वर्गाला किंवा व्यक्तीला याचा लाभ मिळणे मर्यादीत न राहता बहुजनास लाभ मिळावा अशी इच्छा आहे.

माझ्या मते काही पर्याय सुचत आहेत ते खालीलप्रमाणे,

१) स्मशानभुमी व तेथील जागेमधे गरज असणारे एखादे उपकरण. उदा. पाण्यासाठी कुलर, लाकडे वाहण्यासाठी ट्रॉली, ई.
कारण : या जागी येण्याचा योग कधी येतो हे सर्वांना माहीती आहेच, अशा प्रसंगी एखादी गोष्ट मिळाली नाही तर लोकांना मनस्ताप फार होतो.

राजीव'जींना ६६व्या जयन्तीनिमित्त विनम्र अभिवादन! ..... WE STILL MISS YOU..~~ RAJEEV'JI! LOVE YOU!

लेखक मृगनयनी यांनी शुक्रवार, 20/08/2010 18:01 या दिवशी प्रकाशित केले.

~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~

आज २० ऑगस्ट, २०१०

राजीव'जी, तुमच्या ६६व्या जन्मदिनानिमित्त तुम्हाला विनम्र अभिवादन!

आज तुम्ही असता.... तर देशाचे चित्र कदाचित वेगळे असते! ......

WE MISS YOU!

भटकंती झाली सफल

लेखक सुनिल पाटकर यांनी गुरुवार, 19/08/2010 15:29 या दिवशी प्रकाशित केले.

या लेखातून आंबिवली गणी आदिवासी वाडीचे दर्शन मी तुम्हाला घडवलं पाणी, रस्ता, वीज अशा मूलभूत सुविधांपासून दूर असलेल्या महाड तालुक्‍यातील आंबिवली येथील गणी आदिवासी वाडीला अखेर प्रकाशाचा किरण दिसला, तो शेअर संस्थेच्या माध्यमातून. 1स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रथमच या गावाला विकासाचा प्रकाश दिसला. सरकारी अधिकाऱ्यांचे पाय या वाडीला लागले.

शिवाजी महाराज

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी मंगळवार, 17/08/2010 14:57 या दिवशी प्रकाशित केले.

ह्या शुक्रवारी वडिलांच्या शाळेत गेलो होतो .
तिथे पोरांना इंटरनेट शिकवले
मस्त मजा आली ..

मी त्यांना गुगलचा उपयोग सांगितला आणि जेव्हा मी विचारले तुम्हाला काय शोधायला आवडेल ...
पाहिलं नाव होत ... शिवाजी महाराज

खळ्ळ खटॅक

लेखक तिमा यांनी सोमवार, 16/08/2010 20:49 या दिवशी प्रकाशित केले.

बाबा मोबाईलवर कोणाचे तरी डॅमेजिंग एक्झरसाईज घेताहेत. आई मोबाईलवर गॉसिप करत खिदळते आहे. सोनु वर्तमानपत्र वाचायचा प्रयत्न करतो आहे.

सोनु : बाबा बाबा, खळ्ळ खटॅक म्हणजे काय ?

बाबा : अरे, व्हिडिओमधे चेहेरा दाखवू नका म्हणजे झालं तर. बाकी साहेब सांभाळून घेतील.

सोनु : आई, खळ्ळ खटॅक मंजे काय ?

आई : ते तुझ्या बाबांना विचार रे! अगं, तर मी काय म्हणत होते ? .......

सोनु : बाबा सांगाना ! (तेवढ्यात बाबांचा फोन संपतो)

बाबा : हं, सोन्या, मी सांगतो हं! कांच फुटली की आवाज कसा येतो माहिती आहे ना ? तोच तो आवाज.

पाकिस्तानात पुराला भारतच जबाबदार आहे (?).

लेखक संजयशिवाजीरावगडगे यांनी सोमवार, 16/08/2010 13:24 या दिवशी प्रकाशित केले.

पाकिस्तानात पुराला भारतच जबाबदार आहे (?). भारतानेच सतलज आणि बियास या नद्यांमधून जास्त झालेले पाणी सोडले. आता मदत देऊन भारत जखमेवर मीठ चोळत आहे, असा फालतुपणा पाकिस्तानातील वर्तमानपत्रांनी सुरू केला आहे.

भाषाभान : पुस्तक परिचय

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 15/08/2010 19:07 या दिवशी प्रकाशित केले.

'भाषाभान' या डॉ. नीलिमा गुंडी यांच्या पुस्तकात भाषा आणि संस्कृती यांविषयीच्या मार्मीक निरीक्षणांवर आधारीत काही ललित लेख आहेत. 'भाषाभान' मध्ये ललित आणि वैचारिक स्वरूपाचे लेख समाविष्ट केले आहेत. भाषेविषयीचे भान धारदार करण्याचे काम या लेखांद्वारे होते. यातील डॉ. अशोक रा. केळकर आणि डॉ. नागनाथ कोतापल्ले या दोन जेष्ठ नामवंत अभ्यासकांच्या यातील मुलाखती विचारांना चालना देणार्‍या आहेत.