Skip to main content

समाज

लव्ह युवर जॉब. डु यु?

लेखक मराठमोळा यांनी बुधवार, 01/09/2010 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. आजकालच्या शक्यतो तरुण मंडळींच्या गप्पांमधे एक सर्रास आढळणारा विषय. आमीर खानच्या थ्री ईडीयट्स मधे सुद्धा हाच संदेश दिला आहे. जे आवडते ते मन लावुन करा, यशस्वी आणि आनंदी व्हाल. उगाच पैसे कमवायचे म्हणुन एखादे काम करु नका, त्यातुन पैसा मिळेल पण जीवनाचा आनंद नाही. ह्या विषयावर मी/तुम्ही सुद्धा कित्येक जणांशी चर्चा केली असेल. पण याच खरं उत्तर एखादा सामान्यवर्गीय (सामान्यवर्गीयांची व्याख्या व्यक्तीसापेक्ष) देऊ शकेल?

काही बाही - २

लेखक अवलिया यांनी बुधवार, 01/09/2010 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ एकदा वाचुन झाल्यावर कधीही कुठुनही वाचता येतो, त्यातील कुठलेही पान काढून वाचता येते, त्यावर मनन वा चिंतन करता येते असा ग्रंथ म्हणजे दासबोध. दासबोधातील मराठी खुपच सुलभ आहे. फार कमी ठिकाणी शब्दकोशाचे सहाय्य घ्यावे लागते. रोजच्या जीवनातील घटनांमधे प्रचिती येणारे रोकडे पुस्तक असं म्हटलं तरी चालेल. ब्रह्मचारी माणसाने प्रापंचिक माणसाला केलेला उपदेश असला तरी समर्थांच्या तळागाळातील लोकांना असलेल्या समस्यांचे भान थक्क करुन सोडते. पहिल्याच दशकातील पहिला समास. ग्रंथारंभलक्षण.

वेल् ... मला वाटलं ते लिहीलं

लेखक शुचि यांनी सोमवार, 30/08/2010 23:57 या दिवशी प्रकाशित केले.
नवीन प्रकल्पावर रुजू झाले आहे. आत्तापर्यंत थोडेच सहकारी मिळाले आहेत. पैकी एक बराच संबंध येणारा सहकारी - त्याला आल्याआल्या ओळख झाल्यानंतर पहीला प्रश्न विचारल्याशिवाय रहावलं नाही - "फॅमिली इथे आहे का?" बर्‍याच जणांना नसत्या चौकशा लागतात तेही लगेच. नंतर २ दिवसात क्युबमधे येऊन विचारलं " तू काम सुरू केलंस का? तुला काही काम दिलय का?" मी म्हटलं "नाही फक्त फन्क्शनॅलिटीच शिकतेय." जरी मला काम दिलं असलं तरी मी कशाला माझे पत्ते उघडे करू हा काय माझा बॉस आहे का अपडेट्स मागायला? नोझी पीपल. परवा माझ्या क्युबिकलमधून खुर्ची मागुन घेऊन गेला ती परत केलीच नाही. हे साधे एटीकेट्स नाही का?

नक्को नक्को रे!

लेखक अरुंधती यांनी रविवार, 29/08/2010 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
"केतन, नाकात बोटं नको घालू.... " "केतन, तुला कितीदा सांगितलंय, असा पाय हलवायचा नाही म्हणून! कुणाला लागला तर? " "अरे केतन, तिथे उभा नको राहू, कोणीतरी धक्का मारील... " एक गौरांगना बसस्टॉपवर खांद्यावरच्या जाडजूड ओझ्याच्या पिशव्यांना कसेबसे सांभाळत, बसची वाट पाहत दर मिनिटाने तिच्या बोअर झालेल्या चिमुकल्याला हटकत होती. तिच्या चेहऱ्यावरून ती दमल्याचे स्पष्ट दिसत होते. बराच वेळ थांबूनही बस आली नव्हती. आणि सुपुत्र 'केतन' अतिशय बोअर झालेल्या अवस्थेत स्वतःचे मनोरंजन करू जाता त्याला वारंवार हटकण्यात येत होते. खरं तर आपल्या हटकण्याने मुले खरोखरीच त्यांना करावयाच्या गोष्टी थांबवतात का?

माझा बसप्रवास

लेखक पैसा यांनी रविवार, 29/08/2010 01:21 या दिवशी प्रकाशित केले.
तुमच्यापैकी जे मुंबईकर असतील, ते म्हणतील, “हॅः बसचा प्रवास ही काय लिहिण्यासारखी गोष्ट आहे? एकदा विरार फास्ट लोकलने जाऊन दाखवा. पुणेकर म्हणतील, “आमची पी.एम. टी. लै भारी. बसमधून सगळ्या हाडांसहित नीट चढून किंवा उतरून दाखवा.” पण माझ्या मित्रांनो, तुम्ही कधीच आमच्या गोवेकर खाजगी बसमध्ये बसले नसणार. मुंबैहून बदली होऊन आलेल्या साहेबलोकांनीसुद्धा शरणागती लिहून दिल्ये की “तुमच्या गोव्याच्या बसमधून प्रवास करणे हे येरागबाळ्याचे काम नोहे.” तुम्हाला थोडी पार्श्वभूमी सांगणं आवश्यक आहे नाही का? कारण असं की, तुम्ही गोव्यात येता, २ दिवसांची टूर करता आणि परत जाता.

संपादकांच्या फुलक्या

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शनिवार, 28/08/2010 08:09 या दिवशी प्रकाशित केले.
संपादकांच्या फुलक्या भाजायचे ठरले तर टोपलंभरुन तरी हमखास जमतील. त्या टम्म फुगलेल्या फुलक्या मार्मिक टिचकी मारून फोडल्या की पचायला हलक्या होतील व त्या खाल्ल्यानंतर मस्त मेजवानीच्या डुलक्याही लागतील... त्यावेळी आम्ही लेखन क्षेत्रातले उमेद्वार होतो. अजूनही आहोतच, परंतु तेव्हा फारच नवखे होतो. पेपर चाळायचे, 'निवेदने' कॉलम भरारा वाचायचा, पटतील ते विषय पत्त्यांसह उतरवून घ्यायचे. अन् कागद पेन घेऊन लेखनसमाधी लावून घ्यायची. एकेका लेखासाठी चार पाच खर्डे होत. शेवटी हे लिहू की ते करता करता सगळेच उतरुन पाठवून द्यायचो. काय जे लागेल ते त्यांनीच वेचावे असा हवाला टाकून लेख प्रकाशित होण्याची वाट पहात रहायचं.

शितावरून भाताची परीक्षा होऊ शकते, एक-दोन माणसावरून भगव्याची लायकी निघते. हिंदू लोक काय भात आहेत काय ?

लेखक गांधीवादी यांनी शुक्रवार, 27/08/2010 07:40 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या सगळ्यांचे लाडके लुंगी पुचाट केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी 'भगवा दहशतवाद' असे संबोधून जो हिंदूंचा अपमान केला आहे तो हिंदू कधीच विसरणार नाही, आम्ही एक शब्द देखील तोंडातून काढला तर आमच्यावर आगपाखड होते काही पांढरपेशा लोकांची ह्य संकेत स्थळावर, पण हे लुंगी पुचाट वाट्टेल ते बडबडतात ते मात्र सगळे मुग गिळून गप्पा बसतात, अरे पण काहून सुद्धा थुंकायची लायकी नाही असल्या लोकांची. हिंदूंची सहनशीलता हि आता हळूहळू भेकडपना बनू पाहत आहे , काही पेटी मतांसाठी हे लोक समग्र हिंदू लोकांना दुखवू पाहतात, पण ह्यांना कोण अक्कल शिकवणार ?

खासदारांची पगारवाढ : ग्यानबाची मुलाखत

लेखक गंगाधर मुटे यांनी गुरुवार, 26/08/2010 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
खासदारांची पगारवाढ : ग्यानबाची मुलाखत सध्या खासदारांच्या पगारवाढीचा मुद्दा देशात सर्वदूर गाजतोय. खासदारांच्या पगारवाढीबद्दल सर्वसामान्य जनतेत विशेषत: शेतकरी वर्गात प्रचंड रोष असणारच, असे गृहीत धरून आलेली संधी "कॅश" करायला हवी, अशा उद्देशाने एका संपादकाने मला मेल केली. त्यातील मजकूर असा.