आतल्या आत ढवळतं
आणि ज्जोरात उठते कळ
पण तिच्या मते आजकाल
मला लागलाय कवी चळ..
मग, ती समोर असली की
करतो थोडी वळवळ
आतली वेदना लपविण्यासाठी
आणतो उसनं बळ..
पण, ती ही अशी चलाख
गाठतेच माझ्या मनाचा तळ
म्हणते, बस्स झालं तुझं नाटक
नाहीतर मी काढीन इथून पळ..
माझे उर्मी दाबून ठेवण्याचे
प्रयत्न होतात निष्फळ
तिच्या ओरडण्याने भानावर येतो
पण जखम वाहत राहते भळभळ..
अरे, कविता म्हणजे नसते
प्रत्येकाच्या हातचा मळ
उगाच लिहावसं वाटलं म्हणून
सोडायचे शब्दांचे नळ..
काही कामधंदा करू नको
नुसत्याच भावना दळ
हा रोग जडलाय तुला
पण होतोय माझा छळ..
पण मी आता कोडगा होतोय
ऐकून सोडून देतो सरळ
पुन्हा आतमध्ये ढवळलं की
शब्दांचीच ओकतो गरळ..
वाचने
2050
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
ओह गॉड! चांगलं चाललयं.
श्रियाजी तुम्ही दाखवलेल्या
In reply to ओह गॉड! चांगलं चाललयं. by श्रिया
जोरात लागते पळ असं विडंबन करा
+१
In reply to जोरात लागते पळ असं विडंबन करा by नाना चेंगट
राजकुमार सर ,त्या,निमित्ताने
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
आवं चेंगटांचे नाना, आधी
In reply to जोरात लागते पळ असं विडंबन करा by नाना चेंगट
ओ ते
अहो, नवकवीला येणार्या कळा
In reply to ओ ते by इरसाल
ढगाला लागली कळ आठवले!!!
सर एकदम बरोबर, ढगाला कळ लागली
In reply to ढगाला लागली कळ आठवले!!! by बॅटमॅन
'पोटात उठते कळ....'
अधिराज सर
सूड सर, वडिलधार्या माणसांचा
In reply to अधिराज सर by सूड
जोरात लागते कळ ,
खबो शेट जावा तिकडे, परसाकडे
In reply to जोरात लागते कळ , by खबो जाप
आहो तुमचे म्हणणे बरोबर आहे हो
In reply to खबो शेट जावा तिकडे, परसाकडे by अधिराज