काळी पिवळी..
(पूर्वप्रकाशितः मनोगत दिवाळी अंक २०१२)
’सरदारजी, उजवी कडे वळा आणि बरोब्बर दोन बिल्डिंगच्या मधोमध थांबवा!’
मग टॅक्सी चाळीच्या कायमस्वरुपी सताड उघड्या असलेल्या फाटकातुन आंत शिरायची आणि मी वडीलांच्या हातातुन रुपयाची नोट सरदारजींच्या पुढे करायचो. दचकु नका, ही ६० च्या दशकातली गोष्ट आहे. त्या काळी स्कूटर पेट्रोल पंपावर गेली तर टाकी भरुन झाल्यावर पांचाची नोट देता सुटे पैसे परत येत असत. अर्थातच टॅक्सीचे किमान भाडे तेव्हा एक रुपया होते, कदाचित ८० पैसेसुद्धा असेल. ठाण्यात टॅक्सी हा प्रकार केवळ भिवंडीच्या समाईक फेरीपुरता, शहरात फिरण्यासाठी नाही.
मिसळपाव