Skip to main content

आरक्षण

लेखक वेल्लाभट यांनी शुक्रवार, 15/02/2013 या दिवशी प्रकाशित केले.
अनुसूचित जाती जमातींना शिक्षणात आरक्षण झालं, महिलांना सगळीकडे आरक्षण झालं, आता ठराविक जातींना बढतीत आरक्षण म्हणतायत; असं ऐकलं मी की आणखी काही मंडळी आपापल्यासाठी आरक्षणाचे प्रस्ताव मांडणार आहेत. जसं, जाड्या माणसांना सौंदर्यस्पर्धांमधे आरक्षण नाचता न येणा-यांना नृत्यस्पर्धेत आरक्षण गाता न येणा-यांना गायनस्पर्धांत आरक्षण टक्कल असणा-या लोकांना शॅम्पूच्या अ‍ॅड्स मधे आरक्षण दुचाकीधारकांना कार रेस मधे आरक्षण सॉफ्ट ड्रिंक पिणा-यांना बार मधे आरक्षण.... ...यादी खूप मोठी आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2572
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

popcorn

नवीन सभासदांना मिपाच्या बोर्डावर आरक्षण..... मिळालेच पाहिजे :)

हम्म.. तुमचे सदस्यनाम बाकी यथार्थ बघा एकदम.

In reply to by बॅटमॅन

समजले नाही बॅट्या :( वेल्ला म्हणजे अमेरिकन इंग्लिशमध्ये ब्युटीफुल किंवा इसाबेल चा शॉर्टफॉर्म. मग भट कसे?

@ प्रथमः होय हो. @ अभ्या: राईट ! @ बॅटमॅन/अभ्या: हिंदी (किंबहुना पंजाबी) अर्थ अभिप्रेत आहे. वेल्ला:- रिकामटेकडा.

In reply to by अविनाशकुलकर्णी

मिपा मध्ये आमच्या धाग्यांना आरक्षण मिळेल का? >>>> =)) =)) =)) फुटलो च्यामायला ! बाकी जिलबीभट , सध्या , बहुधा, आखिल मिपा जिलबीवाटप केंद्राचे अध्यक्ष श्री स्पा, परदेशात टुर वर असावेत, नाहीतर आतापर्यंत तुम्हाला मिळाल्या असत्या, शुभेच्छा

पूर्वीचे वैभवशाली दिवस आठवून अंमळ गहीवर येतो. फक्त बुद्धीमान लोकांनाच शिक्षणाचा हक्क ठेवल्याने सुयोग्य लोकांचा वावर सुयोग्य ठिकाणी झाला. त्या काळी अणूविज्ञान परमोच्च स्थानी पोहोचले असून, भारताचे अवकाशयान एक अब्ज लाख खर्व प्रकाशवर्ष दूरच्या ठिकाणी जात असे. त्या काळचे काही टॅब्लेट पीसी नुकतेच सापडले असून त्यावरूनच आयपॉडचा अविष्कार झाल्याचे मानले जात आहे. आधुनिक काळात न्यूटनने सांगितलेले तीन नियम हे नूतनशास्त्रींच्या ग्रंथातून घेतल्याचे बोलले जाते. या ग्रंथांचीअनेक पाने गहाळ झाली असून त्यात हजारो नियम असण्याची शक्यता आहे. न्यूटन ला केवळ तीनच नियम सापडले असावेत. पा-याच्या विमानांचे एक वेळापत्रक केळशीच्या टेकडीखाली सापडले असून संपूर्ण भारतभर त्यांची सेवा होती असे मानले जाते. अत्याधुनिक कार्सचा त्या काळच्या प्रगत तंत्रज्ञानानुसार सुळसुळाट असून एसी ऐवजी कारला मातीचा मुलामा दिल्याचे मृच्छकटीक या ग्रंथातल्या आरेखनावरून सिद्ध झालेले आहे. युद्धशास्त्रामधे क्षेपणास्त्रे आणि रणगाडे यांचा विकास हआरो वर्षांपूर्वीच झालेला होता. अशा प्रकारे सर्वत्र विद्वत्ता आणि विद्वान यांचा संचार जाहला असताही मुघल आणि इंग्रज यांनी आपले राज्य प्रस्थापित करून वाटोळे केले आणि त्यांच्या कमअस्सल विद्येमुळे देशाची अधोगती झाली. - दु:खी खट

धाग्याचे नाव वाचुन मोठ्या अपेक्षेने आलो होतो. आमचा हिरमोड केल्यामुळे वेल्लाभट ह्यांचा त्रिवार निषेध.