राजीव'जींना ६६व्या जयन्तीनिमित्त विनम्र अभिवादन! ..... WE STILL MISS YOU..~~ RAJEEV'JI! LOVE YOU!
राजीव'जी, तुमच्या ६६व्या जन्मदिनानिमित्त तुम्हाला विनम्र अभिवादन!
आज तुम्ही असता.... तर देशाचे चित्र कदाचित वेगळे असते! ......
WE MISS YOU! In reply to माणूस अशा पद्धतीने जायला नको by बिपिन कार्यकर्ते
In reply to माणूस अशा पद्धतीने जायला नको by बिपिन कार्यकर्ते

In reply to देशाच कस चित्र कस असत ते by आनंद
In reply to देशाच कस चित्र कस असत ते by आनंद
In reply to विनम्र अभिवादन! फोटु अंमळ by परिकथेतील राजकुमार
In reply to शीर्षकात STILL या शब्दाची by मेघवेडा
In reply to शीर्षकात STILL या शब्दाची by मेघवेडा
In reply to शीर्षकात STILL या शब्दाची by मेघवेडा
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to लहानपणी मी आकाशात एखादे विमान by मदनबाण
In reply to लहानपणी मी आकाशात एखादे विमान by मदनबाण
In reply to राजीव"जी" by मिसळभोक्ता
In reply to हो तर हो तर! by हुप्प्या
In reply to हो तर हो तर! by हुप्प्या
In reply to कसे काय? by क्लिंटन
In reply to संगणक , मारुती , टेलेकॉमचे by शिल्पा ब
In reply to हे बरे आहे by मिसळभोक्ता
In reply to संगणक , मारुती , टेलेकॉमचे by शिल्पा ब
In reply to देवीलाल by हुप्प्या
काँग्रेसने (होय तीच ती पार्टी जिने भारताला आधुनिक युगात नेले!) ह्याचे समर्थन घेतलेच की हो!तसाच संधीसाधूपणा सगळ्या पक्षांनी कधीनाकधी केलेला आहे. भाजपने अशा किती पक्षांचे समर्थन घेतले आहे याची गणतीच नाही.
देवीलाल पाण्यातली वीज काढून घेतली म्हणू शकणारा मूर्ख असेलही पण दुसरी अशी शक्यता आहे की त्याला खात्री होती की जनता मूर्ख आहे आणि आपण असले काही बोललो तरी ते लोकांना पटेल आणि रुचेल.अशाच लोकांच्या सान्निध्यात संगणक आणि टेलिकॉम क्षेत्रांमध्ये नवे बदल घडवून आणणे अजिबात सोपे नव्हते.देवीलाल सारखे बिनडोक नेते याविरूध्द राळ उठविणार आणि त्याची किंमत कॉंग्रेस पक्षाला मतांच्या स्वरूपात द्यावी लागणार हे उघडउघड दिसत असूनही राजीवजींनी हे निर्णय पुढे रेटले. याच देवीलालांच्या लोकदलाने १९८७ मध्ये हरियाणा विधानसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसचा ऐतिहासिक पराभव केला. अर्थात त्यामागे पंजाब प्रश्न आणि राजीव-लोंगोवाल करार आणि त्यात हरियाणावर झालेला कथित अन्याय ही कारणे जरूर होती पण देवीलालांनी राजीवजींविरूध्द अशा प्रश्नांवरून (आणि कोणताही पुरावा नसताना बोफोर्स प्रश्नावरून) उठवलेली राळ हे ही एक कारण होतेच. राजीवजींनी बन्सीलालसारख्या गणंगाला हरियाणाचे मुख्यमंत्री केले याचे अजिबात समर्थन नाही पण त्याचबरोबर भाजपने त्याच बन्सीलालला पुढे पाठिंबा दिला याचेही समर्थन होऊ शकत नाही. १९८७ मध्ये याच देवीलाल या बिनडोक माणसाला भाजपने पाठिंबा दिला होता. सुषमा स्वराज आणि सूरज भान हे भाजपचे ज्येष्ठ नेते देवीलाल यांच्या मंत्रीमंडळात मंत्रीपण होते. सांगायचा मुद्दा हा की अशा राजकिय वातावरणात आपल्याला मतांच्या स्वरूपात किंमत चुकती करावी लागणार आहे याची पुरेपूर जाण असूनही संगणक आणि टेलिकॉम क्षेत्रात बदल पुढे रेटणे ही गोष्ट साधी नव्हती. त्याचे काहीच श्रेय राजीवजींना नाही का? की केवळ ’राजीव गांधी’ हे नाव धारण केल्यामुळे त्यांना देय असलेले कोणतेच श्रेय द्यायचे नाही आणि कोणताही पुरावा नसताना बोफोर्स प्रकरणी राजीवजींनी पैसे खाल्ले असा निर्णय देऊन टाकायचा याला पूर्वग्रहदूषित दृष्टीकोन सोडून दुसरे काय म्हणता येईल?
जशी प्रजा तसा राजा असा लोकशाहीचा नियमच आहेया वाक्यासंबंधी दोन मुद्दे निघतात. १. आपली प्रजा संगणक आणि टेलिकॉम क्षेत्रातील बदल समजून घ्यायच्या परिपक्व अवस्थेत राजीवजींच्या पंतप्रधानपदाच्या कारिकिर्दीत नव्हती हे तर उघडच आहे. तरीही राजाकडे भविष्याची काहीतरी दृष्टी होती हे अमान्य कसे करता येईल? २. तुम्ही भाजप समर्थक आहात का ते माहित नाही. अनेकदा भाजप समर्थकांचे मत असते की १९९८-९९ मध्ये जनता परिपक्व होती कारण त्यांनी आम्हाला निवडून दिले.पण तीच जनता २००४-०९ मध्ये अपरिपक्व झाली आणि you get a government you deserve in a democracy असे त्यांचे मत असते. म्हणजे निवडणुकींचे निकाल आपल्याला अनुकूल झाले तर जनता चांगली आणि निकाल आपल्याविरूध्द लागला तर तीच जनता वाईट कशी? मग केवळ अशाचवेळी ’जशी प्रजा तसा राजा’ हे म्हणणे दुटप्पीपणा नाही का? क्लिंटन
In reply to प्रतिसाद by क्लिंटन
In reply to देवीलाल पुराण by हुप्प्या
राजीवजी वरुन अलगत टपकले म्हणून आणि सॅम पित्रोडाशी मैत्री वगैरे गोष्टीमुळे हे घडले असावे.मी अमेरिकेत असताना माझ्या प्राध्यापकांचे सत्या एन. अतलुरी हे आर्यव्हाईन येथील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया येथील ज्येष्ठ प्राध्यापक हे मित्र-सहकारी होते.एका कॉन्फरन्सदरम्यान त्यांनी माझ्या प्राध्यापकांना आणि त्यांच्या सगळ्या विद्यार्थ्यांना हॉटेलमध्ये डिनरसाठी बोलावले होते.त्यावेळी प्रा.अतलुरींना राजीव गांधींनी १९८८ मध्ये भारताला ’व्हिजन २०००’ साठी विशेष सल्लागार म्हणून बोलावून घेतले होते हे स्वत: अतलुरींनी बोलता बोलता आम्हाला सगळ्यांना सांगितले. वरील दुव्यावर प्रा.अतलुरींचा सीव्ही आहे आणि आधुनिक काळातील ऋषि हेच विशेषण त्यांना लागू पडेल हे त्यांच्या सीव्हीवर एक नजर फिरवली तरी आपल्या लक्षात येईल. आपल्याला वाचायला कंटाळा येतो पण अतलुरींच्या achievements संपतच नाहीत. त्यावेळी स्वत: अतलुरींनी राजीव गांधींना भविष्यकाळाचा दृष्टीकोन होता हे सांगितले. सॅम पित्रोदा हे नाव आपल्याला वर्तमानपत्रांमुळे माहित झाले. सत्या अतलुरी हे नाव मला स्वत: अतलुरींना भेटेपर्यंत माहित नव्हते आणि मिपावरील कोणालाही ते नाव आधी माहिती असायची शक्यता फारच थोडी आहे. अशा अनेक वेगवेगळ्या मोठ्या लोकांशी सल्लामसलत करून त्यांच्या सल्ल्याप्रमाणे पावले उचलायचा प्रामाणिक प्रयत्न राजीव गांधींनी केला होता असे अतलुरींनी मुद्दामून सांगितले. पण भारतातील परिस्थिती आणि लाल फित यामुळे त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना पाहिजे तितके यश आले नाही but Rajiv Gandhi meant business असे त्यांनी बोलताना म्हटले होते. तेव्हा एक लहरी राजा होता, आली लहर केली टेलिकॉम क्रांती इतका उथळ प्रकार हा नक्कीच नव्हता. बाकी चालू द्या.
परमपूज्य राजीवजी नवे प्रयोग करु शकले याचे स्वच्छ कारण म्हणजे त्यांना गांधी घराण्यावरील लोकांची भक्ती. अगदी आणीबाणी हा अपवाद सोडला तर सहसा लोक त्यांची साथ सोडत नाहीत.हा निष्कर्ष तुम्ही कसा काढलात? राजीव गांधींच्या पंतप्रधानपदाच्या काळात ज्या निवडणुका झाल्या त्यात बहुसंख्य ठिकाणी त्यांचा पराभवच झाला.१९८४ च्या लोकसभा निवडणुकींमधील झंझावातानंतर मार्च १९८५ मध्ये कॉंग्रेस पक्ष उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान यासारख्या राज्यात जिंकला.पण प्रत्येक ठिकाणी त्या पक्षाचे बळ डिसेंबर १९८४ पेक्षा कमी झाले होते. उदाहरणार्थ डिसेंबर १९८४ मध्ये कॉंग्रेस पक्षाने उत्तर प्रदेशात ८५ पैकी ८३ लोकसभेच्या जागा जिंकल्या.त्याच न्यायाने पक्षाने विधानसभेत विधानसभेत ४२५ पैकी किमान सव्वा तीनशे जागा जिंकायला हव्या होत्या. जिंकल्या किती? २६८! महाराष्ट्रात ४८ पैकी ४३ लोकसभा जागा जिंकणारा कॉंग्रेस पक्ष विधानसभेत मात्र २८८ पैकी १६७ जागाच जिंकू शकला. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत तर कॉंग्रेस पक्षाचा पराभवच झाला आणि रामकृष्ण हेगडे मुख्यमंत्री झाले.याच कर्नाटकात १९८४ च्या लोकसभा निवडणुकींमध्ये कॉंग्रेसने मोठा विजय मिळवला होता. आंध्र प्रदेशात रामारावांनी परत एकदा कॉंग्रेस पक्षाला दणकून चोप आंध्र प्रदेशात दिला. पुढे कॉंग्रेस पक्षाचा सप्टेंबर १९८५ मध्ये पंजाबमध्ये तर नोव्हेंबर १९८५ मध्ये आसाममध्ये पराभव झाला.या राज्यांमधील पार्श्वभूमी वेगळी असल्यामुळे या राज्यांचा मुद्दा थोडा बाजूला ठेऊ या. पुढे मार्च १९८७ मध्ये केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्टांनी असाच जोरदार चोप कॉंग्रेसला दिला. १९८४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेस पक्षाने पश्चिम बंगालमध्ये ४२ पैकी २० जागा जिंकल्या होत्या. खुद्द सोमनाथ चॅटर्जींचा पराभव झाला.या पार्श्वभूमीवर कम्युनिस्टांनी विधानसभेच्या २९४ पैकी २५०+ जागा जिंकणे म्हणजे कॉंग्रेसने खाल्लेली मोठीच आपटी नाही का?त्यानंतर राजीव गांधींना खरा धक्का बसला जून १९८७ मध्ये हरियाणामध्ये.९० पैकी अवघ्या चार जागा कॉंग्रेस पक्षाने जिंकल्या. खुद्द मुख्यमंत्री बन्सीलाल यांचा पराभव झाला. पुढे जानेवारी १९८९ मध्ये तामिळनाडूतील विधानसभा निवडणुका राजीव गांधींनी प्रतिष्ठेच्या केल्या आणि अण्णा द्रमुकशी युती न करता स्वतंत्रपणे निवडणुका लढविल्या. निकाल काय लागला? २३४ पैकी २६ जागा कॉंग्रेस पक्षाने जिंकल्या! वि.प्र.सिंह राजीव गांधींच्या मंत्रीमंडळातून आणि कॉंग्रेस पक्षातूनही बाहेर पडले आणि त्यांनी लोकसभेची पोटनिवडणुक कॉंग्रेसविरूध्द अलाहाबादेतून लढवली.त्या पोटनिवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले. तेव्हा राजीव गांधींच्या पंतप्रधानपदाच्या कारिकिर्दीतही जनतेचा अबाधित पाठिंबा त्यांना होता आणि त्या जोरावर ते वाटेल ते करू शकत होते हे म्हणणे अप्रस्तुत वाटते.
भारतीय परिस्थितीचा फार सखोल अभ्यास, भारतीय मानसिकतेचा अभ्यास असे काही दिसत नाही.यातही दोन मुद्दे आहेत. पहिला मुद्दा म्हणजे हे दुर्दैवाने बहुसंख्य पंतप्रधानांविषयी खरे आहे. वाजपेयींविषयी बोलायचे झाले तर आली लहर गेले लाहोरला आणि केली लाहोर जाहिरनाम्यावर सही. मग कारगीलमध्ये कंबरड्यात मोठी लाथ बसली तेव्हा यांना जाग आली! इतकी वर्षे रामनामाचा जप केला त्या रामाला सत्ता मिळाल्यावर बासनात गुंडाळून ठेवले. पुढे २००१ मध्ये नागालॅंडच्या प्रश्नावर बृहद-नागालॅंडची निर्मिती करायचे आश्वासन देऊन बसले त्याविरूध्द मणिपूरमध्ये उग्र आंदोलन झाल्यावर यांना जाग आली. असे काहीनाकाही प्रत्येक पंतप्रधानाविषयी लिहिता येईल. आणि दुसरा मुद्दा म्हणजे भारतीय मानसिकता म्हणजे नक्की काय? आणि त्या मानसिकतेत जो सत्ताधीश गुरफटून राहिल तो भारताला नवी दिशा नक्कीच दाखवू शकणार नाही. भारतात आज जी प्रगती दिसते आहे ती मूठभर लोकांनी (ज्यांना आधुनिक काळाची जाण आहे आणि भविष्यकाळाचे व्हिजन आहे) केलेली आहे. बहुसंख्य जनता तर जातीपाती, रूढी-परंपरा यातच गुरफटलेली आहे.मग भारतीय मानसिकता म्हणजे ही बहुसंख्य लोकांची मानसिकता का? उत्तर प्रदेशातील बांदा-झाशी-चित्रकूट या बुंदेलखंडातील भागात सतीची परंपरा अजूनही चालते याविषयी डॉक्युमेन्टरी मी स्वत: एन.डी.टी.व्ही वर बघितली आहे.ही मानसिकता म्हणजे भारतीय मानसिकता का?अशा मानसिकतेत गुरफटलेला पंतप्रधान म्हणजे संकटास निमंत्रणच.
फोन यंत्रणा सुधारणे ह्या विचाराला जनता तयार नव्हती हा निष्कर्ष कसा काढला तुम्ही?भारतातील बहुसंख्य (अगदी शिकल्या सवरलेल्यांनाही) लोकांचे भारतासारख्या गरीब लोकांच्या देशात फोन आणि संगणक गरजेचे नाहीत असेच मत होते. त्याकाळाशी संबंधित लेखांमधून मी हे नक्कीच वाचले आहे.तसेच पंगा या ज्येष्ठ मिपाकरांचे पूर्वी राजीव गांधींवर झालेल्या चर्चेतील हे मत बघा. विरोधी पक्षांचे तर सत्ताधारी पक्षाचे पाय खेचायचे परमकर्तव्य असते.तेव्हा गरीबांना ’तुझ्या भाकरीची सोय करायची सोडून राजीव सरकार फोन आणि संगणक आणत आहे’ असे राजकिय स्वार्थासाठी भडकावणे सोपे असते आणि देवीलालसारख्यांनी ते केले सुध्दा. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून नवीन बदलांना विरोध (केवळ फोन यंत्रणा सुधारणे असा संकुचित अर्थ कृपया घेऊ नको या) अशीच मानसिकता लोकांची होती.
In reply to प्रतिसाद by क्लिंटन
In reply to राजीव गांधींची टेलिकॉम by हुप्प्या
मुळात हा गृहस्थ अभ्यासू होता ह्याचे पुरावे फारसे नाहीत.मान्य.पण राजीव गांधी हे एक well meaning पंतप्रधान होते आणि भारताचे भवितव्य संगणक आणि टेलिफोन क्रांतीत आहे हे समजण्याइतकी पात्रता त्यांची होती.आणि त्यासाठीच त्यांनी सॅम पित्रोदा,सत्या अतलुरी यासारख्या नावाजलेल्या लोकांचे सल्ले घेऊन त्यादिशेने पावले टाकायला प्रारंभ केला होता.त्यात त्यांना यश पूर्णपणे आले नाही म्हणून त्यांच्या मूळ उद्देशालाच नाकारणे योग्य नाही.
एखाद्या क्षेत्रात गाजलेल्या परदेशस्थ व्यक्तीने राजीव गांधींबद्दल चांगले मत व्यक्त केले म्हणून त्यांचे मत ग्राह्य मानायचे हे काही पटत नाही.मग कोणाचे मत ग्राह्य धरायचे?निदान नव्या सुधारणा घडवून आणण्यासाठी राजीव गांधींनी ज्यांना सल्लागार म्हणून नियुक्त केले आणि अशा सल्लागारांनी राजीव गांधींबरोबर जवळून काम केले अशांचे मत अधिक ग्राह्य की राजीव गांधी हे नाव ऐकताच त्यांना कसलेच (अगदी देय असलेलेही) श्रेय द्यायचे नाही असा पूर्वग्रहदूषित दृष्टीकोन असलेल्यांचे?
बोफोर्स प्रकरणी ही बेसावधता दिसलीच.बोफोर्स प्रकरणी बेसावधतेपेक्षा राजीव गांधी चाणक्यनितीचे खेळ खेळण्यात कमी पडले. ’मी बोफोर्स प्रकरणी पैसे घेतलेले नाहीत’ हे त्यांनी अनंतवेळा सांगितले.त्यातूनच बोफोर्स प्रकरण राजीव गांधींनी स्वत:हूनच लोकांच्या स्मरणात राहिल अशी व्य्वस्था करून ठेवली. याउलट नरसिंह रावांवर हर्षद मेहताने लाच दिल्याचा आरोप केला तर त्यावर रावांनी चकार शब्द काढला नाही. महिन्या दोन महिन्यात ते प्रकरण आपोआपच मागे पडले.
राजीवजी खूप खूप थोर आहेत हा ह्या लेखाचा विषय आहे.नाही संदर्भ चुकला.मूळ लेखाचा विषय राजीव गांधींना त्यांच्या ६६व्या जयंतीनिमित्त श्रध्दांजली वाहणे हा आहे.आणि राजीव गांधी हे नाव ऐकतात तुमच्यासारखे लोक त्यांच्याविषयी पूर्वग्रहदूषित दृष्टीकोन बाळगून त्यांना देय असलेले श्रेय द्यायलापण नकार देतात हे मला पूर्णपणे माहित असल्यामुळे त्यांच्याविषयीचे तटस्थ अभ्यासातून मी बनविलेले मत मांडणे हा माझ्यापुरता या लेखाचा उद्देश मी वाढविला असे म्हटले तरी चालेल. मी जेवढ्या हिरीरीने राजीव गांधींच्या नव्या काळानुरूप असलेल्या धोरणांचा पुरस्कार करतो तितक्याच हिरीरीने श्रीलंका प्रकरणी त्यांचा विरोधही करतो हे वरील एका प्रतिसादात दिसून आले असेलच. राजीव गांधी खूप खूप थोर आहेत असा म्हणायचा माझा मुळातच उद्देश नाही.माझा उद्देश एकच की त्यांच्या कारभाराचे वस्तुनिष्ठ मुल्यांकन करावे आणि बहुसंख्य लोक त्यांच्यावर टिका करतात त्याचबरोबर त्यांना देय असलेले श्रेयसुध्दा संकोच न करता द्यावे. कोणाही राजकिय/ऐतिहासिक व्यक्तीविषयी पूर्वग्रहदूषित मते ठेवणे ही वस्तुनिष्ठ अभ्यासाची पायरी नव्हे.
शाहबानोचा निर्णय फिरवताना भारतीय मुस्लिमांची, हिंदूंची मानसिकता जाणणे आवश्यक होते.मागे मृगनयनी यांच्याच राजीव गांधींना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रध्दांजली वाहायच्या चर्चेत आपण "मुस्लिमांकरता असणारे घटस्फोटविषयक कायदे हे कित्येक मुस्लिम देशांपेक्षा जुनाट, रानटी आणि असंस्कृत आहेत. त्याचे श्रेय ह्या महाभागलाच दिले पाहिजे" हे विधान केले होते. त्यावरील चर्चा मी परत जशीच्या तशी इथे चिकटवत आहे. त्यावेळी तुम्ही उत्तरे द्यायचे टाळले होतेत. ती उत्तरे आता देणार का? (माझा मूळ चर्चेवरील प्रतिसाद: इथे
"मुस्लिमांकरता असणारे घटस्फोटविषयक कायदे हे कित्येक मुस्लिम देशांपेक्षा जुनाट, रानटी आणि असंस्कृत आहेत. त्याचे श्रेय ह्या महाभागलाच दिले पाहिजे"या वाक्याचा अधिक खुलासा करू शकाल का? माझ्या माहितीप्रमाणे शाहबानो या मुस्लिम महिलेस तिच्या नवऱ्याने ’तलाक’ दिला. शरियतप्रमाणे अशा तलाक दिलेल्या महिलेस पोटगीचा हक्क नाही. पण न्यायालयाने शाहबानोला पोटगी मिळावी असा आदेश दिला. त्यावर मुल्ला मौलवींचे पित्त खवळले आणि त्यांनी आंदोलनाची धमकी दिली. त्यापुढे राजीव सरकार नमले आणि संसदेत कायदा करून न्यायालयाचा निर्णय फिरविण्यात आला. ही माहिती चुकीची असल्यास बरोबर माहिती सांगावी ही विनंती. काही प्रश्न: १. राजीव सरकारने न्यायालयाचा निर्णय फिरविण्यापूर्वी या संदर्भातले कायदे कसे होते? २. राजीव सरकारने निर्णय फिरविल्यामुळे नक्की काय बदल झाला? ३. तुम्ही जे म्हणत आहात त्याप्रमाणे आपल्याकडील कायदे अनेक मुस्लिम देशांमधील कायद्यांपेक्षा जुनाट आणि असंस्कृत आहेत. नक्की कोणत्या मुस्लिम देशांमध्ये आपल्याकडील कायद्यांपेक्षा आधुनिक आणि सुसंस्कृत कायदे आहेत? त्यात नक्की फरक काय? याविषयी अधिक माहिती दिल्यास बरे होईल.
कॉंग्रेस धर्मपिसाट मुस्लिमांचे पाय चाटते हे सिद्ध करायला शाहबानो केस हे उदाहरण इतिहासात कायमचे राहील.एकेकाळी मी स्वत: भाजपच्या कळपातला (कदाचित अडवाणी-वाजपेयींपेक्षा) कट्टर समर्थक होतो. त्याकाळी मी पण तसेच म्हणत असे. आणि पूर्णपणे तटस्थपणे विचार केला तर शाहबानो प्रकरणी न्यायालयाचा आदेश फिरविणे अयोग्य होते असे मला वाटते. आज आपण २०१० मध्ये आहोत आणि चर्चा करत आहोत १९८५-८६ च्या शाहबानो प्रकरणाची म्हणजे २५ वर्षे जुन्या प्रकरणाची. मी आपल्याला आणखी ३५ वर्षे मागे घेऊन जातो. नुकत्याच स्वतंत्र झालेल्या भारताच्या पहिल्या मंत्रीमंडळात डॉ.आंबेडकर कायदामंत्री होते. त्यांनी नेहरू सरकारपुढे ’हिंदू कोड बिल’ आणण्यासाठी पाठपुरावा केला. पंडित नेहरूंचा या बिलाला तत्वत: पाठिंबा होता. तसेच समान नागरी कायदा आणायलाही नेहरूंचा तत्वत: पाठिंबा होता पण फाळणीच्या वेळी झालेल्या प्रचंड हिंसाचारामुळे त्यांनी समान नागरी कायदा आणायचा निर्णय पुढे ढकलला (संदर्भ: रामचंद्र गुहांचे India After Gandhi हे पुस्तक). आंबेडकरांचे हिंदू कोड बिल हे हिंदू समाजापुरते मर्यादित होते. आंबेडकरांच्या प्रस्तावित हिंदू कोड बिलाप्रमाणे एकापेक्षा अधिक लग्ने करण्यास बंदी, मुलींना संपत्तीत वाटा देणे, घटस्फोटांना मान्यता, मुली दत्तक घेण्यास परवानगी यासारखे भाग होते. तसेच सर्वात महत्वाचा भाग म्हणजे हिंदू या शब्दाची व्याख्या जे मुस्लिम, ख्रिस्ती, पारशी आणि ज्यू नाहीत ते अशी केली. म्हणजे बौध्द, जैन आणि शीख हे पण हिंदू समुदायाचाच भाग म्हणून गणण्यात येणार होते. तसेच हिंदू समाजाला एक समाज म्हणून (जातींचा उल्लेख न करता) गणण्यात येणार होते. (संदर्भ: एक , दोन ) या प्रस्तावित हिंदू कोड बिलाविरूध्द हिंदुत्ववादी संघटनांनी राळ उठवली. निर्मलचंद्र चॅटर्जी (सोमनाथ चॅटर्जींचे वडिल) आणि शामाप्रसाद मुखर्जी या हिंदुत्ववादी नेत्यांनी हे बिल म्हणजे हिंदू समाजातील कुटुंब आणि विवाहविषयक परंपरांना धोका आहे असे म्हटले. करपात्री महाराजांची रामराज्य परिषद ही संघटना या बिलाविरूध्द केलेल्या आंदोलनातून उभी राहिली. शामाप्रसाद मुखर्जी म्हणाले की सरकारने मुस्लिम कायद्यांमध्ये काही बदल केलेला नाही. संदर्भ ते म्हणणे तथ्याला धरून होते. यावर पंडित नेहरूंचे उत्तर कोणते होते हे पण याच संदर्भात दिले आहे. पुढील काळात होणाऱ्या आंदोलनांना घाबरून नेहरू सरकारने हिंदू कोड बिल प्रस्तावित स्वरूपात आणले नाही आणि त्याच्या निषेधार्थ डॉ.आंबेडकरांनी कायदामंत्री पदाचा राजीनामा दिला. नंतरच्या काळात नेहरू सरकारने ४ वेगवेगळी बिले पास केली पण त्यात आंबेडकरांना अभिप्रेत असलेले हिंदू कोड बिल पूर्णपणे नव्हते. राष्ट्रपती राजेन्द्रप्रसाद यांचाही या बिलाला विरोध होता. काही प्रश्न: १. सरकारने मुस्लिम कायद्यांमध्ये बदल केले नाहीत हे म्हणणे बरोबरच होते. पण तत्वत: हिंदू कोड बिलात वाईट काय होते? तसाच बदल मुस्लिम कायद्यातही घडवावा असा आग्रह धरणे वेगळे आणि मुस्लिम समाज आपले जुनेपुराणे विचार सोडायला तयार नाही म्हणून आपणही ते सोडणार नाही असे म्हणणे आणि म्हणून बिलाला विरोध करणे वेगळे. २. हिंदू कोड बिलाला ’आमच्या परंपरांना धक्का लागेल’ असे म्हणून विरोध करणे समर्थनीय होते का? ३. ते समर्थनीय असेल तर मुस्लिम समाजाने न्यायालयाचा निर्णय म्हणजे त्यांच्या परंपरांना लावलेला धक्का असे म्हटले तर त्यात काय बिघडले? ४. राजीव सरकारने शाहबानो प्रकरणी मुस्लिम मूलतत्ववाद्यांपुढे लोटांगण घातले त्याचप्रमाणे नेहरू सरकारने हिंदू मूलतत्ववाद्यांपुढे लोटांगण घातले असे म्हटले तर काय चुकले? ५. राजीव सरकारने घातलेले लोटांगण हे धर्मांध मुस्लिमांच्या दाढ्या कुरवाळायला असेल तर नेहरू सरकारचे लोटांगण हे धर्मांध हिंदूंच्या कफन्या सांभाळायला घातलेले होते असे म्हटले तर त्यात काय चुकले? ६. पण स्वत:ला हिंदुत्ववादी समजणारे पक्ष असे म्हणत नाहीत. ते का? (अवांतर: हिंदुत्ववादी पक्ष गांधींनी १९१९ मध्ये खिलाफत चळवळीला दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांच्यावर टिका करतात. पण लोकमान्य टिळकांनी मुस्लिम लीगशी त्यापूर्वी ३ वर्षे केलेल्या लखनौ कराराविषयी मौन का बाळतात? स्वातंत्र्यलढ्यात मुस्लिमांचे सहकार्य मिळावे हा जर टिळकांचा त्यामागचा उद्देश असेल तर तोच उद्देश गांधींचाही होता. मग टिका करताना टिळकांना आपल्या बाजूला ओढून घेऊन केवळ गांधींवर टिका का?) मला वाटते नेहरू सरकारने हिंदू कोड बिलावर घेतलेली माघार आणि राजीव सरकारने शाहबानो प्रकरणी घेतलेली माघार यासारख्या घटनांमागे सरकारचे अतिनेमस्त धोरण कारणीभूत आहे. हिंदू संघटनांनी मोठ्या आंदोलनाची धमकी दिली आणि नेहरू नमले. मुस्लिम संघटनांनी मोठ्या आंदोलनाची धमकी दिली आणि राजीव गांधी नमले. काही वाटेल ते झाले तरी चालेल कायद्यापुढे धमक्या चालायच्या नाहीत असे ठणकावून दोघांनीही सांगितले नाही. तसेच भारताचे विमान कंदाहारला पळवून नेल्यावर वाजपेयी नमले. काहीही झाले तरी दहशतवाद्यांपुढे लोटांगण घालणार नाही असे वाजपेयी ठणकावून सांगू शकले नाहीत. या सगळ्या घटनांचे कारण -- आपल्या समाजाचा (आणि म्हणून समाजानेच निवडून दिलेल्या सरकारचा) अति नेमस्तपणा हेच आहे असे मला वाटते. एकट्या राजीव-नेहरू-वाजपेयींना तरी का का दोष द्यावा? या प्रश्नांना तुम्ही मागे उत्तरे द्यायचे टाळले होतेत ती आता देणार का? मी राजीव सरकारच्या शाहबानो प्रकरणाबरोबरच नेहरू सरकारची हिंदू कोड बिलावरील माघारीवरही तितक्याच प्रमाणावर टिका करत आहे. क्लिंटन
In reply to चर्चा भरकटत आहे तरी काही मुद्दे लिहिणे गरजेचे वाटते by क्लिंटन
In reply to चर्चा भरकटत आहे तरी काही मुद्दे लिहिणे गरजेचे वाटते by क्लिंटन
In reply to हो तर हो तर! by हुप्प्या
In reply to हो तर हो तर! by हुप्प्या
विप्रो, इन्फोसिस आणि सत्यम ही मंडळी गुगल, अॅपल, सिस्को, मायक्रोसॉफ्ट च्या डोळ्यासमोर तारे चमकतील असे नवनवे शोध लावत आहेत!ठार मेलो! हुच्च!
In reply to राजीवजी दिसायला हॅन्डसम होते. by अप्पा जोगळेकर
In reply to धाग्याच्या शीर्षकातच मिस यु, by मृगनयनी
In reply to gr8!.. I think I was li'l too by wings
In reply to पंख्या उर्फ wings... by मृगनयनी
In reply to पंख्या उर्फ wings... by मृगनयनी
In reply to पंख्या उर्फ wings.. म्हणजे by भारतीय
In reply to छ्या छ्या!! by सुनील
In reply to पण आम्ही हिंमत सोडणार नाही. by मृगनयनी
In reply to हॅ हॅ हॅ by सुनील
In reply to छ्या छ्या!! by सुनील
In reply to +१ by क्लिंटन
In reply to +१ by क्लिंटन
In reply to मला तर सर्वाच्या बद्दल आदर आहे. by वेताळ
पण ते देखणे होते हे जर एकच क्वॉलीफिकेशन त्याना लावायचे म्हटले तर आज कित्येक देखणे नट बॉलीवुड मध्ये काम करतात त्यापैकी एकाला कराना भारताचा पंतप्रधान.राजीव गांधी देखणे किंवा चांगल्या व्यक्तीमत्वाचे होते हा मुद्दा माझ्या लेखी तरी पूर्णपणे बाद आहे.कोणाही राजकिय व्यक्तीचे मूल्यमापन करताना त्या व्यक्तीचा चेहरा किती चांगला किंवा वाईट होता हा मुद्दा मी आजपर्यंत कधीही ध्यानात घेतलेला नाही आणि यापुढेही घेणार नाही. दुसरे म्हणजे आपल्या राज्यपध्दतीत वय वर्षे २५ पूर्ण केलेल्या आणि लोकसभेत बहुमताचा पाठिंबा असलेल्या कोणाही भारतीय नागरिकास पंतप्रधान बनता येते. ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर कॉंग्रेस संसदीय पक्षाने त्यांना रितसर नेता निवडले होते.त्यावेळी कॉंग्रेस पक्षाकडे लोकसभेत बहुमत होते त्यामुळे त्या पक्षाचा संसदेतील नेता आपोआप पंतप्रधान बनायला पात्र होता. तसेच १९८४ च्या निवडणुकांमध्ये त्यांना लोकसभेत बहुमत प्राप्त झाले होते त्यामुळे त्यांना पंतप्रधान बनण्यापासून कोणीही रोखू शकत नव्हते. आजसुध्दा हृतिक रोशनला किंवा तत्सम चेहऱ्याच्या इतर कोणालाही लोकसभेत बहुमत असेल तर त्यालाही पंतप्रधान बनण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.त्यामागे त्या माणसाचा चेहरा नव्हे तर लोकसभेतील बहुमत हाच एक निकष असेल.
राजीव गांधी जर गांधी नसते तर ते एक उच्चवर्तुळात वावरणारे वैमानिक इतकीच त्याची ओळख असती.उच्च वर्तुळात वावरणारे का एक सामान्य वैमानिक यापेक्षा त्यांची ओळख जास्त नसती.किंबहुना गांधी म्हणून जन्माला येऊनही आपली ओळख त्यापेक्षा जास्त असावी ही महत्वाकांक्षा मुळातच त्यांना नव्हती. त्यांच्या ’महान’ बंधुराजांच्या कर्तृत्वाशी तुलना केल्यास ही गोष्ट लगेच लक्षात येते.पण हे सांगण्यामागचा तुमचा उद्देश काय हे लक्षात येत नाही.वर म्हटल्याप्रमाणे ते पंतप्रधान का झाले? कारण त्यांच्यामागे लोकसभेत बहुमत होते.ते गांधी घराण्यात जन्माला आले म्हणून नव्हे. १९८९ च्या निवडणुकींनंतर ते पंतप्रधान का बनू शकले नाहीत? कारण त्यांच्याकडे लोकसभेत बहुमत नव्हते. अशावेळी ’गांधी’ घराण्यातील असणे हे ’क्वालिफिकेशन’ उपयोगी पडले का?तरीही लोक त्यांच्या पंतप्रधान बनण्याशी घराणेशाहीचा संबंध जोडतात ते मला पटत नाही.
खरोखर जर चांगला राजकारणी व जनतेबद्दल काम करणारा नेता निवडायचा झाला तर नरेंद्र मोदी खेरीज आज कोणी नाही.असे तुम्हाला वाटते.तेच मत मतदान यंत्रांमधून व्यक्त झाले आणि नरेंद्र मोदी त्याच्याआधी तुरूंगात गेलेले नसतील तर जरूर पंतप्रधान होतील.
लोंकाच्या डोळ्यात धुळफेक करणे व सत्तेत टिकुन राहणे इतकेच ह्या कुटुंबाचे आजपर्यतचे उद्योग आहेत.पण अजून तरी भारतातील बहुसंख्य मतदारांचे मत ते नाही याचे काय?लोकशाही हा आकड्याचा खेळ असतो.ज्यावेळी बहुसंख्य मतदारांचे तेच मत होईल तेव्हा कॉंग्रेस पक्षाचा आपोआपच पराभव होईल.पण विरोधी पक्ष अजूनतरी असा मुद्देसूद प्रचार करून जनतेत जाऊन आपली बाजू मांडत आहेत असे दिसत नाही.
In reply to प्रतिसाद by क्लिंटन
In reply to जो न्याय तुम्ही मोदीना लावता by वेताळ
In reply to अनपेक्षीत धाग्यावरची चांगली by अर्धवट
In reply to जो न्याय तुम्ही मोदीना लावता by वेताळ
त्यानी आज गुजरात मध्ये खरोखरीच खुप आमुलाग्रबद्दल घडवुन आणले आहेत. मोदी हे कोणत्याही घराण्याशी संबधित नाहीत तरीही भारतातील सर्व मुख्य उद्योग घराण्याना व विकासप्रेमी लोकांना तेच देशाचे पंतप्रधान व्हावे असे का वाटते?मोदींनी गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास घडवून आणला आहे हे उघडच आहे.अगदी कच्छच्या वाळवंटात त्यांनी पिण्याचे पाणी नेऊन पोहोचवले आहे. अंबानी, रतन टाटा यासारख्यांनी मोदींची जाहिरपणे तारिफ केली आहे. २००३ मध्ये आमच्या आय.आय.एम मध्ये येऊन आझीम प्रेमजींनी मोदींवर टिका केली होती पण काही दिवसांपूर्वी याच आझीम प्रेमजींनी नरेंद्र मोदींची भेट घेतली. यात दोन मुद्दे आहेत. पहिला मुद्दा म्हणजे गोध्रासारखी महाभयंकर घटना घडूनही मरणारे हिंदू होते म्हणून की काय पण तथाकथित धर्मनिरपेक्ष मिडिया आणि राजकिय पक्षांनी गोध्रावर चकार शब्द न काढता दुसऱ्या दिवशी सादर केल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पावर जास्त लक्ष केंद्रित केले.गुजरात गांधींजींचा असूनही जातीय दंगलींची मोठी पार्श्वभूमी राज्याला आहे. १९६९ मध्ये चार महिने दंगली चालू होत्या आणि शेवटी खान अब्दुल गफार खानांना बोलावून घेऊन त्यांच्याकरवी शांततेचे आवाहन करावे लागले होते. तसेच १९८५ आणि १९९२-९३ मध्येही दंगली मोठ्या प्रमाणावर झाल्या होत्या.अशा परिस्थितीत जो भडका उडाला तेव्हा नरेन्द्र मोदीच काय अगदी शंकरसिंह वाघेला जरी मुख्यमंत्री असते तरी किती उपयोग झाला असता हे त्या भगवंतालाच ठाऊक. तरीही या दंगलींमध्ये मोदींनी खरोखरच भाग घेतला होता का हे अजून तरी सिध्द झालेले नाही.वर्तमानपत्रातील बातम्यांप्रमाणे तरी एहसान जाफरी हत्या आणि गुलबर्ग सोसायटी प्रकरणी ते अडचणीत यायची शक्यता आहे.एहसान जाफरींनी संरक्षणाची मागणी फोन करून केली असता त्यांना फोनवर शिवीगाळ करणे आणि ’मरा मी काही तुम्हाला संरक्षण देणार नाही’ असे मोदींनी म्हटल्याचे वर्तमानपत्रांमध्ये वाचनात आले आहे. कायद्याच्या दृष्टीने यातून मोदींवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका जरूर ठेवता येईल पण त्यांचा दंगलीत प्रत्यक्ष हात होता हे सिध्द करता येईल की नाही यासाठी काही महिने थांबावे लागेल. पण तसा हात मोदींचा असेल तर मात्र त्यांना तुरूंगात जावेच लागेल. दुसरा मुद्दा म्हणजे मोदी विरोधकांचे म्हणणे असे की मोदींची पक्की खात्री आहे की मुख्यमंत्रीपदावरून दूर होताच त्यांना तुरूंगात जावे लागेल.म्हणून त्यांना मुख्यमंत्री म्हणून चांगले काम करणे भागच आहे.कारण तिकडे जर आळस केला तर किंमत आहे तुरूंगवासाची! या प्रकरणी कायद्याला मान्य असेल ते होईल.मोदींचे नशीब चांगले असेल तर ते तुरूंगात जायच्या आधी पंतप्रधान होतीलही.आणि ते पंतप्रधान झाले तर निदान विकासाच्या बाबतीत तरी गुजरात मॉडेल त्यांनी देशभरात राबवावे असेच मला वाटते.
त्यानी भारतीय शांतीसेना श्रीलंकेत पाठवुन तामिळ लोकांचे हत्याकांड घडवुन आणले व निरपराध तामिळींवर अत्याचार झाले त्याला तेच जबाबदार होते.अगदी इंदिरा गांधी, एम.जी.रामचंद्रन यांनी एल.टी.टी.ई ला अनूकूल भूमिका घेतली होती.इतकेच काय तर मे १९८७ मध्ये राजीव गांधी पंतप्रधान असताना जाफनामध्ये श्रीलंकन सैन्याने एल.टी.टी.ई ची कोंडी केल्यानंतर भारतीय हवाईदलाच्या विमानांनी श्रीलंकेची हवाईहद्द ओलांडून तामिळ लोकांच्या मानवी अधिकारांचे उल्लंघन होत आहे या नावाखाली अनेक टन धान्य आणि इतर सामुग्री टाकली होती.परराष्ट्र राज्यमंत्री नटवर सिंह यांनी श्रीलंकेच्या दिल्लीतील राजदूतास बोलावून घेऊन ’आमची विमाने तुमच्या देशात जाऊन तामिळ लोकांना मदत टाकून येणार आहेत आणि त्यावर हल्ले केल्यास गंभीर परिणाम होतील’ अशी धमकी दिली. माझ्या मते राजीव सरकारने उचललेले हे पाऊल सर्वथैव अयोग्य होते. उद्या काश्मीरी लोकांवर अन्याय होत आहे अशी हाकाटी करत पाकिस्तानची विमाने श्रीनगरमध्ये आली तर आपल्याला चालेल का? श्रीलंकेच्या सार्वभौमत्वाची अशी पायमल्ली करणे पूर्णपणे अयोग्य होते असे मला वाटते. भारतापुढे आपली धडगत नाही हे श्रीलंकन अध्यक्ष जयवर्धने यांना समजून चुकले आणि त्यातून जुलै १९८७ मध्ये श्रीलंका करार झाला. या कराराचा उद्देश तामिळ समस्येवर श्रीलंकेच्या एकात्मतेच्या चौकटीत तोडगा शोधणे हा होता. तसेच तामिळ वाघांना नि:शस्त्र करायला (साध्या शब्दात त्यांच्याशी लढायला) भारताची शांतीसेना पाठविण्यात आली. तेव्हा १. तामिळ लोकांवर अत्याचार करावेत यासाठी भारतीय शांतीसेना पाठविण्यात आलेली नव्हती. २. भारतीय सैन्याकडून तामिळ लोकांवर अत्याचार काही प्रमाणावर जरूर झाले. याचे कारण तामिळ जनतेत तामिळ वाघांविषयी काही प्रमाणात तरी सहानूभूती असल्यामुळे स्थानिक लोकांनी भारतीय सैन्याविरूध्द तामिळ वाघांना मदत केली आणि त्यातूनच पुढे काही प्रमाणावर त्यांच्यावर अत्याचार झाले. हाच प्रकार भारतात पंजाब, काश्मीर आणि पूर्वोत्तर भारतात बघायला मिळाला आहे. तेव्हा मुद्दा क्रमांक १ हा valid असल्यामुळे मुद्दा क्रमांक २ प्रमाणे झालेल्या अत्याचारांसाठी संबंधित सैनिक/अधिकारी यांना जबाबदार धरता येईल. तेव्हा अगदी निरपराध तामिळींवर जरी अत्याचार झाले असतील तरी त्यासाठी राजीव गांधींना (ते हयात असते तरीही) कोणतेही न्यायालय शिक्षा करू शकणार नाही. अनेक वर्षे तामिळ वाघांना भारत सरकारने पाठिंबा दिला होता पण अचानक त्यांच्याविरूध्द भारत सरकार (राजीव गांधींचे सरकार) उलटले याचा राग म्हणून पुढे राजीव गांधींची हत्या तामिळ वाघांनी केली.
सुदैवाने राजीव गांधी जर जिवंत असते तर कोणी त्याच्या विरुध्द सीबीआयचा हत्यारा सारखा वापर करुन तामिळवाघांच्या हत्याकांडाला त्याना जबाबदार ठरवु शकला असता. मग राजीव गांधीना शिक्षा झाली नसती कशावरुनयाचे उत्तर वर दिलेलेच आहे. पण नरेंद्र मोदींविरूध्दचे आरोप आणि राजीव गांधींविरूध्द काल्पनिक आरोप एका मापाने कसे तोलता येतील? तसा अर्थ आपल्या प्रतिसादातून ध्वनित होत आहे म्हणून मुद्दामून लिहावेसे वाटते.
In reply to गांधी घराण्यातील काही (हा by भारतीय
बोफोर्स तोफा भारताला आवश्यक होत्याच, ते कारगिल युद्धात दिसलेच.. त्या राजीवजींच्या काळात खरेदी केल्या गेल्या म्हणून राजीव गांधी थोर होतात?या कारणावरून राजीव गांधींना थोर म्हणणारी मंडळी आहेतच.पण त्यांना थोर म्हणण्यासाठी हे पुरेसे सबळ कारण नाही असेच माझे तरी स्वत:चे मत आहे. तसेच राजीव गांधींना ’थोर’ मी तरी म्हटलेले नाही.माझा मुद्दा एवढाच की त्यांच्याकडे संगणक आणि टेलिकॉम क्षेत्रात विकास घडवून आणायची दूरदृष्टी होती (जी बहुसंख्य भारतीयांकडे त्याकाळी नव्हती) आणि ते बदल त्यांनी नेटाने घडवून आणले. आजच्या तरूण पिढीला त्याचा फायदा किती होत आहे हे समोर दिसतच आहे आणि त्याचे श्रेय त्यांना द्यायलाच हवे.
राजीवजी शुद्ध होते काय?खरेखोटे त्या भगवंतालाच ठाऊक.पण कायद्याच्या दृष्टीने तरी त्यांचा कोणत्याही भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सहभाग सिध्द होऊ शकलेला नाही.
मग नरसिंह रावही त्याच्यापेक्षा थोर म्हणावेत, कारण त्याच्याच कालखंडात भारताने खुले आर्थिक धोरण स्वीकारले.. पण नरसिंहांचे आडनाव 'गांधी' नव्हते ना ! म्हणून ते थोर नाहीत..माझे स्वत:चे मत हे तर नरसिंह राव हे भारताचे सर्वोत्तम पंतप्रधान होते हेच आहे.विविध पंतप्रधानांच्या कारभाराचे मी माझ्या पातळीवर मूल्यमापन केले आहे त्यावरून माझे मत झाले आहे की नरसिंह रावांनी न बोलता देशासाठी खूप चांगले काम करून ठेवले.आणि हे मूल्यमापन करताना पंतप्रधानांचा पक्ष, चेहरा, व्यक्तिमत्व,ते जन्माला आले त्या घराण्याचे नाव या सगळ्या गोष्टी गौण मानून केवळ त्यांचे कार्य हा एकच मुद्दा मी ध्यानात घेतला होता. आणि नरसिंह राव गांधी नाहीत याच एका कारणावरून अर्जुन सिंहांसारखी झुरळे त्यांच्यावर टिका करतात ते पूर्णपणे अयोग्य आहे असेच माझे मत आहे.
सध्या काँग्रेस सत्तेवर आहे ते केवळ "वासरांत लंगडी गाय शहाणी" म्हणून!हीच तर लोकशाही व्यवस्था आहे. ज्या क्षणी जनतेला कॉंग्रेसपेक्षा समर्थ पर्याय आहे असे वाटेल त्याक्षणी निवडणुकांमध्ये कॉंग्रेस पक्षाचा पराभव होईल. भारतीय जनतेने हे यापूर्वी पण दाखवून दिले आहे आणि जनता यापुढेही ते दाखवून देईल याविषयी शंका नको.
समग्र देशव्यापी क्रांतीच्या प्रतिक्षेत.फक्त ही देशव्यापी क्रांती मतदान यंत्रातूनच होऊ दे ही सदिच्छा.
In reply to ~*~*.|.*~*~ राजीव गान्धींना by मृगनयनी
In reply to राजीव गांधीं'ना जयन्तीनिमित्त by मृगनयनी
In reply to राजीव'जींना विनम्र अभिवादन!!! by मृगनयनी
In reply to म हा न आहेस. ___/\___ by प्यारे१
In reply to मॄग्गा... मॄग्गा अगं काय हे ? by मदनबाण
In reply to हो रे.. मदनबाण.. अॅक्चुली by मृगनयनी
In reply to राजीव'जींना विनम्र अभिवादन!!! by मृगनयनी
In reply to राजीव'जींना विनम्र अभिवादन!!! by मृगनयनी
चित्र वेगळे म्हणजे कसे?