पाणी घेऊ का विचारायला म्हणून सायली बंगल्याचे गेट उघडून आत गेली. दरवाज्यावर बेल होती, पण ती वाजली नाही, म्हणून सायलीने दरवाज्यावर थाप मारली. थाप हलकीच होती पण दरवाजा थोडा उघडला, बहुतेक तो लॉक केला नव्हता. कुणी आहे का घरी म्हणत तिने दरवाजा अजून थोडा उघडून विचारलं, पण काही उत्तर आले नाही. सायलीने आता दरवाजा पूर्ण उघडला आणि आत डोकावलं...
****************************************
ना मी शिक्षक आहे ना गणित तज्ञ ना कथाकार. मी इन्स्ट्रक्शनल डिझायनर - इ लर्निंग कोर्सेसचे स्क्रिप्ट लिहिणारा व्यावसायिक. त्या कलेचा/विद्येचा/ज्ञानाचा उपयोग करून शैक्षणिक साहित्य निर्मितीचे प्रयत्न करतोय. अभिप्राय, सूचना, बकेट लिस्ट ... जरूर कळवा. स्तुती आणि उत्तेजना बरोबर मनातलं लिहायला हरकत नाही. गणिताचे शिक्षण गोष्टीचा आधार घेतच पुढे कसे जाईल हा कळीचा मुद्दा...
****************************************
पुण्याचा दक्षिणेकडे चांदणी चौकातून बाणेरकडे जाताना उजवीकडे मोठ्या 6 मजली बिल्डिंग आहेत, त्यातल्या एका बल्डिंग मध्ये सायली राहाते. बिल्डींगच्या मागच्या बाजूला एक मोठी बंगल्याची सोसायटी आहे. मोठ्या बिल्डिंग मुळे रस्त्यावरून दिसत नव्हती. सोसायटी टेकडीच्या पायथ्या पर्यंत उभी आडवी ऐसपैस पसरली होती. सोसायटीतील घरं छोटी पण टुमदार होती. प्रत्येक घराच्या बाजूला मोकळी जागा होती. कुपणाला झुडपं, वेली, फुलांची झाडे लावून घरं आपापली स्वतंत्र ओळख सांगत होती. सि एच इ एम आय डी एल ऑफिसर्स को ऑप सोसायटी असं काहीस लांबलचक नाव होतं. त्यामुळे सगळे त्याला केमिड सोसायटी म्हणायचे.
केमिड सोसायटीतून टेकडीतल्या खाणीपाशी जायला एक पाऊल वाट होती. निचरा नसल्यामुळे खाणीमधे पावसाचे पाणी साठले होते. पाण्यात शेवाळे तर इतकं होते की पाणी दिसायचेच नाही, एक हिरवा गालिचा घातल्यासारखे वाटायचे. खाणीच्या आतली बाजू सरळ एकसांध काळा दगडाची भिंत बांधल्या सारखी तुळतुळीत दिसायचा. खाणींच्या बाजूने वर जायला पाऊलवाट होती. तिथुन वर गेलं की डाव्या बाजूला चतुःश्रींगीची टेकडी आणि उजव्या बाजूला वेताळ टेकडी. सरळ पुढे खाली गोखलेनगर.
सायली शनिवार रविवार संध्याकाळी तिच्या चार बेस्ट फ्रेंडसच्या ग्रुपबरोबर टेकडीवर जायची. बिल्डिंगमधे आणि आजूबाजूला मुलं बरीच होती पण सायलीच्या बेस्ट फ्रेंड ग्रुपमधे चोघेच होते. कधीकधी परीक्षा आणि क्लासमुळे चौघांच्या वेळा जुळत नव्हत्या, पण सायलीला एक्सप्लोर करायला आवडायचं म्हणून ती एकटी सुद्धा टेकडीवर जात होती. खूप लोक टेकडीवर जायचे त्यामुळे सायलीच्या आई काही तिला ग्रुपबरोबर जाऊ द्यायची. पण आज ती एकटीच होती. चारच्या सुमारास बोर झालं म्हणून टेकडीवर निघाली. ऊन खूप होत म्हणून अर्ध्यातूनच मागे वळली. त्यात तिला खूपच तहान लागली होती. केमिड सोसायटीच्या पहिल्याच घरात बाहेर पाण्याचा नळ होता. पाणी घेऊ का विचारायला म्हणून सायली बंगल्याचे गेट उघडून आत गेली...
तुमचे लेख बुकमार्क करून ठेवतो
ही पूर्ण लेखमाला अत्यंत
साहित्याची लोकप्रियता
राजा साहेब