Skip to main content

समाज

शिक्षणाच्या नावानं चांगभलं !

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 29/05/2015 या दिवशी प्रकाशित केले.
शिक्षणाच्या नावानं चांगभलं ! ( मध्यंतरी R. H. Reeves या शिक्षणतज्ञाची ‘The Animal School’ ही कथा वाचनात आली. तशा बऱ्यापैकी माहित असलेल्या या कथेचे मराठीकरण आणि डिटेलीकरण करून आपल्या समोर ठेवत आहे! लवकरच आपल्याही मुलांच्या शाळा सुरु होतील! हे औचित्य साधून आपणही निरीक्षणं, नोंदी आणि आत्मपरीक्षण करायला काय हरकत आहे?) आधुनिक जगातील आव्हानांना समर्थपणे भिडता यावे म्हणून जंगलात, प्राण्यांसाठी एक शाळा सुरु करायचे ठरले. शाळा म्हटले कि अभ्यासक्रम आला! त्यांनी मग परंपरेला छेद देत, विविध क्षमतांचा विकास करणारा क्षमताधिष्ठीत अभ्यासक्रम सुरु केला.

उर्जा घड्याळ

लेखक खेडूत यांनी मंगळवार, 26/05/2015 या दिवशी प्रकाशित केले.
कांही वर्षांपुर्वी विद्युत उर्जा मोजणी आणि विजेची अभियांत्रिकी हिशेब तपासणी या क्षेत्रात काम करायची संधी मिळाली. त्याकाळी आम्ही (पक्षी: टीम)ठिकठिकाणी फिरून विविध संस्था, उद्योग, पाणीपुरवठ्याची पंपिंग केंद्रे, साखर कारखाने , रस्त्यावरचे दिवे यांचे उर्जा परीक्षण करत असू. उर्जा म्हणजेच पैसा … त्यामुळे निर्मिती, वितरण, गळती , यातली मोजणी आणि वसुली यात प्रचंड तफावत असते. वीजेच्या वितरणामधून कोट्यावधीचे घोटाळे राजरोसपणे सुरु असतात, '' घोटाळा आवडे सर्वांना '' हे आपलं अघोषित ब्रीदवाक्य असल्यागत सगळं सुरळीत चालू असतं.

म रा.वि.म.मं. मधील एक दिवस

लेखक शि बि आय यांनी मंगळवार, 26/05/2015 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमी प्रमाणे लोकलचे धक्के खाउन स्टेशनवर उतरलो आणि हुश्श केले. बुधवार असल्यामुळे अजून दोन फक्त दोन दिवस रेटायचे आहेत त्यातच बॉस नामक प्राणी दोन दिवस गायब असणार आहे ह्या सुखद कल्पनेमध्ये डुलत डुलत घरी आलो. घरी येताना आजूबाजूचा परिसर थोडा वेगळा वाटला खूप काहीतरी मिसिंग असल्यासारखे वाटले नंतर लक्षात आले. वीज नामक गोष्ट जी नित्यानेमाने सगळ्या घरात आपली उपस्थिती लावत असते ती गायब आहे( हाय मेरी फुटी किस्मत !) आता मेणबत्ती शोधण्यापासून सुरुवात करावी लागणार ह्याची मानसिक तयारी केली. पण म. रा . वि. म. मं. ने एक सुखद धक्का दिला घरी पोचायच्या आत वीज आली(?). चला सुटलो म्हणत घरी पोचलो ….

उडदांमाजी....

लेखक सस्नेह यांनी मंगळवार, 26/05/2015 या दिवशी प्रकाशित केले.
‘मॅडम, बाहेर काळे म्हणून एकजण भेटायला आलेत. येऊ देत का ?’ दहा मिनिटापूर्वीच मी शिपायाला बजावलं होतं, मिटिंगचं काम आहे, एक तास कुणाला आत सोडू नको. आणि दहाच मिनिटात कोण काळे उगवला ? मी कपाळाला दोन सुरकुत्या पडून विचार केला. काळे नावाची कुणी व्यक्ती डोळ्यासमोर येईना. ‘थोडा वेळ थांबा म्हणावे..’ मी म्हटले. इतक्यात शिपायाच्या मागून एक ओळखीचा चेहेरा उगवला. ‘मॅडम, येऊ का आत ?’ ‘अरे, तुम्ही होय, काळे ? या, या ना !’ काळेला बघितल्याबरोब्बर माझी बत्ती पेटली. तीन वर्षापूर्वी माझे सोलापुरातल्या एका तालुक्याच्या गावी पोस्टिंग झाले असताना तिथे माझ्या हाताखाली दोन शाखा अधिकारी होते. हा काळे आणि दुसरा गोरे.

वेगळ्याचं वेगळं नशीब

लेखक विनीत संखे यांनी सोमवार, 25/05/2015 या दिवशी प्रकाशित केले.
ही पुस्तकं एक अजब गोष्ट आहे. मानवाच्या सर्व संभाषिक प्रकारांमधला सर्वात जास्त "हेकेखोर" प्रकार आहे हा … खरंच !!! माझे विचार, माझ्या संवेदना, माझा न्याय आणि माझाच निवाडा… माझ्या भिंगांमधूनच जग पहा … नाही आवडलं तर वेळीच प्रतिक्रिया द्यायची सोय नाही … पुस्तक पूर्ण वाचल्याशिवाय तर शक्यच नाही … लेखकाला सगळं छापून आल्यावर मग प्रतिक्रियांची पत्र , इमेल पाठवून काय उपयोग?

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ४६

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 21/05/2015 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. आणि त्याची सुरवात ह्या आजच्या दिवसापासून केली पाहिजे. फक्त आजच्या दिवसापासून..कारण तोच आज ठामपणे आपल्या हातात आहे! पुढे चालू... =============================== तेंव्हा हिला हिच्या आईकडे सोडून आलो..तो आलो खरा. पण इकडे आल्यानंतर कामात अज्जिबात म्हणजे अज्जिबात लक्ष लागे ना. शिवाय त्यांच्याकडे असलेला तो टेलिफोन म्हणजे ..ते मॉडेल जितकं जुनं होतं..त्याहुनहि तिथे मिळणारी फोनसेवा जुनाट दर्जाची होती.

पानिपत

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी बुधवार, 20/05/2015 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय अमोल, काही क्षण हे काही विशिष्ट व्यक्तींबरोबरच उपभोगायचे असतात. अन्यथा एक तर ते पूर्ण उत्कटतेने भोगता येत नाहीत किंवा त्यांची थेट माती तरी होते. माझ्याही मनात असे काही क्षण आहेत जे कधी माझ्या वाट्याला आलेच तर त्या वेळी तू बरोबर हवा आहेस. मी रायगडावर महाराजांच्या समाधीसमोर उभा राहीन तर तेव्हा तू तिथे असावास. कधी तोरण्याच्या बिनी दरवाजातून आत शिरेन तर तेव्हा तू बरोबर असावास. एखाद्या माळरानावर किंवा जंगलात नदीच्या किनारी टेंटमध्ये रात्रभर गप्पा मारायचा योग आला तर तो तुझ्याच बरोबर यावा.

चला हवा येऊ द्या (कोल्हापूर ची) भाग ३ अंतीम.

लेखक नाखु यांनी बुधवार, 20/05/2015 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वीची हवा भाग २ या नंतरचे व्यक्तीमत्व हे सध्या पुण्यात स्थाईक असले तरी अस्सल बदलापुर येथील आहे.त्यांचे नाव जरी हूड असले तरी.. निटेश सांगळे: तुम्ही काहीही वाचताय जरा नीट लिहून आणत जा.त्यांचे नाव सूड असे आहे काय सू$$$$$ड उगाच चुकीची नावे वाचता आणि मला कामाला लावता. ध.स.: अस्का, नाही जरा नीट लिहित जारे पोरांनो एक दिवशी माझा आय डी उडवाल मिपावरून,
सूड साहेब तुम्हाला सांगतो ही पोरं फार चुकीचे लिहितात हो आणि मला त्याची बोलणी खावी लागतात.

सुंदरीचे ओझे

लेखक शिव कन्या यांनी बुधवार, 20/05/2015 या दिवशी प्रकाशित केले.
तान्झेन आणि इकीदो पायी प्रवास करीत होते. नुकताच मुसळधार पाउस पडून गेला होता. अधून मधून पावसाच्या हलक्या सरी येतच होत्या. चालता चालता ते एका खेडेगावापाशी पोहचले. तिथे एक अरुंद ओढा होता. त्यातून चिखलाचे पाणी वहात होते. हे दोघे तिथे जरा थांबले. तेवढ्यात, तिथे एक कमनीय बांध्याची, कोमल तनुची, तरुण, जपानी रमणी आली. पावसाने स्वच्छ झालेल्या हवेत तिचे मुखकमल अधिकच प्रसन्न दिसत होते. ती आपला फुलाफुलांचा रेशमी किमोनो सावरत ओढ्यापाशी थांबली. परंतु त्या बिचारीला, प्रयत्न करूनही तो ओढ काही ओलांडता येईना. तिची ती अवस्था पाहून, तान्झेन पुढे झाला.

मदत हवी आहे.

लेखक रामदास यांनी मंगळवार, 19/05/2015 या दिवशी प्रकाशित केले.
या वर्षी जुलै महिन्यात त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे. या विषयावर एका पुस्तकाच्या शब्दांकनाचे माझ्याकडे आले आहे.एकाच वेळी दोन भाषांमध्ये हे पुस्तक तयार करताना माझ्यावर ताण आला आहे. या पुस्तकाची काही प्रकरणे लिहायला मला मदत हवी आहे. तयार झालेल्या प्रकरणांचे भाषांतर करण्यासाठी पण मदतीची आवश्यकता आहे.त्या खेरीज उपलब्ध असलेल्या विदाचे आलेख वगैरे बनविण्यासाठी पण मदत हवी आहे.मानधन आणि श्रेयनिर्देश मिळेल. कृपया संपर्क करा . रामदास ९५९४११०८६१ किंवा nathconsulting@gmail.com