Skip to main content

समाज

बीप बीप - मोबाईल फोन - शाप की वरदान?

लेखक इंटरनेटस्नेही यांनी गुरुवार, 29/07/2010 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
बीप बीप - मोबाईल फोन - शाप की वरदान? सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्याला मोबाईल फोन ची इतकी सवय झालेली असते कि मोबाईल आपल्याजवळ नसला किंवा आपण तो घरीच विसरलो की जणू 'हेल्पलेस' झाल्याचे फिलिंग येते. मात्र, मोबाईल ची इतकी सवय होण्या मागे तो आपल्याला कनेक्टेड ठेवतो हे तर कारण आहेच, पण त्याशिवाय त्यातील इमेल, इंटरनेट, कॅमेरा, म्युझिक प्लेयर आदी अनेक सुविधांवर आपण अवलंबून असतो.

मी अनुभवलेली अमेरीका

लेखक शुचि यांनी बुधवार, 28/07/2010 22:12 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या सासूबाईंचा अनुभव त्यांच्या शब्दात - अमेरीकेत प्रवेश म्हणजे स्वर्गात प्रवेश मिळण्यापेक्षादेखील कठीण हे आजूबाजूंचांकडून ऐकून होते पण याचा साक्षात अनुभव आला काही एक वर्षांपूर्वी. कॉन्सुलेट्च्या फेर्‍या आणि त्यांचे १७६० फॉर्म्स भरता भरता नाकी नऊ आले होते, जीव मेटाकुटीला आला होता. दर वेळेस कॉन्सुलेटला जाते वेळी सिद्धीविनायकाचं दर्शन घडत असे आणि बाप्पाची आळवणी पण तो सोनियाचा दिनु काही उगवत नव्हता. आपल्या इंडीयन लोकांना तुमचा मुलगा जर "आय टी" मधे असेल आणि अमेरीकेत असेल तर व्हिसा मिळणं बरच सुकर होतं.

सौंदर्यास्वाद

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी बुधवार, 28/07/2010 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
सौंदर्य कशात नसतं? सगळ्यांत असतं, अगदी दगडाधोंड्यातही. परंतु त्यासाठी हवी सौंदर्यास्वादक दृष्टी. कलाकारी भावली की अदाकारी सुचते. त्यातूनच मग सौंदर्य मन लावून आस्वादण्याची नजर लाभते. अशा सौंदर्यदृष्टीमुळेच कधी वेड्यावाकड्या काष्ठातून सौष्ठवाचे शिल्प वेड्यासारखे अवतीर्ण होते तर कधी फटकाऱ्‍यांच्या शिंतोड्यातून बिनतोड असे चित्र कँनव्हासवर आकार घेते. कोणाला शब्दांचे सौंदर्य वाचावेसे वाटते तर कोणाला भावलेली सुंदरता शब्दांसह वेचाविशी वाटते. असे सौंदर्यपूर्ण वेचे वाचकांना भुलवतात, झुलवतात अन् खुलवतातही. कोणाला झाडाच्या खोडाची गोडी तर कोणाला खुणावते फांद्यांवरची जोडी.

औषध उतारे आणि आशिर्वाद

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी मंगळवार, 27/07/2010 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
ग्रंथपरिचय- औषधं उतारे आणि आशिर्वाद

मंत्रतंत्र बाबा बुवांच्या गप्पा चाललेल्या असताना एका मित्राने एक पुस्तक वाचायला दिलं. काहीशा नाखुशीनेच मी ते पाहिल. औषधं, उतारे आणि आशिर्वाद.

काही प्रश्न

लेखक जिप्सी यांनी मंगळवार, 27/07/2010 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
काही प्रश्न वेळ :- सकाळचे १०वा.काही मिनिटे स्थळ :- टिळक रोड वार्ड ऑफिस पुणे. खिडकी क्रं. ७ जन्म मृत्यू नोंदणी. मी :- नमस्कार,मला जन्म नोंदणी करायची आहे,फॉर्म द्या. कर्मचारी :- हा घ्या फॉर्म पण आज नोंदणी नाही होणार,आज आमचा कॉम्प्युटर बंद आहे. मी :- कधी होईल चालू ??? कर्मचारी :- काही सांगता येत नाही. मी :- अहो, एक तर तुमच ऑफिस २रा आणि ४था,शनिवार बंद,मी परवाच्या मंगळवारी आलो तर सकाळी १०:५० ला सुद्धा तुमच्या खिडकीत कोणीच नाही. आणि आज कॉम्प्युटर बंद आहे. मी धायरीतन इथ येतो १२ किमी यायला लागतंय मला फक्त एका कामासाठी आणि जर इथ आल्यावर तुमचा कॉम्प्युटर बंद असेल तर माझी फेरी वाया नाही काय गेली?

बाय

लेखक शुचि यांनी मंगळवार, 27/07/2010 08:24 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या सासूबाईंनी लिहीलेला त्यांच्या शब्दातील हा लेख - आजकाल खूपदा वेडं मन मागे मागे जातं आणि व्याकूळ आठवण येते ती बालपणीचा रम्य काळ घलवलेल्या वसई तालुक्यातल्या विरार गावाची. हळूहळू धूसर असं एक चौसोपी घर दिसू लागतं, पुढे मागे अंगण असलेलं. घराला मागे पडवी तर रांगोळीसाठी पुढे मोठ्ठा ओटा.परसदारी आम्हा मुलांसाठी करकर आवाज करणारा, साखळ्या-साखळ्यांचा भला थोरला झोपाळा. लहानपणी तर हा झोपाळा फारच प्रशस्त भासे. अंगणभर तगर, प्राजक्त, जाई-जुई, जास्वंद याव्यतिरीक्त आंबा, पेरू, चिक्कू,पपनस, जांभूळ, करवंद. मग काय मे महीन्यात आम्हा मुलांची मज्जाच मज्जा.

आपण मराठी लोक

लेखक पारुबाई यांनी सोमवार, 26/07/2010 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
सहज जाता जाता एक गम्मत सांगावीशी वाटली. आपल्या मराठी लोकांबद्दल काय बोलले जाते हे सांगण्याकरता हे लिहिते आहे. काल आम्ही इथे ओकलंड ,अमेरिका मध्ये शंकर एहसान लॉय यांच्या कॉन्सर्टला गेलो होतो.

स्वातंत्र्य सुर्या आता तरी प्रसन्न हो

लेखक राजे साहेब यांनी शनिवार, 24/07/2010 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
*नमस्कार ..** ** * * * * .....जरूर करा.....हीच काळाची गरज आहे.........* * * लक्ष द्या हिंदूंनो, *( **हिंदू** - "सिंधु नदीच्या सभोवताली वसलेले..."हिंदू"......यात धर्म भेद नाहीच नाही". ) * गुढीपाडवा म्हणजेच छत्रपति संभाजी महाराज पुण्यतिथी. पाडवा. हिंदुं नववर्ष दिन. या दिवशी हिंदु घरोघरी गुढ्या उभारतात. त्याची 'याद' मनात ठेऊन औरंगजेबाने आजची संध्याकाळ निवडली होती.

स्त्रियांचे वर्चस्व

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शनिवार, 24/07/2010 08:29 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या नदीकाठाला लागून एक झोपडपट्टी आहे. आडवी तिडवी वाढलेली, कोणाची भीडभाड न ठेवणारी, आपल्याच मस्तीत जगणारी. याच वस्तीत एक 'अफलातून' जमात राहते. ह्या जमातीत पूर्णपणे स्त्रियांचं राज्य आहे, त्यांचीच हुकूमत चालते, त्या म्हणतील ती पूर्वदिशा मानली जाते. पुरुषाला दुय्यम लेखलं जातं. त्याच्यावर अधिकार गाजवला जातो! घरातली म्हणजे झोपडीतली छोटी मोठी कामे तोच करतो. पोरं सांभाळणे, धान्य निवडणे, दळून आणणे, धुणी धुणे, भांडी घासणे, पोरांचं आवरणे (त्यात शी शू आलेच.) इ. इ. (स्वयंपाक तेवढाच काय तो स्त्रिया करतात.) बाहेरचे आर्थिक व्यवहार स्त्रियांकडेच.