Skip to main content

समाज

राजीव'जींना ६६व्या जयन्तीनिमित्त विनम्र अभिवादन! ..... WE STILL MISS YOU..~~ RAJEEV'JI! LOVE YOU!

लेखक मृगनयनी यांनी शुक्रवार, 20/08/2010 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~ आज २० ऑगस्ट, २०१० राजीव'जी, तुमच्या ६६व्या जन्मदिनानिमित्त तुम्हाला विनम्र अभिवादन! आज तुम्ही असता.... तर देशाचे चित्र कदाचित वेगळे असते! ...... WE MISS YOU!

हा कुठला बरे आजार/विकार?

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 20/08/2010 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
हा कुठला बरे आजार/विकार? वाचनाच्या बाबतीत ग्यानबा फ़ार अभागी मनुष्य आहे. अभागी या अर्थाने की साहित्यिक क्षेत्रात विपुल साहित्य उपलब्ध असूनही ते जास्तीत जास्त वाचण्याचे भाग्य त्याला फ़ारसे लाभले नाही. कधी आर्थीक स्थितीमुळे पुस्तके विकत न घेऊ शकल्यामुळे तर कधी भौगोलीक स्थितीमुळे पुस्तके अनुपलब्ध असल्यामुळे असे घडले असावे. पण हे सत्य असले तरी मात्र पुर्णसत्य नाही. खरे हे आहे की त्याला एक आजार आहे. आणि तो आजार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्याला वाचायला खूप आवडतं, खूपखूप आवडतं. विषयाचेही बंधन नाही, काहीही आवडतं.

भटकंती झाली सफल

लेखक सुनिल पाटकर यांनी गुरुवार, 19/08/2010 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
या लेखातून आंबिवली गणी आदिवासी वाडीचे दर्शन मी तुम्हाला घडवलं पाणी, रस्ता, वीज अशा मूलभूत सुविधांपासून दूर असलेल्या महाड तालुक्‍यातील आंबिवली येथील गणी आदिवासी वाडीला अखेर प्रकाशाचा किरण दिसला, तो शेअर संस्थेच्या माध्यमातून. 1स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रथमच या गावाला विकासाचा प्रकाश दिसला. सरकारी अधिकाऱ्यांचे पाय या वाडीला लागले.

शिवाजी महाराज

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी मंगळवार, 17/08/2010 14:57 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या शुक्रवारी वडिलांच्या शाळेत गेलो होतो . तिथे पोरांना इंटरनेट शिकवले मस्त मजा आली .. मी त्यांना गुगलचा उपयोग सांगितला आणि जेव्हा मी विचारले तुम्हाला काय शोधायला आवडेल ... पाहिलं नाव होत ... शिवाजी महाराज

खळ्ळ खटॅक

लेखक तिमा यांनी सोमवार, 16/08/2010 20:49 या दिवशी प्रकाशित केले.
बाबा मोबाईलवर कोणाचे तरी डॅमेजिंग एक्झरसाईज घेताहेत. आई मोबाईलवर गॉसिप करत खिदळते आहे. सोनु वर्तमानपत्र वाचायचा प्रयत्न करतो आहे. सोनु : बाबा बाबा, खळ्ळ खटॅक म्हणजे काय ? बाबा : अरे, व्हिडिओमधे चेहेरा दाखवू नका म्हणजे झालं तर. बाकी साहेब सांभाळून घेतील. सोनु : आई, खळ्ळ खटॅक मंजे काय ? आई : ते तुझ्या बाबांना विचार रे! अगं, तर मी काय म्हणत होते ? ....... सोनु : बाबा सांगाना ! (तेवढ्यात बाबांचा फोन संपतो) बाबा : हं, सोन्या, मी सांगतो हं! कांच फुटली की आवाज कसा येतो माहिती आहे ना ? तोच तो आवाज. सोनु : बाबा, पण मॉलमधे कशी काच फुटेल ?

पाकिस्तानात पुराला भारतच जबाबदार आहे (?).

लेखक संजयशिवाजीरावगडगे यांनी सोमवार, 16/08/2010 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
पाकिस्तानात पुराला भारतच जबाबदार आहे (?). भारतानेच सतलज आणि बियास या नद्यांमधून जास्त झालेले पाणी सोडले. आता मदत देऊन भारत जखमेवर मीठ चोळत आहे, असा फालतुपणा पाकिस्तानातील वर्तमानपत्रांनी सुरू केला आहे. भारतानेही काही लाखांची मदत देण्याची तयारी दाखविली आहे. आता जगाच्या डोळ्यांत धूळफेक करण्यासाठी मदत दिली जात आहे,'' असा दावा "नवा-ए-वक्त' या पाकिस्तानातील ऊर्दू वर्तमानपत्राने केला आहे. पहा कुत्र्यांचे (शेपुट) वाकडे ते वाक डेच !॒! (आपल्या परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. एम.

भाषाभान : पुस्तक परिचय

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 15/08/2010 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
'भाषाभान' या डॉ. नीलिमा गुंडी यांच्या पुस्तकात भाषा आणि संस्कृती यांविषयीच्या मार्मीक निरीक्षणांवर आधारीत काही ललित लेख आहेत. 'भाषाभान' मध्ये ललित आणि वैचारिक स्वरूपाचे लेख समाविष्ट केले आहेत. भाषेविषयीचे भान धारदार करण्याचे काम या लेखांद्वारे होते. यातील डॉ. अशोक रा. केळकर आणि डॉ. नागनाथ कोतापल्ले या दोन जेष्ठ नामवंत अभ्यासकांच्या यातील मुलाखती विचारांना चालना देणार्‍या आहेत. लेखीकेने प्रस्तावनेत जरी 'भाषाविषयक', 'भाषेचे' अशा अर्थाचे शब्द वापरले असतील तरी ते शब्द एका अर्थाने 'मराठी' या भाषेसंदर्भात आलेले आहे.

स्वातंत्र्यदिनाचा...

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी रविवार, 15/08/2010 05:34 या दिवशी प्रकाशित केले.
स्वतःच्या तंत्राचा अवलंब करुन इतरांना पारतंत्र्याची हवा खाऊ देण्याची सोय म्हणजे स्वातंत्र्य! देश स्वतंत्र झाला. साठीच्या घरात पोचला. परंतु लोकांचं राज्य अजूनतरी स्वप्नच ठरलंय. लोकशाही अस्तित्वात आली म्हणजे स्वतंत्रता नव्हे. लोकशाहीच्या तंबूलाच भ्रष्टाचाराचा बांबू आधार देऊन दिमाखात उभाय. एकेका मताला कितीतरी महत्त्व आलंय, आणि त्यामुळेच लालची मतदारराजा एका क्षणिक मोहापायी आपले मतदानाचे स्वातंत्र्य विकून टाकतो. मताच्या प्रत्येक बटनाला नेता अमूक तमूक रक्कम अदा करीत असतो. हे सर्वश्रुत उघड गुपित आहे. अशी ठराविक संख्येची बटने विकत घेतली की खुर्ची फिक्स!

नागपंचमीच्या निमित्ताने

लेखक बज्जु यांनी शुक्रवार, 13/08/2010 23:45 या दिवशी प्रकाशित केले.
नागपंचमी:- प्रतीवर्षी श्रावण शुक्ल ५ ला ही पूजा करायची पध्द्त आहे. नागाची मातीची मूर्ति किंवा घरातील देवपूजेच्या खोलीतील बाहेरच्या भिंतीवर काही भाग गोमयाने-शेणाने सारवून त्यावर पिवळ्या मातीने किंवा चंदनाने नागाची आकॄती काढून ही पुजा करतात. त्याचप्रमाणे एखाद्या पाटावर पाच किंवा नऊ फ़ण्यांच्या नागांची आकॄती काढून पुजा करण्याचीही पुष्कळ घराण्यात पद्धत आहे. नवनाग देवता किंवा अनंतादिनागदेवता असे या देवतेचे नाव आहे.

सावरकर आजोबा गेले.

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 13/08/2010 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
आताच समजलेल्या बातमीनुसार गुरुवार दि.१२ ऑगस्ट रोजी रात्री झोपेतच त्यांचे निधन झाले. एक अविश्रांत धडपडणारा, कर्तबगार, करारी जीव मृत्यूला शांतपणे सामोरा गेला. त्यांना शेवटपर्यंत काहीही मोठे आजारपण नव्हते. सगळे काही अचानक घडल्याने त्यांचा मुलगा अभिजित इकडून लगेच जाऊ शकलेला नाही. मागल्या वर्षी आजोबांची भेट इथे झाली आणि त्यांच्या अनुभवांवर आधारित लेखमाला मला लिहिण्याचे भाग्य प्राप्त झाले हा माझ्या आयुष्यातला एक मोठा आनंदाचा आणि आगळ्या समाधानाचा काळ होता. त्यांचे थोडे तरी अनुभव शब्दबद्ध होऊ शकले हा मोठा योगच.