मित्रहो, माझ्या साधा माणुस या काव्य संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याची छायाचित्रे देत आहे. या काव्य संग्रहाला विशेष प्रस्तावना ज्येष्ठ कवी शंकर वैद्य यांची
लाभली आहे, हे मी माझे परम भाग्य समजतो. या सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते यामध्ये दूरदर्शनचे अभय मोकाशी, विख्यात कवी अशोक बागवे,
अशोक लोटणकर, कवयत्री डॉ. अनुपमा उजगरे, साहित्य त्रैमासिकाच्या संपादिका सुहासिनी किर्तीकर इत्यादी. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या सोहळ्याची सांगता
काव्य संध्येने झाली.
गोखले यांची कविता हा त्यांचा उदगार आहे, माझ्या कवितेशी त्यांच्या कवितेची नाळ जुळते म्हणुन मी आलो.