स्वातंत्र्यदिनाचा...
स्वतःच्या तंत्राचा अवलंब करुन इतरांना पारतंत्र्याची हवा खाऊ देण्याची सोय म्हणजे स्वातंत्र्य!
देश स्वतंत्र झाला. साठीच्या घरात पोचला. परंतु लोकांचं राज्य अजूनतरी स्वप्नच ठरलंय. लोकशाही अस्तित्वात आली म्हणजे स्वतंत्रता नव्हे.
स्वतःच्या तंत्राचा अवलंब करुन इतरांना पारतंत्र्याची हवा खाऊ देण्याची सोय म्हणजे स्वातंत्र्य!
देश स्वतंत्र झाला. साठीच्या घरात पोचला. परंतु लोकांचं राज्य अजूनतरी स्वप्नच ठरलंय. लोकशाही अस्तित्वात आली म्हणजे स्वतंत्रता नव्हे.
नागपंचमी:-
प्रतीवर्षी श्रावण शुक्ल ५ ला ही पूजा करायची पध्द्त आहे. नागाची मातीची मूर्ति किंवा घरातील देवपूजेच्या खोलीतील बाहेरच्या भिंतीवर काही भाग गोमयाने-शेणाने सारवून त्यावर पिवळ्या मातीने किंवा चंदनाने नागाची आकॄती काढून ही पुजा करतात. त्याचप्रमाणे एखाद्या पाटावर पाच किंवा नऊ फ़ण्यांच्या नागांची आकॄती काढून पुजा करण्याचीही पुष्कळ घराण्यात पद्धत आहे. नवनाग देवता किंवा अनंतादिनागदेवता असे या देवतेचे नाव आहे.
नवनागांची नावे पुढीलप्रमाणे:-
अनंतं वासुकिं शेषं पद्मनाभं च कंबलम !
ध्रुतराष्ट्रं शंखपालं तक्षकं कालियं तथा !!
आताच समजलेल्या बातमीनुसार गुरुवार दि.१२ ऑगस्ट रोजी रात्री झोपेतच त्यांचे निधन झाले. एक अविश्रांत धडपडणारा, कर्तबगार, करारी जीव मृत्यूला शांतपणे सामोरा गेला. त्यांना शेवटपर्यंत काहीही मोठे आजारपण नव्हते. सगळे काही अचानक घडल्याने त्यांचा मुलगा अभिजित इकडून लगेच जाऊ शकलेला नाही.
बीजिंग ओलम्पिक (८/८/८) चा गड यशस्वी सर केल्यानंतर,
शांघाय जागतिक प्रदर्शन २०१०, १ मे ला जगासाठी खुले झाले, जगातील १७५ पेक्षा जास्त देशांनी भाग घेतला आहे. हंग्पू नदीच्या काठी, ५ पेक्षा जास्त चौरस किलोमीटर मध्ये बसलेले हे प्रदर्शन जगातील सर्वात मोठे प्रदर्शन आहे. चांगले (कि सुंदर ?) शहर, चांगले जीवन (BETTER CITY, BETTER LIFE) ह्या तत्वावर असलेल्या ह्या प्रदर्शनाच्या एकूण ६ महिन्याच्या कालावधीत जगभरातून अंदाजे ७ करोड लोक भेट देतील अशी चीन ची अपेक्षा आहे. ह्या प्रदर्शनाची तारीफ करावी तेवढी कमीच.
गेली काही दिवस मिपावर बायका, आयटी, स्वयंपाक, ह्या विषयावर बरीच चर्चा झाली, त्यातून बरेच काही शिकायला मिळाले. आजूबाजूचे वातावरण नव्याने दिसू लागले. मात्र त्यातून काही नवीन विचारांना काहूर फुटत गेले. त्यातूनच हा लेख लिहिण्याचे ठरविले.मागे झालेल्या सर्व चर्चेचा विराम झाला आहे असे समजून (म्हणजे कुटुंब हे दोघांचे आहे, दोघांनी प्रेमाने एकमेकांना सांभाळून घेऊनच सर्व निर्णय घ्यायचे असते. असाच काही तो शेवटचा निर्णय ) एक नवीन विषयाला हाथ घालत आहे. (माझी लेखन शैली थोडी ढिसाळ असेल. नवीन लिहित आहे ना, तरी सर्व वाचकांनी आशय समजून घेऊन आपापले अनुभव, विचार सादर करावेत हि विनंती.)
पुणेरी विक्षिप्तपणा
_______________________________________________________
सदर लेख केवळ आपल्या मनोरंजनासाठी, माझा कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नाही.
_______________________________________________________
ही घटना 'मे २००७' मधली, या काळात मी 'चाणक्य मंडल परिवारचा एक अभ्यासक्रम' पूर्ण करण्यासाठी म्हणून पुण्यात सुमारे एक महिना वास्तव्याला होतो. सदाशिव पेठेतील एका विद्यार्थी गृहात मी आणि माझा मित्र राहत असताना आलेला हा एक गंमतीशीर अनुभव.
***
(वार: रविवार, वेळ: सुमारे १४:२०)