स्मायली जीवन माझे
स्मायली जीवन माझे
ताजे...स्मायली जीवन माझे!
धागा असो प्रति साद असू दे
सावकाश किंवा घाई असू दे
कुणी हसो अथवा तो रुसु दे, देत पुढे मज जाणे !
स्मायली...
ताजे...स्मायली जीवन माझे!
स्मायली...
ताजे...स्मायली जीवन माझे!
स्मायली...मित्रांनो, टाईम पास चा हा विरंगुळा! घाला भर शब्दांची, अर्थ होऊ द्या खुळा!!देणे - एक कला... अनेक गोष्टींच्या एकमेकातील व्यवहाराला एकत्रित नाव ‘देणे व दुसऱ्या बाजूने घेणे’ असे सामान्यपणे म्हणता येते. देणे ही एक कला म्हणून पाहू जाता - सल्ला प्रथम येतो. न मागता तो देणे ही घरच्यांची मेहेरबानी. तर सल्ला कला कला देता देता अशीलाचा खिसा रिता करायची कला वकील लोक जोपासतात. बायकोच्या भावाने दिलेला सल्ला मानभवीपणे ऐकून तो कटाक्षाने न पाळणे ही कला. सल्ल्याचे एक भाऊबंद - उपदेश.
चित्र १: विचित्रवीर्याची विचित्र मिरवणूक (चित्रकार: जेम्स गुर्ने)
यापूर्वीची कथा:
कुणी घडवून आणले 'महाभारत'? (भाग १)
मत्स्यगंधेची प्रतिज्ञा ( महाभारत भाग २)
मदनकेतु उवाच:
मुनिवर, तुम्ही शांतनुच्या मुलांची नावे ‘चित्रांगद’ आणि ‘ चित्रवीर्य’ होती म्हणून सांगितलेत, परंतु मी तर ‘विचित्रवीर्य’ असे नाव ऐकत आलेलो आहे?
नारदमुनी उवाच:
अरे, ती तर एक मोठी कथाच आहे.